Submitted by दत्तप्रसन्न on 4 May, 2019 - 15:54
डोळ्यात तुझ्या का पाणी
वाहते या सांजवेळी
येते आठवण का गं
कोवळ्या बालपणीची
होतो का स्पर्श बाबाचा
डोक्यांवर हात ठेवुनी
म्हणती खुशाल राहा
छान होणार सर्व राणी
थकलेले शरीर जरी
नजर होती मंदावली
डोळ्यात तरीही जपुनी
तुझी गोड गोड छबी
नको करूस काळजी
खिन्न राहू नको कधी
सुखात मी असणार आहे
लाभली तुझ्यासारखी परी
नको वाईट घेऊस वाटुनि
भेट अखेर राहिली जरी
असेन तुझ्याच सभोवती
जाणवेल योग्य समयी
आशीर्वाद सतत राहील
देउ अजून काय मी तरी ?
गालावर सतत राहूंदेत
छानशी हसरी खळी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त कविता, भिडली हृदयाला,
मस्त कविता, भिडली हृदयाला, छान छान छान
छान आहे
छान आहे
छान.
छान.
मला I am already there या गाण्याची आठवण झाली.
सुन्दर कविता...
सुन्दर कविता...
खूपच छान कविता. किती गोड
खूपच छान कविता. किती गोड फीलिन्ग.
खूप छान कविता..डोळ्यात पाणी
खूप छान कविता..डोळ्यात पाणी आले....
धन्यवाद आपल्या प्रतिसादा
धन्यवाद आपल्या प्रतिसादा बद्दल.
बाबा मोकळेपणाने व्यक्त होऊ शकत नाही पण प्रेम आई एवढंच करत राहतो.
माझ्या एका मैत्रिणीच्या वडिलांचे गेल्या वर्षी निधन झाले. तिला संध्याकाळी भेटायला गेलो असताना, ती अप्पांच्या आठवणी सांगत होती आणि त्यावेळेस सहजच ह्या कवितेचा जन्म झाला.
खुप सुंदर ह्रद्यस्पर्शी रचना!
खुप सुंदर ह्रद्यस्पर्शी रचना!
बोका तुमचं गाणं ऐकलं. तेही भावपुर्ण आहे.
सुंदर कविता.
सुंदर कविता.
धन्यवाद
धन्यवाद
वाह
वाह
डोळ्यात पाणी आले!.
डोळ्यात पाणी आले!.
छान हळवी कविता!
धन्यवाद आपल्या प्रतिसादा
धन्यवाद आपल्या प्रतिसादा बद्दल.