एस.टी. ची एक्काहत्तरी..!

Submitted by DJ.. on 31 May, 2019 - 07:50

महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेस सुखाचा प्रवास घडवणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनची बस अर्थात आपली एस.टी. १ जुन ला ७१ वर्षांची होत आहे. गेल्या ७१ वर्षांत काळानुरुप रुपडे बदललेल्या पण सामान्य जनतेच्या प्रवासाच्या आकांक्षा आपल्या परीने पुर्ण करणार्‍या राज्य मार्ग परिवहन महामंडळास खुप खुप शुभेच्छा..!!

शेजारच्या गावात हॉस्पिटलमधे जन्मल्यानंतर २ दिवसांनी मला पहिल्यांदा घरी आणले ते एस.टी.ने. त्यामुळे एसटीशी आपोआप नाळ जुळली Bw . माझ्या लहानपणी अगदी श्रीमंत लोकांकडे असलेली एखाद-दुसरी फियाट पद्मिनी नाहीतर अँबॅसिडर कार किंवा बुलेट-स्कूटर सोडली तर एस.टी. शिवाय कोणतेही प्रवासी वाहन रस्त्यावर दिसायचे नाही. गावातील एस.टी. स्टँडवर आलेल्या एस.टी. बसमधे उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवासाला जाण्याचे सुख काय असते ते मी पुरेपुर उपभोगले आहे.

जन्माला आल्यापासुन प्रवासाची आवड निर्माण करणार्‍या एसटीने मला आजवर अगदी लाखो किलोमिटर फिरवले. प्रवासासाठी आता भरपुर पर्याय उपलब्ध असतानाही एसटीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. संधी मिळेल तेव्हा मी एसटीने प्रवास करण्यास अतिशय उत्साही असतो.

आज एसटी खरेच लोकाभिमुख झालेली दिसते. एसटीची सर्वसाधारण बस (लाल बस) आता सफेद-लाल रंगाच्या बस मधे परावर्तित झाली आहे आणि तीत आरामदायी सिट्स आल्या आहेत. हिरव्या-पांढर्‍या रंगाच्या निमआराम बसमधे आता पुशबॅक सिट्स आहेत. शिवनेरी आणि मल्टीअ‍ॅक्सल अश्वमेध सारख्या अत्यंत आरामदायी वातानुकुलीत बसेस पुणे-मुंबई रुटवर प्रवासी खेचण्यात आजही प्रतिष्ठेचे स्थान टिकवुन आहेत. राज्यातील कानाकोपर्‍यात माफक दरात वातानुकुलीत प्रवास घडवणार्‍या शिवशाही बसेस अल्पावधीत लोकप्रिय झाल्या आहेत.

काळानुरुप कात टाकणार्‍या एसटीने गेल्या ७१ वर्षात अमुलाग्र बदल घडवुन आपली घोडदौड सुरुच ठेवली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..!!

ST.jpg
साधीबस (लाल बस)^

newST.jpg
अपग्रेडेड साधीबस^

Asiad_1.jpg
निमाअराम बस^

Shivaneri_1.jpg
शिवनेरी बस^

Ashwamedh_1.jpg
अश्वमेध बस^

Shivashahi.jpg
शिवशाही
STlogo.jpg
एस.टी. चा लोगो

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच !!! मुंबई-पुणे-मुंबई असे विकांताला ये-जा करताना माझा प्रेफरेन्स नेहमी लाल डब्याला असायचा. तिकीट कमी असते आणि एस टी तील खिडक्यांच्या काचांचा खाड खाड आवाज आल्याशिवाय प्रवास झालाय असे वाटतच नाही. बऱ्याचदा वेग इतर बस पेक्षा जास्तच असतो.

लाल बस ला आम्ही लहानपणी लाल डब्बा म्हणायचो.
पण त्या लाल डब्याच महत्व त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच माहित.
मस्त लेख.

अगदी 'वाट पाहीन पण एसटीनेच जाईन' कॅटेगरीत नेहमीच नसले तरी खाजगी वाहनापेक्षा एसटीला प्राधान्य देणाऱ्यांपैकी मी आहे. भरपूर प्रवास घडला आहे एसटीतून. वाईट अनुभव मात्र कधी आल्याचं आठवत नाही. गर्दी अनुभवली आहे, पण तरी गर्दीतही लोक एकमेकांना सहकार्य करतात असाच अनुभव आहे.

एस टी हा लहानपणी जिव्हाळ्याचा विषय होता कारण सुट्टीत बाहेर गावी नेणारी ती एकमेव सोय होती. मग थोडे मोठे झाल्यावर एशियाड ने प्रवास करू , वेळा बघून जाऊ असा हट्ट करायला लागलो. मुंबई ला असताना तर पुण्याहून मुंबईला जायला अगदी शिवनेरीचे रिझर्वेशनच करत होतो. नीता व्होल्वो वगैरेंचा नाद न करता आपली शिवनेरीच चांगली असा बाणा धरला पण मज्जा आली.

@ अज्ञातवासी : पण लाल पिवळी एस टी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी या लोगोशिवाय अपूर्ण आहे!!! >> लोगो टाकला Bw

@ अ‍ॅमी : बशीत बसलं कि आमचा वकार युनूस होतो पण तरी लेख आवडला.>> Biggrin Biggrin

गोल्डफिश, वावे, सनव, अज्ञातवासी, धनि, सिद्धी, - धन्स..!

@ च्र्प्स : अहो एसटीचा प्रवास नसेल केला तर करा.. एसटीत न बसता पृथ्वीतलावरचा प्रवास अपुर्ण आहे Wink

अज्ञातवासी Bw

आता ही लाल-पिवळी बस कालबाह्य झाली. त्यानंतर दोनवेळा मॉडेल बदललं गेलंय.

खूप छान लेख.माझाही लाल डब्याशी संपर्क भरपूर आलाय.
अजूनही खाजगी ट्रॅव्हल ने मुंबई ला जाण्यापेक्षा 1 तास वाट पाहून हिरकणी किंवा शिवनेरी ने जाणं जास्त सुरक्षित वाटतं.
लाल एसटी लोकांना लागते त्यात सीट आणि आवाज हा मुख्य भाग आहे.आता एसटी पण सुधारल्या आहेत.

धन्यवाद हर्पेन..! Bw
परंतु आता हा एक्काहत्तरीचा लेख वाढवायला नको.. एसटी बद्दल बरीच आपुलकी असल्याने तो वहावत जाण्याचा धोका आहे Wink

@Dj...
कालच त्या मॉडेलने प्रवास केलाय, अजूनही खेड्यावर हीच एस टी वापरली जाते....

ह्म्म... त्यातील सिट्स खरेच आरामदायक होत्या.. त्यानंतर आलेल्या मॉडेल मधे एवढ्या आरामशीर नव्हत्या.

बादवे काल तुम्ही कुठुन कुठेपर्यंत प्रवास केला अज्ञातवासी..? मीही माझ्या गावी एखाद-दुसरी बस या टाईपमधे पहातो. साधारण ५०-६० किमी च्या टप्प्यात मर्यादीत आहेत या. अजुन १-२ वर्षांनी पहायलाही मिळणार नाहीत.

इट्स सिक्रेट. Happy मात्र प्रवास ३५ किमीचा होता, आणि तिथे जायला एस टी शिवाय वाहन नाही आणि माझी गाडी नेली असती तर पार खुळखुळा झाला असता...
पहिली एस टी
Mercedez.jpg
गंमत म्हणजे आज एस टी च्या ताफ्यात नवीन वोल्वो दाखल, असं आपण म्हणतो, तेव्हा ते एक स्टेटस सिम्बॉल वाटतं. पण पहिली एस टी मर्सिडीज कंपनीने बनवली होती...

मिनी बस

Midi_Bus.jpg

हे मॉडेल वापरात असताना माझा जन्म नव्हता झाला.. Wink

माझे वडील सांगतात की त्यांच्या लहाणपणी एस.टी. तुन प्रवास करणे म्हणजे अक्षरशः चैन समजले जायचे. ३०-४० किमी चा प्रवास चालत अथवा बैलगाडी/घोडा/खेचर यांच्यावरुनच केला जायचा. ज्यावेळेस ते लहाणपणी एसटीतुन प्रवास करायचे तेव्हा प्रवास होईपर्यंत ते आणि त्यांची भावंडे, सहप्रवाशी प्रवास संपेपर्यंत हसत असायचे इतकी मजा लोकांना त्याकाळी यायची. कारण इतक्या वेगात प्रवास कधिही कोणीही केलेला नसायचा.. काही जणांना गरगरायचं, उलट्याही व्हायच्या पण एसटीच्या प्रवासाचे कौतुक सर्वांनाच असायचे. Proud

एसटीचा सर्वात मोठा गुण म्हणजे वाटेत गाडी बिघडली तर प्रवाश्यांना वाऱ्यावर सोडून देत नाहीत. शिवाय ड्रायव्हर सामान्यतः चांगले, संयमी असतात. रॅश चालवणारे नसतात. (अपवाद असतील) . आपण कार चालवत असताना समोरून एसटी आली तर ते लगेच साइड देतात. रस्ता अरुंद असेल तर खाली कुणी उतरायचं असा मानापमानाचा मुद्दा करत बसत नाहीत.

भारीच कि..मी पण प्रवास केलाय लाल डब्यातुन आणि अजुनही करते. निम आराममधे रिझर्वेशन नसेल तर जागा पकडायला जी शब्दांची बाचाबाची होती.,त्यात तर खुपच मजा येते. Happy

माझ्या सासऱ्याना वाचायला दिला, त्यांना आवडला. त्यांची संपूर्ण नोकरी एसटी महामंडळात झाली.

ऑनलाइन आरक्षण, शिवशाही यासारख्या सुविधांनी एसटीने कात टाकली आहे.

@मन्या -

जर तुला निम आरामची बाचाबाची मजा वाटत असेल, तर एखाद्या तालुक्याच्या ठिकाणाहून सकाळी ९ १० च्या सुमारास जाणाऱ्या एसटी ची मजा बघ...
रुमाल, बॅग किंवा जवळच लहान मूल सुद्धा खिडकीतून टाकून जागा सांभाळली जाते.
आणि एका सीटवर दोन रुमाल पडले, की महाभारत चालू होतं.

माझ्या सासऱ्याना वाचायला दिला, त्यांना आवडला. त्यांची संपूर्ण नोकरी एसटी महामंडळात झाली.>> धन्यवाद..! त्यांनाही आज एसटी च्या एक्काहत्तरीनिमित्त खुप छान वाटत असेल.. अभिमान वाटत असेल.. Bw

आणि एका सीटवर दोन रुमाल पडले, की महाभारत चालू होतं.
Submitted by अज्ञातवासी on 31 May, 2019 - 23:22 Biggrin Biggrin अगदी लहाणपणी संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग उघडुन आत सीट पकडण्यासाठी उडणारी झुंबड आठवली की हसुन पुरेवाट होते.

एसटीचा लोगो आता थोडासा बदललाय. खाली अजून एक रिबन भगव्या रंगाची असून त्यावर जय महाराष्ट्र लिहिलेले आहे.
बाकी नवीन पांढरी लाल एसटी ही कर्नाटक एसटीची कॉपी आहे. नवीन एसटी ताफ्यात आता आयशर बसेस ची संख्या वाढली आहे ती कर्नाटकात आधीपासून वाढलेली होती. आयशर बसेस टाटा किंवा लेलँड बसेस च्या तुलनेत अधिक पिकअप व मायलेज जास्त देणाऱ्या आहेत.
काही विशिष्ट डेपोच्या बसेस मात्र त्यात्या वर्कशॉपच्या कलाकाराने सजवलेल्या असतात.
बत्तीस शिराळ्याची बस 'आली शिराळ्याची नागीण' किंवा आमच्या सोलापूरकडे येणारी रोहा अक्कलकोट बस ही 'स्वामी कोकण दर्शन' सोलापूर पंढरपूर बस ही विठ्ठल एक्स्प्रेस किंवा अजून एक बस महाडला जाणारी भिमाई एक्स्प्रेस म्हणून रंगवली आहे.
डीटीपी करून प्रिंटेड पाट्या लावायच्या आधी कर्नाटक किंवा तेलंगाणा (आधी आंध्र) बसेस अप्रतिम शुद्धलेखन मिरवायच्या.
मुंबायी, पंडरपूर, बार्षी, तुलाजापूर, बसवाकलियान असे रंगलेले असते. कित्येकदा ह ला उकार खाली न लावता बाजूला लावतात तर र ला उकार खाली लावला जात असे.
आता प्रिंटेड बोर्ड असल्याने बरेच सुसह्य होते वाचायला.

मस्त लेख DJ.. गेल्या अनेक वर्षांत एस्टीचा प्रवास फारसा घडलेला नाही तरी पण आठवणी ताज्या झाल्या Happy

Pages