मला काहीच आठवत नाहीये भाग ६ - सुरुवात!

Submitted by अज्ञातवासी on 21 April, 2019 - 13:27

भाग ५
https://www.maayboli.com/node/69547

"उद्या निघायचंय मने, लक्षात आहे ना?"
"आई, कितीदा सांगतेस."
शेवटी तो दिवस आलाच, प्रशिक्रापूरला जाण्याचा...
त्याआधी मात्र माझं मन ठिकाणावर नव्हतं. माझा थांगपत्ता लागणार म्हणून आईबाबा खुश होते...
...पण त्यांना कळत नव्हतं का, की माझा आनंद त्यांच्याजवळच आहे.
मला उत्सुकता होती, माझं खरं अस्तित्व शोधण्याची, पण त्यासाठी आई बाबांना गमावणे मला मंजूर नव्हतं.
अभ्यंकरांकडून आल्यावर बाबा प्रचंड उत्साही होते, काहीतरी पर्याय मिळाला म्हणून. कुमार मात्र काहीतरी कामानिमित्त लगेच निघून गेला.
दुसऱ्याच दिवशी आमच्या तिघांची ट्रेनची तिकिटे कुमारचा ड्रायवर आम्हाला देऊन गेला! ट्रेन दोन आठवड्यांनंतर होती...
बाबा आणि आई चमकलेच, त्याने परस्पर प्रवास ठरवून टाकला होता.
"त्याच्या हिशेबाने जायची गरज नाही आपल्याला,"आई म्हणाली.
मला किती बरं वाटलं म्हणून सांगू...
"हो, नाहीतर काय... आम्हाला जरा विचार तर करू देत," बाबा स्वतःशीच म्हणाले.
"मने, तुला घाई तर नाही ना!" आईने मला विचारले.
आई बिलकुल नाही, उलट मला जावंसं वाटतच "नाहीये. मला तुमच्याबरोबर राहावंसं वाटतंय, कायम!"
"नुसती गोड," आणि आईने मला जवळ घेतलं.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो उगवला!
"समजतात काय हो तुम्ही स्वतःला," आई चिडली होती. "माझ्या मुलीला केव्हा कुठे पाठवायचं, ते मी ठरवेल, ही काय पद्धत झाली का, असे सरळ तिकीट पाठवायची."
"मला माफ करा, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता."
त्याने एक कात्रण काढून आईसमोर धरलं.
'सनावा - प्रशिक्रापूर ट्रेन होणार महिनाभरात बंद!'
"जर आपण हा प्रवास आता केला नाही, तर कधीच नाही. बातमी पंधरा दिवसांपूर्वीची आहे, आणि जे तिकीट मी काढलंय, तो ट्रेनचा शेवटचा दिवस आहे..."
आई मटकन खाली बसली. तोही सुन्न होऊन बाजूला बसला...
"मी संध्याकाळी सांगते," ती कशीबशी म्हणाली.
संध्याकाळी बाबा आले. आईने आज जेवणात माझी आवडती भाजी बनवली होती.
जेवणानंतर आम्ही हॉलमध्ये बसलो होतो, सगळ्यांच्या चेहऱयावर तणाव स्पष्ट दिसत होता.
"मने, मी सांगतेय ते ऐक. मला वाटत होतं, यापासून जितकं दूर राहता येईल तितकं चांगलं, पण असं वाटतंय, एकदा बघूनच यावं."
"आई, पण मला जायचंच नाहीये. मी तयार नाहीये..."
"मने, कोणीही तयार नाहीये. बाबा म्हणाले. पण बघूयात तरी, काय सापडतं. जर तुझा परिवार चांगला असेल, तर..."
"तर काय बाबा?"
"तरीही मनेला जाऊ द्यायचं नाही, काहीही झालं तरी...आपली मुलगी आहे. त्यांना समजावू आपण."
"ठरलं मग, जायचंय... कुमारला कळवा. आणि सांगा, जास्त गोष्टी हातात घेऊ नकोस. आम्हाला मानेल तस करू आम्ही. तुझ्या हिशेबाने प्रवास करणार नाही."
"ओके, सांगतो." बाबा हात जोडत म्हणाले.
...आणि आम्ही हसू लागलो.
जशजशी तारीख जवळ येत होती, तसतशी माझी अस्वस्थता वाढत चालली.
जाण्याची वेळ उद्यावर येऊन पोहोचली. मी आयुषीला एकदा भेटून आले होते. बऱ्याचशा आठवणी माझ्या मनात घर करून होत्या.
"उद्या निघायचंय मने, लक्षात आहे ना?"
"आई, कितीदा सांगतेस."
"असं समजू नकोस, तू कायमची सोडून चाललीयेस. तुला परत यायचंय कळलं ना?"
"हो आई."
"आता झोप. हा प्रवास काहीतरी मार्ग दाखवेन."
मी विचार करतच झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी आम्हाला स्टेशनवर निरोप द्यायला बरेच लोक आले होते.
"कुमार, परत या, नाट्यभूमीला तुमची गरज आहे." आयुषीचे बाबा कुमारचे हात हातात घेत डोळे पुसत म्हणाले.
ट्रेनचा भोंगा वाजला, मी आम्ही ट्रेनकडे निघालो. बाबा आणि जमदग्नी शेजारी बसले, आणि मी आणि आई त्यांच्या पुढच्या सीटवर बसलो.
गाडी सुरू झाली. गाडीत तुरळक गर्दी होती.
माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठू लागला, अचानक माझ्या डोक्यात विचारांचा उद्रेक सुरू झाला.
गाडीच्या लाईटची उघडझाप चालू झाली... सीट गदागदा हलू लागले...
गाडीतल्या ट्युब्स फुटल्या.
"मालती," बाबा म्हणाले, आणि अचानक गायब झाले...
"नाही," आई त्यांच्याजवळ जाणार, तेवढ्यात तीही गायब झाली.
"आई, बाबा," मला सुचेनास झालं.
गाडी आता अजून हलत होती... आता तर डबे उलतेपालते व्हायला लागले होते.
गाडीतला प्रत्येक माणूस गायब झाला होता.
सोसाट्याच्या वाऱ्याने डबा उलटा होत होता...
आणि गाडीत एकच माणूस आता उरला होता.
'कुमार!!!!!!'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑ!!! भारीच.
आता जरा पटापट लिहा ओ Happy

खूप छान नेहमीप्रमाणे.. बऱ्याच कथांमध्ये आधीच कळत की कुठल्या प्रकारातील आहे पण तुमच्या कथेचं ते कळत नाही हेच या कथेचं वैशिष्ट्य आहे.आणि suspense कायम ठेवण जमलं तुम्हाला. आणि आतातर कथा अजूनच रंगणार अस दिसत आहे .फक्त बाकीचे भाग लवकर येऊ द्या Happy

@मेघे वाचलास आणि प्रतिसाद दिलास. थँक्स
@उर्मिला येईल पटकन.
@अनघा - हो पटापट पूर्ण कराव्या लागतील, (भोगा आपल्या कर्माची फळं अज्ञातवासी Lol
@किल्ली - थँक्स, पाप वर येण्याच्या आधी भाग पोस्ट केला Wink
@मन्या - थँक्स. अजूनही धक्के असतील कथेत Wink
@सस्मित - थँक्स, लवकर येईल.
@गूढ शुभांगी - खूप खूप धन्यवाद. खरंच तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी बूस्टर आहे.
@श्रद्धा - थँक्स श्रद्धे!!

याही भागातले प्रतिसाद बघून म्हणावसं वाटतंय,
"It's always good to see the old gang"

अज्ञातवासी
जरा पुढचा भाग लवकर टाका नका!
का उगाच तंगवताय

Chan