जिवलगाssssssss

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 24 April, 2019 - 06:37

स्टार प्रवाह वर भव्य दिव्य स्टारकास्ट असलेली 'जिवलगा' मालिका नुकतीच (२२ एप्रिल) पासून सुरु झाली आहे. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, आणि मधुरा ( आडनाव आठवत नाहीये आत्ता, पण गुलाबजाम चित्रपटात सिद्धार्थ ची प्रेयसी दाखवली होती ती ) असे नावाजलेले कलाकार आहेत.

त्यांच्यापेक्षा सतीश राजवाडे मुळे ही मालिका पाहण्याची उत्सुकता आहे, कारण मालिकेची संकल्पना त्याची आहे,
तर उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शन केले आहे. विषय पण तसा बोल्ड दिसतोय थोडा.. विवाहबाह्य संबंध ( नवऱ्याला माहीत असते, असं )...
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा..
अजून कोणी पाहतं का ही मालिका???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिला निखिल थोडीच मिळणार आहे? >>> बदला घ्यायचा असेल, विश्वासलापण विधीबद्दल soft corner आहेना आणि निखीलला आवडतेच बायको म्हणून.

काव्याकडे लहानपणी आईने वगैरे पण नीट लक्ष नाही दिलं, ती प्रचंड आत्मकेंद्रित आहे.

परत एकदा ऑफिस मधले ढोबळ संवाद, तारीख मेल केली आहे (हांई ये क्या?? :हाहा:), इंपॉर्टंट प्रेझेंटेशन, ईम्पॉर्टंट मिटींग सगळीकडे तेच तेच.

विधी सुनावते ते बरंच झालंय त्या बुळ्या निखिलला.

आज विश्वास एकदम फिल्मी स्टाईलने फाईट करतो केकच्या दुकानात, मला तर फार भारी वाटलं ते. विधी त्याच्या प्रेमात पडते की काय पुढे जाऊन. निखीलची आई बिचारी आजारी पडली. विधीची आई आधी म्हणत होती की बोलायला पाहिजे निखीलशी आणि विधी गेल्यावर म्हणते की मी नाही समजावणार तिला. विश्वास आणि काव्या एकाचवेळी कसे येतात कुठेही, योगायोग असेल तर फार जास्त वेळा घडतं हे.

आज विश्वास एकदम फिल्मी स्टाईलने फाईट करतो केकच्या दुकानात >>>>>>>>>>> राईटर बन गया फायटर.

विधी त्याच्या प्रेमात पडते की काय पुढे जाऊन. >>>>>> होप सो, असच व्हाव.

निखीलची आई बिचारी आजारी पडली. >>>>>>>>> आता तिने विधिला ईमोशनल ब्लॅकमेल करुन घरी बोलावल नाही म्हणजे मिळवल.

विधी गेल्यावर म्हणते की मी नाही समजावणार तिला. >>>>>>>>>> बरोबर बोलली ती.

विधी अभिनय मस्त करते हल्ली. >>>>>>>> +++++++++११११११११११

पूर्ण भाग नाही बघितला आजचा पण शेवटची काव्याची एन्ट्री धडाकेबाज होती. काव्या खलनायिका बनणार बहुतेक. विधीची प्रतिक्रिया या मनस्थितीतही अतिशय संतुलित. तो एक सुखद धक्का होता. मला वाटलं आता रधिकासारखी हीपण काव्यावर तुटून पडते की काय, तिनेच माझ्या नवऱ्याला नादी लावलं, नाहीतर माझा नवरा अगदी साधाभोळा आहे, पण नाही. निधी आणि विश्वास एकत्र येऊन बदला घेतील पण प्रेमात पडणार नाहीत असे मला वाटते कारण त्यांचे स्वतःच्या जोडीदारावर नितांत प्रेम आहे.

विधीची प्रतिक्रिया या मनस्थितीतही अतिशय संतुलित. >>> अगदी अगदी.

काव्या टोटली व्हिलन होणार, म्हणून अमृताने स्वीकारली असेल ही भूमिका, वेगळे काहीतरी करायला मिळेल तिला. ती साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊजमध्ये खरोखर ग्लॅमरस आणि ग्रेसफुल दिसते. पण तिचे वरचे दात सुरेख आहेत आणि खालचे काळे वाटतात, हे खूप जाणवतं मला.

मागे कोणीतरी गुंतता हृदय हे ची आठवण काढलेली, ह्या विषयावरची ती सुपर्ब सिरीयल होती.

आजपर्यँत एकही मराठी सिरियलमध्ये विबांस धड दाखवता एके नाहीत, ही माझी खात्री, आणि त्यावर या सिरियलने उमटवलेली मोहोर.

मालिका सुरु असताना मध्येच त्या गुरुदेव दत्तच्या मालिकेची जाहिरात का करतात. सगळा रसभंग होतो. आवाज एवढा मोठा असतो की मी म्युट करते, मालिका सुरू झाली की म्यूट काढेपर्यंत काही सवांद निघून जातात.
काव्याने कॅमेरा बसवला आणि तोही एवढ्या वर. विश्र्वास ते घर सोडून चालला आहे त्यामुळे कॅमेराचा खटाटोप वाया जाणार. वरून त्याला सांगते की मी ऐकलं आहे तुझं बोलणं. सगळ्यांचा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे, सुसंगत कपडे घालतात. पुढे काय होईल याचा अंदाज येत नाहीये.

कालचा एपिसोड म्हणजे 'बॉक्स एपिसोड' होता. Lol काव्याच्या घरी, ऑफिसमध्ये, निखिलच्या घरी कुणीतरी गिफ्ट बॉक्स पाठवले आहेत. काव्याला त्या बॉक्सेसमधून कपल बाहुल्यान्च पेण्डट असलेल लॉकेट, तिच ईअर रिन्गज मिळतात. तर निधीसमोर निखिल बॉक्स उघडतो तेव्हा त्यात त्याचे आणि काव्याचे फोटो असतात.

काव्याने विश्वासला ' हे सगळ तु करतोयस का?' विचारल्यावर नाही म्हणाला तो. निधी निखिलच्या आईवडिलान्कडे त्यान्च्या लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी आली होती. तिला निखिलकडून डिवोर्स हवाय. गुड!

ते बॉक्सेस पाठवणे ह्यामागे विश्वास, विधी, विनोद, काव्याची आई आणि काव्याच्या ऑफिसमधली मुलगी ह्यान्चा हात असावा. परवा विश्वासही विधीला विचारत होता, ' प्रेम कराल का माझ्यावर?' तो आपला प्लॅन तिला सान्गतो. सुरुवातीला तिला ते पटत नव्हत. सो, दोघे प्रेमात पडल्याच नाटक करुन काव्या- निखिलला धडा शिकवणार आहेत वाटत.

काव्या विचित्रच आहे. एकीकडे निखिलला म्हणतेय की ' विश्वास घर सोडून निघून गेलाय. तो तिच्या प्रेमात पडलाय विधीने माझ घर तोडल' तर दुसर्याच क्षणाला असही म्हणते की, ' विश्वास आणि विधी दोघही निघून गेलेत आपल्या आयुष्यातून. आता आपण लग्न करायला मोकळे.' Uhoh

काव्यानेच ते बॉक्स पाठवलेले असतात.
काव्या विचित्रच आहे. एकीकडे निखिलला म्हणतेय की ' विश्वास घर सोडून निघून गेलाय. तो तिच्या प्रेमात पडलाय विधीने माझ घर तोडल' तर दुसर्याच क्षणाला असही म्हणते की, ' विश्वास आणि विधी दोघही निघून गेलेत आपल्या आयुष्यातून. आता आपण लग्न करायला मोकळे.' >>>+१

लेखकाने उगाच काव्याच्या तोंडी विश्वासबद्दल आपुलकी असल्याची वाक्ये दिली आहेत. सरळ सरळ दिसत आहे कि काव्या हात धूऊन निखिलच्या मागे लागली आहे. आता विश्वासच्याही मनातून ती उतरली आहे आणि विधीने निखिलला सोडले आहे आहे तर तो कोणाचे घर वाचवायचा प्रयत्न करणार आहे?
खरेतर जशी विश्वास आणि विधीची व्यक्तिरेखा दाखविली आहे त्यानुसार त्यांनी आपाअपल्या जोडीदाराला सोडून स्वतःचे जीवन शांतपणे जगावे. काव्या आणि निखिल एकमेकांना भरपूर त्रास देऊन वेगळे होतील. पण मालिकेत तसे दाखवायचे नसेल.
आजच्या भागात निखिल विधीला ओरडून माफी मागत असतो. जबरदस्तीची माफी Happy अरे तिला मनापासून माफ करावेसे वाटत नसेल तर ती का माफ करेल? त्याचे म्हणणे आहे कि मला माफ करायचे नसेल तर निघून जा पण मला अजिबात काही बोलायचे नाही कि त्रास द्यायचा नाही. मज्जाच आहे त्याची!!

निखिलची दया आली. तो काव्याएवढा निर्ढावलेला नाहीये. काव्या आणि निधीचा सीन आवडला. काव्याची खलनायिका फिल्मी वाटतेय त्या बॉक्समुळे पण तरी पुढे काय होणार याची उत्सुकता आहे. निखिलचे खेळणे करणार काव्या. निधी काय सांगत होती काव्याला, निखीलचे संस्कार वगैरे, ते काही कळलं नाही.

खूप बोअर वाटलेला आधीचा एपिसोड. पण आता विश्वास विधी एकत्र येऊन काही plans करणार आहेत बघून परत बघावीशी वाटायला लागली.

ते निखिलचे सारखे काव्यातून बाहेर पडायचंय, काव्यातून बाहेर पडायचंय ऐकून अंड्यातून पिल्लू बाहेर पडल्यासारखं वाटतंय Proud

हाहा अंजू, दोन परस्पर विरोधी प्रतिसाद. छान होता आजचा भाग. कमेरा लगेच शोधला विश्वासने. विधी निखिलचे नाव कसे काढू शकते शॉपमधून, पैसे त्यानेच दिलेले असतात ना. तिला निखिलला सोडायचे आहे तर ती घटस्फोट होऊ शकतो असे का म्हणाली, तिचा विचार बदलू शकतो का. निघीचा अभिनय आवडतोय. काव्या रिसॉर्ट जरी स्वतःच्या पैशाने बुक करत असली तरी जाणार ऑफिस अवर्स मध्येच ना, हे कसे चालेल कंपनीला, सुट्टीच आहे ती कामाच्या दिवशी घेतलेली, तीही अजून दोन जणांबरोबर.

इतका लॉजिकल विचार फक्त आपण करतो.

निखीलने पैसे दिले असतील तरी ते हक्काचे होते तिचे, तरी घेतले असतील तरी फेडेल बहुतेक. खरं म्हणजे ह्या सिरीयलचा जीव फार नाहीये. तर काही महिने ठेवावी आणि शेवट नेहेमीप्रमाणे गोड गोड असेल.

स्वप्नील मात्र आता थोडा बरा दिसतोय, स्लिम वाटतोय आणि दाढीत बरा वाटतोय. काम पण चांगलं केलं camera शोधला ते आणि डायलॉग्ज छान होते त्याचे.

विधी निखिलचे नाव कसे काढू शकते शॉपमधून, पैसे त्यानेच दिलेले असतात ना.>> त्याच नाव गॅरेन्टर म्हणून आहे , गॅरेन्टर बदलता येतो.
स्वप्निलला खुप गुडी गुडी रोल्सपेक्षा खरतर थोड्या डार्क शेड वाल्या (अगदी अ‍ॅन्टी हिरो नाही ) भुमिका छान जमतिल. आता त्याचा कणखर रोल बरा वाटतोय.
निखिल केवढा कान्गावेखोर आहे,

माझं डोकं आता भलतीकडेच चालतंय. काव्या निखील आणि तो तिसरा जाणार आहेत आहेत तर तिसऱ्याचा खून वगैरे करून निखिलवर बालंट येईल अशी व्यवस्था करेल का काव्या.

माझं डोकं आता भलतीकडेच चालतंय. काव्या निखील आणि तो तिसरा जाणार आहेत आहेत तर तिसऱ्याचा खून वगैरे करून निखिलवर बालंट येईल अशी व्यवस्था करेल का काव्या. >>> अंजू चिल मार. तुझं डोकं फारच भलतीकडे चाललं आहे Proud

निखिल केवढा कान्गावेखोर आहे,. >>>>>. हो ना, पडलं तरी नाक वर. स्वतःच्या मोठ्या चुकीकडे दुर्लक्ष करून विधीने माफ करावं ही अपेक्षा. तिची चिडचिड, संताप रास्त आहे हे पटवून घेऊन तिला शांत होण्यासाठी वेळ न देता, ती चिडली की हा अजून जोरात ओरडतो. त्याने 4 वर्षे अफेअर केलं,पण तिने मात्र एका आठवड्यात क्षमा करावं अशी अपेक्षा दिसते.

काव्या मध्यरात्री घरी आल्यावर निखिल तिला घालवून देत नाही, रादर shocked फक्त दिसला. पण विधीला मात्र चालती हो म्हणून ओरडला. बायको आणि गर्लफ्रेंडमधला फरक Lol

स्वप्नील जोशीचा नवा लूक आणि नवीन अप्रोच आवडला. सगळेच जण acting पण चांगलं करताहेत. काव्या आणि विधीचे ड्रेसेस मस्त आहेत.

मला सिरियल आवडते आहे.

नताशा Lol

विधीचे डायलॉग्ज मस्त होते, ती फक्त काव्यालाच नाही तर विश्वासलाही छान सुनावते.

विधीचे charactor मस्त झालंय आता आणि ती कामही छान करतेय.

Pages