इलेक्शन रॅप..

Submitted by अजय चव्हाण on 26 April, 2019 - 04:53

उंबराच्या बाजूला वडाचा पार...
कुणाच्या बुडाखाली किती अंधार..
खुर्चीला एका उमेदवार चार..
कुणाला धुळ नि कुणाला हार..
जमतोय रोज चेल्यांचा बाजार..
नेत्यांचा आपल्या करतोय प्रसार..
मिरवले झेंडे नि केला प्रचार..
तु बसला उन्हांत साहेब एसीत गार.

किती बाटले किती फुटणार..
पैसे वाटले कि किती सुटणार...
तंटे सोशलवर, फटके बोच्यावर..
पडला नभातून आला खजूरवर..
बापावर तो गेला हा गेला आईवर..
लक्षात आलं कपडे फाटल्यावर..
ज्यासाठी भांडलो सोडलं वार्यावर..

एक क्वाटर , एका कोंबडीवर
इमानदारी चुलीत,मत पैश्यावर..
फटाके, गुलाल साहेब आल्यावर..
कसली देशभक्ती?? विकास खुंटीवर...
साहेबांचा बंगला पाच एकरावर..
पाऊस ना पॅकेज शेती वार्यावर.
चुल ना भाकर कर्ज घरावर..
मतदार मित्रा घाल आवर रडण्यावर...
असंच होणार पैशे घेऊन मत दिल्यावर..

-अजय चव्हाण..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान...