कुत्र्याला दूर ठेवायचं आहे.

Submitted by सप्रस on 30 May, 2019 - 00:54

नमस्कार, माझ्याकडे चार वर्षाचा लॅब्राडोर आहे. दोन आठवड्यांपूर्वी आमच्या घरी एक बाळ आलंय. आता बायकोचं म्हणणं आहे कि कुत्र्याला घरी ठेवणं बाळासाठी धोकादायक आहे. तिला खूप समजावलं परंतु ती तिच्या मतावर कायम आहे. डॉगीचा मला एव्हडा लळा लागलाय कि माझ्यापासून त्याला दूर ठेवणं कितपत झेपेल माहित नाही. तोसुद्धा माझ्याशिवाय राहू नाही शकणार. एकीकडे बाळ आणि एकीकडे डॉगी अशी द्विधा मनस्थिती झाले. रात्री रडल्याशिवाय झोप लागत नाही, या समस्येतून काहीतरी मार्ग सुचवा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्याकडेपण आहे लॅब, हाच प्रॉब्लेम वर्षापूर्वी आमच्याकडे झाला होता, तेव्हा आम्ही त्याची ग्यालारीत सोय केली, गॅलरी असेल तर तिथे ठेवा म्हणजे घरातला वावर कमी होईल.

बाळ होण्याआधी 9 महिने हा विचार का केला नाही? बायकोला विचारा की दुसरं बाळ झाल्यावर पहिल्या बाळाला सोडून देऊयात तर चालेल का?

माणसापेक्षा कुत्र्याच्या इमोशन्स खूप स्ट्रॉंग असतात, अस 4 वर्षाने कुत्रा सोडून देणं फार क्रूर आहे. जोक नाही, पण वर कोणी लिहिलं आहे तसं कुत्र्याला घेऊन दुसरीकडे रहाण्याची ऑफर द्या. बघा 2 महिन्यात बायको कुत्र्याबरोबर compromise करते की नाही Angry

बाळापासून strictly लांब ठेवा....!
कुत्र्याची सोय घराबाहेर करा...!flatमधे रहात असाल तर gallery t. Lab अवाढव्य असतो त्याने केलेल्या मायेचाही बाळाला त्रास होईल
बाळाला जंतूसंसर्ग होऊ शकतो कारण कुत्रा दिवसभर कशात लोळतो कुठे तोंड घालतो ते त्याचे त्यालाच माहीत..!
कुत्र्याला लावलेले हातही बाळाला लावू नका.. जरी कितीही कुत्रा maintain केला असेल तरी
कुत्रा घराबाहेर काढणे शक्य नसेल तर निदान बाळाच्या खोलीत येऊदेऊ नका , गळणार्या कुत्राकेसान्चा बाळाला त्रास होऊ शकतो
कुत्रा काही महिने/वर्ष नातेवाईकांकडे देऊ शकता
कुत्र्यापेक्षा बाळावर जास्त प्रेम करा... म्हातारपणी तोच आधार आहे Happy
बाळाला अनेक आशीर्वाद Happy

लॅब डॉग्ज प्रेमळ असतात. युट्युब वर 'बेबी &डॉग' असं सर्च केलं तर खूप क्युट व्हिडीओज मिळतील ते बायकोला दाखवा. डॉग्ज बेबीजना अजिबात त्रास देत नाहीत.
माझ्याकडचा द्वाड, अति खोडकर आणि रागीट बिगल घरातल्या आजोबांशी खूप फ्रेंडली असूनही त्यांच्याशी मस्ती करताना लिमिट मध्ये असतो. राग आला की आमचा हात पटकन पकडतो, कधी किंचित चावतो, पण घरी खेळायला येणाऱ्या 2 वर्षाच्या human मैत्रिणीने कितीही हाल केले तरीही कधीही चिडत/ चावत नाही. ती 7 महिन्याची असल्यापासून दोघांची मैत्री आहे. आमचे कपडे तोंडात धरून फडतो किंवा गदगदा हलवतो, पण तिच्या कपड्याला आजवर छोटंसं होल सुद्धा केलं नाही आणि हे न शिकवता. त्यांचं त्यांनाच उमजतं हे.

|नाहीतरी मूल झाल्यानंतर डॉगी आणि नवरा यांची किंमत सेमच असते.. |
किरणुद्दीन,
तुमचे वाक्य जरा जास्त वास्तवाच्या जवळ आणले

मीरा,
कुत्रे कितीही गुणी असले तरी ते बाळच असतात
त्यांच्या डोक्याने ते वागताना माणसाच्या बाळाला त्रास होत आहे हे त्यांच्या गावीही नसू शकते
कुत्र्याच्या अंगावर ticks, mites असल्या, तर ते बाळासाठी प्रचंड danger aahe
शेवटी प्रत्येक कुत्र्याचा स्वभाव वेगळा असतो

>> दोन आठवड्यांपूर्वी आमच्या घरी एक बाळ आलंय

माफ करा पण याचा नक्की अर्थ काय? "एक बाळ आलंय" म्हणजे काही दिवसांकरिता पाहुण्यांसोबत आलेय असा माझा समज झालाय. पण इथे अनेकांना तुम्हाला बाळ झालेय असे वाटत आहे.

काही दिवसांकरिता बाळ पाहुण्यांसोबत आले असेल तर डॉगीची सोय तात्पुरती ग्यालरीत वगैरे करू शकाल. अगदीच अशक्य असेल तर काही दिवस त्याची सोय शेजारी वगैरे करता येणार नाही का.

पण तुम्हाला बाळ झाले असेल तर मात्र दीर्घकालीन उपाय करावे लागतील.

बाळ असताना आजूबाजूला डॉगी असेल तर बाळाच्या तब्येतीसाठी ते चांगले नसते असे अनेक फोरमवर वाचले आहे हे मात्र खरे. पण त्याचबरोबर खेड्यापाड्यात कुत्री पाळलेली असतात व तिथे घरांत लहान मुलांसमवेत एकत्रच राहत असतात, हे सुद्धा खरे आहे.

माझं ऐका कुत्र्याला गॅलरीत ठेवा आणि गळणाऱ्या केसांवर उपाय म्हणजे त्याचे केस दोन तीन महिन्यांनी काढायचे, पेट डॉक्टर काढून देतात, एकदा काढले की केस गळत नाहीत, बायकोशी बोला मार्ग निघेल.

रत्न, तुमची काळजी स्वाभाविक आहे. कुत्रा प्राणी म्हणून घाबरायला होतं, पण माझ्याकडे स्वानुभव आहे. गेले दीड वर्ष कुत्रा आणि बाळ बरोबर वाढतं आहे.

आपण लहान मुलांबरोबर सुद्धा बाळाला एकटा ठेवत नाही, तसंच कुत्र्याबरोबर पण नाहीच ठेवायचं. कुत्रा म्हणजे कधीही मोठं न होणारं बाळच, त्यामुळे दुसऱ्या बाळंबरोबर ठेवताना मॉनिटरिंग गरजेचं.
हो, कुत्र्यांच्या स्वभावात पण फरक असतो, त्यामुळे त्याचा स्वभाव बघूनच बाळाशी किती जवळीक करवायची हे ठरवायचं.
बाकी हायजीन बद्दल बरंच काही लिहिता येईल.

<<< लॅब डॉग्ज प्रेमळ असतात. युट्युब वर 'बेबी &डॉग' असं सर्च केलं तर खूप क्युट व्हिडीओज मिळतील ते बायकोला दाखवा. डॉग्ज बेबीजना अजिबात त्रास देत नाहीत. >>>
हा हा हा.
https://youtu.be/1Gse2J5bqWw
https://youtu.be/AHzlleNc_SI

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार
बाळ होण्याआधी 9 महिने हा विचार का केला नाही? बायकोला विचारा की दुसरं बाळ झाल्यावर पहिल्या बाळाला सोडून देऊयात तर चालेल का?>>> खरं सांगायचं तर बायकोला काहीही प्रॉब्लेम न्हवता. परंतु बाळ झाल्यावर नातेवाईक, आजूबाजूचे नालायक लोक बघायला येतात त्यांनी कान भरले असं होईल तसं होईल त्यामुळे घाबरली ती.
@ atuldpatil आम्हाला बाळ झालंय. पाहुणे म्हणून घरी नाही आले.

आम्हाला बाळ झालंय. पाहुणे म्हणून घरी नाही आले. >>> सॉरी, मी सर्वात आधी विश करायला हवं होतं. अभिनंदन !

तुमची बाजू आणि मजबुरी समजते आहे, तुमच्यासाठी फार मोठा मानसिक त्रास असणार. आईबाबा दोघांनी पूर्ण लक्ष ठेवून लॅबला थोडं थोडं जवळ येऊ देऊन बघा. बाळाचा वास घेऊन थोडी मैत्री होऊन दिली तर बाळाला चांगला मित्र मिळून जाईल, पण सांभाळून. उबो ने दाखवलेले दोन्ही व्हिडीओ पहाता सुरुवातीस अतिदक्षता घेणं गरजेचं आहे आणि नंतरही बाळ आणि कुत्रा बरोबर असताना डोळ्यात तेल घालून नजर राहू दे.

घरात लक्ष ठेवणारे ज्ये ना असतील तर बाळाला कुत्र्यापासून लांब ठेवणं अवघड नाही.जसं इतर धोके, पडणं, आग, तीक्ष्ण पदार्थ यापासून जपतो तसं हे पण एक.थोडं मोठं झालं की बाळाला कुत्र्याचा लळा लागेल.
अगदी कुत्रा नसेल तरी लहान बाळं खूप गोष्टीपासून जपावी लागतातच.सो नॉट मच डिफ.

अनुशी पूर्णपणे सहमत. कुत्रा कशाला, बाळकडून दुसऱ्या बाळाला पण धोका असतोच. आमच्याकडे जावेच बाळ आणि आमचं बाळ यामध्ये दीड वर्षाचा फरक होता. मोठ्या बाळाने छोट्या बाळाला रंगवणे, कुंडीतली फुलं आणून सजवणे, एका हाताला धरून फरपटत खेळायला नेण्याचा प्रयास किंवा स्वतःच्या ब्रशने बाळाचे दात घसण्याचा हट्ट असं बरंच काही केलं आहे. आम्ही 6 adults पैकी कमीत कमी 2 फक्त बाळांवर नजर एवढंच काम करायचो, तरी छोटे छोटे प्रसंग होता होता राहायचे.

मध्यम मार्ग काढा !!! नवमाता नेहमीच जास्त संवेदनशील असतात. त्या बाळाला त्रास होईल असे कोणी सांगितले तर त्यांचेच ऐकतील. बोकलत यांनी सुचवल्याप्रमाणे गॅलरी किंवा एखादी वेगळी जागा ठरवा. कुत्रा बाळाजवळ येणार नाही याची काळजी घ्या. काही कालावधीनंतर नवमाता दोघांना आपलेसे करतील.

माणसापेक्षा कुत्र्याच्या इमोशन्स खूप स्ट्रॉंग असतात, अस 4 वर्षाने कुत्रा सोडून देणं फार क्रूर आहे>>>>>> अगदी अगदी!
वर कोणी लिहिल्याप्रमाणे कुत्र्याबरोबरचे मुलांचे व्हिडिओज जरूर पहा.कंपॅनियन मिळाला की,मुले फार खुशीत असतात.

माझ्या माहेरी आमचा चावरा कुत्रा होता.माझी भाची रांगत रांगत त्याच्याकडे जाऊ लागली की तोच बाजूला व्हायचा.घरातल्या सर्वांना चावला होता.पण भाचीला अजिबात नाही.जनावरांना कळतं हो लहान मुलांशी कसं वागायचे ते घरात मांजरंपण होती.
लॅब हे बेसिकली शांत आणि प्रेमळ असतात.तेव्हा जरूर विचार करा.

स्वतःच्या नवजात बाळाच्या सुरक्षिततेपेक्षा कुत्रं महत्वाचं वाटत असेल तर तुम्ही कुत्र्याला नव्हे, कुत्र्याने तुम्हाला पाळलेय समजा. Just a perspective to think from different angle. बाकी तुमची मर्जी.

लॅब आणि तो सुद्धा घरातलाच असल्यामुळे हायजिन (टीक्स /फ्लीज ) वगरे ची काळजी घेतली असेलच . नसेल तर व्हेट कडे नेऊन औषधे आणा. तो एवढा मोठा प्रॉब्लेम नाहीये. माझा स्वानुभव सांगतो * बाळ घरात असताना कुत्रा असला तरी काही प्रॉब्लेम होत नाही *. बाकी इथे कोणी कुणाला पाळलंय अशी मुक्ताफळे उधळणार्यांची धन्य आहे. टोकाचा विचार करून लॅब चे हाल नका करू प्लीज. माणसांसारखे बोलता येत नाही म्हणून असा लांब करण्याचा विचार करू नका . बाहेरच्या फुकट सल्ले देण्यार्यांपैकी किती जणांकडे कुत्रा आहे किंवा होता हे पण बघा. माझ्या जाऊच्या मैत्रिणीचा किस्सा वगरे सांगणार्याना फाटयावर मारा. आणि हो केवळ बायकोला वाटतंय म्हणून करू नका तिला पण समजावून सांगा आणि थोडा वेळ काढा मध्ये. तिलापण आपोआप कळेलच की बाळाला काही धोका नाही

बायकोतली आई थोडी हायपर होणे स्वाभाविक आहे. खरेतर कुत्र्यांचा काहीही त्रास होत नाही.

तुम्ही एकदा तुमच्या कुत्र्याच्या डॉक्टरला बायकोसोबत भेटा व बाळाना होणारा संभाव्य त्रास याबद्दल त्यांच्याशी चर्चा करा. खरेच त्रास होत असेल तर तुम्हाला निर्णय घेणे जड जाणार नाही.

कुत्रा अडोप्शन साठी द्या, ज्यांना दिला त्यांना सांगा अधून मधून कुत्र्याला भेटायला येईन म्हणून.

माझा स्वानुभव सांगतो * बाळ घरात असताना कुत्रा असला तरी काही प्रॉब्लेम होत नाही *. >>>

सहमत. शेजारी जर्मन शेफर्ड आहे 10 वर्षांचा व बाळ आता दीड वर्षांचे आहे. ज शे walk ला आई-बाबा-बाळासोबत जातो व बाळाला कोणी ओळखीच्याने हात जरी लावला तरी त्याचे डोके फिरते. Happy

टोकाच्या श्वानप्रेमींनाही बिल्ला, पट्टा आणि साखळी सक्तीची असावी. ----- आणि पेडीग्री सकाळ संध्याकाळ सक्तीची !

कुत्र्यापेक्षा बाळावर जास्त प्रेम करा... म्हातारपणी तोच आधार आहे Happy
>>>>>

म्हातारपणी आधार म्हणून ना कुत्रा पाळावा ना बाळाला जन्म द्यावा. त्यापेक्षा धडधाकट आहात तेव्हाच पुंजी कमावून ठेवावी.

@ धागा
कुत्र्याशी किती अटेचमेण्ट आहे यावर निर्णय घ्या.
वर काही जणांनी म्हटलेय की छोट्या बाळाला मोठ्या बाळापासूनही सांभाळावे लागतेच. पण तेव्हा दोन्ही आपलीच बाळे असतात. मोठ्यामुळे छोट्याला त्रास झालाच तर त्याचा काही तुम्ही जीव नाही घेणार. पण तेच कुत्र्यामुळे काही त्रास झाला तर तीच भुमिका ठेवता येईल का हे चेक करा.

मी श्वानप्रेमी नसल्याने यातला एक्स्पर्ट सल्लागार नाही.
पण मला एक शंका आहे.
जसे नवीन बाळ आल्यावर आधीच्याला आता आपला भाव कमी झाला असे वाटून तो कधीतरी मुद्दामच त्या छोट्या बाळाला त्रास देण्याची शक्यता असते. तसे कुत्र्यांच्या मनातही येऊ शकते का? जसे हा आला म्हणून माझी सोय ग्यालरीत झाली वगैरे...??

एक मात्र आहे
बाळ मोठे झाले आणि बाहेर खेळायला जाऊ लागले तर एक मस्त बॉडीगार्ड मिळेल.
कुत्रा सोबत असलेल्या पोराशी बाकीची पोरे जास्त पंगा घेत नाही. मी तरी नाही घ्यायचो. कधी तो त्याला छू बोलला तर ....

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, डॉगीची सोय मामाकडे झाली आहे त्याच्याकडेही फिमेल लॅब असल्यामुळे दोघेही मजेत राहत आहेत.

त्याच्याकडेही फिमेल लॅब असल्यामुळे दोघेही मजेत राहत आहेत.>>> आता तुम्हाला "कुत्रा परत कसा आणावा" यावर लवकरच धागा काढावा लागेल. (गंमत Happy )

Pages