मेळघाटात आरोग्य शिबीर - डॉक्टर हवे आहेत

Submitted by हर्पेन on 22 March, 2019 - 04:46

*मेळघाटात आरोग्य शिबीर - डॉक्टर हवे आहेत*

आपल्या सर्वांच्या मदतीनं मेळघाटात कुपोषण आणि बालमृत्यूवर नियंत्रण आणण्यात आपण यशस्वी झालो. अशी कामं एकट्या-दुकट्यानं होत नाहीत. तुम्ही सारे सोबत आलात म्हणूनच ते यशस्वी झालं.

ते झालं तरी आरोग्याचे इतर प्रश्न आहेतच… महू येथील इस्पितळात त्वचारोगतज्ञ म्हणून काम करत असलेले, पूर्वी ज्यांनी लष्करात काम केलं आहे असे ब्रिगेडियर डाॅ. संजीव वैशंपायन आपल्या पत्नीसह नुकतेच आपल्या चिलाटी गावात गेले. त्यांनी तिथे दीड-दोनशे रूग्ण तपासले आणि उपचार केले. त्यांनी सोबत औषधं आणली होती. काही आपण जमा केली होती. त्यांनी ज्या रूग्णांना तपासलं त्यांच्या पैकी ९०% रूग्णांना गजकर्ण असल्याचं लक्षात आलं. आपण इतके सतत मेळघाटात जातो पण आपल्या ही गोष्ट तितकीशी लक्षात आली नव्हती. डाॅ. वैशंपायनांचं निवेदन सोबतच्या व्हिडियोत जरूर ऐका.

https://youtu.be/ln98u_uVFzg

विविध गावात घेतलेल्या ह्या शिबीरानंतर आपल्याला तिथे अशी शिबीरं घेण्याची आवश्यकता जाणवली. त्यामुळे पुढील महिन्यांपासून आपण तिथे दर महिन्याला “आरोग्य शिबीर” घेण्याचं ठरवत आहोत. अर्थात हे आपल्या सहभागाशिवाय शक्य नाही.

आपण डाॅक्टर असाल तर डाॅक्टरांचा एक चमू तयार करा. हे शिबीर एखाद्या विषयाला, म्हणजे नेत्रतपासणी, रक्तदाब असा, वाहिलेले असेल. एकूण ५ दिवसांचा वेळ द्या. एक दिवस जायला, एक दिवस यायला. तीन दिवस शिबीर. आपण सोबत औषधं घेऊन आलात तर उत्तमच. नाही तर कुठली औषधं लागतील ते सांगा. आपण लोकांना आवाहन करू. गाडी आणलीत तर उत्तम पण नाही आणलीत तर त्याची व्यवस्था करू.

आपण डाॅक्टर नसाल तरी डाॅक्टरांचा चमू तयार करा. औषधं जमा करा. आर्थिक मदत करा. एकटे असाल तर एखाद्या डाॅक्टरांच्या चमूत सहभागी व्हा.

तीन दिवसांच्या शिबीराला १७,१०० खर्च येतो. ह्यात शिबीराच्या तयारीसाठी तिथल्या मित्रांचा प्रवासखर्च, काही प्रशासकीय व्यवस्था, संपर्क, प्रचार, आरोग्य शिक्षण आणि नंतरचा पाठपुरावा ह्या गोष्टी येतात. आपण शिबीराचा आर्थिक खर्च उभा करू शकता. एका दिवसाला ५,७००.

“मैत्री” ही तुमच्या-आमच्या सारख्या मित्रांची संस्था आहे. आपण गेल्या २२ वर्षांपासून मित्रांच्या देणग्यांवरच काम करतो. हिशेबाच्या बाबतीत आणि पारदर्शकतेच्या बाबतीत आपण जागरूक आहोत.

संपर्क साधा :: maitri1997@gmail.com संकेतस्थळ :: www.maitripune.net
धनादेश पाठवायचा असेल तर पत्ता: “मैत्री” ३२, नटराज सोसायटी, कर्वेनगर, पुणे - ४११०५२ दूरध्वनी : ०२०-२५४५०८८२
धनादेश “मैत्री” किंवा “MAITRI” ह्या नावानं काढा.
इ-देणग्यांसाठी : HDFC Bank, Mayur Colony, PUNE A/C 01491450000152
RTGS/NEFT Code - HDFC0000149 . MICR Code - 411240009

“मैत्री” साठी दिलेल्या देणग्या आयकर कायद्याच्या ८० जी अन्वये करमुक्त तर आहेतच परंतु आम्हाला जबाबदारीची जाणीव असावी म्हणून आमचे सगळे हिशेब कुणालाही बघण्याची मुभा आहे.

संपर्क साधा. वाट पहातो आहोत.
मैत्री कार्यालय - ०२० २५४५०८८२ (लीनता)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या ओळखीच्या किंवा माहितीतल्या डॉक्टर्सना वरील मेसेज पाठवावा व त्यांच्याशी यासंदर्भात संवाद साधून मैत्री कार्यालयात त्यांची नावे कळवावीत.

सुंदर उपक्रम...
शुभेच्छा...
माझा खारीचा वाटा... आर्थिक सहभाग घेतो . ई-पेमेंट करतो.

ठिक...