अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

@उनाडटप्पू 'अतीन्द्रिय लोक : गोविन्द प्रसाद श्रीवास्तव' खूप छान पुस्तक आहे हे. अशी अजून काही पुस्तके आहेत का? आपण नावे सांगू शकता का?

@उनाडटप्पू - नाही वाचलेले....

आता Google केले तर ही माहिती सापडली.

गूढ भारताचा शोध. (A Search in Secret INDIA). मूळ लेखक : पॉल ब्रन्टन. अनुवाद : मधुकर सोनावणे.

हेच आहे का ते पुस्तक?

खरं म्हणजे आपण ज्याला विज्ञान म्हणतो त्याचे नियम भौतिक जगाला धरुन आहेत पण काही घटणा या अध्यात्मिक नियमाला धरून घडतात त्याला आपण चमत्कार म्हणतो.. मूळात तो चमत्कार नसून अध्यात्माचे विज्ञान असते.

अध्यात्म आणि चमत्कार यांचा काय संबकाय? आणि विज्ञान ही संज्ञा वापरू नका. हवं तर आधी विज्ञान कशाला म्हणता येतं, त्या अटी/ विज्ञानाचे गुण समजून घ्या.

अध्यात्म्याचे विज्ञान असते तसेच विज्ञानाचे अध्यात्मही असते.
उदाहरण संगणक, त्याचे वाहन माउस म्हणजेच उंदीर.
http://www.life1o1.com/god-ganesha-a-computer/

https://www.speakingtree.in/blog/was-ganesha-the-ancient-computergod

माझ्या मित्राला काल आलेला अनुभव, रादर हल्ली रोजच येतोय .

माझ्या ऑफिसातील एक मित्र, त्याच्या ईतर चार मित्रांसोबत दिड महीन्यापुर्वी नविन रूमवर शिफ्ट झाला. सुरुवातीला काही जाणविले नाही त्यांना पण गेल्या १५ दिवसांत घरभर खुप सारे केस पडलेले दिसतात असे सांगत होता अन काल सकाळी वर सिलींगवर चपल्लांचे ठसे दिसले, जे पुर्वी तिथे नव्हते, तसेही छतावर उलटे चप्प्लांचे ठसे असे अचानक कसे उमटु शकतात तेच कळत नाहीये त्यांना, अजुन तरी केसांचा कचरा सोडल्यास ईतर काही त्रास नाहीये असे सांगत होता .

@VB
रामरक्षा म्हणायला सांग.
सगळ्यांनी एकत्र मोठ्या आवाजात म्हटली तर उत्तम

एक मित्र + त्याचे ४ मित्र
गेला बाजार चांगले ५ फोन कॅमेरे सोबत असताना रेकॉर्ड करायचे की चार भिती + एक छत
हां का ना का
आलेच भुत कुठल्या फ्रेम मध्ये तर मग काय मज़्ज़ाच मज़्ज़ा !

बिचारा कमजोर दिलवाला कोण असेल तर अटैक बिटैक यायचा ....

रामरक्षा म्हणायला सांग.
सगळ्यांनी एकत्र मोठ्या आवाजात म्हटली तर उत्तम>>>> सगळे सौंदइंडियन आहेत सगळे, ते कसली रामरक्षा म्हणतायेत. मी त्यांना सांगितले घरमालकाशी बोलायला , बघू काय करतात.

<<<<फोटू पाठवायला सांगा कादून, मांत्रिक सुचवू चांगला.>>>> फोटो दिलाय त्यांनी कायप्पावर, तो इकडे देतीये, झूम करून बघितले तर दिसेल

IMG-20190305-WA0000.jpg

माझ्या ऑफिसातील एक मित्र, त्याच्या ईतर चार मित्रांसोबत दिड महीन्यापुर्वी नविन रूमवर शिफ्ट झाला. सुरुवातीला काही जाणविले नाही त्यांना पण गेल्या १५ दिवसांत घरभर खुप सारे केस पडलेले दिसतात असे सांगत होता अन काल सकाळी वर सिलींगवर चपल्लांचे ठसे दिसले, जे पुर्वी तिथे नव्हते, तसेही छतावर उलटे चप्प्लांचे ठसे असे अचानक कसे उमटु शकतात तेच कळत नाहीये त्यांना, अजुन तरी केसांचा कचरा सोडल्यास ईतर काही त्रास नाहीये असे सांगत होता .>>>>

येथे द्वादशांगुला या लेखिकेची ब्युटीपार्लर नावाची कथा आहे. तिच्यातल्यासारखं काही असेल हे. Proud

हा छताचा फोटो आहे?
छताचा फोटो असा असतो?
आपल्या छताचा फोटो काढून या फोटोशी तुलना करून पहा बघु.

मानव, योग्य शब्द सुचला/आठवला नाही, खरेतर अजूनही नाही, पण तरीही जे आहे त्याचा फोटो तरी टाकला की ☺️

<<<येथे द्वादशांगुला या लेखिकेची ब्युटीपार्लर नावाची कथा आहे. तिच्यातल्यासारखं काही असेल हे. >>>> काय आहे त्यात, मी वाचलीये की नाही ते आठवत नाही मला

Submitted by VB on 5 March, 2019 - 15:25

माझ्या मित्राला काल आलेला अनुभव, रादर हल्ली रोजच येतोय .

माझ्या ऑफिसातील एक मित्र, त्याच्या ईतर चार मित्रांसोबत दिड महीन्यापुर्वी नविन रूमवर शिफ्ट झाला. सुरुवातीला काही जाणविले नाही त्यांना पण गेल्या १५ दिवसांत घरभर खुप सारे केस पडलेले दिसतात असे सांगत होता अन काल सकाळी वर सिलींगवर चपल्लांचे ठसे दिसले, जे पुर्वी तिथे नव्हते, तसेही छतावर उलटे चप्प्लांचे ठसे असे अचानक कसे उमटु शकतात तेच कळत नाहीये त्यांना, अजुन तरी केसांचा कचरा सोडल्यास ईतर काही त्रास नाहीये असे सांगत होता . > फारच भयानक .

येथे द्वादशांगुला या लेखिकेची ब्युटीपार्लर नावाची कथा आहे. तिच्यातल्यासारखं काही असेल हे. Proud > हे कुठे वाचायला मिळेल ?

बापरे छतावर पायाचे ठसे. रात्री 3 वाजता ते भूत घरभर फिरत असणार ,पाय छताकडे डोकं खाली म्हणून ते केस घरभर पडत असणार. मी लहान असताना बाबांची बदली होऊन नवीन घरी राहायला गेलो होतो तेव्हा पण असं एक भूत रात्री तीन वाजता घरभर फिरायचं. एकदा मी पाणी प्यायला उठलो तेव्हा बघितला त्याला फिरताना, लांबलचक केस जमिनीपर्यंत आले होते. मी त्याच्याजवळ गेलो तर दात विचकाऊन, मुंडी गरागरा फिरवून, डोळे मोठे करून मला घाबरवायला लागला. मी पळत आतल्या खोलीत गेलो भुताला वाटलं मी घाबरलो, मी लगेच उशी घेऊन बाहेर आलो त्या भुताच्या सटासट दोन कानाखाली वाजवल्या, त्याची केसं उशीच्या दोन टोकांना बांधली आणि त्याला बोललो जास्त शहाणपण करू नको मी झोके घेतोय मला तोंडाने फुकर मारून वारा घाल. कित्येक दिवस हा असा प्रकार सुरू होता.

अजून एक उपाय आहे.

पेस्ट कंट्रोल करवून घ्यावे.

कोळी/पाल/डास दिसला की घे चप्पल आणि मार फेकून या पेक्षा चांगला पर्याय आहे तो.

कोळी/पाल/डास दिसला की घे चप्पल आणि मार फेकून या पेक्षा चांगला पर्याय आहे तो.

Submitted by मानव पृथ्वीकर on 5 March, 2019 - 23:20 >>>

कदाचित तुम्ही असे करत असाल , म्हणुन काही सगळेच असे वागत नाहीत Proud

मानव यांनी सांगितल्याप्रमाणे बॅचलर मिळांपैकीच कोणीतरी असे केलेले असावे आणि आपले नाव येऊ नये किंवा बघूया जरा गम्मत म्हणून गप्प बसला असावा. @VB पुढचे अजून अपडेट्स निळाले तर येथे लिहा. पुरावा असलेले अमानवीय किस्से वाचायला आवडतील.

Pages