शाळेसंबधित माहिती

Submitted by दक्षा on 29 May, 2019 - 02:30

नमस्कार,

मी सध्या माझ्या आईजवळ भाड्याने राहते आहे, मला माझ्या मुलाचे जवळच्या एका शाळेमध्ये अ‍ॅडमीशन घ्यायचे आहे १ ली साठी माझे आणि माझ्या मुलाचे रेशनिंग कार्डवर नाव आहे पण ते माझ्या सासरी आहे. मला कोणी सांगेल का, रेंट अ‍ॅग्रीमेंट वर मला अ‍ॅडमीशन मिळेल का. कारण बहुतेक शाळेमध्ये कार्डवर नाव असल्याशिवाय अ‍ॅडमीशन मिळणार नाही बोलतात. पण मला विचारायचे आहे कि ज्याचे मुंबईमध्ये कोणच नसेल आणि रेंट वर राहत असेल ती व्यक्ति रेंट अ‍ॅग्रीमेंटच प्रूफ म्हनुण दाखवणार ना. कृपया कोणी शिक्षक असल्यास त्यांनीहि सुचवावे. (माझे रेशनिंग कार्डवर नाव जोगेश्वरीला आहे आणि मी आता लोअर परेलला राहते)

धन्यवाद

दक्षा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्हा दोघांचे आधार कार्ड आहे का ते चालत असेल. नाहीतर अ‍ॅफिडेविट करून घेता येते. शाळेत विचारून घ्या त्यांना नक्की काय प्रूफ हवे आहे.
एक आयडी प्रूफ एक रेसिडन्स प्रूफ.

आधार कार्ड , रेशनिंग कार्ड सगळे आहे पण सगळे जोगेश्वरीच्या पत्त्यावर आहे आणि शाळा ईथला प्रुफ मागते आहे, कार्डवर नाव पाहिजे बोलतात, पण मी रेंट अ‍ॅग्रीमेंट चालेल का विचारले तर काहीच बोलत नाहित

माझ्या बाबतीत अ‍ॅडमिशन नाही पण अ‍ॅड्रेस प्रूफ प्रॉब्लेम झाला होता. एकत्र कुटुंबामुळे माझ्या नावावर काहीच बिल वगैरे नव्हते. मग सोसायटीच्या लेटरहेडवर सोसायटीच्या सेक्रेटरींनी --- मी अमुक कुटुंबाची सदस्य असून अमुक घरात इतक्या काळापासून वास्तव्यास आहे. सबब सदर कुटुंब प्रमुखाचे अ‍ॅड्रेस प्रूफ हेच माझेही अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून ग्राह्य धरता येईल असे माझ्या वास्तव्याची खात्री देणारे पत्र दिले होते. ते चालले होते.

फार विरोध झाला तर मुख्याध्यापकांना भेटून तुमचा जागा बदलण्याचा प्रॉब्लेम / कारण कानावर घाला.
अ‍ॅडमिनचे लोक --- जे आपल्याशी प्रत्यक्ष बोलतात --- ते त्यांच्या मर्यादित अधिकारामुळे तुम्हाला कदाचित सहकार्य करू शकणार नाहीत पण मुख्याध्यापकांनी तुम्हाला अनुकूल शेरा दिला तर त्यांना हरकत नसते.

जवळच्या आधार केंद्रात जावून पत्ता बदलणे हाही पर्याय आहे. हल्ली काही Banka किंवा पोष्टात ही सुविधा आहे. Online सुद्धा करु शकता दोन-तीन दिवसांत होते.

साळुंके साहेब आधार कार्ड वर पत्ता बदलण्यासाठी रेंट अॅग्रीमेंट बहुतेक नाही चालणार. आधार नोंद बदलण्यासाठी काही दिवस वेळ घेतला जातो. लगेच नवीन नोंद होत नाही. अशी माझी माहिती आहे.