Submitted by मित्रहो on 5 July, 2015 - 02:05
(कवि कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर यांची माफी मागून)
ओळखलत का सर मला, दारात आला कोणी
केस नव्हते विस्कटलेले, डोळ्यात नव्हते पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला छाती काढून,
‘इनकम टॅक्सची धाड आली, गेली मान वाढवून’
कैदाशिनीसारखी नुसती कागदी घोडी नाचली,
सारी खाती गोठविली, स्वीस बँक मात्र वाचली.
कॅश वेचली, लॉकर सील केली, दागिणेही नेले
गादीखाली म्हणून प्रॉपर्टीचे पेपर तेवढे वाचले
वकीलाला घेउन संगे सर आता लढतो आहे
एकेक मुद्दा काढतो आहे, चिखलफेक करतो आहे
फोनकडे हात जाताच हसत हसत उठला
‘ओळख नको सर’, जरा कोडगेपणा वाटला.
काढून घेतले पद, तरी अजूनही काढतोय फणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त चर म्हणा!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
:: मस्त.
:: मस्त.
मस्त आहे.
मस्त आहे.
धन्यवाद सुरेखा कुळकर्णी आणि
धन्यवाद सुरेखा कुळकर्णी आणि कांदापोहे
छान आहे ,
छान आहे ,
(No subject)
हाहा मस्त
हाहा मस्त
धन्यवाद मित्रांनो , ऋन्मेऽऽष
धन्यवाद मित्रांनो , ऋन्मेऽऽष , भरत मयेकर , क्रिश्नन्त
मस्त... कुसुम्रागजपण गालात
मस्त... कुसुम्रागजपण गालात हसले असतील ( मग "श्रीराम" म्हणाले असतील. )
जबरीच....
जबरीच....
फारच छान ! बर्याच दिवसांनी
फारच छान ! बर्याच दिवसांनी चांगलं विडंबन वाचायला मिळालं !
छान जमुन आलेय...
छान जमुन आलेय...
आवडले.. या सरांचे नाव "श" ने
आवडले..
या सरांचे नाव "श" ने सुरु होते का?
धन्यवाद कुसुमाग्रज हसले असतील
धन्यवाद
कुसुमाग्रज हसले असतील पण ही परिस्थिती बघून वाइट वाटले असेल.
>>या सरांचे नाव "श" ने सुरु होते का?
नाही हो , असे सर आणि विद्यार्थी सर्वत्रच असतात
बापरे !!! भारीच फणा...
बापरे !!! भारीच फणा...
फक्त चर म्हना
फक्त चर म्हना
धन्यवाद सोनू, Sandip
धन्यवाद सोनू, Sandip
<<<
<<<
फोनकडे हात जाताच हसत हसत उठला
‘ओळख नको सर’, जरा कोडगेपणा वाटला.
काढून घेतले पद, तरी अजूनही काढतोय फणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त चर म्हणा!
>>>
हा हा हा, झकास.
सुरेखच!
सुरेखच!
धन्यवाद उपाशी बोका आणि सखा.
धन्यवाद उपाशी बोका आणि सखा.
विडंबन चांगलं आहे पण "कैदाशिन
विडंबन चांगलं आहे पण "कैदाशिन" शब्दाचे प्रयोजन कळलं नाही आणि तो अशुद्ध लिहिल्याने खटकला