जिवलगाssssssss

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 24 April, 2019 - 06:37

स्टार प्रवाह वर भव्य दिव्य स्टारकास्ट असलेली 'जिवलगा' मालिका नुकतीच (२२ एप्रिल) पासून सुरु झाली आहे. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, आणि मधुरा ( आडनाव आठवत नाहीये आत्ता, पण गुलाबजाम चित्रपटात सिद्धार्थ ची प्रेयसी दाखवली होती ती ) असे नावाजलेले कलाकार आहेत.

त्यांच्यापेक्षा सतीश राजवाडे मुळे ही मालिका पाहण्याची उत्सुकता आहे, कारण मालिकेची संकल्पना त्याची आहे,
तर उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शन केले आहे. विषय पण तसा बोल्ड दिसतोय थोडा.. विवाहबाह्य संबंध ( नवऱ्याला माहीत असते, असं )...
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा..
अजून कोणी पाहतं का ही मालिका???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्नील छान दिसतोय आणि कामही खूप छान करतोय. पहिल्यांदा आवडतोय स्वप्नील. >>>>>>> अगदी अगदी. पण विश्वास विधीला ' निखिलकडे परत जायची' जबरदस्ती करतो ते आवडत नाही. काल विधीने सुनावल त्याला ते चान्गल केल, त्याला विचारल की काव्या त्याच्याकडे परत आल्यावर तु तिच्यावर पूर्वीसारख प्रेम करशील का , तर म्हणाला की , माहित नाही! विधी त्याच्या प्लॅनप्रमाणे वागते, तिला स्वतःच डोक नाही का?

काव्याच म्हणण पटल की निखिलला अचानक कशी जाणीव झाली की त्याच विधीवर प्रेम आहे ते.

प्रिकॅप भयानक होता.

हो ना, पडलं तरी नाक वर. स्वतःच्या मोठ्या चुकीकडे दुर्लक्ष करून विधीने माफ करावं ही अपेक्षा. तिची चिडचिड, संताप रास्त आहे हे पटवून घेऊन तिला शांत होण्यासाठी वेळ न देता, ती चिडली की हा अजून जोरात ओरडतो. त्याने 4 वर्षे अफेअर केलं,पण तिने मात्र एका आठवड्यात क्षमा करावं अशी अपेक्षा दिसते. >>>>>>>> ++++++++१११११११११११ विधी डिवोर्स देते तर तर तिला चालती हो? Angry चोर तो चोर वर शिरजोर!

त्याच नाव गॅरेन्टर म्हणून आहे , गॅरेन्टर बदलता येतो. >>> अच्छा असं आहे होय. मी समजतेय पार्टनर. >>>>>>> बरोबर केल विधीने. हि डिझर्वज इट!

स्वप्निलला खुप गुडी गुडी रोल्सपेक्षा खरतर थोड्या डार्क शेड वाल्या (अगदी अ‍ॅन्टी हिरो नाही ) भुमिका छान जमतिल. >>>>>>> महागुरु असलेल्या 'रणान्गण' सिनेमात तो व्हिलन होता. ' माझी वेगळी भुमिका' असा गाजावाजा केला होता त्याने. चित्रपट पडला. त्याच्या रोलची कोणीच दखल घेतली नाही. 'चेकमेट' मध्ये मात्र त्याने छान काम केल होत. 'लाल ईश्क' मध्ये त्याचा डार्क शेड आहे अस प्रोमोवरुन वाटत होत. तो चित्रपट बघितला नाही.

किती वाजता असते ही मुख्य भाग. जेव्हा लावते तेव्हा ती छत्रीवली, मोलकरीण नाहीतर देवाची मालिका. रात्रीचा रिपीट बघता येत नाही.

विश्वास सायको आहे. त्याला लहानपणी आईच प्रेम मिळाल नाही म्हणून त्याने आपल्या मित्राच्या आईला भोसकल म्हणे. विनोदने त्याला लेखनाच करियर निवडायला सान्गितल तेव्हा कुठे तो नॉर्मल झाला. काव्यामुळे पुन्हा तो पहिल्यासारखा वागू लागलाय. एकतर तो विधिला जीवे मारेल किव्वा काव्याला.

पण मला एक कळत नाही जर विश्वासचा हा प्रॉब्लेम आहे, तर काव्या ४ वर्ष निखिलशी अफेयर करत होती तेव्हा हा गप्प का बसलेला? अफेअर कळल तेव्हाच खून करायचा होता ना काव्याचा.

इंटरेस्टींग झालीय सिरीयल आता, सस्पेन्स वाटतोय स्वप्निलच्या कॅरॅक्टरचा किंवा नाटक तरी. >>>>>>> +++++++++१११११११११ विनोदच म्हणण खर आहे का विश्वास नाटक करतोय तेच कळत नाही.

इंटरेस्टींग झालीय सिरीयल आता, >>>>>>>>>>>>>>>>+++++++++++++११११११११११११११११ -

हो.... बरोबर विश्वास नाटक करतोय का तो तसा च आहे हे च कळत नाही आता तरी....

श्री आणि राहुलने तडकाफडकी जॉब सोडला आणि राहुलने घरही सोडलं. काव्या गायब आहे. अरे त्या ऑफिसमधल्या कामाचं काय Proud काव्याने त्यांना पैसे दिले असतील पण असे किती पैसे असतील तिच्याकडे. निखिल ऑफिसला रोज जातो ना, काव्याने नोकरी सोडली की नाही हे त्याला माहीत कसं नाही. ती बॉस असली तरी तिलाही नोटीस वगैरे द्यावी लागली असेल ना. तीन महिन्यातले दोन महिन्यांचे पैसे देऊ शकतो पण एक महिनातरी नोटीस द्यावीच लागते, कंपनीने तुम्हाला तडकाफडकी काढलं तर वेगळी गोष्ट. निधीचा खून करते की काय काव्या आता कारण निखिल-निधीच्या फोटोला काट मारलेली असते तिने.

छान होता आजचा भाग. विधी आणि निखिलचा अभिनय चांगला होता. स्वप्नील चक्क आवडत चाललाय. विधी आणि निखिल एकत्र येतील बहुदा. नवीन माणूस येतोय कुणीतरी. पुभामध्ये दाखवलं.

किती वाजता असते ही मुख्य भाग. जेव्हा लावते तेव्हा ती छत्रीवली, मोलकरीण नाहीतर देवाची मालिका. रात्रीचा रिपीट बघता येत नाही.

सकाळी १०, दुपारी १२ आणि २:३० ला रीपिट टेलीकास्ट असतो.

धन्यवाद कुसुमिता. शिफ्ट बदल्लयामुळे रात्री साडेआठला बघते आहे सध्या. रात्री साडेबारालाही परत दाखवतात.

स्वप्नील चक्क आवडत चाललाय. >>>>>>>> ++++++११११११११

विधी आणि निखिल एकत्र येतील बहुदा. >>>>>>>>> पण मला हे पटत नाही. सध्याची स्टोरीच आवडत नाहीये. काव्याला उगाचच व्हिलन केलय. हा विबान्स गुन्ता सस्पेन्स थ्रिलर न करताही सोडवता आला असता. जो तो येतो तो विधीवर आरोप करतोय, निखिलला माफ कर म्हणतोय. तिची आई तर काय धन्यच! म्हणे , विधी सन्सारात कमी पडली, तिच्यात दोष होते म्हणून निखिल काव्याकडे गेला! Sad विधीच कशी काव्यापेक्षा egoistic असते, ती निखिलला सोडून चूक करतेय हेच सगळे म्हणतायत. तिच्या वेदना मात्र कुणीच समजून घेत नाही. निखिल- विधी अ‍ॅरेन्ज मॅरीज होत, म्हणून निखिलच्या वडिलान्ना हि लग्नानन्तरच्या प्रेमाची सुरुवात वाटतेय. काहीही! निखिलला गरीब बिचारा, काव्याच्या जाळयात फसलेला दाखवलाय.

म्हणजे एकुणात काय, शेवटी निखिल आणि विधी एकत्र येतील. विश्वास काव्याला मारुन टाकेल आणि तुरुन्गात जाईल. असच दाखवतील.

गुन्तता हदय बघितली नाही, म्हणून तिचा शेवट माहित नाही. पण हि सिरियल पुरुषप्रधान वाटतेय. म्हणजे पुरुषाने विबान्स केल तर त्याला माफ करा, स्त्रीने अस काही केल तर तिला मारुन टाका किव्वा तिला व्हिलन करा. विबान्समध्ये दोष हा दुसर्या स्त्रीचाच असतो हेच सिद्द करायच असत का सगळया सिरियल्सना? Angry

विश्वास माफ करतो की काव्याला, पण तिला दोघंही हवे आहेत त्याला तो काय करणार. विधीला वेळ हवाय, तो कोणी देतच नाही. त्यादिवशी निखिल आला तर विधीची आई म्हणाली की या तुम्ही आत, हे माझं घर आहे Uhoh म्हणजे ते घर विधीचं नाही? नवऱ्याचे घर हेच बाईचं घर का, चार दिवसासाठी आली तर ठीक, नाहीतर लगेच ऐकवणार. त्याउलट निखिलचे आईवडील, काही झालं तरी त्याच्या पाठीशी उभे आहेत.

विश्वास माफ करतो की काव्याला >>>>>>>> मला वाटत नाही त्याने माफ केलय काव्याला. नाहीतर त्याने परत येऊन तिचा जीव घेण्याची भाषा केली नसती. ज्यावेळी त्याला कळतय की तिला दोन्हिही हवे आहेत तेव्हाच वैतागून त्याने कायमच घर सोडून जायला हव होत.

विधीला वेळ हवाय, तो कोणी देतच नाही. त्यादिवशी निखिल आला तर विधीची आई म्हणाली की या तुम्ही आत, हे माझं घर आहे Uhoh म्हणजे ते घर विधीचं नाही? नवऱ्याचे घर हेच बाईचं घर का, चार दिवसासाठी आली तर ठीक, नाहीतर लगेच ऐकवणार. त्याउलट निखिलचे आईवडील, काही झालं तरी त्याच्या पाठीशी उभे आहेत. >>>>>>>>>> ++++++++११११११११११ हे मला सुद्दा खटकल. गेली तीन वर्ष आपल्या मुलीला जावई फसवतोय हे ऐकून कुठल्याही मुलीच्या आईला त्याचा राग येईलच. इथे तर जेव्हा पहिल्यान्दा निखिल तिच्याशी बोलतो तेव्हा गुळमुळीत शब्दात त्याला सुनावल. नन्तर मुलीलाच ऐकवायला लागली की झाली की चूक, माफ कर त्याला. तु त्याला सोडतेस हे बरोबर नाही वै वै.
जो नवरा तीन वर्ष आपल्याला फसवतोय, आपल्याला आईही होऊ दिल नाही अश्या नवर्याला घटस्फोट देणच चान्गल. विधीने विचार करण्यात वेळ घालवला ते चुकल.

मी वरचं वाचलं नाहीये पण trp नसेल तर संपेल सिरीयल लवकर, मग सरळधोपट काव्याला व्हिलन करतील पण सस्पेन्स असेल तर मुख्य व्हिलन स्वप्निलच असेल, काव्या कठपुतली असेल. असं कालपर्यंत बघून वाटतंय.

विधीला नकोय निखिल परत तर जबरदस्ती का, तिला 3 वर्ष फसवलं की त्याने त्यावर तिला नाही न्यायचं नातं पुढे, तू सुधार नाहीतर नको सुधारूस हे तिचं बरोबर आहे.

काल बघितलं नाही तो व्हिडिओ प्रकार काय झाला ते. विधी किती गोंधळलेली आहे. कधी असं तर कधी तसं. तळ्यात मळ्यात चालू आहे तिचं. निखिल दारू पितो आणि उद्या लगेच जेल Uhoh विश्वास विक्षिप्त आहेच. विधी बहुतेक निखिलला माफ करेल आणि त्याला तुरुंगातून सोडवेल. काव्या काय नाईटी पाठवते विधीला, कोणाची असते ती. निखिलच्या नोकरीची कोणाला पर्वाच नाही.
अमृताचे फोटो छान आहेत मालदीवमध्ये. कोणत्या हॉटेलसाठी काम करत आहे. सोनाली खरेसोबत गेली आहे.

मला वाटत की काव्याला विश्वासनेच गायब केल आहे,आणि तोच हे सगळे खेळ खेळत आहे.>>>+१ आणि सगळे खेळून झाले कि तो त्यावर वर्ल्ड फेमस कादंबरी लिहिल Happy

मला वाटत की काव्याला विश्वासनेच गायब केल आहे,आणि तोच हे सगळे खेळ खेळत आहे. >>> + १२३

हे प्रकरण दिवसेंदिवस बोअर होत चालले आहे. विधी एक सुरी घेउन बसलेली असते. सर्वां ना तुम्ही जा फुटा कटा डिवोर्स द्या म्हणते व ते फ्लॅश फ्लॅश होत राहते. आता सर्वांना मेसेज कळ ला आहे मूव्ह ऑन प्लीज. विश्वास खरेच तात्या विंचू सार्खा दिसतो. निखिल बावळट आहे गेला कस्याला असल्या फालतू पार्टीला?! इतके पण डोके नाही. आता सगळी कडे बाबांना घेउन जातो पोरावाणी. सर्व आई पब्लिक देव पाण्यात ठेवून बसले आहे. काय ही पिडा. फास्ट फॉरवर्ड करून घटस्पोट झाला असे कुठेच दाखवत नाहीत. नुसते दारे उघडतात व फ्लॅश फ्लॅश तुम्ही!!!!!!! असे ओरड तात.

मला केक द्या.

विधी एक सुरी घेउन बसलेली असते. >>>>>>>>> विधी आणि सुरी? शक्यच नाही. हा, पण अस दाखवल तर आवडेल. सध्या तिच कोणीच ऐकत नाहीये. सो, तिने सुरीच घेतलेली बरी.

निखिल बावळट आहे गेला कस्याला असल्या फालतू पार्टीला?! इतके पण डोके नाही. >>>>>>>>> नैतर काय!

मला केक द्या. >>>>>>>>>> अमा Rofl

विधिच्या डिव्होर्स देण्याचा आणि तिच्या ईगोचा किव्वा तिच्या सन्सकारान्चा सम्बध कसा काय जुळवू शकतात सगळे?

विधीला नकोय निखिल परत तर जबरदस्ती का, तिला 3 वर्ष फसवलं की त्याने त्यावर तिला नाही न्यायचं नातं पुढे, तू सुधार नाहीतर नको सुधारूस हे तिचं बरोबर आहे. >>>>>>>>>>>>+++++++++११११११११११ विश्वासने काव्याला माफ केल नाही मग हिने तरी का माफ कराव निखिलला?

हो ती संस्कारांची काय भानगड आहे काही कळलं नाही. विधीची आई काहीही बोलते. विधीला महान बनायला लावून एकदाची तिला सासरी ढकलायची असा विचार दिसतो विधीच्या आईचा.

हो ती संस्कारांची काय भानगड आहे काही कळलं नाही. विधीची आई काहीही बोलते. विधीला महान बनायला लावून एकदाची तिला सासरी ढकलायची असा विचार दिसतो विधीच्या आईचा. >>>>>>>>> नैतर काय. तो निखिल पण तेच बोलला होता तिला, " बर, झाली चूक माझ्याकडून. त्यासाठी तु मला माफ करत नाहीयेस. यावरुन तुझे व्हॅल्यूज ( सन्सकार) कळतात. "

विधीची आई कमी पडली म्हणून की काय आता तिची सासू सुद्दा तिलाच बोल लावतेय. काय तर म्हणे तु दुबळी पडलीस म्हणून काव्याने निखिलला फसवल.

निखिलला नकली पोलिसान्नी एका खोलीत बन्द करुन ठेवलय. विश्वासने किडनॅप केल असेल त्याला.

Pages