बटरफ्लाय - २

Submitted by अज्ञातवासी on 13 May, 2019 - 03:53

बटरफ्लाय -१

https://www.maayboli.com/node/69816

"नवरा मेला नाही, आणि तू काच मागवतेय."
"सोड रे."
"काय सोड, त्याला बरं झालं कळलं नाही, बाटलीत तू विष मिसळलंय ते."
"तो नेहमी म्हणायचा, मी तुला विष घालून मारणार आहे, मग मला सोपा प्लॅन मिळाला."
"पण तुला त्याच्या अफेयरविषयी माहिती होतं का?"
"ऑफकोर्स, पण तो मूर्ख होता रे खूप... "
"आणि त्याला आपल्याविषयी?"
"ऑफकोर्स नाही."
"तिने त्याला का मारलं असावं?"
"आय डोन्ट नो, मेबी असतील काही इश्यू!"
"हं."
"बाय द वे, ऑफिशियल ट्रीपसाठी तू आणि तो गेला होता गोव्याला, तेव्हा माझ्याविषयी काही बोलायचा का तो?"
"नाही, तुझा नवरा फक्त कामात बिजी असायचा."
"गोव्याला जाऊनही, हीही?"
"बरं, मी इथे आहे, हे कुणाला माहीत तर नाही पडणार ना?"
"माझा शेजारी आहेस, आलास तरी काही प्रॉब्लेम नाही."
"हं, चल बियर घेऊयात."
"विष नाही मिसळणार ना? ही ही..."
"काहीही काय... आणतो वेट..."
तो शेजारून बियरच्या बाटल्या घेऊन आला.
त्याने एक मग भरला, एक तिला दिला, एक स्वतः घेतला.
...आणि थोड्याच वेळात ती तडफडू लागली.
"ही इज माय सोलमेट, बीच... गोव्याला आम्ही फक्त तुझ्यापासून सुटका हवी म्हणून गेलो होतो." तो म्हणाला.
"यू *** गे," तिची तडफड वाढत होती.
ती शांत झाली...
त्याने शांतपणे बियर रिचवली.
"त्याच्याविना नाही जगू शकणार मी," असं म्हणून तो उठला...
आणि समोरची काचेवर मग फेकून मारला, आणि त्या काचेच्याच तुकड्याने स्वतःची नस कापून घेतली...
काही वेळाने तोही शांत झाला.
काचेचे तुकडे इकडेतिकडे विखुरलेले होते....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पुन्हा काच मागवावी काय Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy कोकम, लिंबू सरबत पन्हे ताक का पीत नाहीत हे लोक?
तामसी काही तरी पिऊन मारतात एकमेकांना.... फुकट फुलपाखरू बदनाम

नस कापण्यापुरतीच काच हवी होती तर रिकामी झालेली बिअरची बाटली फोडायची, अख्खी खिडकी कशाला ...
काच मागवावीच लागेल. घर उघडं झालं ना खिडकी फुटून.....चोरी होईल.

पण सगळे मेले ना? कोण उरलं मागवायला ? सेक्रेटरी सोसायटीचा? दोन फ्लॅट री-सेलला मिळाल्याच्या खुशीत
की आता पोरं बदले घेणार एकमेकांचे आई बापाच्य खुनांबद्दल?

@अज्ञातवासी वाचल्यावर वाटले ते लिहीलेय....टीका म्हणून नाही .... चालू दे सिरीयल किलिंग

@श्रद्धे धन्यवाद!!!

@कारवी - नाही हो, उलट नवनवीन आयडिया मिळाल्यात Wink
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आणि हो, जरा काच फोडण्याच्या नादात ते बाटलीच लक्षातच आलं नाही... नेक्स्ट टाईम नक्की....

अरेरे! अजुन एका काचेचा बळी.काय माहित अजुन किती बळी जाणारेत प्रेमाच्या त्रिकोण? Uhoh
Oops! Sorry..sorry वर्तुळापायी! Biggrin

माझा पास!
हे असलं माझ्या डोक्यावरुन जातं.
Lol

छान.

Submitted by ॲमी on 14 May, 2019 - 06:09
>>>>>>
धन्यवाद ॲमी

अगदीच अनपेक्षित ट्विस्ट... Rofl

Submitted by L Lawliet on 14 May, 2019 - 12:19
>>>>>
धन्यवाद L Lawliet.

काच खूप महत्त्वाची.. मस्तय कथा

Submitted by किल्ली on 14 May, 2019 - 12:53
>>>>>>>>
ते तर आहेच Lol धन्यवाद किल्ली

माझा पास!
हे असलं माझ्या डोक्यावरुन जातं.
Lol

Submitted by शाली on 14 May, 2019 - 21:56
>>>>>
Lol

धन्यवाद शुभांगी आणि अंकु.

तिसरा भाग सगळ्या कड्यांना जोडणारा बनवतोय... थोडंसं सुचत नाहीये, पण टाकेन लवकर. अंतिम भाग.
पण नाही टाकला तरी कथा इथेच संपली असं समजायला हरकत नसावी.

अरे किती शेजारी आहेत अजुन बाकी.
सगळे विबासं एकमेकांशेजारीच रहायला आलेत काय? Light 1 Lol
आणि खिडकीच्या काचा काय फोडतात दणादण.
तिला विष घालुन मारलं तेच विष प्यायचं ना.
आता नवरा बायको दोघं मेलेत तर नवी काच कोण मागवणार? घरी अजुन कुणी प्रेमपात्र आहे का शेजारी अफेयर असणारं?
हलके घ्यालच.