व्हायचे होऊन गेले

Submitted by निशिकांत on 28 May, 2019 - 22:16

व्हायचे होऊन गेले---( छोट्या बहरातील गझल. )

कोण डोकाऊन गेले?
आत गंधाळून गेले

फक्त भासाने सखीच्या
चांदणे बरसून गेले

पैंजणाच्या चाहुलीने
अंग रोमांचून गेले

एकट्या वेड्या मनाला
स्वप्न चुचकारून गेले

काचणार्‍या काळजाला
कोण झंकारून गेले?

आपुले जे काल होते
आज का टाळून गेले?

आठवांचे झुंड सारे
एकदम सोडून गेले

वास्तवाच्या वेष्टनावर
लोक का भुरळून गेले?

का असे "निशिकांत" अश्रू?
व्हायचे होऊन गेले

निशिकांत देशपांडे.मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मक्ता सुरेख

लहान वृत्तात लिहिताना दोन ओळी सलगपणे वाचल्या तर एक विधान ठरणार नाहीत हे बघितले जावे

आशय खूप सुरेख शेरांमधील

सुरेख कविता
आणि त्यात आपल्या नावाचा उल्लेख छान वाटतो, नेहमीच