Photography

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 12 April, 2019 - 02:09

"दिसते अजून ?" तो नुसताच हसला.
"सांग ना, दिसते ती कधी ?"
"हं." त्याचं लक्ष कॉफीत बिस्कीट बुडवण्यात होतं.
"सांगणारे का नाही तू ?"
त्याचं बिस्कीट पडलंच शेवटी कॉफीत.
"हं.." परत तेच उत्तर.
"चल येतो मी." मी उठायचं नाटक केलं.
"दिसते रे.." मला माहित होतं तो जाऊन नाही देणार.बसलो परत,तो बोलत होता.
"दिसते,एकाच शहरात राहिल्यावर तेवढं होणारच"
"हजारो लोक राहतात शहरात,सगळेच नसतात भेटलेले एकमेकाला" माझं म्हणणं.
"भेटलेही असतील,आपल्याला काय माहित ? हां...आता ओळख असेलच असं नाही."तो ऐकणाऱ्यातला नव्हता.
"पण असं म्हणून..." पूर्ण बोलूनच दिलं नाही,मध्येच तोडत म्हणाला,
"ओळख असणं नाही,पण ओळख ठेवणं अवघड आहे आजकाल,जमत नाही फार लोकांना." असं काहीतरी वाक्य टाकून समोरच्याला विचार करायला लावायचा आणि मूळ विषयाला बगल द्यायची जुनी सवय त्याची.
"बोललास पुन्हा कधी ?" मला विषय नव्हताच बदलायचा.
"सांग ना,बोलणं झालं नाही परत ?" परत तोच प्रश्न केला.
"तेवढी हिम्मत नाहीये तिच्यात" हे नवीन उत्तर होतं.
"म्हणजे ? बोलण्यात कसली हिम्मत ? सरळ यायचं आणि.."
तो पुन्हा तसाच हसला.त्याच्या हसण्यातून तो दाखवत होता कि,मला कसं काहीच कळत नाही,कसा मूर्ख आहे मी.पण खरंच काही नव्हतं कळत मला.मी ओळखतो तिलापण.त्याच्यापेक्षा कमी ओळखत असेन पण ओळखतो.
"ती भेटली आणि बोलली नाही असं होऊच नाही शकत.पैज लावीन मी यावर."
"नाही बोललो परत, rather तेव्हाच बोलणं बंद झालं.संवाद संपला कि भांडणं सुरु होतात."
परत नाटकात बोलल्यासारखं ते वाक्क्य.
तो हि वाक्य वापरतो याचा मला प्रॉब्लेम नाहीये पण ती बोललेली वाक्य जशीच्या तशी पटतात हा प्रॉब्लेम आहे आणि मग विषयांतरच होतं सरळसरळ.
"कधीकधी Whatsapp वर last seen बघतो,क्वचित fb ला profile check करतो"
"म्हणजे पुरता विसरलेला..."
"पण तिथे नसतेच फार ती,तिचं राज्य Insta वर !
Photos चं व्यसनच तिला.
कधी तुमचे,तुमच्या नकळत click केलेले चित्रविचित्र चेहरे तुम्हालाच share करेल,नाही सांगता येत !"
"मग न विचारताच सांगायला लागला सगळं !"
"मग Insta वर बघतोस photos"
"कसे बघणार ?"
"म्हणजे ?" मला 'कसे बघणार ?' चा अर्थच कळेना.
"block केलंय"
"करणारच ना,ती काय येडी नाहीये असं तुला.."
"मी....मी block केलंय,तिला.
फोटोंमधून खूप खरं बोलते ती.कसलीच पर्वा न करता बोलते.
मग दरवेळी आवडतो तिचा खरेपणा,
आधी आवडलेला तसाच,तेवढाच !
त्यापेक्षा नकोच....Fb, Whatsapp is still fine.लपता येतं,त्या emojis वाचवतात"
मी ऐकतोय कि नाही हे न बघताच बोलत होता आता तो,स्वतःशीच बोलल्यासारखा.
"तिच्याकडं Camera आला ना,मग तो साधा फोनचा का असेना,
ती सुरु होते आणि थांबतच नाही मग."
विषय जरा जास्तच गंभीर व्हायला लागलाय असं वाटायला लागलं,मी उठायची तयारी करायला लागलो.

कॉफी संपवली,उठलो,गडबडीत त्याचं टेबलवरचं पुस्तक माझ्याकडून पडलं,ते उचलून वर ठेवताना टेबलवर चिकटवलेली एक ओळ दिसली,

The Photography is nothing but capturing the moments!

ती तेच करते....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेंटल टॉक आहे ना..
एकाच व्यक्तीच्या डोक्यातले विचार

कथा म्हणून नाही पण ललीत म्हणून सुंदर आहे.

मग न विचारताच सांगायला लागला सगळं ! >>> याच्याभोवती अवतरणचिन्हे नको ना?

छान लिहिलेय...पण का कोण जाणे अपुर्ण वाटली कथा, अजुन काहितरि लिहायच राखुण ठेवलय अस वाटल.

नवीन Submitted by 'सिद्धि' on 12 April, 2019 - 02:27>>>>>>>

मला पण असच वाटलं ..
पण लेखनशैली खूप छान आहे ...
हा संवाद मानसिक रोगी च आहे का काय नीट समजलं नाही..

मला कळली नाही कथा Sad

> "मग न विचारताच सांगायला लागला सगळं !" > अवतरण चिन्ह काढून टाका.