स्वैराचार ! (अंतिम भाग)

Submitted by अँड. हरिदास on 3 July, 2019 - 22:07

आपल्या तथाकथित उदात्त विचारांच्या व्याख्यानाचा सिद्धीवर किती फरक पडला, हे जाणून घेण्यासाठी सुबोधने सिद्धीकडे बघितलं.
डोळ्यात आग परंतु चेहऱ्यावरील मिश्किल हसण्याचे भाव पाहून सिद्दीच्या मनोभावणेचा त्याला अंदाज बांधता आला नाही...!

"मग, पटतंय का तुला?"

सुबोध ने सिद्दीला विचारलं;

"पटलं, अगदी पूर्णपणे पटलं.."

"प्रत्येक समाजात अशी काही माणसे असतात की, त्यांना समाजाच्या नितिनियमांची चौकट मान्य नसते; त्यांची प्रवृत्ती नियमांच्या भंगाकडे असते; कोणत्याही काळात आणि कोणत्याही समाजात दुष्टच ठरावेत अशी त्यांची मनोरचना असते. तुम्हीही त्याचं प्रवृत्तीचे आहात, हे मला पटलं..नुसतं पटलं नाही तर माझी खात्री झाली की नुसते तुमचे विचारच नाही तर तुमचा स्वभावही स्वार्थाने विकृत झाला आहे;"

" चांगल काय नी वाईट काय? काय योग्य, काय अयोग्य, कोणतं पाप आणि कोणतं पुण्य? नीती अनीती, यांच्या व्याख्या मला सांगता येणार नाही. कारण, या बाबी काल आणि परिस्थिती यांच्या सापेक्ष असतात. तरीही जगाच्या कोणत्याही कोपऱयात जे वागणे सुसंस्कृत वाटेल त्याला "पुण्य, चांगलं, योग्य,नीती" आदी नामाने संबोधित असतील. हे शब्द कोणतेही असले तरी त्यामागचा आशय एकच आहे. काळानुसार या शब्दांचा अर्थ बदलतो..संदर्भ बदलतात. परंतु त्यामागची सात्विक भावना आणि आशय प्रत्येक काळात एकच राहिला आहे..!
काळ बदलतोय, ही गोष्ट खरी आहे..दोन व्यक्तींनी विवाह न करता वैवाहिक आयुष्य जगण्याच्या लिव्ह इन रिलेशिनशिप नामक संकल्पनेला उचलून धरण्याइतपतचा सुज्ञपणा आज समाजात रुजू पाहतो आहे... ज्याच्या त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा हा मुद्दा. पण, त्यातही सहमती आवश्‍यक आहेच ना? आणि लग्न म्हणजे तरी काय? सहमतीच ना? एकमेकावर विश्वास ठेवणाऱ्या आणि सहमती असणाऱ्या जोडप्यांनी लग्न केलं काय, किंवा लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिले काय.. दोन्ही सारखेच. कारण, नाती ही विश्वासावर टिकत असतात..एकमेकातील संबंध आधुनिक असो कि पुरातन ते टिकवण्यासाठी आजही विश्वासाची जोड लागते. आधुनिक विचाराच्या नावाखाली कुणी स्वैराचार करत असेल तर त्याला कोणतीच विचारसरणी मान्य करत नाही...सुसंकृत समजत नाही. कारण शेण खायची प्रवृत्ती प्रत्येक काळात निषिद्ध मानल्या गेली आहे. 
बाकी, तुमच्या काही गोष्टि खऱ्या आहेत..फक्त त्याचे संदर्भ स्वार्थलोलुप वापरलेत...!
आजची स्त्री अबला राहिली नाही, हे तुमचे म्हणणे शंभर टक्के खरं...पण ती सबला झाली म्हणून तुमच्यसारखी विकृत झालेली नाही. तर तिच्यात स्वाभिमान निर्माण झाला आहे..एक काळ होता कि नवरा कितीही बाहेरख्यालीपणा करत असला तर बायको मन मारून त्याला सांभाळून घ्यायची..तिला पर्याय नव्हता..पण आज पर्याय आहे...कारण, आता ती अबला राहिलेली नाही...शेवटी इतकंच... पाप आणि पुण्य या कल्पना अमूर्त आहेत,अ‍ॅब्स्ट्रॅट आहेत..जगाच्या अंतापर्यंत त्या तश्याच राहतील...लग्न करून बायको घरात आणायची, आणि आधुनिक विचारांच्या नावाखाली बाहेर शेण खायचं...याला शिष्टाचार नाही तर व्याभिचार म्हणतात... संस्कृती नाही तर विकृती म्हणतात..!

..एव्हाना, सिद्दीची बॅग भरून झाली होती..सुबोधकडे तिरस्कारयुक्त कटाक्ष टाकून तिने घरातून बाहेर पाऊल टाकलं..ते कधीही माघारी परतणार नव्हतं...!

-समाप्त-

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवट आवडला.....
हाच शेवट अपेक्षित आणि उचित ठरेल.

Well done Happy ( फ़क्त ते जरा सिद्धी / सिद्दी चं बघा)

सिद्धी काहीतरी स्वैराचार करते आणि मग सुबोधचे डोळे उघडतात अशी काहीतरी स्टोरी असेल असं वाटलं होतं.
पण भाषणावरच आटोपली स्टोरी. Happy

सस्मित +1,

परंतु माझ्या मते हाही शेवट चांगल्या प्रकारे केलाय.

सर्व मान्यवरांचे मनस्वी आभार..आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया निश्चितचं मला लिहण्यास प्रेरणा देतील.. धन्यवाद

लग्नच झाले नसते किंवा लग्न(/करार) मोडले नसते.

> ज्याच्या त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा हा मुद्दा. पण, त्यातही सहमती आवश्यक आहेच ना? आणि लग्न म्हणजे तरी काय? सहमतीच ना? एकमेकावर विश्वास ठेवणाऱ्या आणि सहमती असणाऱ्या जोडप्यांनी लग्न केलं काय, किंवा लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिले काय.. दोन्ही सारखेच. > लग्न केलं काय, किंवा लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिले काय, किंवा ओपन-रिलेशनशिपमध्ये राहिले काय.. तिन्ही सारखेच (इतरांच्या दृष्टीने).
दोन व्यक्तींमधला अ/लिखित करार. त्यांना हव्या त्या टर्मस् अँड कण्डिशन्स टाकू शकतात.