शिवनेरीचा स्टॉप माहित असेल तर प्लीज सांगा.

Submitted by Ashwini_९९९ on 22 June, 2019 - 09:18

पुणे ते दादर जाणारी शिवनेरी औंधला किंवा बाणेरला कुठे थांबते ?
website वर दिलेला नंबर कोणीही उचलत नाहीये. खूप वेळा फोन केला.
कोणाला माहित असेल तर कृपया सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Toll Free: 1-800221250

या फोन वर 5 मिनिटे संगीत ऐकत राहायचे. माणूस येतो शेवटी. मी केलाय फोन बरेच वेळा.

स्वारगेट वरुन सुटून दादरला जाणार्‍या शिवनेरीला कळंबोली बायपास आधी फक्त चार स्टॉप आहेत. स्वारगेट, वाणज, चांदणी चौक, हिंजवाडी फाटा व वाकड. यापैकी तुम्हाला कोणता जवळ पडतो ते पाहा.

मागे एक दोन वेळा मी पाहिलं होतं तेव्हा युनिव्हर्सिटी कडून औंध चेस्ट हॉस्पिटल ला जाणाऱ्या सरळ रस्त्यावर पुलाच्या आधी आणि ब्रिमेन चौक च्या नंतर एक पोलीस मैदान ला छोटी गल्ली जाते त्याच्यानंतर बस थांबते.तिथे एक शेलार की अश्या काही नावाची वडापाव गाडी आहे.तिथल्या छोट्या बेकरी वगैरे मध्ये विचारल्यास नक्की सांगतील.
त्याच्या पूर्वी आतून स्टॉप वेस्ट एन्ड मॉल बाहेर होता.
अर्थात थोडं पुढे जाता येत असल्यास वाकड ला हिंजवडी पुलाखाली(आडवा पुणे बंगलोर हायवे आहे त्यावर पुणे वाल्या बाजूला पुलाखाली.)तिथे कंट्रोलर केबिन पण आहे.आधी तिथे जकात नाका होता आणि खूप ट्रक बाजूला थांबलेले असायचे.एक हॉटेलही आहे.(मॅप मध्ये पाहिलं, हॉटेल सोनम नाव आहे)

सुमित शिवनेरी दोन रूटवरून जाते कोथरूडमार्गे आणि औंधमार्गे. तुम्ही दिलेले स्टॉप कोथरूड रूटचे आहेत.

औंधला शिवनेरीचा स्टॉप ब्रेमन चौकात आहे.

ओहह आता ब्रेमन चौक केला का!
पूर्वी परिहार चौकातून पुढे सरळ जाऊन उजवीकडच्या रस्त्याला वळून थांबत. मॅकडॉनल्ड्सच्या आधीच.

औंधला शिवनेरीचा स्टॉप ब्रेमन चौकात आहे.>>
हो. आणि तिथे करंट बुकिंग करायची देखील सोय आहे. शिवाय प्रायव्हेट गाड्या देखील मिळतात तिथून.
ब्ला-ब्ला अॅप का वापरत नाय पब्लिक?

एसटीची अधिकृत बुकिंग वेबसाईट. मी इथूनच बुक करतो:

https://public.msrtcors.com/ticket_booking/index.php

(वि. सू.: हि साईट बुकमार्क करूनच ठेवावी लागते. गुगल करून जी सापडते ती भलतीच आहे. त्यातून बुकिंग होत नाही):

इथे हवी ती तारीख देऊन From Stop मध्ये PUNE व To Stop मध्ये DDRE (DADAR EAST- MUMBAI- MUMBAI) आणि Bus Service Type मध्ये AC-SHIVNERI निवडून दोन प्रकारच्या गाड्या दिसतील. हव्या त्या वेळेची गाडी निवडून खाली View Stops वर क्लिक करा.

काही पुणे स्टेशन वरून सुटणाऱ्या. त्यांचा मार्ग:
PUNE RLY. STN.
BREMAN CHOWK
HINJWADI FATA
WAKAD
KALAMBOLI
KHARGHAR
KOKAN BHAVAN
NERUL
VASHI HIGHWAY
MAITRI PARK
DADAR EAST

व काही स्वारगेट वरून सुटणाऱ्या. त्याचा मार्ग:
SWARGATE, PUNE
DECCAN GYMKHANA
S.N.D.T. COLLEGE
VANAJ
CHANDANI CHOWK
BALEWADI
KRIDA NAGRI
HINJWADI FATA
WAKAD
LONAVALA FATA
FOOD MALL
KALAMBOLI
KHARGHAR
KOKAN BHAVAN
NERUL
VASHI HIGHWAY
MAITRI PARK
DADAR EAST

आणि हो....... दादरहून पुण्याला परत येताना काही गाड्या चांदणी चौक मार्गे स्वारगेटला येतात. तर काही रावेत निगडी मार्गे स्टेशन ला जातात. ते नीट विचारून बसावे लागते. (मी एकदा पुण्याला जाणारी शिवनेरी गाडी उभी आहे एवढेच पाहून गडबडीने तिकीट काढून गप्पकन त्यात बसलो होतो Lol )

बहुदा स्वारगेटहुन सुटणाऱ्या गाड्या औंधला जात नाहीत. पुणे स्टेशनहुन परिहार चौकात थांबा घेऊन पुढे जातात.

त्यातही स्वारगेट दादर गाड्या रेअर, स्वारगेट बोरिवली अन पुणे स्टेशन दादर अश्या गाड्या जास्त असतात.

तरी थांब्यासाठी एम एस आर टी सी बघावी.

पुणे मेट्रोमुळे पुणे शहरातले काही थांबे बदलले आहेत हे पुण्यात आता न राहणाऱ्या लोकांनी लक्षात घ्या Happy Happy सध्या डेक्कनला शिवनेरी जात नाही. नळस्टोपला उतरून घ्यावे लागते.

उतरताना विनंती केल्यास शिवनेरी आपल्याला हवे तिकडे उतरू देते पण चढताना हे शक्य नाही.

मागे एक दोन वेळा मी पाहिलं होतं तेव्हा युनिव्हर्सिटी कडून औंध चेस्ट हॉस्पिटल ला जाणाऱ्या सरळ रस्त्यावर पुलाच्या आधी आणि ब्रिमेन चौक च्या नंतर एक पोलीस मैदान ला छोटी गल्ली जाते त्याच्यानंतर बस थांबते.तिथे एक शेलार की अश्या काही नावाची वडापाव गाडी आहे.तिथल्या छोट्या बेकरी वगैरे मध्ये विचारल्यास नक्की सांगतील.>>> बॉडिगेट म्हणतात त्या स्टॉपला ☺️