मी अनुभवलेलं गणपती मंदिर

Submitted by मधुरा कुलकर्णी on 7 April, 2019 - 10:33

माझा हा लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे ...
आशा आहे तुम्हाला आवडेल... चुका असल्यास नक्की सांगा ...

मी अनुभवलेले गणपती मंदिर

          विश्वास होता तिला... गणपतीबाप्पा मला कधीच रिकाम्या मनानं अन् हातानं पाठवणार नाही परत त्याच्या घरातून...  कोणीतरी बरेच दिवसांपासून संपर्कात नसणार, कधी काळी किंवा सध्या सुद्धा जिवाभावाचा माणूस नक्की भेटणार या देवलायात...

          जिथं सर्वत्र कोलाहल असून पण शांतता आहे, असंख्य आवाज असूनही स्वतःच्या मनाचा आवाज बुलंद आहे, ज्या समाधानासाठी लोकं झगडतायत, ते आत्मिक समाधान, सुखाचा अन् समाधिस्त अवस्थेचा परमोच्च आनंदाचा बिंदू जिथं हात जोडून स्वागताला आहे, चराचरात गणेश स्तुति चालू आहे असं हे देवालय... जिथं जसं काही सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात, आणि उत्तरे नाही मिळाली; समस्येचं निराकरण जरी नाही झालं तरी त्याला सामोरं जाऊन जिंकण्याची उमेद निर्माण करण्याचं सामर्थ्य त्या पवित्र वातावरणात समावलय...

          तिची भिरभिरणारी नजर शोध घेतिय, एखाद्या प्रियजनाचा, मनात असणारा विश्वास व्यर्थ जाणार नाही याची खात्री असणारी तिची ती नजर शेवटी पडतेच एखद्या अप्तावर... ख्याली-खुशाली होते; निरोपही होतो अन् पुन्हा मनात समाधान व्यापून राहत... विश्वासाची पोच पावती मिळाल्याचं...

          बंद डब्यात ज्याप्रमाणे मधमाश्या घोंघावतायत, दिशाहीन पणे, भिरभिरणारं उद्देशहिन घोंघवण त्यांचं....
जसं मनातले विचार, चांगलं - वाईट, योग्य - अयोग्य, निश्चितता-अनिश्चितता; त्यांच्यात असणार द्वंद...जे या मधमाशा प्रमाणे घोंगावत आहेत मनात... उद्देश हीन, दिशाहीनपणे... अन ज्यात अनिश्चितता भरून राहिली आहे...

          अगदी सहज सर्वांची उत्तरं मिळतात. अनिश्चितता ठाम निश्चयात परिवर्तित होते, नैतिकतेला अनुसरून असणारी उत्तर ठामपणे मिळतात; जरी उत्तर मिळाली नाही तरी मन शांत करणार समाधान, एक उत्कट शांतता मिळते.
हे तर माझं मंदिर आहे आहे जिथं कोलाहल असूनही शांतता आहे, गर्दी असूनही स्थैर्य आहे, शीतलता आहे...
सकारात्मकतेचा लहरी आसपास दौडत आहेत, प्रत्येक मनावर प्रभाव टाकत आपल्या सकारात्मकतेचा...

....सहज मनात आलं म्हणून

Madhura Kulkarni

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप सुंदर लिहिलंय. प्रत्येकाला आयुष्यात असं ठिकाण हवं असतं, जिथे खूप कोलाहल असूनही शांततेची अनुभूती मिळते, पुढे जाण्यासाठी बळ मिळतं.
शब्दसंपदा छान आहे. अशीच यापूढेही सकस लेखनाची अपेक्षा...
लिहीत राहा!

@Tikakar... Well, Mr. Tikakar, तुम्हाला नेमके की समजलं नाही कळू शकेल का??
मान्य आहे माझा पहिलाच प्रयत्न आहे .. याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही मला discourage करावं!!
काय कळलं नाही नक्की सांगा पुढच्या वेळी काळजी घेईन

उत्तम शब्दरचना. भारदस्त वाक्ये. पण मला समजले नाही हे नक्की काय आहे. काय सांगायचं आहे? माझी समज कमी पडली असावी बहुतेक.

@शाली sir, मी सांगलीत राहते तिथं गावाचं गणपती मंदिर आहे सांगली संस्थान च तिथल वातावरण मी मांडायचा प्रयत्न केला आहे ...
हे मंदिर मला खूप आवडतं सो तिथला माझा अनुभव कसा असतो ते सांगायचा प्रयत्न केलाय

कुणाची भेट होण्यासाठी खूप मार्ग व साधने असताना मंदिरा चार वापर का करा. तिथे फक्त देवाशी तल्लीन होऊन मन शांत होण्यासाठी , घोंगावणाऱ्या वादळासारखे विचार शांत होऊन हरवलेली लय सापडावी. बाकी जगण्यासाठी नवी उमेद नक्कीच मिळते हे खरे आहे.

कुणाची भेट होण्यासाठी खूप मार्ग व साधने असताना मंदिरा चार वापर का करा. तिथे फक्त देवाशी तल्लीन होऊन मन शांत होण्यासाठी , घोंगावणाऱ्या वादळासारखे विचार शांत होऊन हरवलेली लय सापडावी. बाकी जगण्यासाठी नवी उमेद नक्कीच मिळते हे खरे आहे.

Submitted by शशिराम on 8 April, 2019 - 00:37
>>>
मी पण फार काही देव भक्त आहे अस काही नाहीय ..
माझा सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की तिथं समाधान अनेक पद्धतीनं मिळत...
वातावरणाचा असा पण परिणाम होतो हे फक्त मला सांगायचंय...

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद