चक्राता - ९ सांगता

Submitted by साक्षी on 5 June, 2019 - 14:23

या आधीचा भाग इथे वाचा.

शेवटच्या दिवशी तरी रात्री गप्पा मारत बसु असा प्लॅन होता. अर्थात रोजचा त्या दिवशी दिसलेल्या पक्षांची यादी करण्याचा नियम कधीच चुकला नाही. आदल्या दिवशी गेलेले लाइट दुसर्‍या दिवशी संध्याकाळी परत आलो तरी आले नव्हते. जनरेटर वर चालू असलेले डायनिंग मधले दिवे सुद्धा बंद झाले. पण किका आणि मंडळींनी टोर्चच्या उजेडात ही यादी पूर्ण केली. हॅट्स ऑफ टू किका! एकही दिवस त्यांच्या चेहेर्‍यावर दमल्याचा, कंटाळल्याचा भाव नव्हता. कोणीही कोणताही अगदी बेसिक प्रश्नही विचारला तरी ते उत्साहात उत्तरे देत होते. आई, बाबा लोक्स सामान कोंबण्यात बिझी होतो. दुसर्‍या दिवशी नाष्ता करून रिसॉर्ट सोडायचं होतं.

निघायच्या दिवशी परत पहाटे एक ट्रेल झालाच. नाष्ता झाल्यावर आमचे कूक, ड्रायव्हर, रिसॉर्ट्चा स्टाफ सगळ्याना बोलावून त्यांचे आभार मानले आणि परत आम्ही सगळे जिथे पहिल्यांदा एकमेकांना भेटलो तिथे म्हणजे हॉटेल आंगन ला जायला निघालो. काही फोटो दाखवल्याशिवाय रहावत नाहिये.
ह्या फळांचं तेल काढतात. ते गुढगेदुखीवर औषधी आहे म्हणे. पूर्वी स्थानिक लोक हेच खाद्य तेल म्हणून वापरत. आता बाजारात येणारी वापरतात. हे पिकलं की काळं होतं
LocalFruit.jpg

ही एक बेरी. पक्षांचा आवडता खाऊ, आम्ही पण चाखून बघितला.
Yellowberry.jpg

हे एक गाव आहे. ही आणि अशीच अगदी छोटी छोटी गावं जाता येता दिसतात.
Village4.JPG

ह्या फोटोंबद्दल काय लिहु? देहेरादून, चक्राता, हिमालय म्हणलं की हेच डोळ्यापुढे येइल.
Sky.jpgDonger1.jpgDonger2.jpgTrees.jpg

आमचा कॅम्प आता पूर्ण झाला होता. आंगनला आल्यानंतर प्रत्येक जण जेवून आपापल्या फ्लाइट/ट्रेन च्या वेळेप्रमाणे निघाला. आम्ही दून मधेच हॉटेल बूक केलं होतं. अगदी ४ तासांसाठी होतं पण गरजेचं होतं. थोडी विश्रांती घेऊन, फ्रेश होऊन रात्री नंदादेवी मधे बसलो. या वेळी मी पांघरायला दिलेला जाड रग गुंडाळी करून लेकाला सपोर्ट म्हणून लावला आणि निवांत झोपले.
पहाटे दिल्लीत पोहोचलो. दिल्ली-पुणे विस्तारा फ्लाइट ५:३५ ला होती. दिल्लीत खूप उन असणार म्हणून फारसं फिरणार नव्हतो. कॅनट प्लेस एरियात हॉटेल बूक केलं होतं. तिथे रूम वर आलेल्या इंग्लिश ब्रेकफास्ट वर ताव मारला. मग रिक्षेतून आणि जमेल तितकंच फिरू म्हणून बाहेर पडलो. इंडिया गेट, वॉर मेमोरिअल, राष्ट्रपती भवश, संसद भवन असं थोडं हिंडलो. शंकर बाजार, पाली बाजार मधे एक चक्कर मारली. नाही म्हणता थोडी खरेदी पण केलीच. बंगाली मार्केटला चाट प्रकार, लस्सी वगैरे अटळ होतं. येताना बघितलेली जुनी दिल्ली आणि आता बघितलेली ही पॉश दिल्ली यामुळे लेक चांगलाच गोंधळला. नविन माणूस शहराच्या कुठल्या भागात हिंडेल त्यावरून तो त्या शहराचं चित्र उभं करेल असं मला नेहेमीच वाटतं. पुण्यात पहिल्यांदा आलेला माणूस धायरीत हिंडला तर आणि कोरेगाव पार्क भागात हिंडला तर २ वेगळीच चित्र उभी रहातील.

४ वाजत आले तशी निघायची तयारी केली. आता घरच्या आमटी भाताची आठवण यायला लागली. फ्लाइट मधले २ तास पटकन गेले पण पुण्यात एअर पोर्ट पासून सिंहगड ऱोड पर्यंतचा १ तासाचा प्रवास पण नकोसा झाला. रात्री घरी आलो तर आमची चिंकी (मनीमाऊ) दारात स्वागताला हजर होती. आम्ही आल्याच्या आनंदात पुढचे २ तास तरी ती इकडे तिकडे नाचत आणि उड्या मारत होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच सगळे वाचले. मजा आली.

किकांचा संपर्क करण्यासाठी काही नंबर वगैरे आहे का? म्हणजे पुढचे कँप कधी आहेत ते समजेल

सर्वच भाग मस्त झालेत. फोटो सुंदर. काही फोटो तर खुपच छान आलेत.
प्रत्येक भागात लिंक दिल्यामुळे सलग वाचता आले.

मस्त झालीये लेखमाला.
किकांचा संपर्क करण्यासाठी काही नंबर वगैरे आहे का? म्हणजे पुढचे कँप कधी आहेत ते समजेल >> + १११११

पक्षांसाठी जावंच लागेल.
----
घरी आलो तर आमची चिंकी (मनीमाऊ) दारात स्वागताला हजर होती. आम्ही आल्याच्या आनंदात पुढचे २ तास तरी ती इकडे तिकडे नाचत आणि उड्या मारत होती.

- हा शेवट आवडला.

सगळी मालिका मस्त आहे. फोटो खूप आवडले. हिमालय देखणाच आहे. अतीशय सुंदर माहिती, धन्यवाद. पक्षी पण फार आवडले.

मी देखिल हा कॅम्प केला आहे, २०१४ साली. आम्ही श्री प्रकश गोळे ह्यानि सुरु केलेल्या इकॉलॉजिकल सोसायटी तर्फ़े निसर्ग अभ्यास सहलीला गेलो होतो. हिमालयन पॅराडाइज हे एक लहानंस हॉटेल होतं तेंव्हा.
तुझे अनुभव आणि फोटो बघुन आठवणी जाग्या झाल्या.
धन्यवाद!

खूप खूप सुंदर लिहिलंय सगळंच!
किकांचा संपर्क करण्यासाठी काही नंबर वगैरे आहे का? म्हणजे पुढचे कँप कधी आहेत ते समजेल>> +९९९
फोटो फारच सुंदर!!

साक्षी, सगळे भाग वाचले. लिहिलेय छान व थोडक्यात आणी फोटोही खूप सुरेख आलेत.

आम्ही 15 दिवसांनी परतलो तर आमच्या बोक्याचा विश्वासच बसेना आम्ही जिवंत आहोत यावर.... आलात कसे परत? मला वाटलं गेलात वरती.. ह्या नजरेने आमच्याकडे बघत होता आधी.. नंतर आनंदाने नाचायला लागला...

सगळेच भाग छान आहेत.
आवडली मालिका. फोटो सुंदर आहेत.
पक्ष्यांची सगळीच नावं इंग्रजीतच आहेत का? स्थानिक किंवा आपली नावं असतील तर द्या.

मस्त झाली लेखमालिका ! आवडलं वर्णन , फोटो सगळेच मस्तच ..
प्रत्येक भागात लिंक दिल्यामुळे सलग वाचता आले.>>+१११

सगळी मालिका मस्त आहे. सगळे भाग लगेचच टाकलेत याचे अप्रूप वाटले >> गेले काही दिवस रोज रात्री बसुन आधी लिहून काढले होते. मग एक दिवसात इकडे प्रकाशित केले. Happy

पक्ष्यांची सगळीच नावं इंग्रजीतच आहेत का? स्थानिक किंवा आपली नावं असतील तर द्या. >> मराठी नावे शोधून किंवा किकांना विचरून देइन नक्की

आम्ही 15 दिवसांनी परतलो तर आमच्या बोक्याचा विश्वासच बसेना आम्ही जिवंत आहोत यावर.... आलात कसे परत? मला वाटलं गेलात वरती.. ह्या नजरेने आमच्याकडे बघत होता आधी.. नंतर आनंदाने नाचायला लागला... >> Biggrin Biggrin Biggrin

२०१४ साली. आम्ही श्री प्रकश गोळे ह्यानि सुरु केलेल्या इकॉलॉजिकल सोसायटी तर्फ़े निसर्ग अभ्यास सहलीला गेलो होतो.
>> u r senior to me by a year.. Happy

हा भागही सुंदर...
माझी बहुतेक उलट गणती चालू आहे. आधीचे भाग वाचायला हवेत.

सगळे भाग एकदम वाचले. छान सुटसुटीत लेखमालिका.
कॉलेजच्या दिवसातल्या फक्त पक्षीनिरीक्षणासाठी म्हणून मारलेल्या ताम्हिणी आणि सिंहगड दरी मधल्या चकरा आठवल्या !

आम्हाला तिथे श्री प्रकश गोळे यांच्या पत्नी आणि त्यांच्या सहकारिणी भेटल्या. त्याच रिसॉर्ट वर राहिल्या होत्या

वावे, विपु पहा.

बकिच्यांना, २ ते ७ ओक्टो चक्राता परत लावला आहे.

Pages