जुन्या हितगुजवरची आरोग्यविषयक पाने

Submitted by webmaster on 1 July, 2008 - 07:30

जुन्या हितगुजवरची आरोग्यविषयक पाने

http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/103387.html

http://www.maayboli.com/hitguj/messages/35/93908.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२ दिवसान्पासून पापणीच्या आत खुपल्यासरखे होतय.वरून हात फ़िरवला तर आत अगदी बारिक पुळी असावी असा वाटतय. डोळा कोरडा ही वाटतोय. बाकी इतर लक्ष्ण नाहीत. मी यु.एस मधे आहे सध्या.इथे काही लुब्रिकन्ट आय ड्रोप्स मिळतील का?ह्या प्रोब्लेम साठी नेहमीच्या फिजिशियन कडे जाउन चालेल की आय स्पेशालिस्ट लागेल?इथे आय इन्शुरन्स नाही आहे माझा.

तुमच्या नेहेमीच्या डॉक्टरकडे जा. त्यांना वाटलच तर ते तुम्हाला eye specialistकडे पाठवतील. पण जर infection वगैरे असलं तर ते स्वतःच औषध देतील. कोठच्याही फार्मसीमध्ये जाऊन काही over the counter medication चालू शकत असेल तर फार्मसिस्टपण मदत करू शकते.

अचानक सुरु झालेय का? जागरण झाले असेल तर, डिहायड्रेशनने, सतत लॅप्टॉप समोर बसले तर dry eye syndrom असेल. मला हा त्रास वरचेवर होतो जागरण झाले की. डोळा खुपतो. काहीतरी आत आहे असे वाटते पण तुमचे कशाने आहे पहायला डोळ्याच्या डॉकटरकडे जाणे उत्तमच वेळ काढण्यापेक्षा डोळ्याच्या बाबतीत.
चष्माचा नंबर काढणारा असेल तरी चालू शकेल सुरुवातीला. कॉसकोत स्वस्त पडेल. तोपर्यन्त पाणी प्या भरपूर.
लॅपटॉप पासून दूर रहा. वरचेवर डोळे बंद करून पहा. रोज वॉटरची पट्टी ठेवा डॉकची अपॉइंन्टमेंट मिळेपर्यन्त.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.आज नेहेमीच्या डॉ कदे गेले होते.त्यान्नी अन्टीबायोटीक ड्रोप्स लिहून दिलेत नाही बर वाटल तर स्पेषालिस्ट कडे जा म्हणाली.
डोळ्यान्चे राहूद्या,पण इथे अमेरीकेत काय तर म्हणे प्रत्येक अवयवासाठी वेगळा डॉ.आपल्याकडचे जनरल प्रअक्टीशनर ही सगळ्या प्रकार्ची दुखणी करतात ना बरी.आणि इथे उन्ची आणि वजन घेण्यातच बराच वेळ घालवतात.......