नात्यांचा गुंता

Submitted by Asu on 15 May, 2019 - 13:48

नात्यांचा गुंता

दोन बिंदूंमधील कमीतकमी अंतर
म्हणजे रेष
नात्यातलं जास्तीत जास्त अंतर
म्हणजे द्वेष
दोन बिंदूतलं अंतर जेव्हा
शून्य होते
अदृश्य प्रेमाची रेषा तिथे
उत्पन्न होते
उभ्या-आडव्या तिरप्या रेषांचं नातं
गुंता असते
आपणच केलेला गुंता सोडवायची
चिंता असते
सरळ रेष मारणं खरंतर किती
सहज असतं
पण...
आपण आपल्यातल्या शिकाऱ्याचं
सावज असतं

प्रा. अरूण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults

मन्या ऽ,
आपल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद!
पण, 'पुलेशु' म्हणजे नक्की काय?
- असु

छानच . आवडली.

पुलेशु- पुढील लेखनासाठी शुभेच्छा
किंवा
पुलेशु- पुर्ण लेखन शुद्ध
दोन्ही अर्थ होतात ना मन्या s.

मन्या ऽ, सिध्दि,
पुलेशु - पुढील लेखनासाठी शुभेच्छा! हे जास्त बरोबर वाटतं. धन्यवाद!