जिवलगाssssssss

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 24 April, 2019 - 06:37

स्टार प्रवाह वर भव्य दिव्य स्टारकास्ट असलेली 'जिवलगा' मालिका नुकतीच (२२ एप्रिल) पासून सुरु झाली आहे. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, आणि मधुरा ( आडनाव आठवत नाहीये आत्ता, पण गुलाबजाम चित्रपटात सिद्धार्थ ची प्रेयसी दाखवली होती ती ) असे नावाजलेले कलाकार आहेत.

त्यांच्यापेक्षा सतीश राजवाडे मुळे ही मालिका पाहण्याची उत्सुकता आहे, कारण मालिकेची संकल्पना त्याची आहे,
तर उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शन केले आहे. विषय पण तसा बोल्ड दिसतोय थोडा.. विवाहबाह्य संबंध ( नवऱ्याला माहीत असते, असं )...
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा..
अजून कोणी पाहतं का ही मालिका???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे अफेअर नाटक करतील, मग loyal नसलेले जोडीदार जागे होतील, मग परत एकत्र येतील. त्यापेक्षा सोडून द्यावं ह्या दोघांनी त्यांना आणि स्वत:च योग्य वाटलं तर एकत्र यावं.

सुलू आणि अंजु, तुम्ही दोघींनी अंदाज केलेली स्टोरी 'गुंतता हृदय हे' मालिकेत अश्शीच होती. दोघांचे रिस्पेक्तीव पार्टनर्स एकत्र येऊन धडा शिकवतात

मला ही सिरियल आवडते आहे कारण मी एकमेव सिरियल पहायचे ' तुला पहाते रे' च्या तुलनेत ही 1000 पटींनी चांगली आहे. सगळेच जण अभिनय चांगला करताहेत, कथा तुपारे एवढी अचाट नाही, पटण्यासारखी आहे. प्रत्येक रोलसाठीच कास्टिंग योग्य आहे. सगळ्यांचे कॉस्च्युम्स, incl पुरुष भूमिकेसाठी योग्य आहेत ( बाहेर वेगळे कपडे, घरात घरातले कपडे, कन्टीन्यूटी इ) सुयोग्य आहे. दोन्ही घरं डोळ्यांना सुखावणारी आहेत. यातलं काहीही तुपारे मध्ये नाही. इतर वेळेस इंटरव्ह्यूमध्ये बढाया मारून टाळ्या घेणारा सुबोध भावे इन्फ्लुअन्स करणं शक्य असू।ही पैशांसाठी पाट्या टाकतो आहे

कालच्या एपि मधे विधी जेव्हा घडून गेलेल्या घटनांची संगती लावायच्या प्रयत्नात असते तेव्हा दाखवलेले सीन्स त्या आधी कधीही न दाखवलेले होते. युज्वली अश्या वेळी सिरीअल्समधे पाट्या टाकतात आणि आपल्याला दाखवलेल्याच गोष्टी ब्लॅक अँड व्हाईट मधे पुन्हा दाखवतात. या बॅकग्राऊंडवर हा अगदीच सुखद धक्का होता.

कालच्या एपि मधे विधी जेव्हा घडून गेलेल्या घटनांची संगती लावायच्या प्रयत्नात असते तेव्हा दाखवलेले सीन्स त्या आधी कधीही न दाखवलेले होते

>>> येस्स... मलाही ते आवडलं. त्यातल्या जवळपास प्रत्येक सीनमध्ये निखिलचे वेगवेगळे कपडे होते. म्हणजे वेगवेगळ्या वेळी घडलेले सीन्स, असं दर्शवलं गेलं. (विधीकडे लक्ष गेलं नाही Wink )

काव्या आणि निखिलला एकत्र पाहून बसलेल्या धक्क्यातून विधी लगेच सावरली आणि वॉचमनशी बोलून खरंखोटं पडताळून बघण्याच्या कामी लागली ते पण मला आवडलं.

फक्त स्वप्नालीचा बॉयफ्रेंड हाच काव्याचा ऑफिसमधला खबर्‍या - हा योगायोग जरा अती वाटला, पण चालवून घ्यायचं.

विधीचा मेक-अप खूप भडक वाटतो; त्यामानाने काव्याचा मॅट-फिनिश मेक-अप अ.खा.ला सूट होतो.

फक्त स्वप्नालीचा बॉयफ्रेंड हाच काव्याचा ऑफिसमधला खबर्‍या - हा योगायोग जरा अती वाटला, >>>>. नाही नाही, दोघे light eyed आहेत हेच साम्य, बाकी दोन्ही वेगळ्या व्यक्ती आहेत.

फक्त स्वप्नालीचा बॉयफ्रेंड हाच काव्याचा ऑफिसमधला खबर्‍या - हा योगायोग जरा अती वाटला, >>>>. नाही नाही, दोघे light eyed आहेत हेच साम्य, बाकी दोन्ही वेगळ्या व्यक्ती आहेत. >>> हो

ते घराची विचार पुस काही कळल ना ही.... त्या बदद्ल काही मिस केलय का....>> तिथे ती खाली पाटि बगते त्यावर के,व्ही देशपान्डे लिहलय ( तेच काव्याच नाव हे विधिला कस कळत? का नाही कळत) स्वप्नाली जशी तिच्या बॉफ्रेला इथे चोरुन भेटते त्यावरुन आन्दाजानेच विचारते पण ते खर निघत..
विधीची अ‍ॅक्टिन्ग आवडतेय मला, ति लहान वाटते चेहर्‍यावरुन त्यामानाने अम्रुता थोराड वाटते तिच्यापुढे, काव्या सारख निखिलला तुझी मला सवय झालिये म्हणते वर विश्वासला तु माझा श्वास आहेस म्हणाते दोन्ही नात्यात नक्की काय हवय हिला?

अमृताची अ‍ॅक्टींग इतकी काही खास नाही वाटत. काल तर त्या कार सीनमधे मला तुझी सवय झालीए रे म्हणते ते इतकं कृत्रिम होतं. काही हावभाव नाही.

आज-कालच्या भागात विधी आणि काव्याची केशरचना सारखीच होती.
विश्वास बरोबर बोलला तिला कि निखिलला सोडायचे बोलते पण प्रयत्न करताना दिसत नाही.
विधी मात्र टोमण्यांवर टोमणे मारत सुटली आहे.

मी हल्ली ही सिरीयल उशिरा बघते, साडेआठला सोनी मराठीवर करोडपती बघते.

काव्याला सर्वांची सवय झालेली असते, ते आता कंटाळा येतो ऐकायला. विश्वासचे डायलॉग्ज छान होते कालचे.

विश्वास बरोबर बोलला तिला कि निखिलला सोडायचे बोलते पण प्रयत्न करताना दिसत नाही.
विधी मात्र टोमण्यांवर टोमणे मारत सुटली आहे. >>>>>>>> छान केल दोघान्नी. आता कुठे ते स्वत: च डोक वापरायला लागले.

प्रोमोत वेगळ दाखवतात. एपिसोडमध्ये वेगळ. प्रोमोत विधि विश्वासला मिठी मारुन सगळ सान्गते. विश्वास धडा शिकवणार अस म्हणतो. पण एपिसोड मध्ये विधिने काय झाल ते अजून सान्गितलच नाही त्याला. तिला हेही माहित नाही की काव्या त्याची बायको आहे.

आज विधीची रिकामी मोठी purse bag पहिली तिझ्या cake शॉप मध्ये आली तेव्हा. खुप सिरीयल मध्ये रिकामी purse दाखवतात. जेव्हा ती purse मोठी असते तेव्हा खूपच जाणवते.

मला तर ही मालिका खूप आवडली कोण्ही पण कोणाची सुधा बायको नवऱ्या समोर पटवून तिला फिरवत आहे ..आणि ह्याला नवऱ्याची समती आहे great .
Asa समाज भारतात पाहिजे होता .
सासू सासरे ,आई वडील हे किती मोकळ्या मनाचे आहेत .
खूपच great

विश्वासने आता त्याची ओळख लपवायला नाही पाहिजे. नाहीतर निधीला फसविले गेल्यासारखे वाटेल. कितीही समदु:खी असले तरी त्याचे ओळख लपवून घरोबा वाढवणे बरे नव्हे.
काव्या तर आता फार पोकळ वाटायला लागली आहे. काही लपवत नाही, स्पष्ट बोलते. जशी आत तशीच बाहेर असे तिच्याबद्दल बोललेले दाखवले आहे. जर तिच्या विश्वासकडून अपेक्षा पूर्ण होत नव्हत्या तर तसे त्याला सांगायचे पण हिला तोही हवाय आणि हाही हवाय. Uhoh आणि हे असे असून ती वाईट नाही म्हणे Proud
विश्वासचे बाबा आणि काव्याची आई या प्रकरणाबद्दल असे काही बोलत असतात कि मर्डर मिस्टरी सोडवायला बसलेत Happy

विश्वासने आता त्याची ओळख लपवायला नाही पाहिजे.>>>> हो ना तो का लपवतोय ओळख? विधीची दोन्ही कडून फसवणूक.
काव्या लबाड आहे. विश्वास ने विधी ला भेटायचं नाही, तिचं नाव घ्यायचं नाही आणि ही बया वाटेल ते करणार.

काव्या लबाड आहे. विश्वास ने विधी ला भेटायचं नाही, तिचं नाव घ्यायचं नाही आणि ही बया वाटेल ते करणार. >>> हो ना.

विश्वास विधीचे पैसे द्यायला घरी गेला, अरे केक शॉपमधे द्यायचे ना. तो सीन कमालीचा फेक वाटला. काही भिडलाच नाही. विश्वास विधीला खरं न सांगून चुक करतोय मोठी.

आता विधीला कळले आहे विश्वासला कळले आहे काव्याला माहीतच आहे. बाबांना माहितच आहे. निखिल ला पण माहीत असावे ऑफिसात सर्वांना माहीत आहे. विश्वास व काव्याच्या बाबा व आईला माहीत आहे. मग एक दिवस मुहुर्त बघून दोन घटस्फोट का नाही करवत? प्रत्येक प्रत्येक सिचुएश नच्चे इतके भंपक अ‍ॅनालिसिस करत बसतात की ते रिडिकुलस होउन जाते आहे. पण लेखन छान आहे. किती ती सुवाचिते सुभाषिते पेरली आहेत.

काव्याच्या आईला मुलीचे काही चुकते आहे हे कळतच नाही का मुकाट्याने संसार कर लफ्डी बंद कर. असे कोणी कुणाला सांगायला धजत नाही?

सर्व म्हातारे फार इरिटेटिन्ग आहेत. माई म्हणजे माया व इमोशनस अरे देवा... जरा कचकचून भांडा रे

पण सिरीअल नेत्रसुखद आहे. काव्या सेक्सी दिसते. निखिल काय मला हेंडसम वाटत नाही. पण इथल्या लोकांना अपील असावे त्याचे.
फारच मेकप असतो. आता आज काय होइल लेव्हल ला आली आहे सीरीअल.

काव्याचा वॉर्डरोब मला आवडतो. इतर मराठी सिरियल्सची घरं, कपडे, राहणी इतकी टिपिकल असते की बोअर वाटते. इथे ऍक्टर्स, घरं, ऑफिसेस पासून सगळंच बघणेबल आहे.

अमृता स्वतःचा वॉर्डरोब स्वतःच सांभाळते असं श्रेयनामावली मध्ये दिसतं आहे. मग ती रोज रात्री झोपताना टाईट लेगिंग, तेवढाच टाईट कुर्ता आणि पिन अप केलेला दुपट्टा अस का बरं घालते. कॅज्युअल्स कधीच घालत नाही म्हणावं तर ऑफिसला मात्र क्रॉप टॉप ?????? आणि ते सुद्धा ऑफिसमध्ये टॉप बॉस आहे, कोणी इंटर्न नाही. अजून तरी भारतात क्रॉप टॉप घालून ऑफिसमध्ये जाण्याच कल्चर दिसत नाही. तिच्या साड्या मात्र सुंदर आहेत आणि तिला दिसतात पण छान. विधीचे कपडे पण छान असतात.

मी ही सिरीयल बघत नाही. पण सिरीयलच्या जाहिराती आणि इथल्या पोस्ट वाचुन कायच्या काय गंडलेल्या लॉजिकवर बोल्ड आहे असा दिखावा करणारी पण नसलेली सिरीयल आहे असं वाटतंय.
काव्या निखिलसोबत आता लगे हाथ विश्वास-विधी, विश्वासचे बाबा आणि काव्याची आई अशी पण प्रकरणं जुळवा म्हणावं

बोल्ड बिल्ड काही नाही आहे. उगीच लफड्याल इंटलेक्चुअल मुलामा दिला आहे. व फेकणे चालू आहे. पण मनोरंजक विषय. चालते आहे. तुपारे मानबा ची जरा सॉफिस्टिकेटेड आवृत्ती आहे.

काही घरंच देवघरा सारखी असतात.

माणसाला आतून बघायला पाहिजे

नात्यात विश्वास हवा.

काव्या सारखे म्हणते मग माझे काय बाई सगळे तुझेच चालू आहे की ग.

पोहे डब्यात घालून घ्या

हास्य क्लब.

टॉवर मधील माणसांचे जीवन.

घरातल्या घरात असे ट्रे मध्ये दहि वडे कोणती सासू देते आणून.

अमा दोन्ही पोस्टी भारी !
पण सिरियलला लॉजिक लावायच नाही हेच तर मेन सुत्र आहे सगळ्या चॅनेल वाल्यान्च!

पण सिरियलला लॉजिक लावायच नाही हेच तर मेन सुत्र आहे सगळ्या चॅनेल वाल्यान्च!> अगदी खरंय..खरं तर किती मस्त खुलवता आला असता विषय..आता मात्र कधी एकदा विधी निखिलला फैलावर घेते याची वाट बघणं चालू आहे...
अवांतरः
१. लफडी करताय तर पार्ट्नरला सांगून तरी करावीत...निखिल भ्याड वाटतोय आता
२. हेंडसम बघायचाय तर जोन स्नो किंवा लुसीफर!

नेमका विश्वास केबिनच्या बाहेर ऊभा असतो तेव्हाच काव्या आणि नि हातात हात घेतात, फारच फिल्मी योगायोग. निखिल हॅंडसम वाटत नाही, जाड झालाय आणि डोक्यावरचे केस विरळ होताहेत, अंकल वाटतो. विधी नेहमी स्कर्टच घालतेे का टिपीकल हिरवीणीसारखी, बाकी काही प्रकार नाहीत कपड्यांचे.

Pages