स्पॉयलर फ्री - अवेंजर्स इन्फिनिटी वॉर- नवीन कोडी जन्माला घालणारं उत्तर....

Submitted by अज्ञातवासी on 28 April, 2018 - 13:43

अवेंजर्स इन्फिनिटी वॉर- नवीन कोडी जन्माला घालणारं उत्तर....

२००८ साली मी जेव्हा पहिला आयर्न मॅन बघितला तेव्हा मला आवडला. प्रचंड आवडला. त्यानंतर येणारी MCU ची प्रत्येक मुव्ही बघणं हा जीवनाचा अविभाज्य घटकच बनून गेला. २०१२ च्या अवेंजर्सने तर या सर्व हिरोजना एकत्र आणण्यासाठी मस्त जमीन बनवली. त्यांनतर सिव्हिल वॉर ने बांधकाम चालू केलं. आणि आता.....

न जाणे का, इन्फिनिटी वॉर बघून समाधान होण्याऐवजी रुखरुख लागून गेली. एखादी भव्य महफील रंगवायला जावं, गायकाने जीव तोडून स्वर लावावेत, पण गायनाचा आत्मा हरविल्यासारखं वाटलं. हो. सगळं भव्य आहे. तुम्ही काय केलंत ते दिव्य आहे. पण ते आत्मा ओतून केलेला वाटत नाही. ते जीव तोडून केलेलं वाटत नाही. मनाला भुरळ घालतं, पण विचार केल्यावर रुचत नाही.

तर साधारणतः ही गोष्ट आहे थानोस ची. हा एक अतिभयंकर महाराक्षस. या विश्वातल् सहा महाशक्तीशाली स्टोन्स त्याला हवेत. विश्वाचं संतुलन राखण्यासाठी. ते तो कसं पार पाडतो याची ही कथा...

रुसो ब्रदर्स ने या चित्रपटासाठी काय मेहनत घेतली असेल, त्याला तोड नाही. इतके सारे स्टार्स एक मुव्ही मध्ये एकत्र आणणे खायचं काम नाही. त्यात प्रत्येकाला स्वतःची ओळख देणं, स्पेस देणं, आणि त्याबरोबर व्यावसायिक गणिते जुळवून आणणे हे कीती मोठं दिव्य असेल याची कल्पनाच न केलेली बरी. पण हे सगळं यशस्वीपणे पार पाडलंय त्यांनी. हे सगळं कल्पनेतच होऊ शकतं. नाही. इट्स आऊट ऑफ ईमॅजीनेशन...

पण न जाणे का रुखरुख लागली. ही रुखरुख एक फॅन म्हणून किती लोकांना डाचली असेल माहिती नाही, पण सगळी कोडी सोडवताना एक स्ट्रिक्टली गोष्ट फॉलो केली गेली आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरे तर द्यायची, पण अजून नवीन प्रश्न तयार करून ठेवायचेत. अरे पण का? धक्कातंत्र वापरलंय तुम्ही, छान. पण द लास्ट जेडाय बघताना शेवटी माझ्यासारख्या फॅन च्या डोळ्यात पाणी आलं होतं. इथे तर तुम्ही निम्मं युनिव्हर्स खल्लास केलं. तरीही ते इतकं अपिलिंग वाटत नाही. उलट तो थानोस बरोबर वाटायला लागतो. त्याचं दुःख खरं वाटत. आणि तो खरा वाटतो. अरे हॉक आय... तुमचा मूळचा टीम मेट ना तो? एक वाक्यात त्याचं अस्तित्वच संपवून टाकावं? खूप दिव्य हाणामारी दाखवलीत तुम्ही. पण सिविल वॉर ची शेवटची फाईट ज्या पद्धतीने जाते, ज्या इमोशनल बॅलन्स ने जाते, त्यात जो आत्मा आहे, तो कुठेतरी हरवलाय.

कलाकारांबद्दल बोलायलाच नको. RDJ क्लास! पण आता तो ग्रेस नाहीये राहिलेला. कारण पूर्वी आयर्नमॅनचं दर्शन दुर्मिळ होतं. आता तसं नाहीये. कॅप्टन अमेरिका, पुन्हा तीच ग्लोरिफाईड बडबड, विदाऊट सेन्स ऑफ रियालिटी. ब्रूस बॅनर, सगळ्यात बॅलन्स. इमोशन असो किंवा कॉमेडी, हा माणूस सगळ्यामध्ये साखरेसारखा मिसळून जातो. थोर, हा माणूस नसता तर हा चित्रपट कसा वाटला असता याची कल्पनाच करता येत नाही. डॉ स्त्रेंज चा भूमिकेत बेनेडिक्ट ही कमाल करतो.नव्या दमाचा टॉम हॉलंड पुन्हा एकदा अक्षरशः प्रत्येक फ्रेम मध्ये हसवतो, आणि शेवटी रडवतोही. स्टार लॉर्ड मध्ये प्र्याट नाही पटत. अरे ही व्यक्तिरेखा साकारताना जी एनेर्जी, जी चपळता लागते, ती कुठेही दिसतं नाही. ब्लॅक वीडो. ओके. स्कोप नाहीये फार. वांडा ने मात्र जो इमोशनल रोल केलंय, त्याला मी फुल मार्कस देईन. व्हिजन ही ओके. ब्लॅक पँथर पुन्हा एकदा मला रियली ग्रेसफुल वाटला. लाईक अ किंग. ग्रूट आणि रॉकेट ची जोडी भन्नाट जमलीये. ड्राक्स ही त्याच्याजागी परफेक्ट. गमोरा नेहमीसारखी च परफेक्ट, आणि नेबुलाही. मंटीस सुद्धा. फाल्कन आणि वर मशीन. ओके.

मात्र एक नाव मी शेवटी घेईन, तो म्हणजे थानोस.... बाप आहे हा बाप.... लिटरली हा माणूस जेव्हा जेव्हा स्क्रीनवर येतो, तेव्हा वाटतं, अरे आता याचं कोणतं रूप बघायला मिळेन, आणि आय फिल, ही नेव्हर लेट यू डाऊन... जोश ब्रोलीन, हॅट्स ऑफ टू यू.

हो, सगळं खूप छान आहे, गुड गुड, पण काहीतरी राहून जातं. काय राहील ते नाही कळतं. बहुतेक पुन्हा बघेन तेव्हा सापडेन.... पण एक सांगेन. काहीही असो....

....मी वाट बघेन....कारण मला हवय हे सगळं पुन्हा...

Group content visibility: 
Use group defaults

कालच टीव्हीवर दाखवला तेव्हा परत एकदा बघितला... अ‍ॅक्शन जबरी आहे एकदम..

अब एंडगेम मे क्या होगा वोईच देखने का है...