कथाकारी व बेफिकिरी (२) चे प्रकाशन - सस्नेह निमंत्रण

Submitted by बेफ़िकीर on 30 April, 2019 - 00:12

नमस्कार मायबोलीकर हो,

मायबोलीवर लेखन करायला लागल्यापासून दिलदार मनाच्या सदस्यांनी मला जो उदंड रसिकाश्रय दिला त्यातून मिळालेल्या स्फुर्तीतून माझ्या निवडक कथा व निवडक गझलांचा असे दोन संग्रह लवकरच प्रकाशित होत आहेत.

कथाकारी - यात मायबोलीवरच लिहिलेल्या काही काल्पनिक तर काही सत्य घटनांशी निगडीत अशा कथा असून मायबोलीकरांनी त्या आवडल्याची पावती दिल्यामुळेच त्या घेतलेल्या आहेत.

बेफिकिरी (२) - तब्बल दहा वर्षांनी प्रकाशित होत असलेला हा माझा दुसरा गझलसंग्रह! यात गझल परिचय या मायबोलीकरांनी गौरवलेल्या लेखाचे विस्तृतीकरण करून व अनेक बदल करून तो लेख समाविष्ट करण्यात आलेला आहे. तो लेख नवोदित गझलकारांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असा आहे. प्रकाशन समारंभ पार पडल्यानंतर मायबोलीवरील मूळ लेख मी संपादीत करून नवा लेख पोस्ट करेनच! तसेच या संग्रहात निवडक गझलाही आहेत.

अक्षय्यतृतीयेच्या मुहुर्तावर, मंगळवार दिनांक ७ मे रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) येथे सायंकाळी पाच ते आठ या वेळात हा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. तपशीलवार पत्रिका सोबत जोडत आहेच.

उदार मायबोलीकरांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी नम्र विनंती आहे.

लेखनक्षेत्रात मी जो काही आहे तो मायबोलीमुळेच आहे व त्याची नम्र जाणीव ठेवून मी कथाकारी या संग्रहाचे मनोगत पूर्णपणे मायबोलीलाच समर्पित केलेले आहे. तेही येथे देत आहे.
=====

कथाकारी या पुस्तकाचे मनोगतः

मायबोली.कॉम या आंतरजालीय संकेतस्थळावर मी लिहायला
लागल्यापासून तेथील वाचकांनी
मला आजवर, गेल्या दहा वर्षांत
उदंड रसिकाश्रय दिला. इतका
रसिकाश्रय मिळाला की
माझ्यातील लेखक जणू याच
स्थळामुळे निर्माण झाला असे
म्हणता येईल. या स्थळाचे
सर्वेसर्वा श्री अजय
गल्लेवाले व प्रशासक समीर
सरवटे यांचे मी मनापासून आभार
मानतो.

या स्थळावर मी कथा,
कादंबर्‍या, ललित, सामाजिक
लेख, गझल, कविता, विनोदी लेखन
अशा अनेक प्रकारचे लेखन केले व
हे लेखन करताना, इतरांचे लेखन
वाचताना, प्रतिक्रिया
वाचताना मला माझ्या लेखनातील
वैगुण्ये, कमतरता, चांगल्या
बाबी यांची अधिक जाण आली.

यातील बहुतेक सर्व
कादंबर्‍या व कथा अलीकडच्या
काळात अचानक व्हॉट्स अ‍ॅप
समुहांवर व्हायरल झाल्या आणि
मला महाराष्ट्रातून तसेच
परदेशातूनही चाहत्यांचे
संदेश येऊ लागले. मायबोलीवर
असलेले हे लेखन अशा प्रकारे
व्हायरल होण्याचे मला एकीकडे
वाईट वाटले तर दुसरीकडे
अंगावर मूठभर मांसही चढले.
अलीकडच्या काळात मी निवडलेली
जी वाट आहे तिने मला मायबोलीवर
लेखन करण्याइतका पुरेसा वेळ
दिला नाही. मात्र माझ्या
गेल्या दहा वर्षांच्या लेखन
कारकीर्दीला या संकेतस्थळाचा
एक भरभक्कम आधार लाभलेला आहे व
मी त्या स्थळाचा आजन्म ऋणी
राहीन. मायबोलीमुळे निर्माण
झालेल्या मोठ्या चाहत्या
वर्गाचा व मायबोलीबाहेरील
चाहत्यांचाही मी आजन्म ऋणी
राहीन.

त्याच स्थळावरील काही निवडक
कथांचा एक संग्रह असावा या
उद्देशाने हा कथासंग्रह
आपल्या हाती सोपवत आहे.

आशा आहे की आपल्याला या कथा
आवडतील व वेगळ्या वाटतील.

आपला अभिप्राय अवश्य
कळवावात.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Kathakari pic.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. अभिनंदन.

तरीच , राजकारणी धाग्यानवर आपली आजकाल उपस्थिती नसते,

मन:पूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !
ड्रेसकोडचे प्रयोजन कळले नाही, यायची इच्छा असणाऱ्या लोकांना ड्रेसकोड मुळे येणे अवघड होऊ शकते .

वाह!
हार्दिक अभिनंदन आणि खुप शुभेच्छा!
पुण्यात असल्याने नक्की हजेरी लावेन.

पुस्तक प्रकाशनाबद्दल खूप अभिनंदन, बेफ़िकीर
आणि सोहळ्यासाठी शुभेच्छा
सोहळ्याला येता येणार नाही, पण निमंत्रणासाठी धन्यवाद.

Pages