विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि पग्या जागा झाला..

आज प्रॅक्टिस मॅच मध्ये माती खाऊन झालेली आहे..
आता होऊ दे खर्च..

विश्वचषक गुणवत्तेची कसोटी आहे तशीच ती अडथळयांची शर्यत पण आहे. सुरवातीलाच आडाखे न बांधणंच बरं, फोटोतलया चेहर्यावरच्या भावांवरून तर नकोच नको ! Wink

पंतला न नेल्याने अर्धी मजा घालवली. त्याने युवराजचे काम केले असते. एक मॅचविनिंग एक्स फॅक्टर आणला असता. कार्तिक जाधव राहुल शंकर अशी बोअरींग मधली फळी बघावी लागणार आता.

माझा पहिलाच वर्ल्डकप ज्यात मला पाकिस्तान टीमची काहीही माहिती नाही, हा सर्फराझ कॅप्ट्न कधी झाला? हा काय करतो टीम मध्ये? तसेच श्रीलंकेचा कॅप्ट्न कोणे?
आपली मधली फळी नसून नुस्ते फटकूळ आहे.

सर्फराज बरेच दिवस असावा कप्तान. काही हायलाइट्स मधे पाहिल्यासारखा वाटतो (हे जरा "तंबाकूवाल्या मलुष्ट्याचा काय रे तो?" टोन मधे आले आहे Happy )

स्पर्धा सुरू होण्याच्या इतक्या जवळही फारशी उत्सुकता नसलेला पहिलाच कप असावा. नाहीतर पूर्वी सहा सहा महिने आधीपासून चर्चा सुरू व्हायची. जुन्या क्लिप्स पाहून वॉर्म अप केले जायचे Happy

कोहली आणि बुमरा कसे खेळतात ते पाहायची उत्सुकता आहे. बाकी आयपीएल मधले दिग्गज स्विंगिंग विकेट्स वर कसे खेळतात ते ही बघायची.

आयपीएल आणि नंतर निवडणुका यामुळे अजून वर्ल्ड कप फीवर आला नाही. येइल लौकरच.

*कोहली आणि बुमरा कसे खेळतात ते पाहायची उत्सुकता आहे. * - वास्तविक, भुवीसाठीं इंग्लीश वातावरण व खेळपटटया खूपच अनुकूल आहेत पण गेल्या दौरयातही तो प्रभावी ठरला नाही. त्याचं उट्टं त्यानं आतां काढावं ही पण रास्त अपेक्षा !

भुवी चार्म हरवल्यासारखा वाटतोय सध्या..
उलट शमी मिडल ओवर्समध्ये विकेट टेकिंग ऑप्शन म्हणून चमकला तर मजा येईल.. एकदोनच विकेट पण मोक्याच्या वेळी..

कुलदीप महत्वाचा आहे या लाईनमध्ये. पण तो ट्रंप कार्ड होईल का यात आता शंका आहे. गेले वर्षभरात खूप वापरलेय.

बुमराहचा प्रश्नच नाही. तो कंडीशन बॉलर नाही. कुठेही खेळवा, तो लिजंड आहे. त्याने मुंबईला आयपीएल दिला आणि भारताला विश्वचषक देऊ शकतो.

मी भुवीला खेळताना खूप पाहिलेला नाही. त्यामुळे कल्पना नाही.

आणि धोनी राहिलाच! असे दिसते की तो नंतर बहुधा निवृत्त होईल. २-३ जबरदस्त "फिनिशर" डाव खेळून त्याने हा कप गाजवावा ही माझ्या विश लिस्ट मधली पहिली एण्ट्री आहे Happy

मला वाटते भारतीय फलंदाज अजुनी आयपीएल मोड मध्ये असावेत... त्यांना कुणीतरी सांगायल हवे वर्ल्डकप ५० षटकांचा आहे..
आजदेखिल बांग्लादेशाविरुद्ध घसरगुंडी!!!

"हे जरा "तंबाकूवाल्या मलुष्ट्याचा काय रे तो?" टोन मधे आले आहे " - Happy मस्त फा!

वर्ल्ड कप दोन दिवसांवर आलाय, पण अजून तितकसं वातावरण तापल्यासारखं वाटत नाहीये. आयपीएल नंतर वर्ल्डकप ला भारताचा अँटी-क्लायमॅक्स होऊ नये अशी आशा आहे. भाऊ म्हणाले तसं खूप मोठी स्पर्धा आहे आणी आत्ताच काही अंदाज बांधणं कठीण आहे.

आपले कमजोर आणि मजबूत दुवे प्रतिस्पर्धी संघांना कळायला नको म्हणून शर्मा आणि धवन मुद्दाम कमी धावा काढताहेत.

धाग्याच्या हेडरमधले ते छायाचित्र कमाल आहे.... फारच आवडले!

थोडा अधिक विचार करता त्या त्या देशाच्या संघाची संस्कृती, मानसिकता आणि एकंदर जनमानसातली प्रतिमा त्या त्या कर्णधारांच्या अविर्भावातुन आणि पोझेसमधून दिसती आहे असे मला आपले उगीचच वाटून गेले!

थोडा अधिक विचार करता त्या त्या देशाच्या संघाची संस्कृती, मानसिकता आणि एकंदर जनमानसातली प्रतिमा त्या त्या कर्णधारांच्या अविर्भावातुन आणि पोझेसमधून दिसती आहे असे मला आपले उगीचच वाटून गेले!

> अगदी , स्पेशली विल्य्मसन . आधी फ्लेमींग , मॅकल्लम नंतर हा , क्रिकेट का खेळायच ते फक्त याच देशाला कळल्यासारख वाटत Happy

*क्रिकेट का खेळायच ते फक्त याच देशाला कळल्यासारख वाटत * -' कोहलींच्या पोझवर पण इतरदेशीयांची प्रतिक्रियाही वाचायला मिळतील तर....! Wink

आज पहिला सामना इंग्रज आणि आफ्रिका!

काय वाटतेय.. मला तरी इंग्रजांचे पारडे जड वाटतेय!

अजुन इथल्या क्रिकेटप्रेमींचा उत्साह वाढलेला दिसत नाही!

भाऊ, एक छान चित्र येऊ द्या! Happy

आज मुहूर्ताची मॅच बघणारच !!
कोण जिंकेल सांगता येत नाही. डेल स्टेन असेल की नाही?

भाऊ, एक छान चित्र येऊ द्या >>> +१

Pages