अस्तित्वात असलेले ब्रह्मज्ञ

Submitted by कूटस्थ on 17 September, 2014 - 12:07

आपल्या देशाला थोर संत व महापुरुषांची देणगी लाभलेली आहे. यातील अनेकजण हे ब्रह्मस्वरूप (God-Realized) होते. उदाहरण द्यायचे झाल्यासच १९ व्या आणि २० व्या शतकातील रामकृष्ण परमहंस , स्वामी विवेकानंद, गोंदवलेकर महाराज, परमहंस योगानंद, रमण महर्षी यांचे देता येईल. परंतु अलीकडच्या काळात अजूनही हयात असलेल्या अश्या सत्पुरुषांची संख्या फार नाही. अश्या सध्याच्या काळात हयात असणाऱ्या सत्पुरुषांची कोणाला माहिती असल्यास किंवा तत्सम अनुभव येवून खात्री पटलेली असल्यास माहिती द्यावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे शतक साईबाबांचे नाही तर सत्यसाईबाबांचे आहे.
आसाराम बापूंचे आहे. अनिरुद्ध बापूंचे आहे.

यांना आपण कोण समजतात हे आपल्यावरच सोडतो. Happy

'अलीकडच्या काळात अश्या 'सत्पुरुषांची' संख्या फार नाही'
याचे साधे सोपे सरळ कारण असल्या भंपक गोष्टीन्वर विश्वास ठेवण्याची कारणे
दिवसेंदिवस विज्ञानाच्या प्रगतीमुळे नष्ट होत आहेत!
म्हणूनच महमदानतर कोणी थापेबाज लुटारू 'प्रेषित' म्हणून बस्तान बसवू शकला नाहीय्!
+
लवकरच इतिहास अशी साक्ष देईल की
आपल्या देशाला(च नव्हे तर सर्व जगाला) थोर संत व महापुरुषांचा शाप लागला होता.
ते ग्रहण आता सुटण्याची चाहूल लागत आहे,
म्हणूनच अलीकडच्या काळात अश्या 'सत्पुरुषांची' संख्या फार नाही.

दुरुस्ती [काथ्या-]कूटस्थ :
आपल्या देशाला(च नव्हे तर सर्व जगाला) "तथाकथित / स्वघोषित" थोर संत व्यक्तींचा शाप लागला होता.
अपवाद नाही.
आपण नाव सांगितल्यास बिंग फोडता येईल.
('व्होल्सेल' बिंगफ़ोड: देव / दैव यांच्या अन्धविश्वासात (कल्पना-विश्वात + दुर्-वासात) गुरफटलेले सर्व अज्ञानी, मूर्ख वा कुटिल होते, त्यांचे विषयी वेगवेगळी बिंगफ़ोड / तसला काथ्या-कूट अनावश्यक.)

अशा व्यक्ती प्रसिद्धीपासून - ऐहिक सुखांपासून दूर असतात, त्यामुळे त्यांच्या जिवंतपणी सापडणे मुश्किल... आणि इथे मला ऋन्मेऽऽषचे पटते, आताचा कुणीही गॉडमॅन हा संत नाही.

डीविनीताजी,

का नाही ? त्यांनी भगवे कपडे घातलेले नाहीत इतकच.

एक माणुस अहमदनगरला एडस झालेल्या, सेक्स वर्कर्स म्हणुन काम केलेल्या महिलासाठी आश्रम चालवतो. त्याचे व त्या आश्रमाचे नाव ही कुणाला माहित नाही.

शोधले तर असे अनेक संत सापडतील. उदा. कै बाबा आमटे ज्यांनी जिवंतपणी अनेक चमत्कार ( कठीण अश्या प्रकारचे कार्य चालवणे तेही निस्प्रुह पणे. त्यांचे कार्य समजल्याने आज त्यांची तिसरी पिढी हेच काम करते आहे )

आपल्या सारख्या पोटार्थी माणसांनी असे कार्य करण्याचा नुसता विचार मनात करावा. अंगावर काटा येतो. स्मशानातुन घरी परत येताना ही दुनीया खोटी असे जे वैराग्य येते आणि अंघोळीनंतर जाते तसे हे विचार आपल्यासारख्या सामान्यांना नुसते शिवुन परत जातात.

नवीन,
उत्तम विचार, आणि सहमत

कै. बाबा आमटे आणि परीवार __/\__

................

पण / आणि
<<<<<त्यांनी भगवे कपडे घातलेले नाहीत इतकच.>>>>
यही सोच तो बदलनी है..

एक काळ होता जेव्हा समाजसेवक किंवा समाजसुधारकांनी भगवे कपडे घातले नाही तर लोकांचा त्यांच्या विचारांवर विश्वास बसणे कठीण व्हायचे, म्हणून कित्येकांनी देवाचे नाव घेऊन समता आणि शांतीचे संदेश दिले, सुधारणा घडवल्या.

आताच्या समाजसेवकांचे चुकते कुठे तर त्यांना वाटते आता समाज सुधारला आहे, आता देवाचे नाव घेत समाजकार्य करायची गरज नाही, पण तसे नाहीये.

उलट आता भगवे कपडे घालणे हे संत असण्याचे लक्षण म्हणून लोक बघू लागलेत. बस्स मग जोडीला हातचलाखी किंवा बोलीबच्चन देता येणे जमले की झाले. आणि हो, या सर्वाची मार्केटींग मस्ट !

कूटस्थ,

छान प्रश्न.. ब्रह्मज्ञ दोन प्रकारचे असतात..
१. त्यांना ज्ञान झालेले असते पण ते ज्ञान द्यावे असे मुमुक्षु सापडत नसल्याने आणि सगळे स्वार्थी लोक आपल्या संसारातील अडीअडचणी दूर करुन घेण्यासाठी मागे लागत असल्याने ते एकांतात असतात.
२. ते संसारात असतात सहजसमाधीत. ते आपले लोकोपकाराचे काम करत असतात. मग कोणी निंदा वा वंदा त्यांना फरक पडत नाही. त्यांचे देणे हे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे असते.

सध्या ऐकीवात असलेल्या प्रत्येकाबद्दल काही ना काही डाग लागलेला दिसतो त्यामुळे यातला कोण ब्रह्मज्ञ सांगता येणे कठीण आहे. (आपण निर्मल बाबा नावाच्या माणसाचा कार्यक्र्म पाहिलात तर त्यावर सगळी क्रेडिट कार्ड पेमेंट कसे करावे, बँक अकाउंट नंबर इ. माहितीच सुरु असते..अशा लोकांमुळे अध्यात्म म्हणजे भोंदुपणा हा समज पसरला तर मला त्यात नवल वाटत नाही.)

ज्या लोकांना आत्मज्ञान हवे आहे (माझी धद्यात भरभराट केव्हा होइल, माझ्या मुलाचे/मुलीचे लग्न कधी होइल, आम्हाला नातु कधी मिळेल, किंवा काहीतरी ऐहीक सुखाची अपेक्षा असलेले नव्हे) त्या लोकांच्या तळमळीप्रमाणे त्यांना सद्गुरु मिळतातच. फक्त नजर पाहिजे.

मिस्टर एम. खुलेपणाने अध्यात्मज्ञान देण्यासाठी तयार आहेत . चेन्नईत असतात वाटत सध्या .
त्यांच्या वेबसाईट वर इमेल id आणि landline नंबर दिला आहे . इमेल ला बर्यापेकी लवकर प्रतिसाद मिळतो .

दुसरे म्हणजे जगन्नाथ कुंटे

त्यांना ज्ञान झालेले असते पण ते ज्ञान द्यावे असे मुमुक्षु सापडत नसल्याने आणि सगळे स्वार्थी लोक आपल्या संसारातील अडीअडचणी दूर करुन घेण्यासाठी मागे लागत असल्याने ते एकांतात असतात. >>>
अजूनही असे पुष्कळ आहेत . पण आजच्या जगात देव हवाय कोणाला ? त्यामुळे हे लोक एकांतातच राहण पसंत करतात .

कै. बाबा आमटे आणि परीवार थोर समाजसेवक आहेत ह्यात वादच नाहीत . त्यांचे समाजासाठी योगदान फार मोठे आहे . परंतु त्यांना ब्रह्मज्ञ नाही म्हणता येत . फक्त भगवे कपडे घातले कि कोणी ब्रह्मज्ञ नाही होत

ब्रह्मस्वरुप म्हणजे नक्की काय?? रामकृष्ण परमहंस , स्वामी विवेकानंद, गोंदवलेकर महाराज, परमहंस योगानंद, रमण महर्षी हे सगळे महानुभाव ब्र.स्व. कॅटेगरीमधले होते असे ठरविण्याचा काही क्रायटेरीया वगैरे आहे कां?? असल्यास ईथे द्याल काय??

आ.न. मानवस्वरुप सडेतोड

असामि-असामि, << मिस्टर एम. पुस्तक वाचा. तुम्हाला अपेक्षीत माहिती मिळू शकेल...>>> मी हे पुस्तक अजून वाचले नाही परंतु त्यांचे vedio पहिले आहेत. कार्य नक्कीच चांगले आहे त्यांचे परंतु योगानंदांनी त्यांच्या 'Autobiography of Yogi' मध्ये 'बाबाजी' यांचा परिचय करून दिल्यापासून अनेकांनी बाबाजींना भेटल्याचा व त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे कार्य पुढे चालवण्याचा दावा केला आहे. त्यामुळे बाबाजींचे नाव घेवून कोणी काही कार्य करत असले कि लवकर विश्वास बसने कठीण होते.

mansmi18 - १००% सहमत.

मोहिनि३३३- <<पण आजच्या जगात देव हवाय कोणाला ? त्यामुळे हे लोक एकांतातच राहण पसंत करतात >> खरे आहे. त्यामुळेच त्यांना शोधणे थोडे अवघड आहे. म्हणूनच हा खटाटोप Happy माहिती असल्यास जरूर कळवावी हि विनंती.

Steffan Howkings, कै. बाबा आमटे आणि परीवार, बंग परिवार,
आणि कदाचित एखाद्या अनोळखी ठिकाणी लोकांपासुन दुर असलेला अवलिया... Happy

अरे हो, गांधी परिवाराला विसरलोच मी... Lol

कूटस्थ videos मध्ये आपल्याला त्याचं सध्याचं कार्य दिसेल पण त्यांची अध्यात्मिक वाटचाल त्यांच्या पुस्तकात वाचायला मिळेल . 'सिध्योग्याच्या शिष्याचे आत्मकथन ' असं काहीतरी नाव आहे . माझ्याकडे आहे ते पुस्तक. त्यांच्या गुरूंच नाव त्यांनी महेश्वरनाथ असं सांगितलंय आणि त्यांनी त्यांना नाथपंथाची दीक्षा दिली होती . खर खोटं हे तर आपण सांगू शकत नाही . कुणाच्या नाडी लागत बसण्यापेक्षा सरळ दत्त गुरूंना शरण जावं

कुणाच्या नाडी लागत बसण्यापेक्षा सरळ दत्त गुरूंना शरण जावं >...>>..

.................मोहिनि३३३ च्या मताशी सहमत

सापडले का हो कूटस्थ कोणी तुम्हाला? असल्यास मलाही कळवा जरा. नाहीतर हिमालयात जाऊन शोधेन म्हणतो. म्हणलं एवढ्या लांब जाण्याआधी बघुयात काही मिळतंय का तुमच्याकडून. असेल तर सांगा जवळपास

हिमालय कायकू गाठणेका इतका लांब Wink बस्स एडमिन विपु चेक करा की ...मायबोलीवरील सगळे ब्रह्म तिकडे हजर असतं ! आणि त्यांच्या ब्रह्मज्ञानाचा सुमधुर लाभ घ्यायला वाहती पाने आहेतच (सुज्ञास नावे सांगणे न लगे)

चेष्टा मस्करी कुटणे सोडून द्या, पटले नाही तर इग्नोर करा .... पण कृपा करून वेड्या वाकड्या गोष्टी लिहू नका ही नम्र विनंती..... तर सध्या आपण ज्यांना भेटू शकतो आणि स्वतः काही चांगले सहज अनुभव येतात असे हे काही संत. यांच्या लाईफ स्टाईल, स्टाईल या.पेक्षा अनुभव हा खरा, माझ्या माहितीतील अनेक जणांचे आयुष्य यांचे ऐकून आनंदी सुखी झाले आहे.
1.श्री एम, हे जन्माने केरळी मुस्लिम पण साईबाबंकडून अनुग्रहित आणि IFS म्हणून परराष्ट्र खात्यात कास्म केलेले आज हयात आहेत,
2. श्री जगन्नाथ कुंटे, शंकर महाराज यांचे गुरू हे आज आहेत,
3. जग्गी वासुदेव हे तमिळ गुरू एक सक्सेसफुल बिल्डर पूर्वी होते . आता ईशा फाऊंडेशन द्वारे काम करतात Inner Engineering हे अप्रतिम पुस्तक आहे. डॉक्टर सुनील काळे, पुणे, हे व्यवसायाने डॉक्टर आहेत एकदा अचानक यांना ठाणे येथील पट्टेकर गजानन महाराजांची कृपा झाली, मी बोलतोय हे आजपर्यंत मिळालेले अप्रतिम अनुभव असलेले पुस्तक
5 सवितानंद हे बरोड्या जवळ असणारे एक संत, हे एका प्रसिद्ध फार्मा कंपनीचे चीफ फर्मिस्त या उच्च पदावर होते, अचानक जगदंबेची कृपा होऊन हे संत बनले यांची तंत्र मंत्राचे विज्ञाn सर्व सुखासी पत्र होईजे ही पुस्तके आहेत
6. देविदास गुरुमाऊली हे बोरिवली मधील एक संत यांची 7 पुस्तके मराठी मधे आहेत अप्रतिम आहेत,
7 महत्रिया रा ... हे सॉफ्टवेअर इंजिनिअर होते ...एक दिवस ... अचानक ते ज्ञानी झाले त्यांचे अन् पोस्तेड लेटर हे पुस्तक आहे
8 स्वामी दत्तवधूत यांची वनिता प्रकाशनाने प्रसिद्ध केलीली पुस्तके
ही गुरू माणसे आज आहेत....
तर यांचा सहवास, यांचा आशीर्वादा मुले अनेक जणांचे जीवन सुखी झाले आहे... विश्वास असल्यास अनुभवी घ्या..... टिंगलटवाळी करू नये ही विनंती....

धन्यवाद गुज्जी.
"श्री एम, हे जन्माने केरळी मुस्लिम पण साईबाबंकडून अनुग्रहित"--> माझ्या माहितीप्रमाणे श्री एम ह्यांचे गुरु श्री महेश्वरनाथ आहेत आणि त्यांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे मागच्या जन्मात बाबाजी होते ना? साईबाबांच्या अनुग्रहविषयी थोडी माहिती द्याल का? जाणण्यास उत्सुक.
तसेच तुम्ही सांगितलेली पुस्तके कोठे मिळतील? बाहेर पुस्तकांच्या दुकानात सहजपणे उपलब्ध असतात का? मी भारतात नसल्यामुळे मलातरी सहज उपलब्ध होणार नाहीत. तुमच्याकडे ई-कॉपी असेल तर पाठवू शकाल का?

God realized >>> ओह.
ब्रह्म म्हणजे गॉड ?
शास्त्रज्ञ म्हणजे शास्त्र रिअलाइज्ड का ?
तंत्र रिअलाईज्ड म्हणजे तंत्रज्ञ.
ओ गॉड.

"ब्रह्म म्हणजे गॉड ?"---> माझ्या अल्पमाहितीप्रमाणे तरी हो. बाकी माहिती त्या कुटस्थांना विचारा. धाग्यात २री ओळ मध्ये त्यांनी तरी हेच लिहिलं आहे. ते काय रिप्लाय करत नाहीयेत (आधीही वेगळ्या धाग्यावर केला नव्हता). आयडी उडालेला वाटतोय.

Pages