प्रत्येक गोष्ट काही कारणासाठी घडते ..?

Submitted by TuKaRam44 on 29 June, 2019 - 02:13

हे जे सायबर अत्याचार झाले, ते सगळं काही करणांसाठीच घडलं का? मी अजुन माहिती काढली आणि कळलं की 'मीना उत्तरा' ह्यांनी केलेल्या अनेक कौटुंबिक वादांच्या निरसनांमुळे त्यांना 90's मध्ये मुंबई हायकोर्टाने फॅमिली कोर्टमध्ये ऑनोररी पद्धतीने लोक अदालत संबंधित अनेक केसेस सोडवायला फॅमिली कोनसेलर म्हणून बोलावले होते व त्यांनी अनेक केसेस सोडवल्या होत्या , कुटुंब मिञांपासून वाचवलेली कळलं, ते त्यांनी केले अत्यंत यशस्वी पणे, त्यांच्या प्रतिसादात त्यांनी हेच म्हटलेलं लक्षात आलं की कोउनसेलर म्हणुन त्या स्वतः बरच काही शिकुन गेल्या! ... इथे वादात न पडता त्यांनी वरील प्रतिसदांच्या माळेत विस्तृत केलेल्या अत्यंत गैर गोष्टी सहन केल्या कोणतेही अपशब्द न लिहिता, आणि 'हे माझे व्यासपीठ नाही' म्हणुन चालु पडल्या ... ट्रॉलिंग करणारे महाभाग (घरच्यांपासुन गुपचूप) कसे वागतात हे त्यांना समजुन चुकले असेल कदाचित आणि त्यांना ह्या घाणेरड्या माणसांचा त्यांच्याच कुटुंबियांना कसा त्रास होत असेल कळलंही असेल... आणि त्याचबरोबर लेखन करणाऱ्यांची संवेदनशील मनं आणि व्यक्तिमत्व ही भ्याड समजत फक्त सायबर अत्याचार करण्याची अश्लील मौज करणारे लुटणारे कसे लेखन करणाऱ्यांना जुमानत नाहीत हेही ! आणि हे सर्व त्या मार्गदर्शीत करत असलेल्या मराठी शाळांत कामी येणार असेल... ते हे रुजवायला की चार शिव्या देऊन पुरुषार्थ अथवा शौर्य होत नसतं आणि नुसतं सभ्य बनून कमकुवत व्हायचं नसतं , कमकुवत माणसांच्या कविता आणि लेख फोल आहेत जर त्यांना आपल्या लिटररी कंमुनिटीचं संरक्षण करता येत नसले तर,

शिवरायांनी संरक्षण केलं होतं , संभाजीराजांनी तेच केलं , संतांचं, सभ्य स्त्री पुरुष मुलांचं संरक्षण करीत...

वारीचा काळ चालु आहे, वारीत शिकायचं ते एकमेकांना 'माऊली' म्हणण्यापासून भरपुर काही...इथे ह्या घटनेतुन काय घ्यायचं आपण..?... त्यावर एकमेकांशी संवाद घडला तर मीना उत्तरा ह्यांच्या थोडक्या उपस्थितीचा आणि त्यांच्या पदरी आलेल्या वाईट वृत्तीचा एक अप्रत्यक्ष फायदाच होईल सगळ्यांना ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे काही झाले ते सभ्यता, संस्कृती, मराठी संवर्धन या उद्दिष्टांना हरताळ फासणारेच होते. निषेधार्ह होते.

मीना उत्तरा जर माबोवर परत लिहायला लागल्या तर बोटीपेक्षा > 'मीना उत्तरा' ह्यांनी केलेल्या अनेक कौटुंबिक वादांच्या निरसनांमुळे त्यांना 90's मध्ये मुंबई हायकोर्टाने फॅमिली कोर्टमध्ये ऑनोररी पद्धतीने लोक अदालत संबंधित अनेक केसेस सोडवायला फॅमिली कोनसेलर म्हणून बोलावले होते व त्यांनी अनेक केसेस सोडवल्या होत्या , कुटुंब मिञांपासून वाचवलेली कळलं, ते त्यांनी केले अत्यंत यशस्वी पण > याच्याबद्दल वाचायला आवडेल.

मी देखील माबोवर वाचनमात्र असतो. जे झालं ते निंदनीय आहे हे लिहिण्यासाठी आलो. मला इथे काही गोष्टी खटकत आहेत. त्या मांडण्याचा प्रयत्न.
१) लेखिका मीना यांच्या समर्थनार्थ तुकाराम यांनी अवतार घेतला आहे तर त्यांची ओळख, फोटो, खरं नाव लेखिकेसारखं प्रोफाइल मध्ये नाही. म्हणजे इथलाच कुणी ड्यु आयडी घेऊन
प्रकरण तापवत असावा.
२) काही वेळेपूर्वी मीना यांनी इथे : बोलून गेलो. क्षमस्व. अशी कॉमेंट केली व परत खोडली. शंकास्पद आहे.
३) अॅमी सहमत. नक्कीच त्यांनी लिहावं.

SAK अब्दूलभाई, तुमचा तर्क घाईघाईचा वाटतोय. मी देखील तुमच्याप्रमाणेच मायबोलीचा वाचक होतो मात्र सदस्यत्व नव्हतं. काही दिवसानपुर्वीच मला आणि इतर फेसबूकवरची त्यांची पोस्ट्स वाचणाऱ्याना (आम्ही अनेक - शेकडो)- कळलं की त्या माबो वर त्यांच्या मिस्टरांचे लिखाण स्वतः सुधारुन लिहिणार आहेत (कारण त्यांचे मिस्टर साहित्यिक लिहीत नाहीत तरी आम्ही लिहा आग्रह करत असतो) त्यांना 'उत्तरामॅम' म्हणुन अनेक वर्षे ओळखतो. आमच्यासारख्या अनेकांना(मराठी आणि अमराठी) त्यांनी विविध प्रकारे स्वतः पलीकडे जगण्यासाठी कायम प्रोत्साहन दिले आहे , जाती धर्मांपालिकडे. जेंव्हा मी त्या इथे आल्याआल्या त्यांच्यावर सायबर हल्ले होताहेत हे ऐकले तेव्हाच मी त्यांच्याच नव्हे पण तसा त्रास होत असलेल्या अजुन कोणी तत्सम सभ्य व्यक्ती असतील तर त्यांनाही त्रास देणाऱ्यांना जितक्या चांगलेपणानी बदलता येईल तितके करावे म्हणून आलो त्यात लपवण्यासारखं काहीच नाही. काही दिवसांपूर्वी मीना-उत्तरा (उत्तरामॅडम) ह्यांनी मला त्यांच्या वतीने काही वादात पडु नको हे इथेच सांगितले होते , तसंच कदाचित त्या परत लिहायला गेल्या असतील. इथे ट्रिगर झालेल्या ह्या सायबर हल्ल्यांच्या प्रश्नाबद्दल मी सिलिकॉन व्हॅलीमधल्या काही तरुण मंडळींनाही ट्रॉलिंग बद्दल उपाय विचारला पण सर्वांनी हतबलता दाखवली, मग निदान सद्बुद्धी वाटेल असातरी समजवायचा माझ्या परीने प्रयत्न चालुच ठेवावा म्हणजे निदान सद्सद्विवेकबुद्धी जागी होईल असे हल्ले करणारे बदलतील असं वाटलं... ..तुम्हाला झमीर म्हणजे काय ते चांगलेच ठाऊक असणार, हल्ले करणाऱ्यांचे झमीर चांगल्यासाठी बदलावे आपले प्रतिसाद देऊन असे वाटले...
आता माझ्याच आईडी फोटो वगैरे बद्दल म्हणाल तर, ते मीच कशाला देऊ? मला काही लेखक नाही व्हायचंय , मात्र इतर अनेकांना मॅरेथॉनमध्ये स्वतः ह्या वयातही धावुन उत्तेजन देणाऱ्या, व्यवस्थित आहार विचाराने राहायला वागायला उत्तेजन देणाऱ्या, युपी बिहार पासून नाशिक पुणे कोकण पर्यंत अनेकांना रोजगार निर्माण करून देणाऱ्या, लहान शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीत करिअर कसे करता येईल ह्याचे मार्गदर्शन देणाऱ्या ह्या निर्भीड मॅडमना असा अनुभव येतोय ऐकल्यावर मन खलबळतं हो! तसे परत होऊ नये हे इथल्या अनेकांप्रमाणे मलाही वाटलंच त्यात गैर काही नाही ... त्यामुळे तुमची शंका रास्त पण त्यात गैर काही नसल्याचेच मिळणारी आहे .... स्वतः jayantiP ह्यांनी सुद्धा मी नोंदणी केल्याकेल्या असाच संशय दाखवलाही होता ... कदाचित मॅडमच्या म्हणण्यानुसार इथेच काय पण इतर काहीं लेखकांना (हल्ले करणारे त्यांना घाणेरड्या वैचारिकते कडे खेचत होते), मी त्यां लेखकांनाही जो हुरूप दिला, ते प्रयत्न सोडुन माझ्या इतर कामांत पुन्हा लक्ष घालीन ....मलाही मोकळा वेळ नसतोच ... मात्र सभ्य मयबोलीकरांकडून होत असलेले विचारमंथन तसेच तुमचेही इथे लक्ष देणे कौतुकास्पदच ...त्या सर्वांना यश मिळो ही ईश्वरी प्रार्थना !

आयडी मीच का देऊ? हे मात्र पटलेले नाही. तुम्ही जर बोलता की मीना यांनी फोटो सह खरं लिहीलं आहे.तर त्यांचा आदर्श का घेत नाहीत. तसेही तुम्हाला लेखक व्हायचं नाही ना. मग घाबरायची गरज नाही. त्यांना कुबड्यांची गरज नाही हे त्यांनी स्पष्ट केले तरी इथं दुषित वातावरण अजुन आग लावावी म्हणून तर हा वेगळा धागा काढला नाही ना.?

आणि तुकाराम आर्यचीन आसनई, शंभ्या की कोण, अजून कोणीतरी मीना यांच्या बरोबर अवतरले व त्यांना सपोर्ट करत होते. आणि जमीर मुसलमानालाच असतो का.

खान साहेब सही फर्माया
इकडे बघा ह्या माणसाची करतूत-

Screenshot_20190629-134740~2.png
ह्याच्यात स्पष्ट होईल की मीना उत्तरा हे कोणा फेसबुक अकाउंटचा तपशील वापरून सगळे लिखाण कोणी डुप्लीकेट आयडीने केले आहे.

मला नाही वाटत मी अगलावेपणा केला... करणारही नाही ... मात्र झाल्याप्रकारा बद्दल काहीच न वाटणं किंवा वाटुनही निष्क्रिय बसणं किती योग्य ठरेल? आगलावेपणा हे कॉन्टेक्सट प्रमाणे दिसेल ... मला वॆयक्तिक पणे अनेक वर्षांच्या परकीय सत्तेत राहिल्याने झालेली ही 'दुर्लक्ष काराहो' सांगणारी वृत्ती वाटते. त्यासाठी संतांची , मला ठाऊक असलेल्या प्रथांची उदाहरणं देणं हा आगलावेपणा कसा असु शकेल ? त्याउलट सायबर हल्ले करणाऱ्यांची मने बदलावीत, त्याचे खोटे बोलणे मात्र खोडुन काढावेत इतके माफक काम तरी करावे, मॅडमनी इतकी कामं लोकांसाठी केल्यावर थोडं आपण तरी करावं वाटलं...इथे माबो वर जसे लेखक असतील तसेच वाचकही असावेत आणि योग्य वेळी त्यांच्यावर हल्ले करणाऱ्यांचे मन बदलायचे प्रयत्न करणारेही हवेतच, आपण काही देव नाही त्यामुळे शिक्षा देणारे आपण कोण? पण जर अश्लील कविता आणि प्रतिसाद देत, शब्दप्रयोग करत (तुम्हीही वाचलं असेलच) कोणी इथे चांगल्या दर्जेदार contributionsची गळचेपी करत असेल तर त्याला प्रत्युत्तर हे स्वच्छपणेही देता येतं ते जरूर करावं, काळजी नको ...... एका ठराविक मर्यादेपुढे आपली कुवत समजुन बाकी ईश्वरारवर सोडावे हेच मी अभंगातुन वाचत आलोय aferall ...तेच करणार कोणताही आगलावेपणा न करता !

अस्लम भाई हेच माझ्या ध्यानात होतं. कमेंट का खोडली.‌ खूप धन्यवाद तुम्हाला. चोरी पकडल्या बद्दल. आणि हे जमीर शिकवतात.

दोघेही जणं 2तासापूर्वी ID घेतलेले आहात, कितीही प्रक्षोभीत केलंत तरी माबो विस्कळीत होणार नाही ... तुमची शक्ती इतरत्र लिहिल्या गेलेल्या अयोग्य गोष्टीकडेही द्या. झमीर इतका योग्य शब्द मला दिसला नाही म्हणून लिहिला कारण तो माझाही शब्द आहे., मात्र तुमची modus operendi ही धुडगूस घळणाऱ्यांसारखीच आहे (अडमिंन ना इतरांनी नमूद केलेली) त्यामुळे तुमच्याशी किती reasoning करावं? कारण तुम्ही हल्ले करणारच ! चालूं दे !

मीना बिचाऱ्या कधीच बाजूला झाल्या नि तू नाचतोय इकडं गळा काढून. इथं शंकेला वाव आहे. आणि तु किती दिवसांचा आहे.

आता देवाचं नाव घेतो आहेस म्हणूनच सांगतो हो अल्लाची कसम, आणि गाडी अजुन आरोप प्रत्यारोपकडे जाऊ नये, म्हणुन थांबतो देखील. वर म्हटल्याप्रमाणे त्यातर गेल्या आणि पुढच्या कामालाही लागल्याही असणार, तुम्हा सर्वांना माझे लिखाण हे शांतते ऐवजी त्रासाचे असेल आणि त्यांनी काही साध्य होत नसेल तर तेही थाम्बवतो की झालं.

तुम्हा सर्वांना माझे लिखाण हे शांतते ऐवजी त्रासाचे असेल आणि त्यांनी काही साध्य होत नसेल...
तुकाराममियां its wrong interpretation. सवाल यह है की पहिली कमेंट मीना उत्तरा आयडी कडून इकडे आली ती मेल जेंडर दिसत होती म्हणून थोड्या वेळाने एडिट करत काढून टाकली म्हणजेच मीना उत्तरा आयडी घेवून इकडे मायबोलीवर जे कोणी वावरले आणि ग़जबचा गोंधळ घातला ती व्यक्ति डुप्लीकेट होती असे आता खात्रीशिर वाटू लागलं आहे.

अस्लम बेग भाई तुकाराम मियां ज्या तत्परतेने व आवेशाने मीना यांची बाजू मांडत होते, त्यावरुन ते paid writer / ghost writer असले पाहिजेत. तो प्रतिसाद का खोडला याचं स्पष्टीकरण हुशारीने टाळलं आहे.

एकूण या लेखनाचा गडबडगोंधळ वाढतोच आहे आणि आता हे प्रतिसाद वाचल्यावर प्रश्नन पडलाय की मायबोली साईट एचटिटिपिएस असूनही एकाच आईडी नावाने दोनतीन जण लिहू शकतात का? अकाउंट hacking शक्य आहे का?

दोघेही जणं 2तासापूर्वी ID घेतलेले आहात, कितीही प्रक्षोभीत केलंत तरी माबो विस्कळीत होणार नाही ... तुमची शक्ती इतरत्र लिहिल्या गेलेल्या अयोग्य गोष्टीकडेही द्या. झमीर इतका योग्य शब्द मला दिसला नाही म्हणून लिहिला कारण तो माझाही शब्द आहे., मात्र तुमची modus operendi ही धुडगूस घळणाऱ्यांसारखीच आहे (अडमिंन ना इतरांनी नमूद केलेली) त्यामुळे तुमच्याशी किती reasoning करावं? कारण तुम्ही हल्ले करणारच ! चालूं दे !
- ही भाषा ओळखीची वाटतेय.