Submitted by थॅनोस आपटे on 24 December, 2018 - 20:58
आताचे रूक्ष क्षेत्र हा माझा चॉईस कधीच नव्हता. मी लेखक झालो असतो असे मला वाटते. तुम्हाला असे काही वाटते का ? इथे चर्चा करा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त धागा.
मस्त धागा.
मी कॉन मॅन झालो असतो - अजूनही होऊ शकतो.
आताचे रूक्ष क्षेत्र हा माझा
आताचे रूक्ष क्षेत्र हा माझा चॉईस कधीच नव्हता. मी लेखक झालो असतो असे मला वाटते. +७८६
मस्त धागा !
मला प्राथमिक शिक्षिका व्हायचं
मला प्राथमिक शिक्षिका व्हायचं होतं., मराठी विषयाची
अभियन्ता झाले नसते तर शिक्षण क्षेत्रात गेले असते ..
आत्ता जे काम करते आहे तेही भारी आहे, त्यामुळे नो रीग्रेट्स
स्वतःला काय व्हायचे होते ते
स्वतःला काय व्हायचे होते ते लिहायचं की मेरीच गिनो लेखक झाले असते का नाही त्याबद्दल लिहायचंय
मी एक आळशी हाउसवाईफ झाले असते.
अजुनही कधी कधी फार्फार इच्छा होते जॉब वैगेरे सोडुन मस्तपैकी फुल्ल टाईम गृहिणी व्हायची
पण ही इच्छा दोन चार दिवसच टिकते.
मी ही गणित / इंग्लिश चा
मी ही गणित / इंग्लिश चा शिक्षक झालो असतो.
मी एका कोल्हापूर सांगली
मी एका कोल्हापूर सांगली मिरजेच्या शेतकऱ्याची (पण श्रीमंत शेतकरीच ) बायको किंवा मग कोकणातली सोज्वळ सून होण्याची स्वप्न पहायचे. (अति कादंबऱ्या आणि सिनेमाचा प्रभाव). प्रत्यक्षात अमेरिकन कम्पनीची नोकरी आणि अर्ध आयुष्य युरोपमधे घालवणार्या नवऱ्याची बायको झाले. अजूनही शेतात वगैरे काम करायची आणि कोकणात राहायची खुमखुमी आहेच, पण शेत आणि कोकण/खेड्याशी दूरदूरचे सुद्धा लागेबांधे नाहीत, मग पाऊस पडला की मला शेतांची स्वप्न पडतात
आयुष्यात बरंच काय करावसं
आयुष्यात बरंच काय करावसं वाटतं, आणि बरंच काय व्हायचं पण होतं पण शेवटी जगण्यासाठी लागणारे चार पैसे अशा रूक्ष नोकऱ्या करूनच मिळतात, तरीपण मला अजूनही एक चांगला ट्रेडर व्हायचं आहे शेअर मार्केट मधला, सकाळी दहा पर्यंत ट्रेडिंग करून बक्कळ पैसे कमवायचे आहेत उरलेल्या वेळात आमच्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत,सायकलवर कोकण फिरायचं आहे, दुपारी पंखा फुल्ल स्पीडवर ठेऊन आवडतं पुस्तक वाचत पडायचं आहे, रात्रीची लाईट गेली असताना भुतांच्या गोष्टीचे फड ओटीवर जमवायचे आहेत, पहिल्या वादळी पावसात खेकडी, मासे पकडायला जायचंय, त्याच गावच्या जुन्या मित्रांसोबत टूपणी खेळता खेळता राज्य दूरवर न्यायची आहे, आणि दमल्यावर देवळाच्या पारावर बसून गुलाबछडी खायची आहे.
मी कोण झालो असतो हे बदलत असते
मी कोण झालो असतो हे बदलत असते.
तूर्तास मी डॉक्टर झालो असतो, पेशंट्सना दिलेली वेळ काटेकोरपणे पाळली असती. तसेच ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यावर काय? हा प्रश्न पडला नसता.
हा कालच आलेला विचार.
सकाळी दहा पर्यंत ट्रेडिंग
सकाळी दहा पर्यंत ट्रेडिंग करून बक्कळ पैसे कमवायचे आहेत
>>
चुकून झालाच तर एक फुकटचा सल्ला: १० नंतरच करा! चिक्कार पैसा कमवता येतो
चुकून झालाच तर एक फुकटचा
चुकून झालाच तर एक फुकटचा सल्ला: १० नंतरच करा! चिक्कार पैसा कमवता येतो>>> रोज कमवता येतो काय? मी या क्षेत्रात उतरायचा विचार करतोय. भीती पण वाटते आमच्या इथे एक जण आहे त्याने एका दिवसात 1लाख गमावले
रात्रीची लाईट गेली असताना
रात्रीची लाईट गेली असताना भुतांच्या गोष्टीचे फड ओटीवर जमवायचे आहेत,
>>>> ऐतेन
धागा-प्रतिसाद वाचून भरपूर
धागा-प्रतिसाद वाचून भरपूर विचार केला पण मी काय झाले असते/ काय व्हायची माझी इच्छा होती जी पूर्ण झाली नाही असे काहीच आठवेना...
मग आठवलं कि त्या त्या गोष्टी वाचताना मला शेरलॉक व्हावं अस वाटलं होतं किंवा डोरीयन ग्रे... एवढंच काय परवा शार्प ऑब्जेक्टस् बघताना "छ्या आपल्याला स्केटिंग यायला पाहिजे होत राव!" वाटलं किंवा अंधाधून बघून आल्यावर "च्यक् कमितकमी पियानो वाजवायला तरी शिकायला पाहिजे होतं"...
छान धागा.
छान धागा.
लहान असताना टिचर टिचर, डॉक्टर, गृहीणी बनण हे खेळ आवडायचे. नंतर मला झाडा-पानांत रमायला आवडू लागल. कृषी क्षेत्रात जाता आल असत तर गेले असते. पण तेव्हा ती सोय आमच्याकडे नव्हती.
मी एस.टी. ड्रायव्हर झलो असतो.
मी एस.टी. ड्रायव्हर झालो असतो..! लहाणपणी माझे स्वप्न होते की मोठा झाल्यावर एस.टी चा. ड्रायव्हर व्हायचे.. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते...
मला असं वाटतं की मी चांगला
मला असं वाटतं की मी चांगला वक्ता झाला असतो.
मला असं वाटतं की मी चांगला
मला असं वाटतं की मी चांगला वक्ता झाला असतो.>> चांगले लेखक आहात... वक्ता पण होऊ शकाल.
मला archaeology,
मला archaeology, palaeography, indology यात करियर करायची इच्छा होती
मी एक छान गायिका बनु शकले
मी एक छान गायिका बनु शकले असते असं मला वाटतं.
मला काॅलेज प्रोफेसर व्हायला
मला काॅलेज प्रोफेसर व्हायला आवडलं असतं...
पण शिकवण्याचा छंद प्रायवेट क्लासला शिकवून जोपसतो...
दुधाची तहान ताकावर तर ताकावर...
मला एक चांगल्या मल्टीनँशनल
मला एक चांगल्या मल्टीनँशनल कंपनीत काम करायचंय
तशी अजूनही वेळ गेलेली नाही.
मला खरं तर पायलट व्हायचं होतं
मला खरं तर पायलट व्हायचं होतं. अजूनही प्रवासात आवर्जून खिडकीची सीट घेतो. बहुधा मी मागल्या जन्मी गरूड वगैरे सारखा पक्षी असावा.
पण नेमस्त जीवन शैली हेच बरोबर असते हा अलिखित संस्कार , जीवन जसे येत गेले त्यातला रूढ विचाराप्रमाणे नियतीने दिलेला सर्वोत्कुष्ठ पर्याय स्वीकारत जाण्यासाठी पुरेसा ठरला. पण तरी सुद्धा त्याबद्दल पश्चात्ताप बिलकुल नाही.
आणि बरोबरच्या सवंगड्यांच्या आमंत्रणाला डावलून संगीत क्षेत्रात न आल्याचेही दु:ख्ख नाहिये...