अस्तित्वात असलेले ब्रह्मज्ञ

Submitted by कूटस्थ on 17 September, 2014 - 12:07

आपल्या देशाला थोर संत व महापुरुषांची देणगी लाभलेली आहे. यातील अनेकजण हे ब्रह्मस्वरूप (God-Realized) होते. उदाहरण द्यायचे झाल्यासच १९ व्या आणि २० व्या शतकातील रामकृष्ण परमहंस , स्वामी विवेकानंद, गोंदवलेकर महाराज, परमहंस योगानंद, रमण महर्षी यांचे देता येईल. परंतु अलीकडच्या काळात अजूनही हयात असलेल्या अश्या सत्पुरुषांची संख्या फार नाही. अश्या सध्याच्या काळात हयात असणाऱ्या सत्पुरुषांची कोणाला माहिती असल्यास किंवा तत्सम अनुभव येवून खात्री पटलेली असल्यास माहिती द्यावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व पुस्तके bookganga.com वर ऑनलाइन मिलतात फिजिकल व ई बुक फॉर्मेट मधे उपलब्ध आहेत, यातील मी बोलतोय हे मराठी पुस्तक तर मास्टरपीस आहे, विचारांची पद्धत काही धारणा या मुळापासून बदलणारे आहे, हे वाचून चिंतन करून काँटेंपोरारी टाईम मधे अनेक जण उद्योग धंद्यात यशस्वी, व कार्यकारण भाव समजून अडचणींतून. अगदी थोडक्या काळात काही दिवसांमध्ये मार्ग मिळाला त्यामुळे ते आनंदी व सुखी झाले, डिप्रेशन उदासीनता यातून मुक्त झाले.... अनेकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे परस्पर मिळाली..... Mahatria Raa यांचे unposted letters व जागी वासुदेव यांचे इंनेर इंजिनिअरिंग ही पुस्तके ...जीवनाचे काही वेगळेच फॅसेट्ट तुम्हाला दाखवतात.... तर सवितनंद यांची पुस्तके कार्यकारण भाव स्पष्ट करणारी आहेत.... या शिवाय आज भेटू शक्य आहे असे अजून एक संत... मुंबई येथील... श्री केणे महाराज ... हे UDCT मुंबई मधून B Tech केमिकल इंजिनिअर व एक यशस्वी उद्योगपती होते, दत्त कृपा होण्यापूर्वी... करोडो रुपयांची उलाढाल असणारे 2 कारखाने यानी उभे केले, आणि अचानक यांची फसगत झाली ... त्यामुळे अनेक अडचणी झेलल्या ..... त्यानंतर यांना प्रत्यक्ष दत्तगुरु नी मार्गदर्शन केले.... यांची पण 2 पुस्तके अनुभव जय गिरनारी या नावाची आहेत... हे सारं पौर्णिमेला गिरनार पर्वतावर ... दर्शनाला पायी जातात.... तर अशी उच्च शिक्षित, वैभव संपन्न, जग फिरणारे globe trotters, आणि उद्योग धंद्यात अत्यंत यशस्वी आणि तरीही ईश्वर कृपा प्राप्त संत मंडळी आजही आहेत... की ज्यांना आपण भेटू शकतो... यांची राहणीमान उच्च दर्जा चे आहे, हे सर्व इंग्लिश व अन्य भाषांवर उत्कृष्ट कमांड असणारे संत आहेत..

2. श्री जगन्नाथ कुंटे, शंकर महाराज यांचे गुरू हे आज आहेत,>>>>> तुम्हाला शिवनाथबाबा म्हणायचय का? शंकर महाराजांना ते गुरु स्थानी मानतात पण त्यांचे गुरु शिवनाथबाबा ज्यांचे वय १५० च्या वर असून ते हयात आहेत असं कुंटे स्वामींकडून ऐकलय.

हिमालय कायकू गाठणेका इतका लांब Wink बस्स एडमिन विपु चेक करा की ...मायबोलीवरील सगळे ब्रह्म तिकडे हजर असतं ! आणि त्यांच्या ब्रह्मज्ञानाचा सुमधुर लाभ घ्यायला वाहती पाने आहेतच (सुज्ञास नावे सांगणे न लगे)
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
फारच अनुभव दिसतोय, आणि एडमीनचा वरदहस्तही.
नाहीतर स्रियांना असली भाषा वापरून आय डी अजूनही कसा टीकतोय हे कोडंच आहे...

@Gujji
यांची राहणीमान उच्च दर्जा चे आहे, हे सर्व इंग्लिश व अन्य भाषांवर उत्कृष्ट कमांड असणारे संत आहेत>>>> माफ करा पण हा मुद्दा मला ऑफेन्सिव्ह वाटला.
बाकी तुम्हाला वैयक्तिक यांचे किंवा इतर कोणाचे काही अनुभव असतील स्वतः ला आलेले तर ते आवडतील वाचायला

यांची राहणीमान उच्च दर्जा चे आहे, हे सर्व इंग्लिश व अन्य भाषांवर उत्कृष्ट कमांड आहे हा उल्लेख ऑफेन्सिव वाटायचे काहीही कारण नाही, कारण जसा देश तसा वेश, आणि शिक्षण, रहाणीमान याचा उल्लेख अश्यासाठी केला की अश्या व्यक्ती कुठेतरी दूर दुर्गम जागी जगापासून फटकून अस्तित्व आणि सर्वसामान्य पणे आधुनिक शिक्षण न घेतलेले, वेश साधी राहणी, किंवा कसलीही जगाची शुध्द नसलेले असते असा एक समज असतो परंतु हे सर्व संत अत्यंत उच्च शिक्षित, आपल्या क्षेत्रात कर्तबगार यशस्वी आणि तुमच्या आमच्या सारखेच मुलेबाळे असलेले तुमच्या आमच्यातील आहेत आणि आधुनिक भाषेत संवाद साधू शकतात... तर हे सर्व जण आपले सामान्य जीवन जगत असताना स्वतः कसा अनुभव येतो हे सांगतात... मला तर यातील डॉक्टर सुनील काळे यांच्या आशीर्वादाने काही अनुभव आले ... अगदी सोपी गोष्ट त्यांनी सांगितली.. आपल्या घरी रोज रात्री .... झोपताना या क्षणा पर्यंत ज्या कुणाला काळात नकळत दुखावले असेल त्यांची मी मनपूर्वक क्षमा मागतो... आणि शरीरातील प्रत्येक पेशीचे आभार मानतो... धन्यवाद... ही प्रार्थना... आणि खरोखरच अनेक चांगले अनुभव आले....

माहिती दिल्याबद्दल अनेक धन्यवाद गुज्जी. 'मी बोलतोय' हे पुस्तक डिजिटल स्वरूपात बुकगंगा वरून विकत घेतले आणि आता वाचतोय....चांगले वाटतेय...
कुटस्थांनी सुचविल्याप्रमाणे मी रामकृष्ण परमहंस , विवेकानंद, परमहंस योगानंद यांची काही पुस्तके वाचली आहेत आणि काही वाचतो आहे. माझी लिस्ट खालीलप्रमाणे आहे:
वाचलेली पुस्तके: योगानंदांचे ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी (मराठीत योगी कथामृत - हा मला वाटलेला मास्टरपीस), विवेकानंदांचे राजयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, पॉल ब्रॅंटन यांचे हिमालय नि एक तपस्वी, श्री एम यांचे Apprenticed to a Himalayan Master
सध्या हे वाचतोय: रामकृष्ण परमहंस यांचे गॉस्पेल, उपनिषदे, पॉल ब्रॅंटन यांचे 'secret search of India'

तुम्ही सुचवलेल्याव्यतिरिक्त अजून काही चांगली पुस्तके असतील तर जरूर कळवा. योग्य असल्यास आपण सांगितलेल्या व्यक्तींना एकदा जरूर भेटेन

या संतांच्या पब्लिक डोमेन मधे उपलब्ध पुस्तकांचा उल्लेख अश्याकरीता केला की या संतांना आपलयाला काय सांगायचे आहे ते लेखी स्वरूपात आपल्यापाशी मिळते आणि सहज अनुभव घेता येतो

ज्यांच्या उत्तरांसाठी ब्रह्मज्ञ माणूसच पाहिजे असे कोणते प्रश्न पडले आहेत? नि ते सगळे एकाच व्यक्तीने सोडवावेत अशी अपेक्षा आहे का?
बहुतेक रोजच्या व्यवहारातील प्रश्नांची उत्तरे निरनिराळ्या लोकांपासून सहज मिळू शकतात.
खरेच ब्रह्मज्ञान वगैरे मिळवायचे असेल तर मायबोलीवर लिहून मिळणार नाही.

एक आठवण... यातील autobiography of yogi याचे योगी कथामृत हे मराठी भाषांतर प्रसिद्ध अडवोकेट श्री ग. नी पुरंदरे, कल्याण यांनी 1985 सुमारास केले, व राइट्स योगदा सत्संग सोसायटी la दिले यांनी मला शाळेत असताना यांनी इंग्लिश शिकवले, या बरोबरच पॉल ब्रतान यांचे थर्ड आय , लोंबसांग रंपा , भारतीय अध्यात्मिक रहस्याचा शोधत अशी अप्रतिम मराठी भाषांतर केली व ही इंग्लिश पुस्तकं मराठीमध्ये उपलब्ध केली, यांना अनेक अनुभव होते, यांची 2मुले अकाली वारली, त्यांची भेट मृत्युनंतर भेट लाहिरी महाशय यांनी समाधी नंतर प्रत्यक्षात यांना घडवली त्यानंतर दादर मधून प्रॅक्टिस सोडून त्यांनी योगडा सत्संग सोसायटी चे काम केले, श्री पुरंदरे 1988 मधे 88 व्या वर्षी वृद्धपणामुळे निधन झाले..

नंद्या प्रत्यानाविना passion शिवाय जगात काहीही मिळत नाही, आऊट सोर्स होत नाही, प्रयत्न लागतातच, पण जसे सचिन तेंडुलकर हा क्रिकेट मधील देव तसे या बाबतीत संत हे अनुभव घेतलेल्या व्यक्ती... अर्थात प्रयत्न पशोन, ध्यास याशिवाय जगात काहीही मिळत नाही, त्याच बरोबर पाणी पिण्यासाठी तहान भागवण्यासाठी नळा समोर थोडे का होईना वाकावे लागते.... इतकेच... कोणताही चमत्कार... मेनू ड्रिवेन सोलुशन .... अपेक्षित नाही.... तर निखळ ... शारिंग ऑफ इंडिया आहे.... विविध प्रकारची माणसे... कलाकार... शत्रू... मित्र. . क्रितिक... याचमुळे आपले आयुष्य निश्चित समृध्द होते.

"एक आठवण... ...................झाले" ---> छान माहिती गुज्जी. हे माहित नव्हते. मी Autobiography of a Yogi हे इंग्लिश मधून जे ओरिजिनल आहे ते वाचले तसेच त्याचा मराठी अनुवादही वाचला.आणि मला मराठी अनुवाद जास्त भावला. ओरिजिनल इंग्लिश पुस्तक हे अतिशय वरच्या लेव्हलच्या इंग्लिश मध्ये लिहिलेले आहे आणि तेवढे उच्च इंग्लिश समजण्याची माझी कुवत नसावी. कदाचित ते अमेरिकेत असताना लिहिले असल्यामुळे अमेरिकन लोकांची भाषाशैली गृहीत धरून लिहिले असणार. मराठी अनुवाद मात्र एकदम सुरेख.

खरेच ब्रह्मज्ञान वगैरे मिळवायचे असेल तर मायबोलीवर लिहून मिळणार नाही ---> पण इथे बरीचशी माहित असलेली माहिती, विविध लोकांचे अनुभव, त्यांच्या परिचित व्यक्ती हे मात्र जरूर मिळेल आणि मला तेच अपेक्षित आहे. बाकी ब्रह्मज्ञान काळ आणि वेळ आली की गुरु देतीलच.

ब्रम्हज्ञान?

भीखा बात अगम की, कहन सुनन की नाही
जो जाने सो कहे नाही, जो कहे सो जाने नाही

रामकृष्ण परमहंस म्हणायचे

ब्रम्हज्ञान होणे म्हणजे मिठाच्या बाहूलीने समुद्राची खोली पहायला जाणे.

मग वर आलेल्या उदाहरणांमध्ये त्या व्यक्ती ब्रह्मज्ञानी आहेत हे कसं कळलं? खरंच प्रश्न पडलाय म्हणून विचारतेय.

सिद्ध आणि ब्रह्मज्ञ ह्यात गल्लत तर होत नाहिये ना?

ब्रम्हज्ञान झालेले, परमहंसपदी विराजमान असणाऱ्या व्यक्तिंची काही लक्षणे असतात. तसेच या व्यक्तिंच्या बोलण्यातूनही ते अनेकदा व्यक्त होते.
पुन्हा रामकृष्णांचेच उदाहरण देतो.
ते विवेकानंदादी अंतरंग भक्तांना ब्रम्हानंद किंवा योगातल्या काही विशिष्ट अवस्था समजाऊन द्यायला बसत आणि विवेचन करुन मुख्य मुद्याला सुरवात करताच त्यांना समाधी लागे. ते कैकदा व्याकूळ होऊन रडत हे सगळे अनुभव सांगता येत नाही म्हणून. ही अनुभवायचीच गोष्ट आहे.

विवेचन करुन मुख्य मुद्याला सुरवात करताच त्यांना समाधी लागे. ते कैकदा व्याकूळ होऊन रडत >>>> ह्यात समाधी म्हणजे खोल ध्यानधारणा का?

व्याकूळ होवून अश्रू येणे हे अष्टभाव जागृत झाल्याचे लक्षण आहे. ते तुम्हा आम्हालाही होते.

रामकृष्ण परमहंस किंवा शारदादेवी हे सद्गुरू होते आणि सद्गुरूतत्व म्हणजे भगवंत.

माझा नेमका प्रश्न हा आहे की हे ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञानी व्यक्तींना स्वत:ला अनुभवायला येते हे बरोबर. पण ती व्यक्ती ब्रह्मज्ञानी आहे हे इतरांनी कसे ओळखावे? कर्म, ज्ञान, योग व भक्तीमार्गावरून वाटचाल चालू असताना प्रत्येकाला आपापल्या कुवतीनुसार त्या त्या पातळीला अनुभव येत असतात. अगदी एक एक करून सिद्दी प्राप्त होणे व त्याची जाणीव इतरांना होणे ह्यातही stages असतील. अर्थात ज्याला सिद्धी मिळतात त्याने त्या मोहाला दूर ठेवून नाकारायच्या तरी असतात किंवा जबाबदारीने सांभाळायच्या असतात. नाहीतर पतन निश्चित. पण ज्या व्यक्ती त्या जबाबदारीने सांभाळतात त्या देखील नक्की कुठल्या stage ला आहेत हे कळले नाही तर त्या stage लाच ब्रह्मज्ञान प्राप्त झाले असा चुकीने समजले जाऊ शकते.

असतीलही खरे ब्रह्मज्ञ अजूनही. पण ब्रह्मज्ञान सोपे नाही. श्रीसाईसच्चरितात एक व्यापारी साईनाथांकडे ब्रह्मज्ञान मागायला येतो. मग साईनाथ काय करतात त्याची कथा आहे. बहुतेक अध्याय नववा.

ह्यात समाधी म्हणजे खोल ध्यानधारणा का?>>>ढोबळ शब्दात तसं म्हणायला हरकत नाही. पण भाव समाधी ते निर्विकल्प समाधी हा बराच मोठा प्रवास आहे. ज्ञानेश्वरीत समाधीचे बारीक विश्लेषन आहे. ओव्यांचे क्रमांक शोधून पाठवतो.

व्याकूळ होवून अश्रू येणे हे अष्टभाव जागृत झाल्याचे लक्षण आहे. ते तुम्हा आम्हालाही होते.>>> हो हे अष्टभावातील एखादा भाव जागृत झाल्याचे लक्षण आहे. पण आपण जे व्याकुळ होऊन रडतो ते अष्टभावाचे लक्षण नक्कीच नाही. रामकृष्ण वरिल प्रसंगात रडत ते सामान्य माणसांसारखेच. आपल्या भक्तांना काही गोष्टी सांगायला आपल्याला परवानगी नाही या खंतेतून ती व्याकुळता येई.

सिध्दींबाबत तुम्ही म्हणता ते योग्यच आहे. त्या त्याज्यच आहेत. सिध्दींना विष्ठेची उपमा दिली जाते. त्यांचा उपयोग फक्त मैलाचा दगड एवढाच आहे. साधक योग्य मार्गावर असल्याचे ते एक लक्षण आहे.

आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे अशा व्यक्ती ओळखायच्या कशा? तर साधकाची विशिष्ठ प्रमाणात साधना होते, नामस्मरण होते तेंव्हा ही दृष्टी प्राप्त होते. थोडक्यात अशा व्यक्तींना ओळखण्यासाठी आपलीही तेवढी पात्रता असायला हवी. अती प्यायलेला माणूस स्वत:च्या बायकोला देखील ओळखू शकत नाही. तेच एखादा रस्त्यावर गाणाऱ्या माणसातला कलाकार सर्वसामान्य माणूस ओळखू शकत नाही पण ती सुरावट ऐकूण एखादा गायक त्या गाणाऱ्यात लपलेल्या कलाकाराला त्वरीत ओळखू शकतो.

येथे या विषयावर जास्त सविस्तर लिहिणे प्रशस्त वाटत नाही. तसेही माझी माहीत ही ऐकुन व वाचूनच आलेली आहे, स्वानुभवातून नाही. पण ज्यांच्या मुखातून ऐकायचे भाग्य लाभले ते निश्चीत अधिकारी होते.

ज्या ज्ञानाचा सामान्य मानवाच्या जीवन विकासाकरिता उपयोग होतो आणि त्यातून मानव जातीचे भले होते ते ज्ञान माझ्या मते ब्रह्मज्ञानाइतकेच महत्वाचे आहे आणि ज्याने हे जाणले व त्याप्रमाणे आपले आयुष्य जगले ते सर्वजण ब्रम्हज्ञ आहेत.

आदि शंकराचार्यानी समोरून येणाऱ्या मदोन्मद हत्तीतील ब्रह्म जाणले आणि स्वताही त्याच ब्रह्माचा अंश असतानाही हत्तीपासून स्वताच्या बचावासाठी आडोशाला धावले. जे असे प्रैक्टिकल लेव्हलवर ब्रह्म जाणतात ते खरे ब्रह्मज्ञ... बाकी मोठे मोठे ज्ञान आणि ग्रंथाचे विवेचन माझ्या काय कामाचे ?

ज्या ज्ञानाचा सामान्य मानवाच्या जीवन विकासाकरिता उपयोग होतो आणि त्यातून मानव जातीचे भले होते ते ज्ञान माझ्या मते ब्रह्मज्ञानाइतकेच महत्वाचे आहे आणि ज्याने हे जाणले व त्याप्रमाणे आपले आयुष्य जगले ते सर्वजण ब्रम्हज्ञ आहेत.

आदि शंकराचार्यानी समोरून येणाऱ्या मदोन्मद हत्तीतील ब्रह्म जाणले आणि स्वताही त्याच ब्रह्माचा अंश असतानाही हत्तीपासून स्वताच्या बचावासाठी आडोशाला धावले. जे असे प्रैक्टिकल लेव्हलवर ब्रह्म जाणतात ते खरे ब्रह्मज्ञ... बाकी मोठे मोठे ज्ञान आणि ग्रंथाचे विवेचन माझ्या काय कामाचे ?

Submitted by रागिणी on 15 June, 2019 - 12:58
>>>>>>>
या सगळ्या काथ्याकुटातला सर्वोत्तम प्रतिसाद!!!!

आज हयात असणारे संत हे आजच्या काळात अपलल्या उपयोगी उपदेश देत आहेत... ब्रह्म ज्ञान फार दूर ची गोष्ट पण या संतांनी सांगितलेल्या गोष्टीचे मनंन चिंतन आणि कणभर आचरण केले किंवा कळत नकळत घडले तरी परिणाम आनंददायी असतो आजचे आयुष्य नक्कीच सुखी होते, चिडचिड खूप कमी होते, आणि त्यामुळे कोणताही छोटा मोठा निर्णय हा रीझन्ड घेता येतो अश्या निर्णयाचे परिणाम पण चांगलेच असतात कठीण प्रसंगात सहन करता यातील असे असतात त्यामुळे परिस्थिती बदलण्याचे बळ मिळते, एनेर्जी चॅनल होते आणि यश मिळते... कुठली गोष्ट किती ताणावी याचे भान येते... आणि योग्य. वेळी हेका सुटल्यामुळे ..किंवा सोडा यची बुद्धी झाल्यामुळे.... ब्लडप्रेशर वाढत नाही... आणि टाईम ली एक्झिट मूळे .. पुढील .. नको ते वळण टाळते.. तर असा अगदी साधा सोपा कॉस्ट बेनिफीट रशिओ लक्षात आला तरी चिक्कार झाले... त्यामुळे आह हयात असणर्या संतांचा. सत्संग करावा... संत सत्संगा बद्दल एक श्लोक आठवला हा श्लोक सत्संगामुळे होणारी प्रोसेस डीस्क्राईब करतो ...सत्संगत्वे निस्संगत्वं, निस्संगत्वे निर्मोहत्वं।
निर्मोहत्वे निश्चलतत्त्वं, निश्चलतत्त्वे जीवन्मुक्तिः ... म्हणून शक्य असल्यास सत्संग करावा...

इथे ब्रह्मज्ञान म्हणजे काय असे काही जणांनी विचारले आहे. मला स्वतःला याचा काही अनुभव नाही परंतु जेवढे काही वाचले आहे आणि या अल्पबुद्धीला समजले आहे त्यावरून थोडक्यात सांगतो. 'मी कोण' याचे ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान. मी म्हणजे शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही किंवा अहंभाव नाही तर त्या सगळ्या पलीकडचा विशुद्ध, चिदानंद, अनंत, सर्वव्यापी, सदासर्वकाळ अस्तिस्त्वात असणारा असा तो आत्मा किंवा परमात्मा म्हणजे खरा मी असा अनुभव येतो (विचारांच्या कसोटीवर नाही तर प्रत्यक्ष जाणिवेच्या कसोटीवर) अथवा जाणिवेच्या कसोटीवर ते ज्ञान होते ते ब्रह्मज्ञान. याबाबतीत शंकराचार्यांचे निर्वाणषटक खूप छान आहे. जरूर वाचावे.
हा अनुभव शब्दात सांगणे खूप अवघड कारण तो शब्दातीत आहे. समाधीच्या उच्च पातळीवर असा अनुभव येतो. अनेकांनी प्रयत्नपूर्वक तो शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतीत मला आवडलेले लेखन म्हणजे परमहंस योगानंदांनी लिहिलेल्या योगी कथामृत यातले आहे. त्यावर समाधीचं अनुभूती हे एक वेगळे प्रकरणच आहे. असा अनुभव स्वामी विवेकानंदांनाही रामकृष्ण परमहंसांनी दिला होता. ज्ञानेश्वरांनी देखील 'अमृतानुभव' मध्ये या ज्ञानाचे, अवस्थेचे वर्णन केले आहे. जिज्ञासूनी नक्की वाचावे. आदी हजारो वर्षांपासून ऋषी मुनींना हा अनुभव आला, महाभारतात भगवान श्रीकृष्णांनी तो अर्जुनाला दिला, शेकडो वर्षांपूर्वी गौतम बुद्धाला आला, शंकराचार्यांना आला, ८०० वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांना आला, ४०० वर्षांपूर्वी तुकाराम, समर्थ रामदासांना आला, २०० वर्षांपूर्वी स्वामी समर्थ, साईबाबा, गोंदवलेकर महाराज यांना आला, आणि १०० वर्षांपूर्वी विवेकानंद, योगानंद, रामकृष्ण परमहंस यांना आला आणि आत्ताही असे अनेक संत असतील ज्यांना हा अनुभव आला असेल, किंवा हे ज्ञान झाले असेल. हे ज्ञान कालातीत आहे कारण ही मंडळी वेगवेगळ्या काळात होऊन गेलेली असली तरी या अनुभवाबद्दल, ज्ञानाबद्दल सर्वत्र एकवाक्यता आहे. खाली काही लिंका देतो कुतूहल असल्यास जरूर वाचा.

समाधीची अनुभूती (an An Experience in Cosmic Consciousness) from Autobiography of a Yogi by Paramhansa Yogananda: https://www.crystalclarity.com/yogananda/chapter-14/

अमृतानुभव ( ज्ञानेश्वर महाराज): https://archive.org/details/amritanubhava_changdev_pasashti/page/n17

Cosmic Consciousness Experience of Vivekananda: https://www.vedanta.gr/wp-content/uploads/2012/03/SwVivek_Experience-Nir...

शंकराचार्य यांचे निर्वाणषटक: https://greenmesg.org/stotras/brahman/nirvana_shatakam.php

"माझा नेमका प्रश्न हा आहे की हे ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञानी व्यक्तींना स्वत:ला अनुभवायला येते हे बरोबर. पण ती व्यक्ती ब्रह्मज्ञानी आहे हे इतरांनी कसे ओळखावे? " ---> चांगला प्रश्न अश्विनी. सध्याच्या काळात हे तितकेसे सोप्पे नाही. जी व्यक्ती ब्रह्मज्ञानी असते ती गुरुस्थानी असते आणि समर्थ रामदासांनी खऱ्या गुरूंची लक्षणे दासबोधात सांगितली आहेत. या कसोटीवर गरज भासल्यास गुरु पारखून घ्यावा. पण असे म्हणतात की आपल्याला गुरु शोधावा लागत नाही. योग्य वेळ आली की गुरु स्वतःहून येतात. तोपर्यंत आपल्या आवडत्या देवतेचा मंत्रजप करावा. आणि संतमंडळींचा सहवास लाभेल असे प्रयत्न करावेत. त्यातच अर्धेअधिक काम होते. तुकाराम महाराज म्हणून गेलेत- 'न लगे मुक्ती आणि संपदा संतसंग देई सदा'

दासबोधात (दशक पाचवा) समर्थ रामदास म्हणतात
निःशेष कामनारहित | ऐसा तो विरुळा संत | अवघ्या वेगळें मत | अक्षै ज्याचें ||३८||
अक्षै ठेवा सकळांचा | परी पांगडा फिटेना शरीराचा | तेणें मार्ग ईश्वराचा | चुकोनि जाती ||३९||
मुख्य सद्‍गुरूचें लक्षण | आधीं पाहिजे विमळज्ञान | निश्चयाचें समाधान | स्वरूपस्थिती ||४५||
याहीवरी वैराग्य प्रबळ | वृत्ति उदास केवळ | विशेष आचारें निर्मळ | स्वधर्मविषईं ||४६||
याहीवरी अध्यात्मश्रवण | हरिकथा निरूपण | जेथें परमार्थविवरण | निरंतर ||४७||
जेथें सारासारविचार | तेथें होये जगोद्धार | नवविधा भक्तीचा आधार | बहुत जनासी ||४८||
म्हणोनि नवविधा भजन | जेथें प्रतिष्ठलें साधन | हें सद्‍गुरूचें लक्षण | श्रोतीं वोळखावें ||४९||
अंतरीं शुद्ध ब्रह्मज्ञान | बाह्य निष्ठेचें भजन | तेथें बहु भक्त जन | विश्रांति पावती ||५०||
नाना सद्विद्येचे गुण | याहिवरी कृपाळूपण | हें सद्‍गुरूचें लक्षण | जाणिजे श्रोतीं ||७३||
वासनेचा निःशेष क्षय झालेला क्वचित एखादा कोणी खरा संत असतो, सर्व लोकांहून त्याचे मत वेगळेच असते. असा हा विरळ आढणारा संत सतत त्या अक्षय, निराकार, अनंत भगवंताबद्दलच बोलत असतो. सर्वप्रथम शुद्ध विमळज्ञान असलेला, निश्चळ समाधान पावलेला, आत्मस्वरुपामध्ये अखंड स्थिर असलेला असा जो असतो, तेच त्या मुख्य सद्गुरुचे लक्षण असते. याशिवाय प्रबळ वैराग्यसंपन्नता असते, वृत्ति केवळ उदास समत्वबुद्धिची असते, स्वधर्माचे अत्यंत निर्मळ आचरण असते, अध्यात्मश्रवण, हरिकथानिरुपण आणि निरंतर परमार्थाचे विवरण चालू असते, जेथे नित्य सारासार विवेकविचार, आत्मानात्म विचार चालू असतो, तेथे जगाचा उद्धार होत असतो. अनेकांना येथे नवविधा भक्तीचा मंत्र मिळतो. म्हणून जेथे नवविधा भजन आचरले जात असते, जेथे साधन मार्गास अत्यंत महत्व असते, ते सद्गुरुचे लक्षण आहे असे श्रोत्यांनी ओळखावे. अंतरंगात शुद्ध ब्रह्मज्ञान, बाहेर निष्ठापूर्वक नामस्मरणासारखे सगुण भजन असेल तेथे बहुतांश भक्तजनांना समाधान लाभते. आत्मज्ञानातून स्वाभाविकपणे अंगी येणारे अनेक गुण आणि त्यापेक्षा अज्ञानी जीवांबद्दल अत्यंत कृपाळुपणा अंगी असणे हे सद्गुरूंचे लक्षण श्रोत्यांनी आवर्जून ध्यानात ठेवावे.
संदर्भ: http://www.dasbodh.com/2018/02/blog-post_37.html

Submitted by कोहंसोहं१० on 16 June, 2019 - 02:30

ब्रह्म/सद्गुरूतत्व व ब्रह्मज्ञ/ब्रह्मज्ञानी/ब्रह्मर्षी ह्या बद्दल खूप मोठा सविस्तर प्रतिसाद लिहिला होता. दुसऱ्या विंडोत काही रेफरन्स शोधल्यावर ती विंडो बंद करायच्या ऐवजी हीच बंद केली आणि अख्खा प्रतिसाद हरवला. असो.... त्या निमित्ताने चिंतन झाले.

सर्वसाधारण माणसापेक्षा मनाची थोडीशीही उन्नत अवस्था असलेले/गाठलेले लोक सहज ओळखू येतात. ते ऊर्जेने भरलेले असतात. सतत कार्यरत असतात. एक क्षणही वाया जाऊ देत नाहीत. चिडचीड करीत नाहीत. प्रयत्न सोडीत नाहीत. प्रसंगी वर्षानुवर्षे कायदेशीर लढाही देतात. यश मिळाले नाही तर त्या अपयशाच्या दु:खात गुंतून न राहाता दुसर्‍या कार्यात गुंततात. चेहेरा स्वच्छ, सतेज आणि आनंदी असतो. बहुतेक वेळा मितभाषी असतात. लोकसंग्रह पुष्कळ असतो पण मित्रप्रेमापोटी अयोग्य कृत्ये सहसा करत नाहीत. उलट अशा कृत्यांचे परिणाम समजावून सांगतात. त्यामुळे यांच्या आजूबाजूला वावरणारे लोक मित्र नसतात तर लाभेच्छू किंवा भक्त असतात. जसजशी उन्नतावस्था वाढते तसतसा त्वचेचा आरक्तपणा वाढतो. यांचे अन्नग्रहण कमी असते आणि त्या मानाने कार्य अफाट असते. इन्पुट कमी आणि आउटपुट अधिक. पण अमुक तर्‍हेच्या अन्नावाचून यांचे कधी अडत नाही. काही योगी कधी कधी अचाट अन्नग्रहण करतात. उदा. डझनभर केळी सालासकट खाणे किंवा परातभर भातात नुसते तेलतिखट मिसळून तो खाणे. पण काहीही न खाताही अनेक दिवस शांत उत्साही क्रियाशील वृत्ती राखू शकतात. समोरच्याचा प्रश्न आणि वृत्ती ह्यांना लगेच कळते. नजर शांत असते. भिरभिरती नसते. दृष्टीचा पल्ला मोठा असतो. एका दृष्टिक्षेपात अनेक गोष्टी त्यांच्या लक्ष्यात येतात. यांची निद्रा गाढ तरीही सावध असते. सहसा यांना प्राणी वश असतात. ह्यांच्या सहवासात कुत्रे, गायीबैल आनंदित असतात. कित्येक जण न शिकताही अनेक कसबांमध्ये पारंगत असतात. एकंदरीत स्थिरचित्त, अविकारी आणि भवतालाशी समकंपित असल्याने यांना निसर्गातील आकस्मिक बदल आधीच कळतात. त्यांना निसर्गाकडून सहसा त्रास होत नाही आणि झाला तरी त्याचे त्यांना काही वाटत नाही. त्यांना घाम असा पुष्कळ येत नाही. साधारणतः देहबुद्धी आणि वृत्ती त्यांच्या ताब्यात असते. स्तुतीने हुरळून जात नाहीत, निंदेने अस्वस्थ होत नाहीत.
असो. पुष्कळ लिहिता येईल.

माताजी प्रल्हाद जानी, गुजरात . हे संत अन्न पाण्याशिवाय आजही जिवंत आहेत>>> संदर्भ? अन्नपाण्याशिवाय किती दिवस मनुष्य जिवंत राहू शकेल या विषयी वैद्यकीय तज्ञ काहि भाष्य करु शकतील काय?

मी आत्ताच ब्रह्मज्ञ सुनील काळे यांच एक पुस्तक वाचलं .. खाली एक फोटो बी डकवलाय . माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे. माझ्या ओळखीत एक साधारण कुटुंबातील छोटा मुलगा आहे . तो काही वर्षांपूर्वी खेळताना पडला आणि आज कमरेपासून खालच्या संवेदना गेल्यात. सुनील काळेंच वर्णन वाचून ते त्याला नीट करू शकतील अशी २००% खात्री वाटतेय. त्याला जाऊ का घेऊन त्यांच्याकडे ? मला खात्री आहे कि ते मोफत इलाज करतील त्याचा
Image and video hosting by TinyPic

Pages