बटरफ्लाय!

Submitted by अज्ञातवासी on 3 May, 2019 - 04:16

"ये बस."
"नाही ना."
"का नाही,"
"मूड नाही."
"अरे बस रे, काय घेशील?"
"ब्लॅक डॉग!"
"शेकन, नॉट स्टीर्ड?"
"येस."
"ते मार्टिनीसाठी असतं. तू ना, जास्त जेम्स बॉण्ड च्या मुविज बघत जाऊ नकोस."
"हम्म."
"परवा हाय वे वर अपघात झाला, भयानक होता तो."
"हम्म."
"त्या बाईकचा चकनाचूर झाला."
"तुला बोलायला हाच विषय मिळालाय का?"
"अरे रागवतोस काय, हे घे!"
....
"बोलणार आहे की नाही, की जाऊ मी."
"काय बोलावं तेच कळत नाही."
"अच्छा ऐक ना, बेडरूमची काच बसवलीस का तू?"
"हो परवाच."
"ओके... छान बसली ना?"
"तू असं का विचारतेय?"
"कारण अपघात झाला त्याच्या बाजूलाच आपण राहतो ना, म्हणून."
"काय... काय... संबंध... मला काय होतंय...."
"शांत झोप, कायमचा..."
"तू... तू..."
"तुझं आणि तुझ्या वाईफचं भांडण झालं, त्यात तू ब्लॅक डॉगची बॉटल काचेवर फेकून मारलीस. काच फुटली. तू नवीन ऑर्डर केलीस. दुसऱ्या दिवशी ते काच घेऊन आले, आणि हायवेवर थोड्यावेळ ठेवली. काचेवरचा सूर्यप्रकाश परावर्तित झाला, आणि त्या मुलाच्या डोळ्यावर पडला. त्याला समोरचं काहीच दिसलं नाही, आणि तो ट्रेलरला धडकला आणि मेला. हे सगळं तुझ्यामुळे घडलं. ही इज माय ट्रू लव."
"देवा, मूर्ख मुली, सायको."
त्याने धडपड केली, आणि थोड्यावेळात शांत झाला.
"आय लव पोईजन!"
तिने व्हिस्कीची दुसरी बॉटल फोडली. एका ग्लासात ओतली, आणि आस्वाद घेऊ लागली.
थोड्यावेळाने...
"मला काय होतंय? शीट... ही अल्वेज टोल्ड मी, एखाद्या दिवशी व्हिस्कीत विष घालून मी बायकोला मारणार आहे, बास्टर्ड!!!"
ती खाली कोसळली, कोसळताना रागात तिने व्हिस्कीची बॉटल समोरच्या काचेवर फेकून मारली.
-------
"हॅलो, नॅशनल ग्लास हाऊस?"
"बोला?"
"एक आठ बाय आठ ची १० एमएम ची काच मागवायचिये."
"कुठे, पत्ता द्या?"
"SHATTERED GLASS HOUSE, NEAR HIGH WAY....."

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इट्स Alcoholic Beverages मन्या!
नुसती दारू म्हणून अपमान करू नकोस! (मी घेत नसलो तरी)
Wink

ते जाऊ देत पण imagination मस्तै तुझं.
काच मागवली >काचेच reflection>बाईकचा अपघात>बाईकवाला बायकोचा boyfriend!

शेवटची काच शेजार्यानी मागवली का? चांगले शेजारी मिळाले हो ☺️
मला 2 वेळा वाचून कळली गोष्ट.अश्या गोष्टी वाचायला मजा येते.कल्पनाशक्ती वापरता येते.

छानेय गोष्ट. नक्की कोण कोणेय हे समजायला मलादेखील दोनदा वाचावी लागली होती...

आणि खाली मन्या, अनुचे प्रतिसाद वाचून परत तिसऱ्यांदा वाचली आणि मी लावलेला अर्थ वेगळाच आहे हे लक्षात आले Lol Lol

सुरवातीचे संवाद शेजारची मुलगी आणि नवरा यांच्यात झालेत. शेवटी काच मागवणारी बायको आहे.
===

> १. "बोलणार आहे की नाही, की जाऊ मी."
२. "काय बोलावं तेच कळत नाही."
३. "अच्छा ऐक ना, बेडरूमची काच बसवलीस का तू?"
४. "हो परवाच."> इथे थोडी गडबड झालीय का? २ आणि ३ ही वाक्यं एकाच व्यक्तीने म्हणली पाहिजेत असं वाटतंय.

काय हे, इथे नवऱ्याचे मयत झाले आणि तिथे लगेच बाईला काच दुरुस्त करायची घाई.
आणि बायको घरी नसताना नवऱ्याने तिच्या ग्लासात विष घातले, जे पिऊन शेजारची मुलगी मेली?
आता मला एकदमच मठ्ठत्व आलं आहे.

हो, सहमत.. मीही 2-3 वेळा वाचली आणि नंतर ट्यूब पेटली.. अजून कोणी अर्थ सांगितला तर तो मला समजलेल्या अर्थपेक्षा वेगळा निघू शकतो हेही खरंय Lol

अनु,

तू काय, कसा अर्थ लावलाय सांग.
मी माझ्या मते घटनांची क्रोनोलॉजी सांगते..

१. नवरा-बायकोचे भांडण झाले. त्यात त्यांच्या घराची काच फुटली.
२. काच मागवली. ती काही काळ घराबाहेर राहिली होती तेव्हा अपघात होऊन एक मुलगा मेला.
३. तो मुलगा शेजारच्या मुलीचा बॉयफ्रेंड होता. बदला घ्यायचा म्हणून तिने शेजारच्या नवर्याला घरी बोलवून विष घातलेली दारू पिऊ घालून मारले.
४. तो नवरा एक वेगळी दारूची बाटली घेऊन घरी चालला होता. ती बाटली फोडून शेजारणीने दारू पिली.
पण त्यातदेखील विष होतं कारण भांडणानंतर बायकोला मारायचा प्लॅन नवर्याने केलेला.

५. शेवटचा काच मागवण्याचा फोन काही दिवसानी केलेला असू शकतो...

ओह असं होय ☺️☺️ कळलं कळलं.
(आता या काचेमुळे दुसऱ्या बाजूच्या शेजाऱ्याची बायको रस्त्यावर मेली, त्याने या काचमागवू बायकोला सरबत प्यायला घरी बोलावलं आणि कटवलं तर? ☺️)

> आता या काचेमुळे दुसऱ्या बाजूच्या शेजाऱ्याची बायको रस्त्यावर मेली, त्याने या काचमागवू बायकोला सरबत प्यायला घरी बोलावलं आणि कटवलं तर? > हा हा Lol चांगली कल्पना आहे.

नवी कोरी काच हायवे च्या बाजूला धूळ लागेल, फुटेल अशी ठेवणारा कंत्राटदार किती हलगर्जी असेल?
आमच्या सोसायटीत त्या काचेला एक धुळीचा अणू चिकटलेला दिसला असतं तरी रिजेक्ट केली असती डिलिव्हरी

आईशपथ.गोंधळ उडालाय माझा.

मला समजलेली कथा अशी

नवरा-बायकोचं भांडण>नवरा दारुची बाटली खिडकीवर फोडुतो>नवरा खिडकीची नवी काच मागवतो>reflection>biker चा Accident>biker बायकोचा boyfriend>बायको नवर्याला मारते>नवर्याने आधीच whiskyत विष mix केल>बायको मरते>शेजारचे पुन्हा नवी काच मागवतात.

अशी माझ्याशिवाय कुणी वाचलीय. Uhoh

मन्या आणि रत्न,

बायको स्वतःच्या नवर्याला > "तुझं आणि तुझ्या वाईफचं भांडण झालं, त्यात तू ब्लॅक डॉगची बॉटल काचेवर फेकून मारलीस. > असं का म्हणेल?

नाही नाही अवा,
अजून थोड्या गेस येउदेत मग सांगा तुमचा अर्थ.

मस्त कथा
कथेचे नाव बटरफ्लाय इफेक्ट वरून ठेवलेले आहे
मला लागलेला कथेचा अर्थ असा -
भांडण> काच फुटणे> अपघात> biker नवर्या च ज्या बाई बरोबर अफेयर आहे त्या बाईचा true love (म्हणूनच ती ही इज माय true love म्हणते)> मग ती बदला घ्यायचा प्रयत्न करते आणि स्वतः ही मरते
पण हा अर्थ घेतला तर काही प्रश्नांची उत्तरे नाही मिळत-
1. घराचे नाव shattered glass house असे का?
2. शेवटी काच कोणी ऑर्डर केली?
तसं तर या प्रश्नाचं उत्तर मिळतं... बायको...पण मग शेवटचा सस्पेन्स नाही क्लिअर होत...
3. कथेमध्ये supernatural elements आहेत का?

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!
@ मन्या - तू बरोबर चालली होतीस, पण बायकोला किलर बनवून फसलीस.
"तुझं आणि तुझ्या वाईफचं भांडण झालं, हे वाक्य नीट वाचलं नाहीस वाटतं!

@सस्मित - खूप खूप धन्यवाद!

@mi_anu - नाय हो, शेजारी साधं पाणी विचारत नाही.

नवी कोरी काच हायवे च्या बाजूला धूळ लागेल, फुटेल अशी ठेवणारा कंत्राटदार किती हलगर्जी असेल?
आमच्या सोसायटीत त्या काचेला एक धुळीचा अणू चिकटलेला दिसला असतं तरी रिजेक्ट केली असती डिलिव्हरी
>>>>>>
Rofl

@ॲमी - तुही सांगितलेली शक्यता बरोबर आहे, अशाही अँगलने जाऊ शकते, पण माझा हा प्लॉट नव्हता.
आणि वाक्याचा सिक्वेन्स बरोबर आहे, तू सांगितलंस म्हणून मी पुन्हा पुन्हा चेक केलं, पण बरोबरच निघालं Happy

@रत्न - आप और मन्या एकही लॉजिक की कष्टी मे सवार है!

@अंजली १२ - बटरफ्लाय इफेक्ट्स नावाची एक संकल्पना आहे, छोट्या गोष्टीचा साखलीद्वारे होणारा मोठा परिणाम. कथा नीट समजावी म्हणून विकिपीडियाची लिंक दिलीये, एकदा जरूर बघा. इट्स रियली इंटरेस्टिंग.

@ L lawliet - चला पुढच्या प्रतिसादात उत्तरे बघूयात.

Pages