विस्मरणात गेलेले/सहज न मिळणारे खाऊचे पदार्थ.

Submitted by अज्ञातवासी on 10 June, 2019 - 13:19

या लेखाची सुरुवात, प्रस्तावना कशी करावी नाहीये कळत. बघायला गेलं, तर यापैकी बरेच पदार्थ अजूनही दर आठवडी बाजारी मिळतात. पण आता शहरात सहजासहजी मिळणं अशक्य!
ठिकठिकाणी मारवाड, राजस्थान, कृष्णा अशा नावाची चकचकीत स्वीटची दुकाने उघडलीत. त्यातून हे पदार्थ तर हद्दपारच झाले आहेत. जिथे आहेत, तिथे अव्वाच्या सव्वा भावात विकले जातायेत.
चला तर, लहानपणी कसे आजोबा गुडीशेव आणायचे, लग्नाच्या पंगतीत कशी मूठ मूठभर बुंदी खाल्ली, याची आठवण जागवूयात!

१. गोडीशेव/गुडीशेव

लालजर्द दिसणारा आणि बघताच लक्ष वेधून घेणारा पदार्थ म्हणजे गुडीशेव! गोड आणि क्रिस्पी हे कॉम्बिनेशन शक्यतोवर जात नाही, पण गुडीशेवची मजाच न्यारी. एकदा तोंडाला लागली, की सुटता सुटत नाही. पण आता शक्यतोवर आठवडे बाजारात किंवा जत्रेतच मिळते.

२. बुंदी

एरवी लग्नाच्या पंगतीमध्ये हमखास आढळणारा गोड आयटम म्हणजे बुंदी. रात्रभर जागून आचारी बुंदी पाडायचा. आता ही बुंदीही हद्दपार झालीये. बुंदी खाताना दाताखाली जो पाक यायचा, त्याची मजा काय वर्णावी महाराजा!

३. हलवायाचा बुंदीचा लाडू

मोतीचूर या गोंडस नावाने बुंदीचा लाडू चकचकीत काचेत विराजमान झाला, आणि तिथेच त्याची मजा संपली. 'शुद्ध घी मे बने हुए मोतीचुर के लड्डू - ६०० रु KG + GST ५ परसेन्ट. गिफ्ट पॅकिंग मे भी उपलब्ध' यात जी मजा नाही, जी एका जुनाट कळकट हलवायच्या दुकानात ओबडधोबड आकारात बनलेल्या ३० रु पावशेर ने कागदात बांधून मिळणाऱ्या लाडवात आहे.

सगळे एकत्र! PC शालिदा

IMG_20190610_222537_875.jpg

४. कडक शेव

भावनगरी, गाठींया, इंदोरी या नानाविध नावानी मिळणाऱ्या शेवेत ही पिवळीधमक दिसणारी झाऱ्यातून सरळ पाटीत आणि तिथून मुठीने कागदात पडणारी शेव हरवली. ही शेव खाताना येणारा कुर्र कुर्र आवाज आता कुठल्याही दुकानात मिळणाऱ्या शेवमध्ये नाही होत.

PC शालिदा

IMG_20190610_222903_625.jpg

५. भत्ता

भेळ नाही, फक्त भत्ता, आणि तोही मिळेल तर एखाद्या जुन्या दुकानात किंवा सरळ बाजारात. पॅकिंग फरसाण मध्ये प्रचंड आढळणाऱ्या मक्याच्या पोह्यांचा, तळलेल्या पोह्यांचा मागमूस नाही. सर्वात आधी तीन चार मुठा भरून मुरमुरे, त्यावर शेव, थोडी जाड शेव, थोडासा भाजक्या पोह्यांचा चिवडा, खारी बुंदी मग दाळ्या आणि सगळ्यात शेवटी पापडी. वर भरपूर मूठभर बारीक कापलेला कच्चा कांदा आणि कोथिंबीर! लिंबू पिळायचा असेल तर पिळा, जास्तच पट्टीचा असेल तर कच्चं तिखट आणि काळा मसाला वरून. स्वर्गसुख.

images (2)_0.jpeg

६. रेवड्या

रेवड्यांची चव काय सांगू महाराजा, गुडीशेवची लहान बहीण. शुभ्र, जिभेवर पडताच अवीट गोडीचा आनंद देणारी.

gulab-revdi-250x250.jpg

७. गुळाची जिलेबी.

पूर्वी मिळायची. आता नाही मिळत जास्त

IMG_20190610_223519.jpg

८. लाल रसगुल्ले

हो, अशा नावाने एक पदार्थ मिळायचा. एक रुपयाला चार. मध्ये पाक असायचा थोडा, गोड.
thaen-mittai-candy-500x500.jpg

९. दूधमलाई चॉकोलेट

एक रुपयाला चार. हीच्यात आणि किसमीमध्ये टफ फाईट होती. पांढरीशुभ्र चॉकोलेट असायची.

dudh-malai-toffee-500x500.jpg

१०. असवंतरा गोळ्या

पांढऱ्या गोळ्या असायच्या, जिभेवर ठेवताच एक वेगळीच अनुभूती यायची. नेटवर फोटो मिळाला नाही.

११. इमली

एक रुपयाला चार अशा अतिशय छोट्या पॅकिंग मध्ये आंबटगोड अशी ही इमली मिळायची. नेटवर फोटो मिळाला नाही.

१२. बोरकूट

अतिशय सुंदर चव, पुडी फोडून तोंडात टाकली, की कित्येक वेळ तोंडात चव रेंगाळायची.

IMG_20190610_224720_0.jpg

१३. दहिवडे

ह्या पदार्थाचा अजूनही मला नेटवर फोटो मिळाला नाही. थोडासा ब्राऊनिश लाल कलर असलेला पदार्थ जिलेबीच्या पाकात टाकला जायचा. स्वर्गीय चव.

अजून काही पदार्थ सुचवा, सांगा. लहानपणीच्या आठवणी जाग्या करूयात.

१४. राजमलाई चॉकोलेट (धन्यवाद किल्ली)

अशा चवेची चॉकोलेट अजून बनलेली नाहीये. मस्त चव..images (3)_1.jpeg

१५. काळ्या आंबट गोड गोळ्या (किल्ली)

१६. बटर (आशुचाम्प)

images (4)_0.jpeg

१७. संत्रा गोळी (आशुचाम्प)

ही मिळण्याच अजूनही हक्काचं ठिकाण, एस टी स्टँड Lol
images (5).jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@महाश्वेता - तुझ्या तोंडून भंडारींचा उल्लेख ऐकून ऑ! असं झालं. नीलसागर यांनी लिहिल्याप्रमाणे चणकापूरचे अण्णा भंडारी फार प्रसिद्ध! नेहमी फक्त धोतरावर असणाऱ्या अण्णा भंडारींची गाडी आली, कि लोकांची लाईन लागायची. ते वारले, त्यानंतर त्यांच्या मुलांनी व्यवसाय सांभाळला, पण ती चव काही साधता आली नाही. शेवटी तो पेढाच मिळणं बंद झालं. ता. कळवण, जि. नाशिक.
आणि मला हवेत दहीवडे, नक्की कळवेन.
आणि लहानपणची आठवण तर भारीच Lol

@नीलसागर - कळवणचा दगा भत्त्यावाल्याकडे अगदी तसलाच पेढा मिळतो. Happy

@रश्मी - मी घरी जाताना आज भत्ता घेऊन जाईन अशी चिन्हे आहेत Wink धन्यवाद! तुम्हीही लिहा तुमच्या आवडीचा खाऊ!

@तन्मयी - प्रतिसादासाठी धन्यवाद.

@आशुचॅम्प - मस्त आठवण

@रेशीम गाठी - किलर फोटो

@मेधावी - ती कशी असते?

@स्वरा - पोपिन्स! ऑरेंज कलरची गोळी माझी फेवरीट.

@नरेन - मस्त फोटो

@बोकलत - मँगोलाविषयी माहिती नाही. थोडं सविस्तर लिहा प्लिज!

@स्वरूप - मस्त आठवणी

(आशुचाम्प) >>> हे बरे आहे, तुझ नाव कुणी चुकीचे लिहिले की इगो दुखवतो तुझा पण तु दुसऱ्याचे नाव कायपण लिहिलेले चालते Angry अर्थ बदलो न बदलो पण चुकीचे आयडी नाम चुकीचेच असते,

छान धागा. यादीतले बरेचसे पदार्थ लहानपणी खाल्लेले आठवले.
Duke's मँगोला मलाही आवडायचा. तेव्हा खूपवेळा प्यायले आहे. आता Maazaa मिळतो पण मँगोला सारखा नाही लागत.
चुणचुण्या सुद्धा खल्ल्या आहेत Happy
शाळेबाहेर मिळणारे काळे मीठ, हिरवी-कच्ची बडीशेप आठवली.

दहा पैशांच्या आकाराचे बिस्कीट आठवते का कुणाला ?
मार्केट यार्डात एका ठिकाणी दिसले. ठोक भावात घ्यावे लागते.

मस्त धागा काढलाय! Happy

बोरकूूूट माझं प्रचंड आवडीचं. हल्ली पॅकेटमधल्या बोरकूटात बराच फूडकलर टाकलेला जाणवून येतो. पण प्लास्टिकच्या पारदर्शक पातळ नळीतला बोरकूट प्रचंड चविष्ट लागतो. (लांबी रुंदी जाडी बाॅलपेनेवढी) जमल्यास फोटो टाकीन. दोन रुपयाला एक कांडी मिळते हल्ली. पण तो दूर्मीळ झालाय.

नाझचा समोसा.
पुणे रेल्वे स्टेशनसमोर कॉर्नरला एक बेकरी होती. तिथेही छोट्या आकाराचा असाच समोसा मिळायचा. एकदा मुंबईला नातेवाईकांकडे जाताना घेऊन गेलेलो. तेव्हांपासून त्याला मागणी आली. बरेच दिवस मला स्टेशनला जाऊन मुंबईवरून कुणी आलेले असेल त्याच्या कडून पाठवावे लागत असे.
(त्याला खाऊ म्हणता येईल का ? )

प्लास्टिकच्या स्ट्रॉमध्ये असलेल्या बडीशेपेच्या रंगीत गोळ्या.
वेगवेगळ्या फळांच्या आकाराचे, त्याच फळाच्या चवीचे छोटेसे चुइंग गम.

नाझच्या सामोशाची कुणी आठवण काढली? आहा हा!
किती आठवणी जाग्या झाल्या.
असा सामोसा मिळणे नाही आता. कॅंपातही मिळत नाही आता.

वरती सिगारेट च्या गोळ्या दाखवल्या आहेत त्या एकदम आवडायच्या. मिंटसारखा स्वाद आणि मुख्य म्हणजे त्याची लाल बाजू ओठांवर फिरवून लिपस्टीक ची हौस भागवत असू (लहानपणी लिपस्टीक लावायला गॅदरींग व्यतिरिक्त परवानगी नसे) :डोळा मारणारी भावली..

> हे बरे आहे, तुझ नाव कुणी चुकीचे लिहिले की इगो दुखवतो तुझा पण तु दुसऱ्याचे नाव कायपण लिहिलेले चालते Angry अर्थ बदलो न बदलो पण चुकीचे आयडी नाम चुकीचेच असते,

हे कोणाला उद्देशून आहे

शाली... भारीच

घरात कुणी बुंदीचे लाडू वळलेत का ?
आचारी बुंदी पाडून गेले की आम्ही लहान मुलं वळत बसायचो. छोटे लाडू असले तरी मी वळलेल्या लाडूंना मागणी असायची चांगली. लॉजिक काय ते माहीत नाही Lol
हाताला चव म्हणतात तसं असेल Lol

वर सगळ्यांनी आठवण काढलीच आहे
मला सिलिंडर शेप गोल असलेल्या झेब्रा पट्टे वाल्या गोळ्या आठवतात.
आमच्या इथे समुद्राच्या गल्लीत एक घर होतं तिथे 5 पैश्याला 2 बदाम (फळ) मिळायचे☺️
कधीकधी धामण(साप नाही, मण्यांच्या आकाराची मरुन रंगाची लहान फळं) आणि शिंदोळ्या(खजूर जातीतले कमी गर वाले फळ) आणि खिरण्या(खारकेच्या शेप ची गोल्डन यलो फळं) पण विकत मिळायच्या.
जाम्ब(म्हणजे पांढरे पाणीदार फळ) पण कधीकधी मिळायचे.

हे कोणाला उद्देशून आहे

नवीन Submitted by आशुचँप on 11 June, 2019 - 19:39>>>> ज्याने तुमचे नाव चुकीचे लिहिले पण त्याचे नाव कुणी चुकून चुकीचे लिहिले की आकांडतांडव करतो त्या अग्यातवासीला Wink

अररर मी पण चुकीचे लिहिले की आता

हाताला चव म्हणतात तसं असेल>>>>> मी एकदा सहज म्हणलं की बायकांपेक्षा पुरुषांच्या हातच्या स्वैपाकाला जास्त चव असते, तर माझ्या सासुबाईंचा इगो जाम दुखावला. Uhoh

खरे बोलले की लोकांना राग का येतो देव जाणे ! त्यावर माझा नवरा म्हणाला की पुरुष स्वैपाक करतांना मनात कुठलाच किंतु परंतु ठेवत नाहीत त्यामुळे असेल.

कधीकधी धामण(साप नाही, मण्यांच्या आकाराची मरुन रंगाची लहान फळं) आणि शिंदोळ्या(खजूर जातीतले कमी गर वाले फळ)
आम्ही दामनं म्हणायचो, कडक बिया असायच्या आतमध्ये पण टेस्ट काय.... अहाहा.
शिंदोळ्यांना शेमनं म्हणले जाते बार्शी, उस्मानाबाद भागात.
करवंद हे नाव अगदी आत्ता आत्ता कळलं, इतकी वर्षं ती काळी मैनाच होती.

दारावर येणारी कुल्फी आणि अण्डे (?) हे पण थन्ड च असायचे. अण्ड्याच्या आकाराचे आइसक्रीम. फोटो सापडला नाही. रेवडी, सुकी भेळ हा खाऊ आजोबा घेऊन यायचे.

मस्त धागा आहे.निरनिराळ्या प्राण्यांचया आकारात असलेली बिस्किटं कोणी खाल्ली नाहियेत का?आता मिळत असतिल कुठे तर खायला मी एका पायावरतयार आहे :-)बटर बिस्किट म्हणजे बेळगावच्या शंकर बेकरीतलं.मागच्या वर्षी बेळगावाला गेले तर 3किलो आणली.तिथे आमच्या लहानपणी मिळनारया ब्रेडला एक गोडसर चव असायची.तसा ब्रेड फक्त इस्लामपूर ला मिळाला.बाकी आता सगळीकडे विब्ज आणि तत्सम स्टँडर्ड ब्रेड दिसतात.धामण्ं बेल्गावात लहानपणी खाल्ली आहेत.सोबत चार्ं आणि चुरणं ह्या नावाची फळंही मिळायची.आता सगळं इतिहासजमा झालं.मुंबईत जांब मिळतात.पण बहुतेक वेळा पचपचीत असतात.लहानपणी बेळगावत दुपारी एक आईसक्रिम वाला 'फेमिला'ह्या नावाचं आईसक्रिम विकत जायचा.त्या काळात परत जायला मिळालं तर काय मजा येईल.बाकी इथले बरेच पदार्थ ओळखीचे नाहीत.वाचून मजा वाटली.

कॉफी बाईट्स, मेलडी (मेलडी खाओ, खुद जान जाओ), सोनेरी नाण्यासारख्या पॅकिंग मधे मिळणारं चॉकलेट.

घरच्या पदार्थांमधे, गुळ/साखर तूप पोळीचा लाडू, रव्याचा केक.

>>तिथे आमच्या लहानपणी मिळनारया ब्रेडला एक गोडसर चव असायची.

कोल्हापूरचा यळगूड ब्रेड अजुनही गोड असतो बहुतेक!

>>लहानपणी बेळगावत दुपारी एक आईसक्रिम वाला 'फेमिला'ह्या नावाचं आईसक्रिम विकत जायचा.

हो.... कोल्हापुरातही यायची फेमिला ची ढकलगाडी दुपारी घंटा वाजवत..... कांडीवाले आईसक्रीम असायचे बहुतेक ते!

हो कांडीवालं आईसक्रिम असायचं ओरेंज रंगाचं :फिदी:ते खायला घरच्या समस्त मोठ्यांचा विरोध असायचा.त्यामुळे तो फेमिलावाला ओरडायला लागला की त्याचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून घरचे त्याच्या वरताण आवाज काढून बोलायचे.मजा अशी की ते असे चढ्या आवाजात बोलायला लागले की फेमिलावाला आलाय हे आम्हाला कळायचं.

निरनिराळ्या प्राण्यांचया आकारात असलेली बिस्किटं कोणी खाल्ली नाहियेत का?आता मिळत असतिल कुठे तर खायला मी एका पायावरतयार आहे
>>> अमेरिकेत... अनिमल करकर्स.. फेमस आहेत .

मिंटसारखा स्वाद आणि मुख्य म्हणजे त्याची लाल बाजू ओठांवर फिरवून लिपस्टीक ची हौस भागवत असू >>> हे भारी आहे Happy फॅण्टम सिगारेट्स जबरी होत्या.

वरचे बिस्किटावर मुकुटासारखे ठेवलेले क्रीम वाले बिस्किट मस्त होते. बटन बिस्किट त्यालाच म्हणायचे बहुधा.

अण्ड्याच्या आकाराचे आइसक्रीम. >>> हे ही आठवले.

अरे हे सगळे उपल ब्ध आहे आजही. तुम्ही घेत नसाल कदाचित.

माझे दोन पैसे. कच्चा चिवडा जनसेवाचा. मला रोज नवीनच काय काय खायला आव्डते त्यामुळे नो हॅन्ग ओव्हर. नो नॉस्टॅ ल्जिया बिझनेस.

Pages