पित्त - Acidity

Submitted by admin on 28 May, 2008 - 23:15


पित्तावरचे आयुर्वेदिक उपायः

१. रोज सकाळी उठल्यावर मोरावळा खाणे. मोरावळा नसल्यास, आवळ्याच्या रसात (सरबतात), जिर्‍याची पूड व खडीसाखर घालून घेणे.
२. उलटी थांबण्यासाठी १ ग्रम आल्याचा रस, ५ ग्रॅम खडीसाखर घालून घेणे.
३. भूक लागण्यासाठी जेवायला बसण्यापूर्वी थोडे आले मीठ लावून खाणे.

पित्तासाठी calciprite गोळ्यांचा खूप सुंदर उपयोग होतो. नाव जरी इंग्रजी असले तरी गोळ्या आयुर्वेदिक आहेत. दोन गोळ्या चावून खायच्या आणि त्यावर लगेच पाणी प्यायचे.
असे दिवसातून २ वेळा घ्यावे.

बाकी, प्रवाळ, कामदुधा, खूप त्रास होत असेल तर चंद्रकला रस हे तीक्ष्ण गुणाने पित्त वाढले तर घ्यावे.

अम्ल गुणाने पित्त वाढले तर सूतशेखर, प्रवाळ पंचामृत, शंख भस्म, शौक्तिक भस्म इ. चा उपयोग होतो.

अर्थात पथ्य पाळणे हे दोन्ही बाबतीत महत्वाचे आहे.

आयुर्वेदामध्ये सांगितलेले "पंचकर्म" हे असे दोष काढुन टाकण्यासाठी अतिशय उपयोगी आहे.

जुन्या मायबोलीवरचे पित्त (acidity) या विषयावरचे मायबोलीकरांचे हितगुज इथे पहा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिलभाई,
मला हे असे लहानपणी भरपुर व्हायचे.. बघता बघता चट्ट्यांनी अंग भरुन जायचे. मी अंगभर कोकम फासुन लालकाळी मारुती बनुन बसायचे.. Happy

mogara.ketaki
अंगावर पित्त उट्ण म्हणतात ते काय असत?
अंगावर लाल फोड्या [पुरळ आल्यासारख्या], चट्टे येणे
आणि त्यामुळे खाज येते

juyee

dineshvs यांनी दिलेला प्रतिसाद वाचा http://www.maayboli.com/node/9473

dineshvs | 27 July, 2009 - 02:04
हा बाफ़ सुरु झाल्यापासून वाचतोय. बरेच दिवस लिहायचे मनात होते, पण वेळ मिळत नव्हता. खरे तर हे थोडेसे विषयांतरच आहे,
पण अगदी विषयाला सोडूनही नाही.

कफ़, वायू आणि पित्त हे आपल्या शरिरातले त्रिदोष. आपल्या सर्वांच्या शरिरातच त्याचा वास असतो. एखादा दोष वाढला कि
त्या अनुषंगाने आपल्याला आजार, विकार होतात. या त्रिदोषांचे संतुलन साधणे महत्वाचे. ( त्रिफ़ळा चुर्णात असते हे )
पण काहि जणांच्या शरिरातच एखादा दोष अधिक असतो, आणि त्या व्यक्तीला त्या प्रकृतीची व्यक्ति म्हणतात.

आणि मी आहे पित्त प्रकृत्तीचा. ( मला जे मायबोलीकर प्रत्यक्ष जाणतात, त्यांची करमणुक नक्कीच होणार आहे हे वाचून, आणि हे त्याच दॄष्टिने वाचायचे बरं ! ),
तर या प्रकृतीची माणसे अगदी तान्हेपणीच ओळखू येतात. बाळ असणार तेजस्वी गोरं. लालस रंगाचं, पण नाजूक. जराही उष्णता सोसत नाही. अंगावरचे पांघरूणच काय, कपडेही भिरकावून देतात हि बाळं. याना कपडे घालणे म्हणजे आईची परिक्षाच. पण उघडे ठेवा, बाळ खूष. शेक शेगडी केली तर भोकाड पसरणार. लोकरीचे कपडे घातले तर अंगावर पुरळ येणार. जास्त दूध सोसणार नाही. लगेच बाहेर टाकणार. आईला जराही तिखट चमचमीत खाता येणार नाही. बाळाचे लगेच तोंड येणार. पण या बाळाना भूक आवरत नाही. आईला जराही उसंत मिळू देणार नाहीत अश्यावेळी.

पण हे सगळे कौतूकात विसरले जाते. एकंदर बाळच ते, शिवाय बालवय हा कफ़ दोषाचा काळ. थंड गुणाचा कफ़ दोष उष्ण पित्तावर नियंत्रण ठेवतो. हि बाळे क्वचितच शेंबडी असतात.
पण तरुणपणी यांचे पित्त वाढते म्हणजे खवळते. या व्यक्ती रंगाने लालस गोऱ्यापान असतात. खास करुन हातापायचे तळवे, नखं, जीभ, ओठ अगदी लाल. अंगावर तीळ, जन्मखुणा असतातच. पण यांच्या त्वचेला सुरकुत्या लवकर पडतात. केस लवकर पिकतात, गळतातही ( हेअर विव्हींग, ट्रान्सप्लांट, हेअर व्हायटलायझर, या जाहिरातींचे हे खात्रीचे वाचक ) पण केस मुलायम आणि पिंगट असतात. यांच्याशी शेकहॅंड केला तर चटका बसेल इतका नाही पण हात गरम लागणारच. आणि हे त्याला उबदार स्पर्ष म्हणणार. शिवाय तू असा थंडगार कसा, असेही विचारणार.

या व्यक्ती तेजस्वी तर दिसतातच आणि बुद्धिमानही असतात ( ?? ). त्यांचा स्वत:चा असा एक विषय असतो, आणि त्यावर त्यांचे प्रभुत्व असते. वादविवादात या, सहसा भाग घेणार नाहीत, घेतलाच तर सहजी हार मानणार नाहीत. पण खुपदा, वादात पडण्यापेक्षा, अडाणी आहेत ते, देवा त्याना क्षमा कर, असाच विचार करतात या. यांचे बोलणे ठासून असते. सहज बोलताना, भांडण्याचा अविर्भाव असतो. पण या निर्भय असतात. याना राग खूप लवकर येतो, पण लवकर शांतही होतात. यांच्या स्वभावाची एक खोच म्हणजे यांची वागणूक मार्जिनल कॉष्ट कर्व्ह सारखी असते. ( आता हे जरा अर्थशास्त्रांचा विद्यार्थ्याना जास्त लवकर समजेल. म्हणजे ज्यावेळी अ‍ॅव्हरेज व मार्जिनल दोन्ही कॉष्ट्स कमी होतात, त्यावेळी, मार्जिनल कॉष्ट जास्त वेगाने खाली येतात व वर जाताना उलटे होते, जाऊ दे सोप्या भाषेत लिहितो ) यांच्याशी पंगा घेणार्‍यमशी ते जास्तच पंगा घेणार, पण जरा यांच्याशी प्रेमाने आणि नम्रतेने वागा, अनेकपटीने ते प्रेमाची परतफ़ेड करणार.

याना भूक अजिबात सहन होत नाही. सहसा उपास करायच्या भानगडीत हे पडणार नाहीत. उपास केला तरी दाण्याचे कूट घातलेली खिचडी खाणार नाहीत. यांची पचनशक्ती उत्तम असते पण त्या मानाने कष्ट सोसत नाहीत.
यांचा आवडता ॠतू हिवाळा. पावसाळाही आवडता पण उन्हाळा नकोसा. थंड पदार्थांची आवड. तूम्ही आईसक्रीम चवीने खात बसाल तर हे लचके तोडत तोडत खातील.

मंद सुगंधी फ़ुले, हिरवा रंग आणि निसर्गदृष्यांची खुप आवड.

खरे तर असे घडण्यात त्यांचा काहि दोष नसतो, दोष असतो तो त्या पित्ताचा. पित्त म्हणजे शरिराचा शासक.
अग्नि या महाभूताचे प्राधान्य. अग्निच्या प्रभेमूळेच हे तेजस्वी दिसतात. पित्ताचा रक्ताशी संबंध असल्याने,
यांचा वर्ण लालस. याच अग्निमूळे यांच्या शरिराचे तपमान गरम असते, पण त्यानेच अन्नाचे पचनही सुलभ
होते.
पित्ताचे प्रमुख कार्य रुपांतर. त्यामुळे अन्नपचन आणि पेशींच्या अंतर्गत घडणाऱ्या प्रक्रिया, पित्ताच्या प्रभावाखाली
होतात. म्हणुन धारणाशक्ती आणि बुद्धी याना वश. धैर्य आणि शौर्य देखील अंगात भरपूर. यांच्या डोळ्यात
रुपग्रहण करण्याची ताकद जास्त. इतराना न दिसणारे सौंदर्य याना सहज दिसते.

पण यांचे लहान आतडे दुबळे असते. उलट्या, जुलाब होण्याची प्रवृत्ती जास्त असते. घाम खूप आल्याने
कधीकधी अंगाला दुर्गंधी येते. रक्तदाबाचा विकार सहसा असतोच. त्वचेवर पुटकुळ्या, चट्टॆ जास्त असतात.
डोकेदुखी पाचवीलाच पूजलेली. जरा खाण्यात इकडे तिकडे झाले कि अ‍ॅसिडीटि ठरलेली.

पण एकंदरीत शरिरात जिथे द्रव्य अकार्यक्षम अश्या मूळरूपातून कार्यक्षम द्रव्यात रुपांतरीत होतात,
तिथे पित्ताचा प्रभाव असतोच. पण आधुनिक शास्त्राप्रमाणे पित्त म्हणजे अमुकतमुक द्रव्य असे सांगता
येत नाही.

आता आपण या बाफ़च्या विषयाकडॆ वळू.
तिखट, खारट आणि आंबट रसात अग्निचे प्राधान्य असते त्यामुळे हे रस अगदी बालवयापासून
टाळायला हवेत. या बाळाना आवर्जून गोड खायला द्यावे. आंबट दही, आबवलेले पदार्थ टाळावेत.
कडू तूरट प्रमाणात खावेत ( जास्त खाल्ले तर वात बिघडतो ) वरुन मिठ घेणे टालावे. पापड, लोणची, चिप्स नकोच.
डाळींब, द्राक्ष, मोसंबी उत्तम. मनुका, बेदाणे, खोबरे, खारिक अवश्य खावे. यांच्यासाठी सर्वात
श्रेष्ठ साजुक तूप ( इथे तूप म्हणजे दहि विरजून, घुसळून लोणी काढून कढवलेले तूप अपेक्षित आहे )
शतावरी, अनंतमुळ असलेली औषधे वा यांची चुर्णे घ्यावीत. आवळा आहारात असावा. गुलकंद, मोरावळा
मध खाण्यात असावेत. दुपारी २ ते ५ हा पित्त वाढण्याचा काळ. या काळापुर्वी जेवणे आवश्यक आहे.
तसेच या कालावधीत अजिबात तिखट खाऊ नये. सौम्य चवीचे, गोड काहितरी खावे.
मे व ऑक्टोबर यांचे घातमास असतात. या दिवसात वाळ्याचे पाणी प्यावे.
वाढलेले पित्त शरिराबाहेर काढण्यासाठी यानी, विरेचन करावे. त्यासाठी काळ्या मनुका, बहावा मगज
अशी सौम्य विरेचक घ्यावीत. पण आदल्या रात्री भरपुर तूप घातलेली, मुगाची खिचडी खावी, त्याने
पित्त आतड्यात जमा होते.
पित्त म्हणजे सर्वच कसे वेगात. हि बाळे लवकर कुशीवर वळतात, लवकर रांगतात, तसेच याचमूळे
यांचे केस लवकर पिकतात, गळतात.

( या सर्वाला गुरुवर्य डॉ. शरदिनी डहाणुकर यांच्याशी झालेल्या चर्चेचा व त्यानी लिहिलेल्या लेखांचा
आधार आहे. )

शरिरावर येणारे लाल चट्टे यावर काहि उपाय आहे का ?
नोन व्हेज आणि बेसनच्या पदार्थाने पित्त होते का ?
पित्त आल्यावर दोन वर्षाच्या मुलासाठि काहि उपाय ?

जुई घरात सतत एक कॅलामाईन ची बाटली ठेव. (गुलाबी रंगाचे औषध हे लॅक्टोकॅलामाईन मेकप साठी पण वापरतात.) मुलाला पित्त किंवा रॅश उठले की लगेच लाव. डॉ. ना विचारून सेट्रिझिन सिरप पण देउ शकतेस. लाल चट्ट्यांवर घरगुती उपाय म्हणजे कोकमाचे पाणी लावणे.

हो नॉन वेज आणि बेसनाचेपदार्थ खाल्याने असे होते.

माझ्या घरी कॅलेमाइनची बाटली आहे, डॅक्टराचे उपायपण चालू आहे तरीही कमी नाही,
तेवढयापुरती कमी होते पण परत तेच,
त्याला सर्दिचा त्रास आहे, मला एकीने सांगितले की आवळ्याचा रस दे,मी दिला पण तो पाण्यात मिसळुन नाही दिला आणि सर्दि झाली.

घरी बनवले असेल तर उत्तम... म्हणजे दूध मंद आचेवर तापवून, विरजण घालून, दही घुसळून, लोणी मंद आचेवर तापवून केलेले...
विकतचे पण चालेल, मला माहीत असलेले त्यातल्या त्यात चांगले म्हणजे गोविंद, गोवर्धन इ.

हल्ली अभ्यासासाठी रोज रात्री जागरण होतंय १२-१२.३० पर्यंत. सकाळी उठल्यावर पित्तासारखं होतं. कडवट पाणी पडतं उलटी होऊन. चहा पण पिता येत नाही Sad
काही उपाय आहे का??

यो,
जमत असेल तर सकाळी उठून अभ्यास कर... रात्रीचे जागरण टाळणे हेच उत्तम...
चहा [थोडे दिवस तरी] बंद कर...

पित्तासाठी:
१. रात्रीचे जेवण हलके नी लवकर घ्या
२. काळया मनुका खा
३. खजूर पण चांगले असतात
४. रात्री झोपताना थंड दूध घ्यावे

तो पदार्थ खाल्ला की काहीतरी दुष्परिणाम दिसून येतील...
माझ्या जुन्या बॉस ला, बेसन, चणे डाळ इ. अ‍ॅलर्जी होती... तो मग असे पदार्थ खात नसे...

माझा स्वतःचा असा अनुभव आहे की रोजच्या १५-२० मि. च्या प्राणायामाने [भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम्-विलोम, ॐ कार ] पित्त कमी होते...

त्याला आता पित्त आले आहे , डॉक्टरांनी सांगितले नॉन व्हेज आणि अंड खायला नाही सांगितले आहे.
पण प्रोब्लेम असा आहे की एकतर त्याचे खाण्याचे नखरे असतात, आणि आता कुठे तो अंड आणि नॉन व्हेज खायला लागला आहे. अंड्याच आम्लेट तर तो आवडीने खातो. बंद करायला आता जमेल की नाही माहीत नाही

मला पित्ताचा खुप त्रास होतो मला बरेच वेळा जळजळ होते डोक खुप दु़खते काहि सुचत नाहि उलटी काढली तर ती झाली तर बरे वाटते नहितर आणिक डोक ठणकत आणि जबरदस्ती उलटी काढली तर पोटात खुप दुखते मला कडु पित्त आहे मला उपाय सुचवा

मला डोके दुखीचा त्रास आहे बरेच वेळा पित्ताने दुखते मि बाम वापरुन बघितले पण काही फरक पडत नाहि फक्त disprin ची गोळीनेच रहाते मि नेहमी डोकेदुखीसाठी disprin वापरते माझ्या जवळ disprin नेहमी असते पण मला बरेच जण सांगतात कि गोळ्या घेउ नकोस मला डोकेदुखीसाठी उपाय सांगा तसेच
disprin घेतल्यास काहि अपाय होतो का?

कुपया मला उपाय सांगा पित्ताने आणि डोकेदुखीने त्रास दिलाय

हसरी, माझे पण symptoms सेम तुझ्यासारखेच....डोकं दुखतं, उलटी झाल्यावर बरं वाटतं, disprin ने बरं वाटतं, etc....
डोकं कशाने दुखायला सुरुवात होते ते शोधुन काढ. माझं सकाळचा नाश्ता मिस केला तर आणि उन्हात फिरलं की दुखतंच दुखतं..ते मी टाळते. आणि disprin अजिबात घेउ नको, त्यात aspirin असतं जे blood thinner आहे (पाळी जवळ आली असताना तर अजिबात नको...मला प्रचंड त्रास झालाय एकदा..तेव्हापासून नाही घेत मी.) त्यापेक्षा saridon ट्राय करुन बघ. अर्थात डोकेदुखी trigger करणार्‍या गोश्टी टाळल्या तर माझं दुखत नाही. क्वचितच वर्षातून १-२ वेळा दुखतं..त्यामुळे गोळी घेते...फार वरचेवर दुखत असेल तर सारखी गोळी घेणं चांगलं नाहीच. त्यापेक्षा डोकं दुखणार नाही याची काळजी घे. ह्याच बीबीवरची आधीची चर्चा वाच.

फार वरचेवर दुखत असेल तर सारखी गोळी घेणं चांगलं नाहीच. त्यापेक्षा डोकं दुखणार नाही याची काळजी घे. <<
लाखो मोदक.
गोळ्यांची सवय लागणे चांगले नव्हे.

मलाही सेम असेच होते दुपारच्या उन्हात फिरले तर. अगदी एसी गाडीतुन फिरले तरीही त्रास होतोच होतो. गोळी कधीमधी घेते, पण फायदा होत नाही. अशा वेळी सरळ अर्धातास डुलकी काढते. एकदोनदा ऑफिसातही डुलकी काढली Happy नाहीतरी डोके दुखत असल्यामुळे काम होतच नव्हते काही.

उन्हात जायचे असेल तर मी कायम छत्री घेऊन जाते आणि उन्हात गाडीतुन प्रवास करायचा झाला तरी एक मऊ कॉटन ओढणीने डोके आणि डोळे सोडुन तोंड झाकुन ठेवते. त्यामुळे त्रास कमी होतो.

झोपताना डोळ्यावर गार दुधाच्या किंवा गुलाबपाण्याच्या घड्या ठेवल्या तर एकूणच उष्णतेने तळावल्यासारखे होते ते कमी वाटते.

या वर्षीचा शतायुषीचा दिवाळी अंक पचनसंस्थेच्या विकारासंबंधी आहे. मी घेतलाय पण वाचला नाही अद्याप. त्यात कदाचित अ‍ॅसिडीटीची माहिती असेल. मुमुक्षुनी पहावा.... Proud

मला बहुतेक पित्तामुळे आणि उन्हामुळे हा त्रास होतो मि saridon घेउन बघीतले पण कोणत्याच गोळीने त्रास कमी होत नाहि दुसरा काही उपाय असल्यास सांगा

हसरी,
वरवार वेदना शामक गोळ्या घेण हे अजिबातच चान्गल नाही.
वेदनाशामक गोळ्या ह्या स्वभावतह्च पित्त वाढवणार्या आसतात.
याने पुढे जाऊन अल्सर चा त्रास होउ शकतो.
तुझ्यासाठी आत्ता तरी मला 'सुवर्ण सूतशेखर रस' हे योग्य वाततय. उलट्या मुद्दम कधण यामुळे आमशयातील्(जठर)पित्त वर खेचून काढण्याचा प्रयत्न होतो व अत्यन्त कडू पित्त रस बाहेर येतो हे करणे ही चान्गले नाही.
या त्रासा करता पन्चकर्म चिकित्सा (शोधन) खूप उपयोगी होइल. याने हा वर्चेवर होणार त्रास खूपच कमी करता येइल गोळ्यान्शिवाय.मी स्वतह वैद्य आहे.मत्र मी सध्या भारतात नाही. माझा तुला असा सल्ला असेल,की यासाठी तू आयुर्वेदिक तज्ञाच्या देखरेखीत पन्चकर्म करून घ्यावेस.
तुला हवे असल्यास तज्ञ वैद्यान्च नाव मी सुचवू शकेन.
तोषवी.

हो हो पंचकर्माबद्दल मी ही नुकतीच सगळी माहीती गोळा केलीये.
तोष्णवी, मला एक शंका आहे. पंचकर्मात बर्‍याच संस्कारांचा अंतर्भाव असतो जसं स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन इ. यापैकी मोजकीच करून घेऊ शकतो का? कारण मला वमनाची भिती वाटते. मला ही लहानपणापासून पित्त आणि उलट्यांचा प्रचंड त्रास होता, आता कमी आहे पण उलटी करायची कल्पना केली तरी नको वाटतं. Sad त्यामुळे वमन टाळून पंचकर्माचे इतर संस्कार करून घेतले तर चालतं का?

दक्षिणा,
पन्चकर्म करायचे म्हणजे प्रत्येकाला पाचही कर्म करण्याची अवशकता आहे अस नाही.खर म्हणजे पन्चकर्म कोणत्या आजारात्/कोणत्या अवथस्थेत्/दोशान्च्या कोणत्या स्थीतीत करावे याचे काही नइयम आयुर्वेदाने सान्गीतलेले आहेत.त्यानुसार ज्यात गरज आहे त्यातच ते करयचे आहेत्.पन्चकर्मातील कउथलेही कर्म करण्या आगोदर पुर्वकर्म (स्नेहन आणि स्वेदन ) करायचे असते त्याने दोशान्चे सहज गत्या शओधन होण्यात मदत होते.दोषान्च्या गती नुसार पुर्वकर्मानन्तर वैद्य नाडी आणि पोट तपासून कोणत्या प्रकार्चे शोधन द्यायचे ते ठरवतात. आणि या आगोदर केलेल्या पुर्वकर्मा मुळे वमन/ विरेचन अगदी सहज गत्या होते.आजारात लक्षण म्हणून जशा उलट्या आणि जुलाब होतात तसे कष्ट शोधन करताना जानवत नाहीत्.कारण त्यात उदरात आलेल्या दोषाना योग्य गती देऊन फक्त बाहेर काढायचे असते.
मात्र हे कुठलेही कर्म /किवा कुठलीही औषध हे तज्ञ वैद्या च्या मर्गदर्शनाखालीच घ्यावे.
तोषवी.

Pages