एक संध्याकाळ

Submitted by द्वादशांगुला on 20 January, 2018 - 03:48

आज शनिवार होता. मनुला छान रिलॅक्स वाटत होतं, डोक्यावरचं ओझं गेल्यासारखं. कित्येक आठवड्यांनी तिनं विकेंडला घरी काम आणलं नव्हतं. काल ऑफिसमध्ये जादा वेळ बसून तिनं काम पूर्ण केलेलं होतं.तिच्या विक्षिप्तपणामुळे तिला कोणी टोकलंही नाही. ठरवलंच होतं तिनं, काहीही झालं तरी हा व्याप घरी न्यायचा नाही. त्यामुळे तिला दोन दिवस आराम होता . स्वतःच्या हुशारीवर खुश होती ती .

संध्याकाळचे आठ वाजले असावेत. तिच्या घरातलं इथे राहायला येतेवेळी आईने गिफ्ट केलेलं घड्याळ बंद पडलं होतं. ती ते रिपेअर करून आणणं गेल्या आठवड्यापासून पुढे ढकलत होती. तिनं रीमोटचं बटन दाबून टीव्ही ऑफ केला. ती सोफ्यावरून उठली. छानपैकी आळस दिला. सवयीनं घड्याळाकडे पाहिलं अन् बंद असल्याचं लक्षात येताच जीभ चावली. तिला काॅफीची तलफ आली होती. मनु किचनमध्ये गेली. फॅन सुरू केला. पाणी तापवायला ठेवलं. काॅफी बनवता बनवता किचनमध्ये मख्ख चेहर्याने तिच्याकडे पाहत असलेल्या तिच्याशी बोलू लागली.

" काय गं काॅफी नकोच असेल तुला!
तुझ्या आवडीचा चहा काही मी बनवून देणार नाही हं!!
ओ बाईसाहेब ...... आळस झटका, उठा, चहा का काय बनवा स्वतःसाठी अन् कीचनचा वरचा लाॅफ्ट साफ करा. जळमटं झालीयेत नुस्ती....."

मनु वाफाळती काॅफी घेऊन डायनिंग टेबलवर चेअर ओढून बसली. तिला अजूनही शांत पाहून मनु तिची मरगळ घालवण्यासाठी उत्साही स्वरात म्हणाली,

" काय गं रागवलीस? आज छान पोस्ट वाचली. भूताबद्दल. थांब तुला ऐकवते....."

ती बेडरूममध्ये गेली . चार्जिंगला लावलेला फोन घेतला अन् फेसबुक ओपन करून ती पोस्ट शोधता शोधता किचनमध्ये परत आली.
"हं ऐक-
' भूत बित काही नसतं. सगळे मनाचे खेळ. लहान मुलांना घाबरवायला पूर्वी भूताच्या काल्पनिक संकल्पनेचा उदय झाला. मग कालांतराने मोठ्यांतही याची दहशत बसली. आपलं मन एक चित्रकार असतं. कोणी काही विषय सांगितला की त्यावर स्वतःच्या मतांचं, कल्पनांचं , विशेषणांचं आरोपण करतं. यालाच साध्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे बढवून चढवून सांगणं. मग काय भूत हा गमतीत गमतीत उदयाला आलेला विषय मानवी समाजात आपली पाळंमूळं रूतवून कधी बसला, कळलंच नाही. याचं कारण म्हणजे वाढलेली भोंदूगिरी आणि दैववाद. हे खरतर सारं थोतांड आहे. धादांत खोटं आहे.'

कसा वाटला लेख?"

उत्तरादाखल पंख्याला उलटी लटकलेली ती मनुकडे बीभत्स चेहर्याने अन् कुत्सित नजरेने पाहून हवेत विरून गेली. नि हवेत गारवा पसरला. मनु शांतपणे काॅफी पिऊ लागली.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

बापरे... तुमच्या कथा म्हणजे शेवटला कलाटणी असते जबरी.

एक सज्जेस्ट करू का - शेवटच्या या दोन ओळी काढल्यात तर आणखी इफेक्ट येईल. -

नि हवेत गारवा पसरला. मनु शांतपणे काॅफी पिऊ लागली.

धन्यवाद च्रप्स.. Happy

एक सज्जेस्ट करू का - शेवटच्या या दोन ओळी काढल्यात तर आणखी इफेक्ट येईल. -
नि हवेत गारवा पसरला. मनु शांतपणे काॅफी पिऊ लागली.>>> खरंतर कथा लिहिताना मला या दोन ओळी टाकाव्या की नाही वाटत होतं, पण तेव्हा मी वाचकाच्या दृष्टीनं पुन्हा एकदा वाचली. तेव्हा लक्षात आलं ते असं -
मनु ही जाॅबला जाणारी रूमीसोबत रूम शेअर करून राहणारी मुलगी आहे. ती रूमीसोबत नाॅर्मली वागते, एखाद्या फ्रेन्डसारखी. क्लायमॅक्सला जेव्हा कळतं की एक भूतच तिच्यासोबत राहतंय तेव्हा यावर मनुची रिअॅक्शन गरजेची होती. नाहीतर मनु याला घाबरते, का तिच्या खर्या रूमीच्या वेशात भूतानं ठाण मांडलेलं असतं, का मनुही भूत असते हा प्रश्न अनुत्तरीत राहिला असता. परिणामी , शेवट तुटक वाटला असता.
या शेवटामुळे मनु त्या भूतासोबत किती इझीली राहतेय आणि हे सारं तिच्या किती सवयीचं आहे, हे दिसून येतं.

च्रप्स पुन्हा एकदा धन्यवाद- प्रामाणिक प्रतिसादाबद्दल आणि मनापासून गोष्ट वाचल्याबद्दल. Happy

Climax भयानक होता
घरात एकटा होतो म्हणुन सहज माबो वार हा लेख वाचायला घेतला
शेवटच वाक्य वाचलं तस घरातली वीज बंद पडली

भयानक

भीती वाटतेय अत्ता कारण अख्या घरात पसरलेल्या काळोखात एकटा सापडलोय

अक्की, बाप रे ! आणीबाणीचीच वेळ आली म्हणायची. Happy जपून रहा. जपून म्हणजे मंत्र जपून. एखादे गाणे मोठ्याने गायल्यास जाते भीती. ( सेल्फ एक्सपीरियंस) Happy

बाकी तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद . Happy

धन्स द्वांदशांकुला

घरात अंधारया जागेत असतांना आपण पटकन आपले डोळे बंद करतो कारण

कारण ते भुत आपल्याला जिवाशी मारेल यापेक्षा ते भुत आपल्याला दिसेल याचीच जास्त भीती वाटते [माझ पर्सनल मत].

धन्स द्वांदशांकुला

घरात अंधारया जागेत असतांना आपण पटकन आपले डोळे बंद करतो कारण

कारण ते भुत आपल्याला जिवाशी मारेल यापेक्षा ते भुत आपल्याला दिसेल याचीच जास्त भीती वाटते [माझ पर्सनल मत].

मस्तच आहे कथा. शेवट मस्त. अशीच एक शनिवारची संध्याकाळ. रूम मध्ये एकटाच असताना हि पोस्ट वाचली. भिती तर वाटली नाही पण कॉफीची तल्लफ मात्र झाली आहे.

अक्की,
घरात अंधारया जागेत असतांना आपण पटकन आपले डोळे बंद करतो कारण
कारण ते भुत आपल्याला जिवाशी मारेल यापेक्षा ते भुत आपल्याला दिसेल याचीच जास्त भीती वाटते >>>>> मताशी सहमत . भूत म्हटल्यावर आपल मन चित्रविचित्र भूताचे चेहरे आठवू लागतं. आणि भूत कसं दिसत असेल याचा विचार करून डोळ्यांसमोर येणारे भूताचे चेहरे नकोसे वाटू लागतात. हे चेहरे आठवण्यात चित्रपट , अॅड यांचा प्रभाव असतो बरेचदा. हे असं सेम टू सेम आपल्याला दिसलं तर , घडलं तर या विचाराने ते घडणं नकोसं वाटू लागतं अन् आपण डोळे गच्च मिटून घेतो. त्यानं थोडंसं हायसं वाटतं आपल्याला.

द्वांदशांकुला>>>>> =-० माझ्या ( टोपण) नावाची पूरी चिपाडंच केलीत की.... . . Happy Happy

द्वादशांगुला = संस्कृतात बारा बोटांची व्यक्ती.
द्वांदशांकुला= संस्कृतातच बारा कुळांची व्यक्ती. Happy

असो.

धन्यवाद अभिषेक. Happy

रूम मध्ये एकटाच असताना हि पोस्ट वाचली. भिती तर वाटली नाही >>>>>बडी हिम्मत है आपमें . Wink

पण कॉफीची तल्लफ मात्र झाली आहे.>>> छान. काॅफी पिता पिताच टाईप करतेय मीही. Happy
आणि कथा टाईप करतानाही काॅफीच पित होते..... म्हणून तिच काॅफी उतरलीय कथेत. Wink

mi gharat ektich aste

kissa asa ki ekdivas mi majha belt shodhat hote sagli kapata palthi ghatli.... achanak ek drawar sulll kan open jhala... mhanje pudhe ala apoaap!

tyat majha belt hota...

2 min mi stabdha jhale... mag mhanale jorat "Thanks yar itki kalji kuni nai ghetli"

ani office la nighun gele.

उत्तरादाखल पंख्याला उलटी लटकलेली ती मनुकडे बीभत्स चेहर्याने अन् कुत्सित नजरेने पाहून हवेत विरून गेली. >>>> खुप घाबरले.