पाटील v/s पाटील - भाग १७

Submitted by अज्ञातवासी on 8 April, 2019 - 12:43

पाटील v/s पाटील - भाग १६

https://www.maayboli.com/node/69475

लग्न उद्यावर आलं होतं. मध्यरात्र झाली तरीही बरीचशी मंडळी अजून जागीच होती.
मीने खोलीतून शाल पांघरून बाहेर पडली, आणि दरवाजाकडे निघाली. 
दरवाजा उघडून ती गेटजवळ आली. गेटपासून दूरवर एक लाल गाडी उभी होती.
टॉक टॉक! गाडीचा आवाज आला, आणि मीने त्यादिशेने गेली.
"मीनेताई, पटकन बसा, वेळ कमी आहे." मोहनने हळूच आवाज दिला.
मीने गाडीचा दरवाजा उघडणार, तेवढ्यात...
"थांबा....!!!"
मोहनने आवाजाच्या दिशेने बघितले आणि त्याची बोबडी वळली. मिनेची पाचावर धारण बसली.
"मला कधीचाच संशय होता तुमच्या दोघांविषयी. ताई लाज नाही वाटत? अण्णांच्या इज्जतीचा तरी विचार करायचास."
"सोनी, असं काहीही नाहीये. पण प्लिज. आता आम्हाला थांबवू नकोस. मिनेताई तुम्ही गाडीत बसा."
सोनी गाडीच्या समोर येऊन उभी राहिली. "मी कुणाला कुठेही जाऊ देणार नाहीये."
"देवा... "मिनेताई गाडीत बसा. 
"अरे पण हि घुबड एवढ्या रात्रीची जागी कशी?"
"तुम्ही बसा हो. प्लिज..."
मीने गाडीत बसली. मोहन गाडीतून उतरला आणि सोनीला उचलून त्याने गाडीत टाकलं. आणि गाडी लॉक करून सुसाट वेगाने रस्त्यावर काढली.
सोनी मोहनचे केस ओढू लागली, गळा दाबू लागली.
"मिनेताई, मेलो.. वाचवा..."
मिनेने सोनीला ओढले. मोहनने त्यातही वेग कमी केला नाही.
'तुमच्या ह्या चाळ्यांना मी भीक घालणार नाही. मोहन तुला दाखवते मी... एकदा मला फक्त खाली उतरू दे..."
गाडी पाटीलवाडीच्या पुलावर आली, आणि मोहनने कचकन ब्रेक दाबला.
पुलाच्या पलीकडे दहा बारा खचाखच माणसांनी भरलेल्या गाड्या उभ्या होत्या.
एका गाडीच्या बॉनेटवर सर्वेश बसलेला होता.
"मीना शेवटी तुडवलीस तू इज्जत पाटलांची...अण्णा पाटील काय म्हणतील? लोक शेण घालतील अण्णाच्या तोंडात. आता तर तुझ्याशी लग्न करावंच लागेल... अण्णाची पळून गेलेली पोर पदरात घेतली म्हणून अण्णा कायम आता आमच्या पायाशी राहतील. मीने, लग्नानंतर बघ, नाही तुझा महिनाभरात जीव घेतला ना, नाव सर्वेश नाही. मग आहेच ही सोनी, काय?"
"नीच आहेस तू..." सोनी सुन्नपणे म्हणाली.
"चावा अजून मला... केस ओढा... गळा दाबा. चांगलं करायला जावं आणि कायम मार खावा अशी गत झालीये. बघितलं? का पळवून आणलं आता. आणि हे माझं प्रकरण नाहीये... यांचं प्रकरण वाट बघतंय लांब... कळलं?"
सोनीने मान हलवली...
"आता सर्वेश मोरे... शिक्षण सम्राट, साखर सम्राट आणि अजून काय काय... या दोन्हींच्या केसाला जरी इजा झाली, मी तुझ्या सगळ्या कॉलेजला आणि कारखान्याला आग लावेल. समजलं?"
"यार... किती बोर करतोय तू. हे ड्रायवर लोक असेच वटवट करतात. जा रे पोरांनो, तुकडे करून आणा याचे. पक्या, पोपकोर्न आन रे.. लाइव मर्डर बघून बरेच दिवस झालेत."
"मीने, सोनी. गाडीत बसा."
दोन्हीही पटापट गाडीत बसल्या.

----------------------------------

दहा बारा माणसे मोहनच्या दिशेने येत होती.
मोहनने खिशात हात घातला, व गन काढणार, तेवढ्यात त्याला गाडीत बसलेल्या मीने व सोनी आठवल्या.
'हॅन्ड टू हॅन्ड.' तो स्वतःशीच म्हणाला.
मोहनच्या डाव्या बाजूने सात माणसे धावत येत होती, तर उजव्या बाजूने पाच!
'असिमेट्रिकल लिंक. स्ट्राईक एरिया, राईट साईड.'
आणि तो झपकन उजव्या बाजूने धावत निघाला.
त्यापैकी तिसऱ्या माणसाच्या हातात कोयता होता, तर बाकीच्यांच्या हातात हॉकी स्टिक्स.
'मोस्ट डेंजरस, थर्ड मॅन.'
मोहनने दोन्ही हॉकी स्टिकचे वार चुकवले. आणि कोयत्याचाही... कोयत्याचा वार चुकल्याने तो माणूस खाली वाकला, आणि तेवढ्यात मोहनने डाव्या हाताची मूठ आवळून त्याच्या डोक्यात प्रहार करत उजव्या हाताने कोयता हिसकवाला 
'हर्ट द लेग्स. वन्स मॅन फॉल, हि विल नेव्हर राइज...'
मोहन कोयत्याने पोटऱ्यांवर वार करत होता... रक्ताच्या चिळकांड्या उडून माणसे पडत होती...
बाराहि माणसे धाराशायी झाल्यावर मोहनने कोयता पॅन्टला पुसला, आणि ओरडला...
"येऊ दे अजून...सर्वेश!!!"
मात्र आपल्या साथीदारांची घटकाभरात झालेली ही अवस्था बघून बाकीच्या सर्वांनी पळ काढला.
मोहन कोयता घेऊन सर्वेशच्या दिशेने येत होता. सर्वेशला त्याचा अवतार बघून उठायचंही त्राण नव्हतं.
मोहनने कोयत्याचा वार केला. सर्वेशने डोळे मिटले...
...आणि बरोबर मानेजवळ येऊन कोयता थांबला.
सर्वेशने डोळे उघडले.
"उद्या घरी यायचं. अण्णांची माफी मागायची... कळलं?"
सर्वेशने घाबरून मान डोलावली.
मोहनने सोनी बघत नाही असं बघून खिशातली गन सर्वेशच्या कपाळावर ठेवली.
"कळलं?" मोहन विकृत हसत म्हणाला.
मोहन तसाच मागे वळला, आणि गाडीत बसला.
"चला ग पोरींनो... आजचा कार्यक्रम संपला... आता देवदर्शनाला जाऊ."
आणि मोहनने गाडी सुसाट वेगाने मंदिराकडे नेली.
प्रकाश मिनेची वाट बघत होता. मीने धावतच त्याच्याकडे गेली, आणि त्याला मिठी मारली.
मोहन आणि सोनी गाडीला टेकून उभे होते. 
"बघा, हे प्रकरण आहे." तो सोनीकडे हसत म्हणाला.
"तुला कधीपासून माहिती होतं?"
"बरेच दिवस झालेत. पण मध्ये हे साखरसम्राट आडवे आले, आणि सगळं विस्कटलं. त्यादिवशी तुमची बहीण जीव द्यायला निघाली होती, म्हणून तुमची स्कुटर घेतली. कळलं आता?"
"मोहन..."सोनी मोहनकडे बघत म्हणाली आणि बघतच राहिली.
मात्र मोहनच सोनिकडे लक्ष नव्हतं. तो प्रकाश आणि मिनेचा आनंदी चेहरा बघण्यात गर्क होता.
त्याला तिथे तो स्वतः आणि सोनी दिसत होती...
"मोहन,"सोनी किंचाळली.
"काय?"मोहन दचकला.
"मूर्खा, किती रक्त वाहतय?" आणि तिने घाईघाईने तिची ओढणी त्याच्या डाव्या दंडाला बांधली.
"लागला असेल ग कोयता, त्यात काय एवढं. बरं, उद्या ओढणी ड्रायक्लीन करून पाठवून देईन." मोहन हसत म्हणाला.
ती मोहनच्या हसण्यात हरखून गेली.
अनेक क्षण असेच आनंदात गेले, आणि मोहन म्हणाला,
"आज हे लग्न मी होऊ देणार नाही मिनेताई..."

Group content visibility: 
Public - accessible to all site users

I know you don't need it.. तरीही सांगतेय..
छान आहे..

धन्यवाद निलसागर!

I always need it shraddha Happy
तुझा प्रतिसाद बघून छान वाटलं.

Very filmy, but(/and) entertaining! >>> +१
खूप दिवसांनी आले २ भाग.. येउद्या पुढचे.. Happy

थोडे मोठे भाग करा हो, साऊथच्या चित्रपटात २ ब्रेकच्या मध्ये असतात तेवढेच भाग लिहिता राव तुम्ही! Wink

Aho saheb ... Patil hill station la gele ka.. yeu dya ata next part . Plzzzzz