जिवलगाssssssss

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 24 April, 2019 - 06:37

स्टार प्रवाह वर भव्य दिव्य स्टारकास्ट असलेली 'जिवलगा' मालिका नुकतीच (२२ एप्रिल) पासून सुरु झाली आहे. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, आणि मधुरा ( आडनाव आठवत नाहीये आत्ता, पण गुलाबजाम चित्रपटात सिद्धार्थ ची प्रेयसी दाखवली होती ती ) असे नावाजलेले कलाकार आहेत.

त्यांच्यापेक्षा सतीश राजवाडे मुळे ही मालिका पाहण्याची उत्सुकता आहे, कारण मालिकेची संकल्पना त्याची आहे,
तर उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शन केले आहे. विषय पण तसा बोल्ड दिसतोय थोडा.. विवाहबाह्य संबंध ( नवऱ्याला माहीत असते, असं )...
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा..
अजून कोणी पाहतं का ही मालिका???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

४५८ म्हणजे सुद्धा I L U, as 4, 5, 8 numbers on phone correspond to I L U (google प्रसन्न)
मला विधी अजून म्हणावी तितकी आवडत नाहीये. आवडेल काही दिवसांनी.

४५८ म्हणजे सुद्धा I L U, as 4, 5, 8 numbers on phone correspond to I L U (google प्रसन्न)>> हो कि Happy
हि विधी गूगल का नाही करत.
गेल्या १-२ भागात विधीची अ‍ॅक्तिन्ग आवडली आहे >>+१
प्रोमोत विधी ने निखिल-काव्याला हग करताना पाहिलिय >>> ते फक्त प्रोमोपुरतं असू शकतं>> हो अगदीच. मधली कुठली तरी दोन वाक्य दोन प्रसंग जोडून आपला काहितरी गैरसमज होईल असे प्रोमोज असतात हल्ली Angry

तीन वर्षांच्यावर अफेअर सुरू असते तेव्हा विधी, निखिलचे बाबा यांना अजिबात संशय येत नाही, आता सगळे जागे होतायेत. मला विधी ok च वाटतेय पण त्या प्रोमोत छान दिसली, तो गाऊन शोभत होता तिला. मला तिचं हसणे वगैरे कृत्रिम वाटतं. स्व जो कडे हल्ली बघवत नाही. फार वयस्क वाटतो बरेचदा.

कळुदे बाई विधीला लवकर असं वाटतं.

अम्रुताची ज्वेलरी आद्या ने डिझाइन केलिये, मला फार आवडतायत ते दागिने, साड्या हे कॉम्बो फक्त अम्रुताचा चेहरा रसरशित नाहि दिसत जरा खप्पड दिसते ती
आता सिरियल जरा ग्रिप घेतेय निखिल-विधि-काव्या सगळे ओके वाटतायत फक्त विष्वास त्यातही स्वजो अ‍ॅक्टिन्ग वाइट नाही करत आहे पण त्याच कॅरेक्टर जरा कन्फ्युजिन्गिन लिहलय अस वाटतय किवा स्वजोच्या जागी एखादी बाई असती तिच्या नवर्‍याच अफेअर चालु आहे आणि ति त्याला त्यातुन बाहेर काढतेय तर हजारो सिरियल मधुन प्रेक्षक म्हणुन आपल कैक वेळा बघितलच आहे त्यामुळे का ? त्यावेळेला तितक ऑड नाही वाटत (का?)
मला निट लिहता येत नाहिये पण स्वजो गन्डलाय हे नक्कि.

त्यावेळेला तितक ऑड नाही वाटत (का?) >>>>>>>>> अगदी अगदी. प्रत्येकवेळी काय बायकान्नाच त्यागमुर्ती दाखवायच?

उदय टिकेकर फक्त पाहुणे कलाकार म्हणून सिरियलमध्ये आहेत का? सध्या एपिसोडसमध्ये दिसत नाही म्हणून म्हटल.

विश्वासला माहिती आहे कि निखिलचे काव्यावर प्रेम नाही आणि त्याला या नात्यातून बाहेर पडायचे आहे. जर तसे नसते तर काव्या आणि निखिलच्या मधे विश्वास आला नसता. जे तिचे नाहीच आहे त्या मागे ती लागली आहे, भरकटली आहे. पण जेव्हा काव्याला कळेल कि निखिल तिचा कधीच होणार नाही तेव्हा ती कोसळेल. अश्यावेळी विश्वास तिला एकटे सोडणार नाही.

विधी मला अजूनही आवडत नाहीये. तिच्या मैत्रिणीकडेच लक्ष जातंय. ती विठुमाऊली मध्ये सत्यभामा होती बहुतेक, माझ्या एका मैत्रिणीला वाटतंय, माझ्या लक्षात नाही आलं. डोळे तसेच आहेत.

ती भेटी लागी जीवा मधली स्वरा होती, विश्वासची fan म्हणून आलेली केक shop मध्ये ती. ती मला फारशी आवडत नाही. विश्वासने काव्याशी नातं लपवायला नको होतं विधीसमोर. काव्या निखीलच्या प्रेमात आहे आणि विश्वासला थापा मारते. तिला आता व्हिलन करतील की काय, असंही वाटतंय. निखिल दिसल्यावर तिच्या डोळ्यात एक चमक दिसते, ती विश्वास दिसल्यावर कधीच नसते. इगो आहेच पण प्रेमही करते ती निखिलवर. ती डोळ्यातली चमक अमृता छान दाखवते.

निखिल दिसल्यावर तिच्या डोळ्यात एक चमक दिसते, ती विश्वास दिसल्यावर कधीच नसते. इगो आहेच पण प्रेमही करते ती निखिलवर. ती डोळ्यातली चमक अमृता छान दाखवते.>>> अगदी!

विधीजर निखिलचा मोबाईल ऊघडू शकते तर मेसेज वगैरे का नाही वाचत, आतातर तिला संशयपण आलाय. ज्याचं विबासं आहे तो मोबाईलला व्यवस्थित लाॅक नाही का करून ठेवणार. विधीला कधीच सोडणार नाही आणि काव्याची सवय झालीये Uhoh दोघींनी सोडून दिलं पाहिजे निखिलला. एका वर्षाचंं भाडं कोण आधीच देऊन ठेवतं तेही अॅडव्हान्ससकट. वीधीतर लोकांना केक फुकट वाटते.

कालचा नाही बघितला.

विधीजर निखिलचा मोबाईल ऊघडू शकते तर मेसेज वगैरे का नाही वाचत, आतातर तिला संशयपण आलाय. ज्याचं विबासं आहे तो मोबाईलला व्यवस्थित लाॅक नाही का करून ठेवणार. >>> हो ना. इतकं लॉजिकल सिरीयलवाले दाखवत नाहीत मात्र.

विनोद देशपाण्डे हे शेवटी विश्वासचेच वडील निघालेत तर.

काल विनोद कोणाचा प्रेगनन्सी रिपोर्ट सान्गत होता विश्वासला. बाळ आणि मूल ह्या दोघान्पैकी एकच वाचू शकत. विधीचा का? हे अस कुणाचाही प्रेगनन्सी रिपोर्ट कुणीही वाचू शकत? विधीला निखिलबद्दल कळत तर ती कोसळून जाईल असही विनोद म्हणाला होता.

दोघींनी सोडून दिलं पाहिजे निखिलला. >>>>>>>> +++++++++१११११११११

विधीचा का? हे अस कुणाचाही प्रेगनन्सी रिपोर्ट कुणीही वाचू शकत?>>>> नाही. विधी कुठे गरोदर आहे? आणि असेल तर तिच्या सासू ऐवजी काव्याचा सासरा कशाला रिपोर्ट जवळ ठेवेल. Happy तो रिपोर्ट विश्वास्च्या आईचा असतो. त्याला हे सांगण्यासाठी दाखवतो कि तुझ्या आईने तुला वाचवायचे ठरविले कारण तिचे तुझ्यावर खूप प्रेम होते आणि आपल्या हातात काहिच नसते.

तो रिपोर्ट विश्वास्च्या आईचा असतो. त्याला हे सांगण्यासाठी दाखवतो कि तुझ्या आईने तुला वाचवायचे ठरविले कारण तिचे तुझ्यावर खूप प्रेम होते आणि आपल्या हातात काहिच नसते. >>>>>> ओह असे आहे तर. धन्स सोनाली. Happy

विधी कुठे गरोदर आहे? >>>>>>>>> त्या काव्या- निखिल प्रोमोमध्ये विधि अर्जण्टली त्याला कॉल करते, पण निखिल तिला बिझी असल्याच सान्गतो. आनन्दात दाखवलीये. त्यावरुन डाउट येतो की ती गरोदर असावी.

तर तिच्या सासू ऐवजी काव्याचा सासरा कशाला रिपोर्ट जवळ ठेवेल >>>>>>> डेली सोप आहे काहीही दाखवू शकतात. Lol

डेली सोप आहे काहीही दाखवू शकतात. >>> हो हे मात्र खरे आहे Lol

त्यावरुन डाउट येतो की ती गरोदर असावी.>>> मागे तर सासर्‍यांना सांगत होती ना कि निखिल जवळ घेताना बिचकतो, विचार करतो. त्यातून त्याच्यावर संशय...कशाला या फंदात पडावे! मगच्या भागाच्या शेवटी ती आज त्यांना गाडीत मिठीत असताना बघणार आहे. तेव्हा कशी वागेल ती? राडा, दंगा कि घरी जाऊन गुपचुप रडारड उरकून मग ह्याची शाळा घेणार?

तो मोबाईल निखिलचाच असतो. काव्याचा सासरा विधीचा रिपोर्ट Rofl ते रिपोर्ट प्रकरण फार बोर होतं. काही आपल्या हातात नाही म्हणे, मग सगळ्यांनी विबासं ठेवायचे का, काहीही. आज विधीने तो ऐतिहासिक क्षण बघितल्यावर घरी जाऊन रडायचे तर मॅड त्या ईशासारखी रस्त्यावरून चालत सुटली. आता बहुतेक अपघात आणि दळण कितीतरी दिवस.

अवांतर पण त्या सविता प्रभुणेच्या मालिकेतली नायिका बदलली का. साथ दे तू मला, आत्ता आठवलं, तर त्यातपण आज एक अंबाबाईवाली जोगतीण आली आज लग्नाच्या प्रसंगी. डिट्टो तुला पाहते रे सारखी. किती काॅपी करतात, ते पण फ्लाॅप आयडिआज. कोणीही असं लग्नात घुसू शकतं का.

आजकाल मराठी कौटुंबिक मालिका म्हणजे फालतूच असणार अशी खात्री पटत चाललीये.
मी पूर्ण बघितलेली सगळ्यात शेवटची मालिका म्हणजे अग्निहोत्र!!! प्रचंड सुंदर!!

मी दोन दिवस जिवलगा बघितलं नाही.

चंपा हो त्या सिरीयलची नायिका बदलली, मी पेपरात वाचलं, म्हणून एक प्रोमो बघितला तर आधीचीच चांगली होती असं वाटलं.

अज्ञातवासी, अग्निहोत्र खरंच अप्रतिम होती.

अज्ञा+111
आत्ता tv वर फक्त एकच चांगला कार्यक्रम आहे.
भेटी लागी जिवा

आणि हम बने तुम बने.

भेटी लागी जीवा संपतेय की काय, असं वाटतंय, आजचा बघितला नाही अजून.

जिवलगाने शनिवारपासून तुपारेशी स्पर्धा करायची ठरवली आहे वाटत. परवा विधी मानसिक धक्का बसल्यावर फिरत होती रसत्यावर. आज शोधकार्य करत होती. आणि आता तर काय विश्वास आणि विधी विश्वासघाताचा बदला घेणारेत म्हणे.

म्हणजे काय करणार? अफेअर का बदला अफेअर? >>>>>>>>> ते अजून दाखवल नाही. पण प्रोमोमध्ये विधीला खर कळल्यावर विश्वासला हलकीशी मिठी मारताना दाखवलय. सो, हिण्ट दिलीये त्यान्नी. पण मराठी सिरियलमध्ये खरच अस दाखवतील की नाही ते सान्गता येत नाही सध्या.

काव्या निखिलला सांगते कि तिच्या विश्वासकडून काय अपेक्षा आहेत ते विश्वासलाही माहित नाही. तिला काय आवडतं ते तिला कोणीच विचारले नाही.
बिचारा विश्वास! अश्या बायकोला परत मिळवून करणार काय? जिला त्याच्यात काहीच रस नाही कि त्याची किंमत नाही.

Pages