मधुमेहः आयुर्वेदिक औषधोपचार

Submitted by गजानन on 11 February, 2016 - 09:11

मधुमेह आणि आयुर्वेदिक उपचार आणि त्यांचे (सु)(दु:) परिणाम यावर इथे चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे.

तुम्हापैकी कोणाला मधुमेहावर आयुर्वेदिक औषधांचा अनुभव आहे का?

मधुमेही व्यक्तींना अनेकदा आयुर्वेदिक औषधे घेऊन बघा, तुमची सगळी औषधे बंद होतील, असा सल्ला दिला जातो. त्या अमक्या अमक्याची औषधे पूर्णपणे बंद आहेत, असे ऐकून त्या संबंधित रुग्णाकडे खोलात जाऊन चौकशी केली असता त्यांना अजूनही रक्तशर्करा नियंत्रणासाठी अ‍ॅलोपथिक औषधे (गोळ्या किंवा/आणि इन्शुलीन) घ्यायला लागतात असे समजले. (आयुर्वेदात मधुमेहावर उपचार उपलब्ध नाहीत, असे इथे अजिबात म्हणायचे नाही. किंबहुना रोजच्या गोळ्या आणि इन्शुलीनमधून सुटका करून देणारी आयुर्वेदिक औषधे मिळाली तर कोणताही मधुमेही तुम्हाला आशीर्वादच देईल. पण एक-दोन उदाहरणात खोलात गेल्यावर वरीलप्रमाणे समजले, म्हणून नमूद केले इतकेच.)

मुंबई, नवी मुंबई अथवा पुण्यात चांगले आयुर्वेदिक मधुमेहतज्ज्ञ माहीत असतील तर कृपया इथे माहिती द्या.

आमच्याकडे एका मधुमेह्याकरता एका नातेवाईकांनी आस्थेने (अर्ध्या दिवसाचा प्रवास करून) एक आयुर्वेदिक औषध आणून दिले आहे. ते औषध म्हणजे कसल्यातरी झाडाच्या पातळ तासलेल्या साली/ढपल्या आहेत. त्या पाण्यात भिजत ठेवून ते पाणी प्यायचे असे त्या नातेवाईकांनी ते औषध देताना सांगितले. डॉ. सल्ल्याशिवाय असे काही अज्ञात देणे नको वाटते. त्या सालींविषयी कोणाला काही माहिती आहे का? आम्हाला त्या सालींविषयी अगदी प्राथमिक स्वरुपाची देखील माहिती मिळू शकली नाही. दुसरे म्हणजे आम्ही अ‍ॅलोपॅथिक डॉ. ना व्यवस्थित कल्पना देऊन दुसरे एक आयुर्वेदिक चूर्ण आधीच चालू केले आहे. तेंव्हा सध्या हे सालींचे औषधही आताच चालू करण्याचा विचार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुमेह विषयी आजार आणि पेशंट गेल्या काही एक वर्षात अचानक वाढले आहेत. >> कुठल्या माहितीच्या आधारे काढलाय हा निष्कर्ष ? किती राज्यात, कुठल्या शहरातला डेटा आहे ? किती वर्षांपासूनचा डेटा आहे? की फक्त अ‍ॅनेक्डोटल माहिती आहे ? अशी वाढ होण्याच्या अगोदर या राज्यात, शहरातले किती लोक नियमित तपासणी करत होते ?

{कुणी किती नाकारले तरी हेच सत्य आहे}
ठीक आहे.
तुम्ही डॉक्टर, lab, केमिस्ट यांच्याकडे अजिबात जाऊ नका.
शक्य झालं तर तुमच्या कुटुंबीयांनाही जाऊ देऊ नका.

Pages