महत्त्वाचं असतं.

Submitted by मन्या ऽ on 18 June, 2019 - 07:55

महत्त्वाचं असतं..

नेहमीच जिंकण्यापेक्षा
कधी कधी हार मानणं
पण महत्त्वाचं असतं..
हार पक्तरल्यानंतर
उठुन उभं राहणंही
महत्त्वाचं असतं.

प्रेमात पडुन
प्रेम शेवटपर्यत टिकवणंही
महत्त्वाचं असतं.
पण
प्रेमाने मैत्रीचा हात
पुढे केल्यावर
तो स्विकारणंही
गरजेचं असतं.

आयुष्याच्या वाटेवर
येतच राहतात
सुख-दुखःचे खाच-खळगे
त्यांना पार करुन
पुढे चालत राहणंही
महत्त्वाचं असतं.

नात्यांमध्ये
नेहमीच खरं बोलुन
समोरच्याला दुखावण्यापेक्षा
कधी कधी
खोटं बोलणंही
महत्त्वाचं असतं
आपणचं आपल्या
माणसांना जपायचं असतं.

(दिप्ती भगत)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कविता दिप्ती! आवडली!
मैत्री हे जगातलं सगळ्यात कॉम्प्लिकेटेड नातं. खूप जवळचे मित्र असतात ना, इतके कचाकचा भांडतात, रुसतात, आणि नंतर कोण आधी बोलेन याची वाट बघत बसतात. यातच आयुष्यातले खूप आनंदाचे आणि महत्वाचे क्षण निघून जातात.
एक तत्व मी नेहमी अंमलात आणते, मला ज्याक्षणी वाटेल ना मी चुकलेय, त्याक्षणी मी माफी मागून मोकळी होते. जवळचे लोक माफ करतातच. पण मुळात मैत्रीत माफीची अपेक्षा ठेवणेच चूक. फक्त गुण बघून होणारी मैत्री जास्त काळ नाही टिकत, पण जी मैत्री गुणदोषासहित स्वीकारली जाते, तीच खरी मैत्री, आणि त्यात किती का संकट येईना, ती टिकतेच!
एक ब्रह्मवाक्य आहे, तुमचं प्रेम तुमची सगळ्यात जवळची मैत्री असता कामा नये. सोडून गेल्यात दुप्पट नुकसान होतं!
बादवे कुणासाठी लिहिलंय? Proud
(हलकेच घे)

मन्या तुम्ही जे लिहिलय तेवढं जरी समजलं तर असंख्य प्रश्न सुटतील माणसांचे. आणि नव्याने निर्माणही होणार नाही.
छान कविता.

Nice .. Happy

मस्त!

छान