निळावंती

Submitted by Dhangya on 2 April, 2019 - 05:37

काल घरी जेवायला बसलो होतो, वडील फोनवर बोलत होते, तेव्हा ते निळावंती या ग्रंथाविषयी बोलत होते. मी आईला विचारले की निळावंती हा विषय काय आहे.तेव्हा आईने मला सांगितले निळावंती हा ग्रंथ वाचल्यानंतर माणूस वेडा होतो. मी या ग्रंथाविषयी पहिल्यांदाच ऐकत होतो.
मी: तुला कसं काय माहित?
आई: मी लहान असताना आमच्या गावात हे घडले होते.
मला ही स्पष्ट अफवा वाटली.व मी लगेच युट्यूबवर सर्च केलं. तेव्हा मला आईने सांगितल्या प्रमाणेच बरिच माहिती मिळाली.माझ्या आई-वडीलांना लिहिता वाचता येत नाही,ते आध्यात्मिक धोरणाचे आहेत.
मला ही प्रश्र्न पडलेत की निळावंती हा ग्रंथ वाचल्यानंतर खरेच माणूस वेडा होतो का?तो ग्रंथ वाचल्यानंतर माणूस सहा महिन्यांत मरतो का? आणि का मरतो?तो ग्रंथ वाचल्यानंतर पशु-पक्षांची भाषा कळते का? आणि तो ग्रंथ कुठे मिळेल? आणि मिळाला तर तो वाचावा का?
तुम्ही कुणी हा ग्रंथ वाचलात कींवा काही माहिती असेल तर तर नक्की ईथे शेअर करा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निळावंती ग्रंथाविषयी काहीही

निळावंती ग्रंथाविषयी काहीही माहिती नाही.
पक्ष्यांच्या बोलीला निळावंती म्हणतात.ती ज्याला कळते,त्याचा वंश पुढे चालू रहात नाही......हे इतकेच माहित आहे.मारुती चितमपल्ली यांच्या पक्षी जाय दिगंतरा या पुस्तकातली ही माहिती आहे.

निळावंती ग्रंथ वाचून जर पशुपक्षांची भाषा कळत असेल तर तो माणूस नक्कीच मरणार. आपल्या जमातीने एकूणच पशु-पक्षी-वृक्ष जमातीवर केलेल्या अत्याचारांची कहानी त्यांच्याच तोंडून ऐकल्यावर कुठलाही संवेदनशील माणूस जिवंत राहू शकणार नाही.

म्हणूनच हा ग्रंथ गडप झाला असावा.

निळावंती ग्रंथ वाचून जर पशुपक्षांची भाषा कळत असेल तर तो माणूस नक्कीच मरणार. आपल्या जमातीने एकूणच पशु-पक्षी-वृक्ष जमातीवर केलेल्या अत्याचारांची कहानी त्यांच्याच तोंडून ऐकल्यावर कुठलाही संवेदनशील माणूस जिवंत राहू शकणार नाही.

म्हणूनच हा ग्रंथ गडप झाला असावा.‌>>>>>> हे सुद्धा खरेच आहे साधना

ती ज्याला कळते,त्याचा वंश पुढे चालू रहात नाही......हे इतकेच माहित आहे.मारुती चितमपल्ली यांच्या पक्षी जाय दिगंतरा या पुस्तकातली ही माहिती आहे.>>
मारुती चितमपल्ली यान्च्या आई वड़ीलान्पैकी एकाच्या तोंडी हे वाक्य आहे.

काही गोष्टी ईश्वराने पडद्याआड ठेवल्या आहेत, शहाण्या माणसाने पडद्यामागे काय आहे ते जाणण्याचा प्रयत्न निस्ककरण करू नये, कारण असे करण्यात काही धोके संभवतात, आपले विश्व 96% डार्क मॅटर ने बनले आहे तर फक्त 4/%0भाग आपणाला ज्ञात होऊ शकतो असे मॉडर्न फिजिक्स मानते असे म्हणतात म्हणून ही बंधने पाळावी असे वाटते, अधिक माहिती हवी असल्यास डॉक्टर सुनील काळे यांचे अनेक अनेक गूढ विषयांचे छोटे व्हिडिओज यू ट्यूब वर आहेत जरूर बघा ..... बाकी सर्वसामान्य पने विषा ची परीक्षा न घेण्यात शहाणपणा असतो, असेच एक पुस्तक सहदेव भडाळी नावाचे आहे ... पण याठे सुद्धा काळजी घ्या .....

भारत सरकारनी स्वातंत्र्यापूर्व काळात बंदी आणली आहे अस म्हणतात .

निळावंती अस एक 'मारुती चितमपल्ली' च पुस्तक होत.

फेसबूक वर एक मराठी पुस्तक प्रेमी नावाचा गृप आहे. त्यात बर्‍याच लोकांच्या हे पुस्तक वाचल्याच्या, त्याची पीडीएफ असल्याच्या पोस्टी येत असतात. त्या गृपवर विचारा - तुम्हाला हवी ती सर्व माहिती मिळेल.

पशु पक्ष्यांची भाषा, जमिनीत पुरलेले गुप्त धन, भविष्य समजणे असे सर्व काही त्या पुस्तकात आहे म्हणे

सिद्धी, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले, चितमपल्ली कधी लिहिते झाले याचा मेळ बसत नाही. तसे काही नसावे. ब्रिटिश सरकार फक्त राजकीय दृष्ट्या स्फोटक आणि त्यांना अडचणीच्या साहित्यावर बंदी आणत असे. धार्मिक साहित्यावर बंदी ही एकतर खूप प्राचीन किंवा अलीकडे स्वातंत्र्यानंतरची गोष्ट आहे. डॉं आंबेडकरांचे रिडल्स किंवा कोलत्यांचे लीळाचरित्र, सेटनिक वर्सेस ही ठळक उदाहरणे. पण आध्यात्मिक दृष्ट्या पाहाता विकारविरहित मनुष्याचे वर्तन पारदर्शक बनते. तो निसर्गाशी एकरूप होतो आणि प्राणिमात्राची सुखदुःखे त्याला कळू शकतात.

हीरा -धन्यवाद माझ्या वाक्यरचने मुळे असं वाटतं असेल, सुधारणा केली आहे.

- मी अस नेट वरति वाचलय की भारत सरकारनी स्वातंत्र्यापूर्व काळात निळावंती वरिल लेखणास बंदी आणली होती.....म्हणुनच मि पुढ अस लिहिलय कि 'अस म्हणतात'

निळावंती अस एक 'मारुती चितमपल्ली' च पुस्तक होत पण ते स्वातंत्र्यापूर्व काळात लिहिलय अस मी म्हणटलेल नाही.
माझ्याकडे एक फोटो आहे...

nilavanti-inmarathi.jpg

निळावंती या बद्दल मि सुद्धा माहिती मिळवत होते...कारण सेम विषय आधी सुद्धा मा. बो. वर बघायला मिळेल.... जेव्हा मि ते वाचल होत तेव्हाच याचि महिति मिळते का बघत होते.

बोकलत, तुम्ही वाचला असेलच ना हा ग्रंथ.>>>हो वाचलाय, खूपच बेसिक माहिती आहे या ग्रंथात. खरं सांगायचं तर ही पशु पक्षांची भाषा मला फार पूर्वीपासून अवगत होती. म्हणजे आमच्या एरियातल्या बहुतेक पशु पक्षांच्या नवजात बालकांचे शिशु वर्ग मी चालवायचो. त्यामुळे हा ग्रंथ जेव्हा माझ्या हातात आला तेव्हा खूपच निराशा झाली म्हणजे पंचपक्वानांची अपेक्षा करून पंगतीला बसावं आणि पुढ्यात भोपळ्याची भाजी चपाती वाढली जावी असा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत घडला.

माझ्या आजोबांच्या ट्रंकेमधे आहे हा ग्रंथ. ते गेल्यानंतर ट्रंक उघडण्याचं धाडस कुणी केलेलं नाही. त्याच्यावर एक नाग बसलेला असतो. सामान्य डोळ्यांना तो नाग दिसत नाही...
(मी एकदाच चोरून ट्रंक उघडली होती.. पुढचा भयानक अनुभव मी इथे सांगू शकत नाही)

Heera. agree.

कशाला पण
लोकांनी नको वाच म्हटलं तर नाही वाचायचं
तो काय मराठी बोर्डाच्या परीक्षेत शेवटी असलेला मंडेटरी 15 मार्कांचा निबंध नाही की अभ्यास झालाच पाहीजेल ☺️☺️

Lol

माझ्याकडे इंद्रजाल, सहदेव भाडळी ही पुस्तके पण आहेत. सहदेव भाडळी भध्ये पाणी कुठे लागेल, नक्षत्रानुसार जातक कसा असेल. बरेच ठोकताळे आहे. मला पटत नाही. निळावंती विषयी इथे सांगू शकत नाही.

निळावंती विषयी इथे सांगू शकत नाही.>>> अहो सांगा हो! वेडेच होतात ना लोक्स म्हणे...मेलं कोंबडं आगीला भित नाही म्हणतात. Wink
पक्षांच्या नवजात बालकांचे शिशु वर्ग मी चालवायचो.>>> Rofl

निळवंती मध्ये डॉल्फिनी भाषा देखील आहे. काही शास्त्रज्ञ त्याचा अभ्यास करून ग्लोबल वॉर्मिंग वर डॉल्फिन चा फीडबॅक घेत होते. डॉल्फिनी ते इंग्लिश वर मशीन लर्निंग वापरून भाषांतराचे अँप बनवले जात होते. पण अचानक एक दिवस सगळे शास्त्रज्ञ वेडे झाले.

पक्ष्यांच्या बोलीला निळावंती म्हणतात.ती ज्याला कळते,त्याचा वंश पुढे चालू रहात नाही.. >>>>> हे खरं असतं तर भारत सरकारने नक्कीच बंदी घातली नसती. उलट प्रत्येक घरी एक ग्रंथ फुकट वाटला असता. Wink लोकसंख्या वाढीस आळा घालायला इतका सोपा मार्ग असताना कशाला उगीच ग्रंथावर बंदी घालतील.

छापील ग्रंथ नाहीत हो चालत. ताम्रपत्रावर लिहीलेला किंवा भ्रूजपत्रावर. जगात असे चारच ग्रंथ शिल्लक आहेत. त्यातला एक माझ्या आजोबांकडे होता.

पक्ष्यांची भाषा सेमच असते का? म्हणजे भारतीय उपखंडातील पक्षी आणि युरोपातील पक्षी एकाच भाषेत कंमुनिकेट करतील का?

https://www.youtube.com/watch?v=uoisMmpotJw
इथे संपूर्ण कथा आहे.
https://www.youtube.com/watch?v=2DG_8VbdmcE
(संपूर्ण व्हिडीओज पाहून झाल्यावर माझा आत्मा हा प्रतिसाद टमकत आहे )

Submitted by किरणुद्दीन on 2 April, 2019 - 08:07
,>>>>>>धन्यवाद.....किरणुद्दीन हा व्हीडिओ मी त्या दिवशीच पाहीला...

वर atulpatil यांनी जी लिंक दिली आहे तिथेदेखील अशोक. म्हणताहेत कि भारत सरकारने बंदी घातली होती (स्वातंत्र्यपूर्व नाही). त्यांचा प्रतिसाद:-

"निळावंती" संदर्भात ज्या काही आख्यायिका आहेत त्या अनुषंगाने (पूर्वी) सायंकाळी बैठकीच्या वेळी गप्पांच्या ज्या चंच्या सुटत, पानसुपारीची देवघेव होई, त्या दरम्यान पुरून ठेवलेले सोन्याचे मडके, चांदीच्या रुपयांनी भरलेला तांब्याचा हंडा, जडजवाहीर....असल्या गोष्टी सांगणारे वेल्हाळ बैठक रंगवत आणि खिशात पाच रुपयेही नसलेल्या आजुबाजूच्या श्रवणधारकांच्या त्या झळाळत्या सोन्याच्या कल्पनेने अंगावर सुखद असे रोमांच उमटत...त्याच नशेत मग ते "निळावंती" कुणाला वश असेल यावर खल करत बसत....ती समाजमनाची एक जडणघडण असतेच. कायम दरिद्री वा उपाशीपोटी वा अर्धपोटी राहाणा-यांना अशा जादूने माखलेल्या गोष्टींची सवय होऊन गेली होती. सवय इतपत ठीक, पण "निळावंती" शी लगट होण्याच्या नादात जर अघोरी (आणि क्वचित प्रसंगी हिडिससुद्धा) प्रकार करण्या इतपत यांची मजल गेल्याचे दाखले आहेत.
कबुतरांना पकडून आणून त्याना पायाखाली चिरडण्याचे प्रकार या निळावंतीच्या नादाने केलेले लोक पाहिले आहेत. का चिरडायचे ? तर त्यांच्या वेदनेच्या आवाजाला प्रत्युतर कुठून तरी ती निळावंती येते, ही खुळचट समजूत. पुस्तके होती या विषयावर पण भारत सरकारने या विरोधात ती सारी जप्त करण्याचे आदेश दिल्याचे आठवते.
===

निळावंतीची कथा
http://web.bookstruck.in/book/chapter/50150

निळावंती गैरसमजांचे निराकरण
http://web.bookstruck.in/book/chapter/50149

मराठी पुस्तक प्रेमी ग्रुप वर या पुस्तकाबद्दलचा सविस्तर खुलासा आहे. पण पोस्ट टाकून विचारू नका. तिथे बर्‍याचदा चर्चा झाली आहे या पुस्तकाबद्दल.

हे खरं असतं तर भारत सरकारने नक्कीच बंदी घातली नसती. उलट प्रत्येक घरी एक ग्रंथ फुकट वाटला असता. Wink लोकसंख्या वाढीस आळा घालायला इतका सोपा मार्ग असताना कशाला उगीच ग्रंथावर बंदी घालतील.>>>>>> लोकांना एखादी गोष्ट कर किंवा करु नकोस असं सरळ सांगितलं तर ते ऐकण्याची प्रवृत्ती नसते.मग काही धर्मिक आवरणांखाली अथवा भिती दाखवून करावे/करु नये असे सांगितले असावे इतकेच.

निळावंती हा गे जीवनशैलीवरचा ग्रंथ आहे आणि तो कायम बासनात गुंडाळलेला असतो.

संदर्भ: गे निळावंती कशाला झाकिसी काया तुझी (चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले)

माधव, निळावंती लेस्बियन असावी. कारण मेघा नसताना तिचे सौंदर्य बघायची आस कवीला लागली आहे.
(पाहु दे मेघा विन सौंदर्य तुझे मोकळे)

माधव, निळावंती लेस्बियन असावी. कारण मेघा नसताना तिचे सौंदर्य बघायची आस कवीला लागली आहे.
(पाहु दे मेघा विन सौंदर्य तुझे मोकळे)

Submitted by अमितव on 2 April, 2019 - 23:58
>>>>>ऐकतो आता

निळावंती हा बेसिक ग्रंथ आहे. याच्या पुढच्या व्हर्जन सुद्धा आहेत बरं का मित्रांनो. पण त्याबद्दल कोणाला ठाऊक नाही. नावातच नीळ असल्याने हा ग्रंथ वाचला की तुम्ही ज्या पशु पक्षांच्या अंगावर निळा रंग असतो त्यांच्यासोबत गप्पा मारू शकता. नाच रे मोरा, कबुतर जा जा हे गाणं गाणाऱ्या गायिकांनी हा ग्रंथ वाचला होता.

निळावंतीला तिच्या जगात परत न जाता यावे म्हणून ताईत पळवणारा राक्षस कोकलत हाच होता. तो निळू निळू करत सैराट बोकाळला आहे . सावधान.

नावाबद्दल उत्सुकता वाटली म्हणून उघडला आणि प्रतिसाद वाचून मज्जा आली.
(माझ्या वेळात येऊ द्यात हो असे धागे)

>> निळावंती हा गे जीवनशैलीवरचा ग्रंथ आहे आणि तो कायम बासनात गुंडाळलेला असतो.
>> संदर्भ: गे निळावंती कशाला झाकिसी काया तुझी

Rofl

शरद उपाध्ये यांच्या राशीचक्र मधला विनोद आठवला

अर्जुनाचा जन्म चार जूनला झाला असावा कारण गीतेत उल्लेख आहे...
भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन । Biggrin