जन्मकुंडलीची वेळ कशी ठरवावी

Submitted by बोकलत on 12 March, 2019 - 09:28

नमस्कार, माझ्या मित्राला काल मुलगी झाली, तर डिलिव्हरी वेळ डॉक्टरांनी रात्री आठ वाजता सांगितली होती, परुंतु सीझर होऊन दुपारी 3वाजून 42 मिनिटांनी डिलिव्हरी झाली, तर माझा प्रश्न हा आहे की कुंडली मांडताना नक्की कोणती वेळ विचारात घेतली जावी. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी पण घेतलं ग्राईप वॉटर मग मला सुचलं की मायबोली संकेतस्थळ आहे तिथे प्रश्न विचारलं की उत्तर मिळेल. तुम्ही पण दोन दोन चमचे घ्या बघा काय सुचतय का ते Happy

डॉक्टरांनी 8 सांगितली - हा ट्रिकी पार्ट आहे पझल मधील.
चार पर्याय असते आणि एखादा विकल्प 8 असता, फसलो असतो ना राव.

काही वेळा जन्मलेलं मूल रडत नाही. मानवप्राण्यात ही एक विशेष श्रेणी आहे.
मग चिमटे काढून, थापट्या मारून रडवतात यामध्ये थोडा वेळ जातो तेवढ्यात ग्रह पुढे सरकतात. मग कोणती वेळ धरायची असा सोपा प्रश्न वाटला होता परंतू सिझेरिअन उर्फ नियोजित/ प्लॅन्ड अवतार आणि प्रत्यक्ष अवतरण यामध्ये काळ गेल्यास काय करायचे हा खूपच गहन प्रश्न ठरतो आहे. नशिबाने शालेय प्रवेशासाठी इतकी चाचणी घेत नाहीत.

ज्या क्षणाला बाळ रडते तो जन्माचा क्षण.
कारण त्या वेळी बाह्य जगात श्वास घेऊन बाळ बाह्य जगावर अवलंबून राहू लागते - तोच या जगातला जन्म!

ऐक शंका आपण रोजच्या जीवनात प्रमाण वेळे चा वापर करतो .
जन्मकुंडली साठी जन्मवेळ खूप महत्त्वाची त्यासाठी जिथे जन्म झाला त्या ठिकाणी खरी वेळ काय होती ते काढलं पाहिजे .
म्हणजे सूर्य डोक्यावर आला आणि सावली पायाखाली पडली की दुपारचे 12 वाजले असे समजून जन्मवेळ काढली तरच ती योग्य जन्मवेळ आसेल ना .

दुपारी ३ वाजुन ४२ मिनीटे हीच वेळ. आता यावर कितीही जोक आले तरी तशी वेळ + जन्मठिकाण + जन्मतारीख हे तीन महत्वाचे पैलु आले तर जन्मकुंडली बनते. आता कोणी विश्वास ठेवो न ठेवो, पण अशी पर्फेक्ट कुंडली माणसाचा स्वभाव, त्याचा व्यवसाय व इतर गोष्टी दाखवते.

ज्यांना टिंगल टवाळी करायची त्यांनी खुशाल करावी. पण फक्त बोकलत यांच्या मुख्य प्रश्नालाच मी उत्तर दिले.

जन्मवेळ चुकली तर भविष्य चुकते का?
समजा आम्ही उलट असा प्रश्न विचारला की, जन्मवेळ बरोबर असेल तर भविष्य बरोबर येईल याची खात्री ज्योतिषी देईल का ? काय उत्तर मिळेल ? मुळात, खरी जन्मवेळ कुठली मानावी या मुद्यावर ज्योतिषीलोकांतच वाद होते. तर्कदृष्टीनं विचार केला तर ज्या क्षणी गर्भधारणा होते ती खरी जन्मवेळ मानली पाहिजे. पण ती वेळ खुद्द आईबापांनासुद्धा माहीत नसते! बालक रडते म्हणजे पहिला श्वास घेते ती जन्मवेळ मानावी, असे आता मान्य केले आहे. पूर्वी बालकाचे डोके दिसणे, मूल पूर्णपणे बाहेर येणे, नाळ कापणे, अशा अनेक गोष्टीवरून जन्मवेळ ठरवीत असत. एक गोष्ट खरी की जन्मवेळ ही मिनिटांच्या हिशोबात अचूक सांगणे जवळजवळ अशक्य आहे. अचूक जन्मवेळेवर कुंडलीचा अचूकपणा अवलंबून असतो. अचूक कुंडलीवर भविष्यकथनाचा अचूकपणा अवलंबून असतो. त्यामुळे भाकीत खरे ठरले नाही तर जन्मवेळ चुकीची असेल हे निमित्त लगेच पुढे केले जाते व ते पटण्यासारखेही असते. आपण जेव्हा किती वाजले हा प्रश्न विचारतो तेव्हा "३ वाजून ५८ मिनिटे ५० सेकंद " असे काटेकोर उत्तर अपेक्षित नसते, तर "चार वाजले " असे उत्तर पुरेसे असते. डिजीटल घडयाळात ३.५९ नंतर ४.०० हा आकडा येतो. तिनाच्या ऐवजी चाराचा आकडा तिथे दिसू लागतो. प्रत्यक्षात एक मिनिटच उलटलेलं असतं पण तासाचा आकडा एकाने वाढतो. हे जसे घड्याळाच्या बाबतीत होते तसेच कुंडलीतही एखादे वेळी होते. अशा "बॉर्डर "वरची जन्मवेळ असेल तर ५-१० मिनिटांच्या अंतराने प्रथमस्थानातील राशीचा आकडा बदलू शकतो. पण ज्योतिषी लोक मात्र असा समज करून देतात की तेवढ्या थोडयाशा फरकामुळे कुंडलीत काहीतरी मोठी उलथापालथ होते. सामान्यत: भविष्यकथनासाठी ज्योतिषीलोक ठोकळा कुंडली वापरतात. दहा-पंधरा मिनिटांच्या फरकामुळे कुंडलीतला जो घटक बदलणार असतो तो घटक या ठोकळा कुंडलीत टिपलेला नसतोच. आणि जरी सूक्ष्म कुंडली वापरली तरी सर्वसाधारण भविष्यकथनासाठी ज्योतिषी तो घटक विचारात घेत नाहीतच. एकंदरीत काय तर जन्मवेळेच्या अचूकपणावर भविष्य फारसे अवलंबून नसते.

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी..... प्रश्नोत्तरातून सुसंवाद मधून
http://mr.upakram.org/node/806

मी हा धागा मजेसाठी नाही काढला, एका मित्राला काल मुलगी झाली त्याने विचारलं, आता आपल्याला या ज्योतिषशास्त्रातील काय कळत नाही म्हणून इथे हा धागा सुरू केला.

जन्मकुंडलीची वेळ कशी ठरवावी
Submitted by बोकलत on 12 March, 2019 - 18:58

नमस्कार, माझ्या मित्राला काल मुलगी झाली, तर डिलिव्हरी वेळ डॉक्टरांनी रात्री आठ वाजता सांगितली होती

मित्राला मुलगी कशी होईल? काही दिवसांपूर्वी एकाने सोशल मीडियावर माझ्या भावाला मुलगा झाला त्याचे नाव अभिनंदन ठेवले अशी पोस्ट लिहिली होती तर भाजप भक्त म्हणून त्याची संभावना करीत मायबोलीवरच टिंगल उडविली गेली होती हे ताजे वर्तमान आहे.