Submitted by पुरंदरे शशांक on 24 June, 2019 - 22:38
आनंदाचे गाणे व्हावे
माळरानी एकांतात
रानफुले फुललेली
बहुरंगात रंगोनी
मस्त मजेत डोलली
नाही कौतुक कराया
नाही सुगंध लुटण्या
रंग गंध उधळिता
कोणी न ये त्या जाणण्या
अनामिक वाटसरु
जाई पहात तयांस
थबकून पूर्णपणे
वेडावून जात खास
करी नवल मनात
म्हणे कशी ही फुलत
नये कौतुकाला कोणी
वार्यावर डोलतात ?
गोंजारुन जाता तया
फुले गोड हसतात
सहजचि उमलोनि
नकळत व्हावे लुप्त
अपेक्षाचि न ठेविता
आनंदाचे गाणे व्हावे
दिस सरता सरता
हळु निघोनिया जावे...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी कविता!
भारी कविता!
अपेक्षाचि न ठेविता
आनंदाचे गाणे व्हावे
दिस सरता सरता
हळु निघोनिया जावे...अगदी अगदी.
छान, पु ले शु
छान, पु ले शु
सुंदर.
सुंदर.
अतिशय सुंदर .....
अतिशय सुंदर .....
सुंदर लिहिलीये.
सुंदर लिहिलीये.
कवितेचं शेवटचं कडव मनाला अगदी पटलं.
सुंदर कविता .....हे जग ,जगणे
सुंदर कविता .....हे जग ,जगणे सुंदर आहे