अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्रप्स, नास्तिक, मी माणसांना मानते, त्यांना जपायला आवडते ☺️ हो पण नास्तिक आहे म्हणून आस्तिकांची चेष्टा करत नाही, जे त्यांना वाटते ते ते करतात जे मला पटते ते मी करते

VB कदाचित मागच्या जन्मी तुम्ही आस्तिक असाल व दत्तभक्त असाल.

Submitted by शक्तीराम on 7 June, 2019 - 07:00>>> काय माहित असेल सुद्धा

VB जी तुम्ही थोरले महाराज वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे चरित्र वाचा. भक्तिभावाने नाही वाचले तरी दत्तमहाराजांनी घडवलेले चमत्कार वाचून आश्र्चर्य चकित व्हायला होते. तसेच ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे चरित्र विलक्षण आहे.

माझी पत्नी गेली एकदीड वर्ष झाले तशी रात्री झोपेतच उं उं करून जोरात रडत असे. मुलांनी किंवा मी रडण्याचा आवाज ऐकून धावतपळत तिला झोपेतून उठवून धीर देण्याचे नेहमीचेच झाले होते. तिच्या स्वप्नात एक स्त्री येऊन तिला आपल्याकडे ये असे बोलावत असे. स्त्रीचं रूप तिला आठवत नसायचं. पण तिला खूप भिती वाटायची. मग मी तिला द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र म्हणायला सांगितले. तेव्हापासून तिच्या स्वप्नात ती स्त्री आली नाही.

मला रात्री अचानक जाग येते हाताला पायाला कोणीतरी सुया टोचत आहेत किंवा उगीचच कोणीतरी चिमटे काढते आहे असे वाटते. आता ते कदाचित मच्छर वैगरे अगदी मनापासून माझे रक्त पीत असेल म्हणून असेल पण ते असो. मागच्या आठवड्यात नेहमीप्रमाणे मला अचानक जाग आली आणि बाथरूमसमोर एक काळी आकृती उभी आहे असे मला जाणवले. काळोखामुळे मला फक्त त्या आकृतीची बॉर्डर दिसत होती. मी पडल्या पडल्याच त्या आकृतीला ओरडुनच विचारले, 'कोण तुम्ही' आणि आकृतीने उत्तर दिले ...................."मम्मी मी" मी त्या 'मम्मी मी' वालीला ओरडले, 'अग मग लाईट लाव'. ती माझी छोटी होती जी झोपेत सुसु साठी बाथरूम समोर उभी होती.

>>>>>> अरे धागा का झोपला परत >>>>> कारण बोकलतनी जगातल्या सगळ्या भुतांचा नायनाट केला आहे. आता आत्मे भूत व्हायला सुद्धा घाबरतात Submitted by मीरा.. on 29 May, 2019 - 11:22>>>
@ रश्मी Rofl

(अमानवीय नाही)
कालच एक गोष्ट वाचली. एका गुरूंचा शिष्य जहाजात बसलेला असतो व जहाज दुसऱ्या देशाला जाण्यासाठी निघणार असते. इतक्यात शिष्याला गुरुचा आवाज ऐकू येतो." आत्ताच्या आत्ता खाली उतर." शिष्य दुर्लक्ष करतो. पण परत दरडावणीसारखा आदेश ऐकू येतो.
शिष्य नाईलाजाने खाली उतरतो, त्याच दिवशी त्याला तेच जहाज समुद्रात बुडाल्याचं कळतं व कोणीही वाचलं नाही हे समजतं. त्याला गुरूंचा फार राग येतो. नंतर काही दिवसांनी गुरूकडे गेल्यावर तो गुरुंना जाब विचारतो " मला एकट्याला का वाचवलं?"
गुरू म्हणतात मी सगळ्यांना आवाज दिला होता पण केवळ तुझं अंत:करण शुद्ध, पवित्र असल्याने आवाज फक्त तुलाच ऐकू आला. शिष्याचे समाधान झाले.
असाच एक बसचा अनुभव इथं कुणीतरी लिहीला होता. त्यावरून हे लिहावे वाटले. पण.पण. पण....
माझ्या मनात विचार आला जर गुरू शिष्याला खाली उतरायला सांगतात,तर मग जहाज बुडणार आहे हे जर सांगते तर शिष्याने इतरांना सावध केले असते.‌ अर्थात त्याचे किती जणांनी ऐकून विश्र्वास ठेवला असता हा भाग बाजूला ठेवू.

सगळ्यांना का नाही वाचवलं म्हणून जाब विचारला, मला वाटलं मला (शिष्याला) का वाचवलं म्हणून त्याने जाब विचारला. अशा घटना ऐकल्या आहेत पण फक्त योगायोग घडला म्हणून, कोणी गुरूने काही संदेश दिला असे ऐकलेले नाही.

त्यांनी एक वेगळा धागा काढून लोकप्रियता अजमावून पाहिली. तिकडे जबरदस्त रिस्पॉन्स मिळाल्याने इकडे फार कमी येतात आता.

समद्या भुतासनी जोताला बांधून शेतात गेलया बोकलतराव ... पेरणी झाली की येतील हितं नव्या स्टोऱ्यासंगी ! तंवर वाइंच दमानं घीवा.

>> त्यांनी एक वेगळा धागा काढून लोकप्रियता अजमावून पाहिली. तिकडे जबरदस्त रिस्पॉन्स मिळाल्याने इकडे फार कमी येतात आता.
कोणता धागा ?

मंगळ असलेल्या लोकांना ग्रहणाचा काही विशेष त्रास होतो का? तसेच, पौर्णिमा आणि अमावस्या या दोन दिवशी अमानवी शक्तीचे सामर्थ्य का वाढते? हेही सांगू शकाल काय?

Pages