माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त नरम पनीर रसगुल्ल्य्यासाठी तयार.

नवीन Submitted by झंपी on 2 July, 2019 - 14:06
>>>>>

धन्यवाद झंपी Happy

आज बर्‍याच दिवसांनी पुन्हा धाग्याची प्रस्तावना वाचली.

सहस्त्रावधी प्रतिसाद अन अनेक भाग होणारे धागे माबोवर आहेत. त्यात हा एक. १८००+ प्रतिसाद झाल्याने याचा भाग २ काढावा अशी विनंती करतो.

पण तो मूळ धागाकर्तीनेच काढावा, अन हीच प्रस्तावना ठेवावी हा आग्रह.

कस्लं भारी पिठलं जमलंय ते! वाह!! 35.gif

काल म्हैसुरपाक केला. साहित्य प्रमाण बरोबर होते.
पण बेसनमधे (बॅटरमधे) पळीने तेल / तूप टाकायला लागल्यावर बॅटर एकदम कोरडे व्हायला लागले. वडी होईना.
मग पटकन थोडा साखरेचा पाक करुन वरुन घातला, तर जरा वडी जमली. पण फार ठिसूळ झालीये.
काय चुकलं??

पाकात बेसन जास्त वेळ राहीले का? कोरडे झाले का?

हा प्रकार एकदा करून झालाय. मी सगळ्या वड्या मोडून परत मिश्रण तूप घालून परतलं. तेव्हा जरा वड्यांमध्ये जीव आला.

धन्यवाद

परत करेन तेव्हा लक्षात ठेवते. पाक जास्त झाला असावा असेच वाटतेय.

(पुढच्या 15 मिनिटात उत्तर मिळालं तर बरं होईल.त्यांनतर मिळाल्यास पुढच्या वेळी उपयोग होईल.)
उडीद भिजवला वाटला काल, आज मेदू वडे तेल पित आहेत.मी किंचित बेसन रवा भेसळ केली पण उपयोग झाला नाही.एरवी दही वड्याला करते ते मस्त होतात.आज डब्याला करायचे आहेत तर धोका देत आहेत.मदत.

नाहीतर डब्या पुरते करून बाकीच्यांना दही वडा बाप्तिस्मा द्यावा लागेल असं दिसतंय.

दहिवडे पाण्यात टाकतात ना, मग पाण्यात ते सगळे तेल निघून जाते almost. 15-20 min आहेत का पाण्यात टाकायला?तेलकट नाही लागत.

डबे डीप्लॉय केले.2 वडे दिले.
तसे तर डबे करून उरलेल्या पब्लिक ला मेदू वडे हवे होते.दही वडे करायचा पर्याय निघाला पण तेल पितात म्हणून आणि तळलेले नको म्हणून आता त्या पिठात रवा मिसळून डोसे चटणी सांबार होईल ☺️☺️
आमचे सगळे बग आम्ही फिचर म्हणून विकतोच.

प्रत्येक फिचर हे फिचर नसून नवाच प्रोग्राम आहे असे समजून कस्टमर खायला लागले की समजायचे, मुरलेली सुगरण तयार झाली.

रच्याकने, मेदूवडे डाळ वाटून लगेच करतात ना? डाळ आंबवत ठेवत नाहीत की ठेवतात? उडीद डाळ वाटल्यावर वडे करतानाच इतकी सैल पडायला लागते की ठेवली तर सैरावैरा पळेल असे वाटते. Happy Happy

लगेच करायला वेळ नाही झाला(युट्युब वर एका ठिकाणी 45 मिनिट भिजवून, दुसरीकडे 6 तास भिजवून असे आहे.आम्ही रात्रभर भिजवून आमचाच हेका चालू ठेवला ☺️)
चटणी तयार आहे
रवा घातला सम प्रमाणात.
आता डोसे. ते बिघडले तर परत येतेच इथे.हिंमत हरायची नाय.लढत राहायचं.

म्हणे फीचर. Happy . आईची गमतीची भाजी, गमतीच थालिपीठ आणि शिळासप्तमी यातल्या गमतीचा शोध लग्न झाल्यावर पण खूप उशिरा लागला. सब मिले जुले है. Happy

दही वडे मस्त होण्यासाठी डाळ फक्त तीन ते चार तास भिजवून, हात दुखेपर्यंत फेटून लगेच्च करावे. तेल पीत नाहीत.

रात्रभर भिजवले हे चुकले. तीन ते चार तास भिजवून वाटून लगेच करा नाहीतर फ्रिज मध्ये ठेवा. डोशे होउन संपले ना चला किस्सा खलास.

'हात दुखेपर्यंत' या स्टेप ला वेगळा पर्याय आहे का >>>>

फिलिप्सचा फेट्या असतो न, आपण केक वगैरे करायला वापरतो तो, तो बघा वापरून....

उडीद डाळ फेटल्यावर एक ग्लासभर पाणी घेऊन त्यात पीठाचा छोटा गोळा टाकायचा. पूर्ण तरंगला तर नीट फेटले.

जास्त तेल प्यायला लागले तर रवा घालून डोसे करायची आयडिया आवडली. Happy

इथे फिलिप्स चा फेटा वाचून बराच वेळ ब्लँक झाले मग कळले की तो फेट्या आहे ☺️☺️
मुळात कोफ्ते कऱ्या बिऱ्या यांचा शोधच तळताना बिघडलेली भजी/कटलेट प्लॅन बी म्हणून ग्रेव्हीत ढकलून देण्यातून लागला असावा ☺️☺️

रात्रभर भिजवले हे चुकले. तीन ते चार तास भिजवून वाटून लगेच करा नाहीतर फ्रिज मध्ये ठेवा.>>>>>> +++१११११
मेदुवड्यांसाठी वाटून लगेच करायचे वडे, नाही तर तेल पितातच.

Pages