Submitted by सुप्रिया जाधव. on 21 May, 2019 - 03:19
निष्कर्ष भलता काढला आहेस का
चष्मा कुणाचा लावला आहेस का
मी गुंफते अजुनी तुला शेरांमधे
ह्रदयात माझ्या सांडला आहेस का
वस्त्रातुनी हा निसटला आहे खरा
तू तोच धागा ओढला आहेस का
आई-वडिल, नवरा-मुले आणिक सख्या
सल्ला स्वतःचा मानला आहेस का
वनवास माझा संपता संपेचना
राशीस माझ्या लागला आहेस का
असहाय्य जर होते तुला घुसमट तुझी
तू उंबरा ओलांडला आहेस का
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख जमली आहे.
सुरेख जमली आहे.
असहाय्य जर घुसमट तुझी होते 'प्रिया'
तू उंबरा ओलांडला आहेस का ?>>>छान. बाकीचेही शेर छान आहेत.
शाली आपला प्रतिसाद वाचूनही
शाली आपला प्रतिसाद वाचूनही छान वाटले
मला बहुतेक कळालीच नाहीए तुमची
मला बहुतेक कळालीच नाहीए तुमची गझल!
पु.ले.शु!
(आयुष्यात पहिली गझल तुमचीच वाचलीए म्हणून असेल कदाचित )
हरकत नाही
हरकत नाही
तुमच्या पुढील गझल वाचनास शुभेच्छा !
धन्यवाद
निष्कर्ष भलताच असे केले तर
निष्कर्ष भलताच असे केले तर म्हणण्यावर जोर येईल असे वाटते अर्थात मात्रात बसत असेल तर बाकी गझल नेहमी प्रमाणे उत्तमच ......
मस्त
मस्त
छान!
छान!
छान आहे.
छान आहे.