अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथे पाल किंवा झुरळ असावी बूट फेकून मारला त्याचा ठसा उमटला दिसतोय....
असे अशरीरी आत्म्याची भौतिक चिन्हे कशी दिसणार?

मानव पृथ्वीकरांच्या पोस्ट्स Lol

अरे हा धागा आता खूपच इंटरेस्टिंग झाला आहे. उगीच ऐकीव किस्से टाकून खोटं खोटं घाबरण्यापेक्षा असं घटना /प्रसंगांचं विश्लेषण करून लॉजिकल conclusion काढलं तर काही अर्थ आहे. नाही तर सुपर हिरो बोकलतच्या कथा वाचाव्यात. त्या भन्नाट असतात.

या धाग्यावरची अजून एक मजा मला कळत नाही, की कोणी तरी काका, मामा, शेजाऱ्यांचा भाचा, मावशीची नणंद असे भलत्या लोकांचे किस्से टाकतात आणि उरलेले लिहितात ' अजून येऊ द्या' Lol हे म्हणजे पंगतीत जिलब्या वाढल्यासारखं झालं की Proud अमानवीय प्रसंग दुर्मिळ सोडा, पण हजारातल्या एखाद्याच्या आयुष्यभरात एखादी घटना होत असेल, मग अजून येऊ द्या काय Lol बरं ती घटना पण अर्ध्या वेळा लॉजिकल विचार करून निकालात निघू शकते.

स्वस्ति, तू लिहिलेली शक्यता खूपच लॉजिकल आहे

कोणाची girlfriend वगैरे येते का छडा लावा. केसांचा गुंताही सुटेल>>> स्वस्ति, जेंव्हा केसांबद्दल कळले तेव्हा हाच प्रश्न मी ही विचारला होता. पण असे काही नाहीये, निदान अजून तरी असे कळले☺️

फोटो पाहून असं वाटलं की चिखलात माखलेला फुटबॉल वगैरे कुणितरी तिथे टप्पा टप्पा खेळला असेल
छाप तसे वाटतायत. चुभूद्याघ्या.

पुराव्यादाखल दिलेल्या फोटोंची सत्यासत्यता पडताळण्यासाठी त्या स्थळाला भेट द्यावी इथे टीव्ही चॅनेलगत चर्चा करू नये!

दक्षिणा, तू धाग्याची मालकीण आहेस जबाबदारी तुझी! Wink

पुढील भुतांची भूतकथा येऊ द्या!

भुतांच्या दुर्दैवाने मला स्वतःला भुताचा अनुभव नाही.

परंतु एकदा पावसात रोह्याहून पुण्याला टेम्पो ट्रॅव्हलरने जात असताना आमच्या गाडी समोर प्रचंड तेजाचा लोळ केवळ १० फुटांवर पडताना बघितलेला. आमची गाडी १-२ सेकंदात तिथे पोहोचली आम्ही ती जागा ओलंडली आणि प्रचंड आवाज आला मागे हलकासा धूर दिसत होता झाडीत.. तेंव्हा लक्षात आले ती वीज पडली होती आम्ही काही सेकंदांमुळे बचावलो होतो...
ह्याला अमानविय म्हणता येईल का?

बॉलीवुडात कित्येक नट्या पुर्वापार बिजल्या गिरवत आहेत Lol>> Lol

दुर्दैवाने एकही बॉलीवूड नटी तेंव्हा नव्हती समोर त्या कोसणार्‍या पावसात !! Wink

कोसणार्‍या पावसात>>> ओके. पाउस होता म्हणजे वीजेचा लोळ असावा. हे भुताटकी सदरात बसत नसलं तरी जावेद म्हणतात ते बरोबरच आहे की मानवाला वीजा कोसळवता येत नाहीयेत अजुन तरी. म्हणजे हे अमानवीय आहे.

काय म्हणता? बॉलीवुडात कित्येक नट्या पुर्वापार बिजल्या गिरवत आहेत Lol

कित्ता गिरविल्यासारख्या कि ते नारदाचे चंद्रिका ऑ ऑ ऑ चंद्रिका उं उं उं सारखे गिरमीट ........

Thanda chlel fakt tya sobat tucha kahi kissa asel thararak tar dya khup divas zhale vachla nahi

>> दक्षिणा जी तुम्ही माधुरी दीक्षित सारख्या दिसता बरं.
माधुरी दीक्षित ह्या दक्षिणा जी सारख्या दिसतात असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?

दक्षिणा जी तुम्ही माधुरी दीक्षित सारख्या दिसता बरं.>>> सुरवातीला जेव्हा मी 2g नेट वापरायचो तेव्हा दक्षिणाजी यांचा फोटो लोड व्हायला वेळ लागायचा, ब्लर फोटोमध्ये त्या माधुरी दिक्षितच वाटायच्या.नंतर 4g नेट आलं तेव्हा फोटो व्यवस्थित दिसायला लागले. तोपर्यंत मी याना माधुरी दिक्षितच समजायचो

बोकलत you are first time right and agreed with someone. thanks to you.
दक्षिणा जी I am sorry if it hurts you.

Pages