Submitted by सुप्रिया जाधव. on 8 May, 2019 - 01:54
मत्सराने पेटते अन् राख होते... जाण मी !
फक्त ह्यासाठीच ठरते दुर्गुणांची खाण मी ?
एवढ्यासाठीच केवळ ताणतो आहेस ना ?
लावला ना अजुन प्रत्यंचेस माझा बाण मी
मोडतो आहेस जी कैफात ती आठव जरा
घेतली होतीस जी शुध्दीमधे ती आण मी !
पानगळ पाहून माझी हिणवतो आहेस का ?
फुलवण्यामध्ये तुला कुर्बान केले न्हाण मी
निखळले कोठे स्वतः, भिरकावतो आहेस तू
विश्व होते भोवती केले तुझ्या निर्माण मी
वल्गनांची फौज आलेली मला नमवायला
परतली जाणून हे... त्यांच्याहुनी वरताण मी
गुंतला श्वासांत त्याच्या... हो म्हणूनच थांबले
त्यागला असता कधीचा अन्यथा हा प्राण मी
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह! खुप सुरेख! आवडली अगदी.
वाह! खुप सुरेख!
आवडली अगदी.
मनापासून आभार शाली
मनापासून आभार शाली
प्रत्यंचेस?
प्रत्यंचेस?
मी प्रत्यंचेस असच वाचले.
मी नकळत प्रत्यंचेस असच वाचले.
आभार ! टायपोबद्दल क्षमस्व !
आभार !
टायपोबद्दल क्षमस्व !
घेतली होतीस जी शुध्दीमधे ती
घेतली होतीस जी शुध्दीमधे ती आण मी !
वाह बहुत खूब
Bhari
Bhari
निव्वळ अप्रतिम !! _/\_
निव्वळ अप्रतिम !! _/\_
वल्गनांची फौज आलेली मला नमवायला
परतली जाणून हे... त्यांच्याहुनी वरताण मी>> जे बात !!
गुंतला श्वासांत त्याच्या... हो म्हणूनच थांबले
त्यागला असता कधीचा अन्यथा हा प्राण मी>> खूपच मस्त
मोडतो आहेस जी कैफात ती आठव जरा
घेतली होतीस जी शुध्दीमधे ती आण मी ! >> हे विशेष आवडले
कोणते कोणते आवडले म्हणून सांगू ? सग्गळेच एकसे एक आहेत !!
प्रतिक, किल्ली, अंजली
प्रतिक, किल्ली, अंजली मनापासून धन्यवाद !
सुर्रेखच...
सुर्रेखच...
मस्त. आवडली.
मस्त. आवडली.
गुंतला श्वासात त्याच्या..
गुंतला श्वासात त्याच्या.. अहाहा, मस्तच
सगळेच शेर मस्त !!!
सगळेच शेर मस्त !!!
आवडली अगदी गझल
मोडतो आहेस जी कैफात ती आठव
मोडतो आहेस जी कैफात ती आठव जरा
घेतली होतीस जी शुध्दीमधे ती आण मी !>>>> वाह ! मस्तच.
वाह मस्तच.
वाह मस्तच.
या गझलेत वापरलेले शब्द खणखणीत वाजणारे आहेत. एक नाद आहे. आणि हे शब्द ताणलेल्या धनुष्याची जी उपमा वापरली आहे शीर्षकात त्याला पूरक आहेत. आवडले
सगळ्यांचे मनापासून आभार
सगळ्यांचे मनापासून आभार
माझ्या मते प्रत्यंचेस ऐवजी
माझ्या मते प्रत्यंचेस ऐवजी प्रत्यंचास असे हवे
गजल छानच आहे.
जियो !
जियो !
खूप छान
खूप छान