"ती चा "सच्चीतानन्द

Submitted by kalyanib on 3 May, 2019 - 04:20

नमस्कार मी कल्याणी, खूप दिवसांनंन्तर लिहायचा प्रयत्न करतेय. हि कथा आहे एका साध्वी ची आधी उत्तरार्ध मग पूर्वाध असेल. सूचना असेल तर जरूर कळवा. काही त्रुटी असू शकतात त्या माफ कराव्या .

"ती चा "सच्चीतानन्द

ती आज सुद्धा आपल्याच विचारात दत्त नामाचा नामजप करत चालत होती. मनामध्ये आनंद व्यापून उरला होता. संसार, घर, मुलबाळ, ह्या गोष्टी तिने कधीच मागे टाकल्या होत्या. आता एकच उद्देश होता-जीवनाचे सोने करण्याचा. वैराग्य येणं हे सोपे काम नाही. स्वतः वर पण मात करावी लागते. आणि बायकांचे पुरुषानं सारखे नसते. या जगात चांगली तसेच वाईट माणसे आहेतच ना. विचार करता करता ती आपल्या गुहे जवळ आली, हि गुहा तिच्या गुरूंची होती येथे तिला ना कसला त्रास होता ना कसली भीती. अखंड नामस्मरणात आणि ध्यानात तिचा दिवस कसा जात असे हे तिला कळत न्हवते. ती आता या दुनियेत होतीच कुठे? ध्यान करावे, फुले- फळे आणून आधी मानस पूजा करून ती नैवेद्य दाखवी आणि मग तो ग्रहण करीत असे. तिला कोणाच्या सोबतीची ना गरज होती ना आवश्यकता. तिचे गुरु अवधूतानंद खूपच करुणामयी आणि उच्च दर्जाचे साधू /योगी होते. तिच्या परम भाग्याने तिला त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. ध्यानाला बसणे आधी फार कठीण वाटत असे पण जसे जसे दिवस जात होते तसे तसे तिचे ध्यान अधिक चांगल्या पद्धतीने होत होते. गुरुकृपा झाल्या शिवाय हे शक्य नाही हे तिला माहिती होते. अध्यात्मात जी उच्च स्थिती असे आपण ऐकतो त्याची तिला हळू हळू कल्पना येऊ लागली होती.
या जगात किती तरी अशा गोष्टी आहेत ज्या सामान्य माणसाला दिसू शकत नाही आणि त्यांच्या समजण्याच्या पलीकडे असतात. हिमालयातील तिच्या गुहेमध्ये बसून तिचे ध्यान सुरु होते. आधी "मी " ला जाळावं लागतं तेंव्हा कुठे काही तरी आपल्याला सापडलाय असे वाटू लागते. हे "मी " जाळणे म्हणजे येरा गबाळ्याचे काम न्हाई, पण देवाला मिळवायचे म्हटले म्हणजे वाट बिकट असणारच ना हो. तुम्ही पोथी पुराणं वाचून तसे आचरण केले तर अर्थ ना नाही तर उगीच पोपटपंची काय कामाची? पण एकदा का तुमची योग्य वेळ आली कि मात्र तुमचे काम संपले सगळे सोपवून द्यायचे त्यांच्या वर म्हणजे आपण मोकळे, काही भार नको. ते समर्थ असतात हो.. आईला आपल्या मुलांना कसे सांभाळावे हे सांगावे लागत नाही. लहान मूल होता यायला हवे पण... गुरु अवधूतानंद उद्या दर्शन द्यायला येणार हे तिला आज ध्यानात दिसले होते. त्या गोष्टी मुळेच ती सकाळ पासून भावुक होऊन रडत काय होती, हसत काय होती सगळ्या मिश्र भावना होत्या पण आनंद होता तो शब्दात सांगू शकत नाही. आता वाट फक्त उद्याची होती....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lavkarach pudhcha bhag taka ani kathechya navat bhag kramank taklat tar changal hoil....