याला जीवन ऐसे नाव!

Submitted by प्रांजलीप्रानम on 19 June, 2019 - 03:26

याला जीवन ऐसे नाव!

जगणं म्हणजे जगणं,
जगणं कसं असतं?
मृत्युच्याच दिशेने पुढचं पाऊल नुसतं

मनं म्हणजे मनं,
मनं कसं असतं?
माझं माझं म्हणताना
नेमकं हाती काहीच नसतं

प्रेम म्हणजे प्रेम
प्रेम कसं असतं?
सहवासातही विरहाचं
शल्य मनी वसतं

स्वप्न म्हणजे स्वप्न
स्वप्न कसं असतं?
सत्यसृष्टीत जे उतरत नाही
तेच डोळ्यांना दिसतं

दु:ख म्हणजे दु:ख
दु:ख कसं असतं?
अंत:करणाच्या गाभाऱ्यात
कोपऱ्यात दडून बसतं

सुख म्हणजे सुख
सुख कसं असतं?
वेदनांनी व्याकूळ होताना
अश्रूतूनही हसतं

आशा म्हणजे आशा
आशा कशी असते?
न मिळणाऱ्या सुखामागेही
वेड्यासारखी धावत बसते

कर्तव्य म्हणजे कर्तव्य
कर्तव्य कसं असतं?
दुबळ्या मनात एखाद्याच्या
तेवढं पेलण्याचं सामर्थ्य नसतं

नशिब म्हणजे नशिब
नशिब कसं असतं?
आजमावलं वाटतानाच कित्येकदा
अवचित उगीचच रूसतं

मृत्यु म्हणजे मृत्यु
मृत्यु कसा असतो?
अज्ञातापलिकडचा अनुभव
कोणलाही सांगता येत नसतो
....... प्रांजली

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Sorry for THAT!
Manya S,
But it's also TRUE FACT na?
Not for. Every one but.......
Thanks a lot,

सहवासातही विरहाचं
शल्य मनी वसतं

अप्रतिम
अज्ञातापलिकडचा अनुभव
कोणलाही सांगता येत नसतो

नकारात्मक असूनही अगदीच मनापर्यंत पोहोचणारं काहीतरी !