रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

का माहित नाही पण मला दत्ताच्या डोक्यात धोंडा घालावा वाटु लागलयं>> त्यापेक्षा आण्णाच्या डोक्यात घातला तर सगळे प्रश्न मिटतील..! Proud

का माहित नाही पण मला दत्ताच्या डोक्यात धोंडा घालावा वाटु लागलयं.... Angry>>>>> नको गं नको, नाहीतर तो बदकन विहीरीत पडेल. Proud आणी त्याचे वजन जास्त असल्याने सरीता, पांडु, माई, अण्णा आणी छायाला पण दोर ओढुन त्याला काढायला जमायचे नाही. Biggrin

सरिताशी नीट वागत नाही तेव्हा राग येतो दत्ताचा पण अण्णांच्या नजरेला नजर देतो तेव्हा आवडतो मात्र मजा वाटते.

काल झीनाटयगौरवमधला अण्णा नाईकान्चा परफॉर्मन्स कुणी कुणी बघितला? >>> लाऊन ठेवलेला tv पण काही कामासाठी किचनमध्ये गेलेले, घाशीराम कोतवालचं स्कीट होतं ना.

झी नाट्यगौरव पहिला झाला तसा परत झालाच नाही, तो अप्रतिम होता. काल प्रसाद आणि प्रियदर्शनने मला तरी जाम बोअर केलं त्यामुळे इंटरेस्ट गेला.

मात्र ह्या निमित्याने झी मराठी लावलं गेलं, खरं म्हणजे आम्ही हे channel नको असं सांगितलं आहे केबलवाल्याला, तरी त्याने अजून काढलं नाही.

सरिताशी नीट वागत नाही तेव्हा राग येतो दत्ताचा पण अण्णांच्या नजरेला नजर देतो तेव्हा आवडतो मात्र मजा वाटते>> मालवणी रजनीकांत Lol

पांडुला वाड्यामागचड्याबावीत कोणतरी पडलेलं दिसलंय.. आज कळेल कोण आहे ते..! >>>>

शोक्यता नंबर १ :- सरीता खरोखरच विहीरीत पडुन वर ढगात गेली. मगे अण्णोबा दत्ताचे परत दुसर्‍यांदा लग्न लावुन देतील आणी आपण सरीताला न्याय दिला नाही या दु:खाने पिचणारा दत्ता दुसर्‍या बायकोचे नाव सरीता ठेवेल.

शोक्यता नं २ : सरीता आई बापाकडे निघुन गेली. तिच्यासकट तिचे घरचे लोक पण ते गावे सोडुन दुसरीकडे निघुन गेले.

शोक्यता नं ३ : सरीता ऐवजी कोणीतरी प्राणी वा अन्य वस्तु विहीरीत सापडली. आणी सरीता मात्र वाड्यापासुन दूर कुठेतरी बसली नंतर परत आली.

ते चुकुन तसे टाईप झाले. असो.. पण ही सरिता छान वाटते गेल्यावेळपेक्षा. ज्या सरिताने वच्छीला दम भरला आणि शोभाचे मुस्काड फोडले ती बावीत उडी मारुन बुडुन मरेल असे आजीबात वाटत नाही.

बरोबर आहे डिजे. पण नवर्‍याचाच तिच्यावर विश्वास नाही, तो तिच्यावर प्रेम करीत नाही, तिच्याशी चार शब्द कधी नीट बोलत नाही अशा बाईची मनःस्थिती कशी खंबीर असणार? आणी त्यातुन तिच्या माहेरचे तिला सपोर्टला नसतात.

सासु सपोर्ट करते हे तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचं. माई आजवर सरिताला वेळोवेळी हातचं राखुन सपोर्ट करत होती पण कालच्या भागात तिने दत्ताला निक्षुन सांगितलं की जर सरिताचं काही बरंवाईट झालं तर तो माईचं मेलेलं तोंड पाहिल. आता तुम्हीच सांगा ज्याअर्थी माई राखेचा१ मधे पांढर्‍या कपाळाने वावरत होती त्याअर्थी राखेचा२ मधे सरिताचं काही बरंवाईटं होऊ शकेल का..? Wink

घाशीराम कोतवालचं स्कीट होतं ना. >>>>>>> हो.

काल प्रसाद आणि प्रियदर्शनने मला तरी जाम बोअर केलं >>>>>>> अगो, छान करत होते की. मकरन्द देशपाण्डेचा नाटयप्रवेश आवडला.

वाड्यामागचड्याबावीत मला वाटले वाड्या मागच्या मी वाचले पण त्यात चड्या पण आले का ?>>>>>>>> Rofl

अगो, छान करत होते की. मकरन्द देशपाण्डेचा नाटयप्रवेश आवडला. >>> मला नाही आवडलं अँकरींग, नंतर पकड घेतली असेल कदाचित, ओहह मी मकरंद देशपांडे पण मिस्ड, मग मी बघितलं तरी काय नक्की. स्मिता तांबे, सागर कारंडे यांचं नवीन नाटक स्किट बघितलं आणि शोभायात्रा थोडं बघितलं.

शेवंता कडे असेल सरिता>>>> मला पण काल तसेच वाटत होते. कारण पांडु जेव्हा शेवंताकडे घरंगळत गेला, तेव्हा शेवंता आत बघुन बाहेरच्या पांडुशी बोलत होती.

<<< कारण पांडु जेव्हा शेवंताकडे घरंगळत गेला, >>> पांडु घरंगळत गेला हे मी इमॅजिनलं. Lol Lol Lol

त्या माईचा मेक अप मॅन तिच्या चेहर्‍याला पीओपी थापतो का? (किती तो थर मेकअपचा)>> तेच तर.. पहिल्या भागात माई कशी होती आणि आता कशी झालिय. हे असंच चालु राहिलं तर एक दिवस माईची मायरा व्हायला वेळ नाही लागणार..! Uhoh

दत्ता कायम 'आता माझी सटकली' मूड मध्ये वावरत असतो.. अण्णांवर कधी सटकतोय ते बघायचं.
सरीता बहुतेक शेवंतिणी कडेच असावी असे वाटतय..
गेले काही भाग मात्र ताक, गे बाये माझे, छायाचे भांडान एव्हड्या वरच अडकलय.. पुढे सरकेना कथानक.. वच्छी अन शोभा चे तेच तेच खेळ आणि माई-छाया चे संवाद बघून कंटाळ आला.. कथानक पुढे लिहायला पांडू ईसरलय वाटतं. माधव तर पूर्ण गायबच झालाय..

Pages