संभाजी : येत आहेत

Submitted by मी - सागर on 7 September, 2017 - 02:50

संभाजी : येत आहेत

झी मराठी वर लवकरच वेळ आजून माहीत नाही पण कुठलीतरी शिरेल बंद होणार असा दिसतंय.

Upcoming Sambhaji Maharaj serial teaser

https://www.youtube.com/watch?v=AjKvkh1Qweo

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा आणि आजचा भाग बघून राहून राहून मनात एकच प्रश्न येतो आहे..... गागाभट्ट यांनी संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास येण्यास नकार का दिला??? प्रकृतीचे कारण देऊन त्यांनी नकार कळवला पण न येण्यामागचे खरे कारण काय असावे???

<<< पण न येण्यामागचे खरे कारण काय असावे? >>>
इतकं खोकताना दाखवलय की. शिवाय ते स्वतः म्हणतातच ना की शरीरात जुना ज्वर पण आहे. तब्बेत हे खरे कारण होऊ शकत नाही का?

इतकं खोकताना दाखवलय की. शिवाय ते स्वतः म्हणतातच ना की शरीरात जुना ज्वर पण आहे. तब्बेत हे खरे कारण होऊ शकत नाही का?>>>> हम्म्म...असू शकते हे खरे कारण पण मला कुठेतरी असे वाटले की त्यांना मंत्रिमंडळा पैकी कोणीतरी म्हणजे अनाजीपंतांनी बहुतेक काहीतरी चुकीचे कळविले असणारे त्यामुळे हा प्रश्न विचारला....बरे 'छावा' मध्ये याचा काही उल्लेख आहे का?

आजचा भाग पाहिला आणि समाधान झाले. गागाभट्ट यांनी संभाजी महाराजांना खलिता पाठवून फक्त आणि फक्त प्रकृतीचे कारण येत नसल्याचे कळवले. आणि राज्याभिषेकास पाठींबा असल्याचेही सांगितले. ते स्वतः येऊ शकत नसले तरी त्यांनी राज्याभिषेक करण्यासाठी सुयोग्य पंडित केशवभट यांचे नाव सुचविले.

कुणी बघताय की नाही. उद्या निवाडा होणार आहे. अनाजीपंत सापडले नाहीत अजून पण बाकीचे सगळे सापडले आहेत.

कसले वस्ताद आहेत ते पंत.
सगळ्यांना अेका रस्त्याने जायला सांगितलं, सगळे पकडले गेले व स्वतः दुसरीकडेच आश्रयाला गेले.

बाळाजीपंत सर्व माहिता काढून घेऊन संभाजीी महाराजांना देण्यासाठी यांच्या गोटात सामिल झाले असावेत व याचा नंतर खुलासा होईल असं मला वाटत होतं. (ते स्वतःच्या मुलाला कानाखाली मारतात शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलतो म्हणुन, त्यावरुन वाटलं.)
पण तसं काही नव्हतं.त्यांना कसे काय पटले अ.पंतांचे विचार?

मालिका संभाजी महाराजांची की अनाजी दत्तोची? मालिकेचा नक्की उद्देश काय? हिंदू एकत्रीकरण कि हिंदू धर्म विभाजन ?
संभाजी महाराजांच्यापेक्षा अनाजी दत्तोला प्रसिद्धी देत आहे. मालिका पूर्ण भरकटली आहे आणि द्वेष भावनेने पेटलेली वारंवार दिसून येते. कोणत्याही तथ्या शिवाय प्रसंग दाखवले जातात, हे फार दुर्दैवी आहे. हे थांबायला हवे. संभाजी महाराजांचा आत्मा वरून तळमळत असेल.

गेले कित्येक एपिसोड अनाजी दत्तो वर घालवले आहेत त्यावरून तरीहीच शंका येते
अष्टप्रधान मंडळ संभाजी राजांच्या ऐवजी राजाराम महाराजांना गादीवर आणण्यासाठी कारस्थान करते आणि त्याचा सुगावा महाराजांना लागल्याने ते त्यांना हत्तीच्या पायी देतात हा इतिहास झाला
पण इथले अनाजी पंत तर लैच हुशार, व्युव्हरचना काय आणि तलवार बाजी तर विचारूच नका
सदरे वरचा माणूस असूनही 5-6 मावळ्यांना भारी पडतो एकटा
त्यातून वर जंजिऱ्याच्या सिद्दी कडे जाणार म्हणे
तो सिद्दी काय याचा मेव्हणा आहे, अनाजीला ठेऊन घ्यायला

एकूणच सिरीयल मागचा ब्राह्मण द्वेष खदखदून बाहेर येतोय हे उघड उघड दिसतंय

टिपिकल मालमसाला घातला जातोय यापलीकडे काही असावे असे वाटत नाही. मी पुस्तक वाचलेले नाही. हे सगळे प्रकरण फारच लांबवले आहे हे खरे. किती दिवस झाले तेच चालू आहे. अजून एक आठवडा आरामात जातोय. अनाजीपंत छान काम करतात पण एवढा जाडा माणूस किती लांब पळू शकतो आणि किती मावळ्यांना पुरून उरू शकतो. काल निवाडा का करायचा याचं स्पष्टीकरण चांगलं दिलं महाराजांनी.

सदरे वरचा माणूस असूनही 5-6 मावळ्यांना भारी पडतो एकटा>>>>> नाही आशुचँप. अनाजीपंत सदरेवरचे होते तरी शिवाजी महाराजांच्या विश्वासातले असल्याने त्यांना बर्‍याच मोहीमांवर पण महाराजांनी पाठवले होते, तसा उल्लेख पण आहे सिरीयल मध्ये. त्यामुळे अनाजीपंतांनी मावळ्यांना झुंजवणे कठिण नाही.

एवढा जाडा माणूस किती लांब पळू शकतो >>>> Proud चंपा, अगं अनाजी इतके ढोलमढोल असतील असे वाटत नाही. हा कलाकारच ढोल्या आहे. त्यामानाने सोमाजी बारका आहे.

उनाडपप्पू आणि आशुचॅंप +१
गेले अनेक आठवडे हेच दळण चालू आहे. पुढे सरकतच नाही. संवाद, म्हणी वगैरे तर सासू सुना मालिका पठडीतले अगदी !!
सुरुवातीला खूप आवडीने पाहिली , एकही एपिसोड चुकवायचो नाही. पण अनाजीपंतांचा ट्रॅक सुरु झाल्या पासून मालिकेतला रसच संपला.

निवडणुका वगैरे मुळे त्यांनी महाराज कमी लागतील असा ट्रॅक चालू ठेवला होता बहुतेक...३-४ एपिसोड तर फक्त कारभारी पळताना दाखवलेत...अतिशय लांबवतायत....

वर्ल्डकप सुरु आहेत त्यामुळे टीआरपीचे गणित सांभाळावे लागत असेल.. म्हणुन अनाजी अजुनही पळतोय नहितर गेल्यआठवड्यातच हत्तीच्या पायदळी चिरडला असता.

संभाजी महाराजांची एखादी तरी भव्यदिव्य लढाई दाखवायची. फार शूर होते ते. मध्ये एक एपिसोड पाहिला होता. त्यात ते वेश पालटून जातात. अगदीच काहीतरी होता. बिल्कूल आवडला नाही. उगाचच अधूनमधून भावनिक, कावरेबावरे झालेले संभाजीमहाराज दाखवतात. शूर , निर्भय दाखवणं म्हणजे उद्दाम, गुंड वाटणार नाही हे काळजीपूर्वक पहायला हवं. फंड्स आणि सेट च्या मर्यादा फारच जाणवतात.

DJ..+१ अणाजी पंत त्याचे सहकारी यांची आतापर्यत हत्तीच्या पायी देऊन चटणी व्हायला हवी होती.
पण ते दाखवण्याऐवजी भलताच ट्रॅक सुरु केलाय जो माझ्या वाचनात कधी आलेला नाही.कुणाच्या वाचनात आला असेल तर प्रकाश पाडा.

रावी, तुम्ही म्हणतय ते काही अंशी बरोबर असेल म्हणा पण तरिही टीआरपी चे अग्रस्थान या मालिकेने सतत राखले आहे. भव्य-दिव्य सेटस, फंड, मुद्दाम हाईप केलेले कलाकार नसतानाही ही सिरिअल सर्वात जास्त पाहिली जाते हे सत्य आहे. सर्वच कलाकारांचा अभिनय तोडीस तोड, भिडणारे संवाद आणि खोट्या लेखणीची जळमटे झुगारुन खरा इतिहास प्रेक्षकांपुढे समोर मांडण्याची जिद्द यामुळेच ही मालिका सर्वांपेक्षा उजवी ठरते.

>>एकूणच सिरीयल मागचा ब्राह्मण द्वेष खदखदून बाहेर येतोय हे उघड उघड दिसतंय<<

आणि त्याउपर इथल्या काही आयडींचा Proud
कितीहीदा आयडी उडवा यांचे.... नव्या रुपात परत जुनेच गुण उधळतात!

मुळात संभाजीराजांचे आयुष्य इतके विलक्षण घटनांनी भरलेलं आहे की त्यात मालमसाला, फाफटपसरा घालण्याची आवश्यकताच नाही

आणि इतिहास बदलून दाखवायची तर त्याहून नाही

माझ्या वाचनात आलेलं की ज्यावेळी खंडो बल्लाळ च्या वडील आणि भावाला मारले जाते त्यावेळी ते लहान असतात, आणि राजे त्यांनाही मारायचा आदेश देतात पण येसूबाई मध्ये पडून त्यांना वाचवतात आणि मग नंतर महाराज त्यांना आपल्या सेवेत दाखल करून घेतात
पुढे याच खंडो बल्लाळ ने महाराजांचा जीव वाचवला आहे
जेव्हा महाराज बेभान होऊन नदीत घोडा घालतात आणि त्यावेळी महाराज त्याला जवळ घेऊन तू पुत्रासारखा आहेस म्हणतात

इथे खंडो बल्लाळ तर जवळजवळ महाराजांच्या वयाचे घेतलेत आणि स्वतःच वडिलांना अटक करून आणतात

हा कुठला नवा इतिहास म्हणायचा

कितिही झोंबला तरी खरा इतिहास आता समोर यायचे रहात नाही. शिवाय डॉ. अमोल कोल्हे आता खासदारही झालेत. यावरुनच कळते जनतेचे प्रेम कोणाला अणि कसे मिळत आहे ते.

संभाजी मालिकेत गेल्या दोन वर्षांमध्ये जे काही दाखवलंय, त्याची सत्यासत्यता पडताळण्याची कोणतीही यंत्रणा नाही. कितीही काहीही दाखवा, भोळीभाबडी जनता संभाजी महाराजांच्या प्रेमाखातर ते स्वीकारते. गेल्या दोन वर्षात संभाजी महाराज यांच्यापेक्षा अनाजी दत्तो व त्याच्या कारस्थानांचं उदात्तीकरणच जास्त केलं गेलं आहे. अनाजी दत्तो आणि त्याचा बंधू गद्दार आहेत, त्याचे कोणीही समर्थन करत नाही. अगदी ते ब्राम्हण असले तरी, आजच्या समाजातील कोणीही ब्राम्हण त्यांचे समर्थन करत नाही. कारण ब्राम्हण समाज हा स्वराज्याशी कायम एकनिष्ठ व इमानदार राहिलेला समाज आहे. कवी कलश हे संभाजी महाराजांचे सखे, सोबती व सावली सारखे रक्षक होते. त्यांनी महाराजां बरोबर वीरमरण पत्करले, कवी कलश हे स्वतः ब्राम्हण होते. तसेच शिवाजी महाराजांचे काव्य रचिते, महाकवी कविराज भूषण हे देखील ब्राम्हण होते.

पण सदर मालिकेत अनेक गोष्टी पुराव्याशिवाय दाखवत आहेत, असे स्पष्ट दिसून येते. मालिकेतील अनेक प्रसंगांना कोणताही आधार नाही. एक म्हणजे, शिवाजी महाराजांना विषबाधा झालेली असते, तेव्हा वैद्यबुवांना आणण्यासाठी संभाजी राजांना कोणीही सरदार किंवा मावळा सापडत नाही. जवळपास पाच सहा एपिसोड संभाजी धावत होते, धावत होते, धावत होते आणि वाटेत काही नाही, नुसती सपाटीवरची पायवाट. बास्स! हे मात्र अजिबात खरे दिसत नाही. मालिकेतले अनेक संवाद अनावश्यक व घुसडलेले दिसतात. लेखक इंद्रजित सावंत हे संभाजी ब्रिगेडी आहेत, हिंदू द्वेषाने भारलेले आहेत, पछाडलेले आहेत. ते त्यांनी या मालिकेत देखील सिद्ध केले आहे.

अमोल कोल्हेनी माझ्या भूमिकेचे काय करून ठेवले आहे ? आणि आता, अमोल कोल्हे खासदार झाले आहेत, खरोखर ते या मालिकेचे शूटिंग पुढे करणार आहेत की दत्तोला मारल्यावर मालिका वाऱ्यावर सोडणार आहेत ?

आज काहीच घडलं नाही नेहेमीप्रमाणे. सासू सून मालिके सारखे फ्लॅश, कर्कश्श पार्श्वसंगीत आणि राजमातेचा डायलेमा, इथे बसू की तिथे, दरबारात जाऊ की नको जाऊ, अरे किती वेळ घालवतात Angry

मी आज बघितलेच नाही, बोर झालं फारच
अजून एक आठवडा आता निवाडा करण्यात घालवतील
बहुदा अजून हत्ती मिळाला नसावा झी वाल्याना
मला ती घटना कशी दाखवणार हे बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे
पण असा अंदाज आहे की हत्तीचा रेकॉर्ड केलेला आवाज, घाबरलेला अनाजी, घाबरलेले लोक, डोळे विस्फारून बघणारे लोक, अजून जास्त डोळे फाडून बघणारे लोक, रागाने बघणारे संभाजी राजे, निर्विकार मक्ख चेहरा ठेऊन बघणारे कविराज आणि आ आ आ अशी कींकाळी यावर विषय संपेल
जुलै अखेरीस

हो ज्या वेगाने चालले आहेत त्याहिशोबाने प्रत्येकाची प्रतिक्रीया दाखवत बसले तर ऑगस्ट उजाडेल. हत्ती वगैरे दाखवण्याइतके बजेट नसावे. कविराज खरेच निर्विकार असतात. ईतर ठिकाणी चांगला अभिनय केला आहे त्याने, इथे फार संथ आणि आळशी वाटतो तो कलाकार.

हत्तीचा रेकॉर्ड केलेला आवाज, घाबरलेला अनाजी, घाबरलेले लोक, डोळे विस्फारून बघणारे लोक, अजून जास्त डोळे फाडून बघणारे लोक, रागाने बघणारे संभाजी राजे, निर्विकार मक्ख चेहरा ठेऊन बघणारे कविराज आणि आ आ आ अशी कींकाळी यावर विषय संपेल >>> Lol

अगं चंपा तो राहुल मेहेंदळे आहे कलश झालेला. मानबा मधल्या रेवतीचा खरा नवरा. शिवाजी महाराज होते, तेव्हा सिरीयल वेगात होती, आता संथ झालीय. ब्राह्मण - मराठा- ब्रिगेड वाद जाऊ दे. पण मला आता काल मजा वाटली जेव्हा हिरोजी फर्जंद आले. चला हवा येऊ द्या च्या कार्यक्रमात त्यांनी ( हिरोजी फर्जंदचे काम करणारे, अनिल रोकडे. नाव अनिलच आहे का लक्षात नाही ) सांगीतले की ते रात्री उशिरा शुटिंग संपवुन घरी कोपरखैरणे ला चालले होते. नेहेमीच्या वेशात होते ते. कंडक्टरने कुठले तिकीट विचारल्यावर ते म्हणाले एक कोपखैरणे द्या. बस रिकामीच होती. अगदी पुढे एक मुलगा बसला होता. यांचा आवाज ऐकल्यावर त्याने वळुन पाहीले आणी हसला. ते पण सहज हसले. तर तो म्हणाला, ऐकलं का? मग त्यांना ( रोकडेना ) जाम हसू आले. कारण त्या मुलाने त्यांना नुसत्या आवाजावरुन व डॉयलॉगवरुन ओळखले होते.

सिरीयलाचा वाद जाऊ दे, पण सर्व कलाकार अगदी हिर्‍यासारखे चोख आहेत. बाळाजीपंतांचे काम करणारा नझीर खान हा कलाकार अक्षरशः शुद्ध पुणेरी बोलतो. अनजी पंतांचे काम करणारे महेश कोकाटे यांनी सुद्धा किती बेरकीपणा दाखवलाय भूमिकेत. हिरोजी फर्जंद असो, नेताजी पालकर असो, यांचे नाणे कामाच्या बाबतीत खणखणीत आहे.

हत्तीचा रेकॉर्ड केलेला आवाज, घाबरलेला अनाजी, घाबरलेले लोक, डोळे विस्फारून बघणारे लोक, अजून जास्त डोळे फाडून बघणारे लोक, रागाने बघणारे संभाजी राजे, निर्विकार मक्ख चेहरा ठेऊन बघणारे कविराज आणि आ आ आ अशी कींकाळी यावर विषय संपेल >>>> Rofl हत्तीचा आवाज येतोय अण्णाजी घाबरलाय, नको नको हातवारे करत अण्णाजी या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात पळतोय यावर एक तासाचा विशेष भाग असेल.

Pages