पहा रे जगता

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 2 June, 2019 - 10:37

पहा रे जगता
**********

माझ्या जाणिवेला
फुटले धुमारे
जग पाहणारे
यथावत ॥

होवूनी निवांत
सुटूनिया कष्ट
पाहण्याचे फक्त
भान उरे ॥

अवघाची खेळ
चालला केवळ
वाफेचे ते बळ
आधणाला ॥

दुनिया चालते
मनही धावते
काय अन कुठे
ठाव नाही ॥

माय मदालसा
सांगते विक्रांता
पाहा रे जगता
निरखून ॥

अवधूत कृपे
जाणियले वर्म
मरू गेले कर्म
उगवते ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवघाची खेळ
चालला केवळ
वाफेचे ते बळ
आधणाला ॥

बाकी सगळं अतिशय साधारण वाटत असताना हे मनाला प्रचंड भावलं...सुंदर, खूप सुंदर!!!

सुंदर कविता लिहिता तुम्ही.
पण रचना तुम्ही अशीच का ठेवता? काही विशेष कारण?
दत्ताबद्दलची तुमची आस्थाही वाखाणण्याजोगीच आहे...

बाकी सगळं अतिशय साधारण वाटत असताना हे मनाला प्रचंड भावलं...सुंदर, खूप सुंदर!!!..
अज्ञातवासी... धन्यवाद ...

प्रांजली धन्यवाद ...

पण रचना तुम्ही अशीच का ठेवता? काही विशेष कारण?

ही अभंग रचना आहे फॉरमॅट असाच असतो.6 6 6/4 शब्द . लहानपणा पासून भक्ति रचना अभंगात ऐकल्या, वाचल्या म्हणून असेल की भक्ति भाव प्रधान कविता अभंगात सुचतात
कधी अष्टाक्षरी ,मुक्त छंदही लिहतो .