महिला दिन? ते काय असतंय?

Submitted by टोच्या on 8 March, 2019 - 09:47

कालच्या अंगमोड मेहनतीनं ठसठसणार्या हाडांकडं दुर्लक्ष करून ती भल्या पहाटे उठली. नवर्‍याचा चहा, न्याहारी, पोरांचा डबा, पोरींची येणीफणी, धुणंचुणं आवरून दिवसभराचं रांधून ती शेतावर रोजंदारीवर निघाली, तेव्हा तिचं पोरगं म्हणालं, 'माय, महिला दिनाच्या तुला सुबेच्च्या'... लेकराकडं कौतुकानं पाहत माय म्हणाली...' ते काय आसतंय रे? '

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

महिला दिन
https://www.indiatimes.com/news/india/pregnant-woman-killed-in-up-for-ac... >>>> Disgusting Sad जातीव्यवस्थेमधून कधी बाहेर येणार भारत कोण जाणे.

टोच्या, थोडक्या शब्दात उत्तम. वास्तव आहे हे. आणि फक्त खेडयात नाही. शहरात सुद्धा. फक्त प्रकार वेगळा.

आणि फक्त खेडयात नाही. शहरात सुद्धा. फक्त प्रकार वेगळा.>>> अगदी खरय. आमच्या सोसायटीत एका फॅमिलीला गणपतीत वगैरे अशी वागणूक देतात. ते बिचारे दहा दिवस उत्सवाकडे फिरकत देखील नाही. Sad

किरणुद्दीन... भयाण आहे हे..

शाली, देवकी प्रतिसादासाठी आभार.

मीरा,
<<टोच्या, थोडक्या शब्दात उत्तम. वास्तव आहे हे. आणि फक्त खेडयात नाही. शहरात सुद्धा. फक्त प्रकार वेगळा.>>
महिला दिन हा फक्त माध्यमे आणि समाजमाध्यमांपुरता, सत्कारापुरता आणि फोटो छापून येण्यापुरता मर्यादित असतो. तळागाळातील महिलांना तो माहिती असण्याचे कारणही नाही. महिला दिन साजरा केल्याने, न केल्याने त्यांना काय फरक पडणार आहे?

फॅमिलीला गणपतीत वगैरे अशी वागणूक देतात. ते बिचारे दहा दिवस उत्सवाकडे फिरकत देखील नाही. >>>>> सॉरी शाली,पण सोसायटीवाल्यांना शरम वाटली पाहिजे.

फॅमिलीला गणपतीत वगैरे अशी वागणूक देतात. ते बिचारे दहा दिवस उत्सवाकडे फिरकत देखील नाही. >>>>. सॉरी, पण हे खरंच वाटत नाही. म्हणजे तुमच्यावर अविश्वास नाही, पण मी जन्मल्यापासून आजतागायत असा एकही प्रसंग पाहिला नाही की जातीवरून कोणाला काही वेगळी वागणूक दिली गेली आहे. ज्या काही जातीवरून झालेल्या घटना, प्रसंग, अत्याचार ते फक्त न्यूज पेपरमध्ये वाचले आहेत.

शहरात ते ही महाराष्ट्रासारख्या प्रगत (नकाशातल्या वरच्या राज्यांपेक्षा नक्कीच) राज्यात असं कसं होऊ शकतं? तुम्ही बाकीचे शिकलेले रहिवासी काहीच का करत नाही? आणि ते कुटुंब स्वतः का अन्याय सहन करत? तेही कायदा असताना.

जातीयवादाची इथे चर्चा करण अवांतर होईल. आपण धाग्याच्या मूळ मुद्द्यावर येऊ.

महिला दिन हा फक्त माध्यमे आणि समाजमाध्यमांपुरता, सत्कारापुरता आणि फोटो छापून येण्यापुरता मर्यादित असतो. तळागाळातील महिलांना तो माहिती असण्याचे कारणही नाही. महिला दिन साजरा केल्याने, न केल्याने त्यांना काय फरक पडणार आहे? >>>> हे अगदीच खरं आहे.
माझा मुद्दा असा होता की खेड्यातल्या कामकरी बाईने घरकाम आटपून महिला दिनाच्या दिवशी रोजंदारीवर जाणं काय किंवा माझ्या मैत्रिणीने स्वयंपाकपाणी करून ठाण्याहून वरळीला नोकरीवर जाणं काय? स्त्रीला दिवस कुठलाही असू दे कष्ट चुकत नाहीत. शहरातल्या स्त्रिया ऑफिसमध्ये जाऊन महिला दिनाची 4 भाषणं ऐकतात आणि दिलेली कॉफी सँडविच खाऊन परत कॉम्प्युटरमध्ये मान मोडेस्तोवर काम करतात. तिला महिला दिन आणि महिला हक्काची जाणीव आहे म्हणून सहानुभूती मिळत नाही पण कष्टही चुकत नाहीत.

देवकी, मीरा सोसायटीत म्हणजे एका विंग मधली तिन चार फॅमिलीजचा एक ग्रुप असे वागतो. इच्छा असुनही बाकी मेंबर्स काही बोलू शकत नाहीत. प्रसाद देताना वरुन टाकणे, शेजारी येऊन बसले की उठून दुसऱ्या चेअरवर जावून बसने, स्वत:च्या मुलांना त्यांच्या मुलांबरोबर खेळत असताना सगळ्यांसमोर रागावने, त्यांनी दिलेलेला दिवाळीचा फराळ दुसऱ्यादिवशी त्यांच्यासमोरच वॉचमनला देणे असा छळ करतात. या गोष्टींवर सोसायटी अॉब्जेक्शन नाही घेऊ शकत. मला कितीही राग आला तरी मी काय करु शकतो? त्यांना आवर्जुन जेवायला बोलावते बायको काही कार्यक्रम असला की. पण ते कुटूंब एकूनच आता अंतर ठेऊन वागते. विशेष म्हणजे ते अत्यंत सधन आहेत व नम्रही आहेत खुप. अत्यंत सज्जन कुटूंब आहे.

असो. मुळ धाग्यावर चर्चा होऊद्या.

प्रसाद देताना वरुन टाकणे, शेजारी येऊन बसले की उठून दुसऱ्या चेअरवर जावून बसने, स्वत:च्या मुलांना त्यांच्या मुलांबरोबर खेळत असताना सगळ्यांसमोर रागावने, त्यांनी दिलेलेला दिवाळीचा फराळ दुसऱ्यादिवशी त्यांच्यासमोरच वॉचमनला देणे असा छळ करतात. या गोष्टींवर सोसायटी अॉब्जेक्शन नाही घेऊ शकत>>>>

सोसायटी ऑब्जेक्षन नाही घेऊ शकत हे मान्य. पण -

1. ही मंडळी प्रसाद वाटत असताना ती मंडळी प्रसादास आली की मुद्दाम कुणी प्रसादाचे ताट ह्यांच्या हातून घ्यायचे, हे मोठ्याने बोलत की ' तुम्हाला त्यांना द्यायचा त्रास होतो ना, द्या इकडे प्रसाद, मी देतो त्यांना'

2. या मंडळींनी त्यांना दिवाळी फराळ द्यायचाच नाही, देऊन दुसऱ्या दिवशी वॉचमनला दिलेला का बघायचा? मुद्दाम त्यांच्यासमोर इतरांना द्यायचा. त्यांच्या शेजारी यांनी बसायला जायचे नाही. जागा नसेल तर कुणीतरी उठून मोठ्याने बोलून यांना जागा द्यायची व स्वतः त्यांच्या शेजारी जाऊन बसायचे.

मुद्दा हा की ते जसे यांना वागवताहेत तसेच इतरांनी त्यांना वागवा, त्यांना त्रास व्हायला लागला की कळेल. नुसते आपल्याला वाईट वाटून काय होणारे?

अर्थात सहन करणाऱ्या यांना छळणाऱ्या त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून राहता येते. पण तुम्ही लिहिलेय त्यावरून यांना तसे राहायचे नाही हे दिसतेय. मग इतरांनी हे निमूट बघत बसण्यापेक्षा आपल्या वागणुकीतून त्या ग्रुपला धडा शिकवा की चांगला.

बाकी महिला दिनी वेगळे काय करायचे हे आता मलाही कळेनासे झालेय. मी हल्ली महिलांना विश करणेही बंद केली. माझ्यासाठी रोजचा दिवस महिला दिन आहे.

मलाही महिला दिनात इतकं काय ते विशेष हे अजून कळायचं आहे. पर्सनली मला ते वॉट्सॅपवर येणारे मेसेजेस, फेसबुकवरच्या पोस्ट्स यांचा प्रचंड वैताग येतो. माझ्याकडून मी कोणालाही काहीही पाठवत नाही, फॉरवर्ड करत नाही. इतर कोणत्याही दिवसासारखंच आपण जे करण्यासारखं असतं ते करत रहावं. दिवस कोणताही असो.

१. निदान ज्याना या सगळ्याची जाण आहे त्यानी जरी उपेक्षित , शोषित महिलांसाठी , आपल्या कार्यकक्षेत ठोस कार्यक्रम करायला हवेत.
२. सर्वसाधारण घरांमधे कामाला येणार्या बायकांसाठी प्रत्येकाने जरी काही तरी केले तरी मोठे समाजबदल साध्य होतील.

किरणुद्दिन यांनी दिलेल्या लिंकवरची बातमी जेवढी धक्कादायक आहे तेवढंच किंबहुना (मोठ्या शहरात, चांगल्या सोसायटीत राहणारे सुशिक्षित लोक आहेत म्हणुन) त्यापेक्षा जास्त शाली यांनी लिहिलेलं धक्कादायक आहे.

साधना,
<<बाकी महिला दिनी वेगळे काय करायचे हे आता मलाही कळेनासे झालेय. मी हल्ली महिलांना विश करणेही बंद केली. माझ्यासाठी रोजचा दिवस महिला दिन आहे.>>
भारतीय सण उत्सवांना नेमकं काय करायचं हे आपल्याला ठावूक असतं. पण, या नव्याने आलेल्या डेज प्रकारांना नेमकं काय करायचं याची गोची होते. असे डेज फक्त सोशल मीडियापुरते मर्यादीत राहतात.

सायो,
<<इतर कोणत्याही दिवसासारखंच आपण जे करण्यासारखं असतं ते करत रहावं. दिवस कोणताही असो.>> अगदी. दुसरं करायचं तरी काय?

पशुपत
<<निदान ज्याना या सगळ्याची जाण आहे त्यानी जरी उपेक्षित , शोषित महिलांसाठी , आपल्या कार्यकक्षेत ठोस कार्यक्रम करायला हवेत.
२. सर्वसाधारण घरांमधे कामाला येणार्या बायकांसाठी प्रत्येकाने जरी काही तरी केले तरी मोठे समाजबदल साध्य होतील.>>
पण, या गोष्टी होत नाहीत. स्वयंसेवी संस्था जे करतात त्यातील बहुतांश पेपरला बातमी येण्यापुरतंच मर्यादीत असतं.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद

शाम्पु, क्रीम, कपडे विकण्याच्या भडिमारात महिना दिन नक्की का साजरा केला जातो व त्याच्यामागे काय इतिहास आहे हे कुणालाच माहित नाही होत.

जरा ८ मार्च चा इतिहास निदान विकिपिडियावर धुंडालला तरी ह्या दिनाचे महत्त्व कळेल.

स्त्रिया कशा मेहनती, किती किती काय काय सोसून घरदार नोकरी काम करतात वगैरे गोष्टींचा महिला दिनाशी काही एक संबंध नाही. कॉर्पोरेट मार्केटींग बिग इंडस्ट्रीज ने मूळ हेतू लपवुन आपल्या वस्तू विकण्यासाठी महिलांचे महिमामंडन सुरु केल्याने महिला दिन म्हणजे बैलपोळाची महिला आवृत्ती असल्यासारखे सगळ्यांना वाटते.

हेला,
खरंय, महिला दिन का साजरा केला जातो, हे फारसे कोणाला माहिती नाही. ते कोणी जाणून घ्यायचा प्रयत्नही करीत नाही. त्याला उत्सवी स्वरुप दिलं गेलंय, असं वाटतं.

महिला दिन
प्रेम दोन
आई विषयी प्रेम व्यक्त करायचा दीन
वडील ना विषयी प्रेम व्यक्त करायचा दीन
ही ऐक formality Ashe .
स्त्री आणि पुरुष हे ऐकमेकावार अवलंबून आहेत .
आता पर्यंत स्त्रियां वर अन्याय झाले त्यांच्या मताला किंमत दिली गेली नाही ( ३०० वर्ष जास्तीत जास्त प्राचीन काळी स्त्री जोडीदार nivdu शकत होती)
स्त्री आणि पुरुष समान आहेत त्यांचे अधिकार समान आहेत हे मत योग्य आहे .
दोघे ही स्वतंत्र व्यक्ती आहे त्यांचे स्वतंत्र विचार आहेत हे पण मान्य .
कायदे सुधा समान गुन्ह्यासाठी समान शिक्षा देणारे आसावेत हे सुधा मान्य असायला हवे .
जेव्हा आपण समान अधिकार कुटुंबात वापरतो तेव्हा त्याच लिमिट हे कुटुंब आसात बाहेरची व्यक्ती येते तेव्हा कुटुंब म्हणून स्त्री पुरुष वेगळे व्यक्ती नसतात
जसं कंसात ३÷४) multiplay by ४ आसात तेव्हा कंसा मधील बेरीज वेगळी आस्ते आणि कंस बाहेरची वेगळी .
हा कंस म्हणजेच कुटुंब आसत

महिला दिन, मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेन्टाईन डे वगैरे सगळे दिवस मार्केटींगसाठी उपयुक्त आहेत, बाकी त्याला काही किंमत नाही. उद्या भारतात सेंट पॅट्रिक डे साजरा व्हायला लागला तरी आश्चर्य वाटणार नाही.

मान्य आहे की याचे मार्केटिंग केल्या जाऊन नसता फायदा घेतल्या जातो.

पण त्याला काही किंमत नाही, त्याचा काहीच फायदा होत नाही हे सुध्दा बरोबर नाही.

वेळ लागेल, पण होते जागृती सावकाश का होईना.

Pages